Subscribe Us

header ads

February 4 - Day of Special (Dinvishesh)

February 4 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 4: दिनविशेष



महत्त्वाच्या घटना:

जागतिक कर्करोग दिन

दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक आरोग्य संस्था (WHO) याच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक कर्करोग दिन’ पाळला जातो.


4 फेब्रुवारी 1670 रोजी ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला "असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक हाडशी सुभेदार होते व महाराजांचे बालपणीचे सवंगडी पण होते. तानाजी चा जन्म 1626 मध्ये गोडवली सातारा जिल्ह्यात झाला मृत्यू सिंहगडावर पुणे जिल्ह्यातील या ठिकाणी झाला. तानाजींचा मृतदेह किल्ल्यावरून ज्या मार्गाने कोकणात नेला त्या मार्गाला मढे घाट असे म्हणतात. तानाजी मालुसरे यांचे स्मारक रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आंबेशिवथर या गावांमध्ये आहे. सिंहगडाची लढाई 1670 रोजी झाली. ही लढाई तानाजी मालुसरे आणि सिंहगडाचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड यांच्यात झाली. तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिपत्यार्थ कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले.

            तानाजी मालुसरे

4 फेब्रुवारी 1789 रोजी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.

X X

4 फेब्रुवारी 1922 रोजी भारतात बिहार राज्यात चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी 3 दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले. चौरी चौरा हे भारतातील उत्तर प्रदेशातील गोरखपुर जिल्ह्यातील एक शहर आहे. या शहराने 4 फेब्रुवारी 1922 रोजी घटना पाहिली जेव्हा शेतकऱ्याच्या मोठ्या जमावाने पोलीस स्टेशनला आग लावली आणि 22 पोलीस हार झाले. या घटनेचा परिणाम म्हणून महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली.




4 फेब्रुवारी 1936 रोजी शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.


4 फेब्रुवारी 1944 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी "चलो दिल्ली" चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच केले. जेव्हा आझाद हिंद फौज ने बर्माविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली तेव्हा आझाद हिंद फौजला प्रेरित करण्यासाठी या घोषणाचा वापर केला. 19 मार्च 1943 रोजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची सूत्रे हाती घेण्याचा निर्णय घेतला व पुढे जय हिंद चा नारा देत चलो दिल्लीचा आदेश आपल्या सैनिकांना दिला.



4 फेब्रुवारी 1948 रोजी भारताच्या दक्षिणेकडे असलेला देश श्रीलंका या देशाला स्वातंत्र्य मिळाले.


4 फेब्रुवारी 1961 रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारत सरकारने "भारतरत्‍न" हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान केला. ते एका गाडीचे स्वतंत्र्य सैनिक व महात्मा गांधीचे निकटवर्ती सहकारी होते.  बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले ते या पदावर 14 वर्ष काम केले. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ काळ 23 जानेवारी 1948 ते एक जुल 1962 पर्यंत होता. यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी बंगालमधील बंकीपुर या ठिकाणी झाला. उच्च शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते. वैद्यकीय शास्त्रात केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी डॉ. बी सी रॉय यांच्या नावाचा एक पुरस्कार दरवर्षी दिल्या जातो.




X X

4 फेब्रुवारी 2000 या दिवसापासून विश्व कर्करोग दिन पाळल्या जातो.


4 फेब्रुवारी 2003 रोजी युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.


4 फेब्रुवारी 2004 रोजी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक ची स्थापना केली.

                 मार्क झुकेरबर्ग

4 फेब्रुवारी 2004 रोजी नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला. या विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने नामकरण करण्यात आले. तुमचे मूळ नाव सोनेगाव विमानतळ असे होते. या विमानतळाला सध्या इंड्रा ही रडार प्रणाली लावण्यात आलेली आहे अशी प्रणाली लावणारे हे भारतातील पहिले विमानतळ आहे. या नागपूरच्या आकाशातून दररोज 650 विमानांची योजना असतेनागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानीचे शहर असून संत्र्यांसाठी देशात नव्हे तर विदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे.


4 फेब्रुवारी 893 रोजी मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म झाला.

              चिंतामण गणेश कर्वे

4 फेब्रुवारी 1902 रोजी जगातील धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचा जन्म झाला. 1927 मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या 5800 किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या "द स्पिरीट ऑफ सेंट लुईस" या पुस्तकास "पुलित्झर पुरस्कार" मिळाला. त्याचा मृत्यू 26 ऑगस्ट 1974 मध्ये झाला.

             ऑगस्टस लिंडबर्ग

              पुलित्झर पुरस्कार

X X

4 फेब्रुवारी 1917 मध्ये भारतातील शेजारील राष्ट्र पाकिस्तानचे 3 रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 ऑगस्ट 1980 मध्ये झाला.


4 फेब्रुवारी 1938 मध्ये भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ घराण्याचे कथक नर्तक व गुरूवर्य पंडित बिरजू महाराज यांचा जन्म झाला.


4 फेब्रुवारी 1922 मध्ये भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 जानेवारी 2011 मध्ये झाला.


4 फेब्रुवारी 894 मध्ये सुप्रसिद्ध सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अ‍ॅडोल्फ सॅक्स यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1814 मध्ये झाला होता.

                  अ‍ॅडोल्फ सॅक्स

4 फेब्रुवारी 1974 मध्ये भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील सुप्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1894 मध्ये झाला होता.


4 फेब्रुवारी 2001 मध्ये भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू पंकज राय यांचा मृत्यू झाला. भारत सरकारने त्यांना "पद्मश्री" पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांचा जन्म 31 मे 1928 रोजी झाला होता.



4 फेब्रुवारी 2002 मध्ये भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते भगवान आबाजी पालव उर्फ मास्टर भगवान यांचा मृत्यू झाला.



https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-5-day-of-special-dinvishesh.html

👆

February 5 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 5: दिनविशेष



X X





View, Comments and share..... 

Post a Comment

1 Comments