Subscribe Us

header ads

Day of Special (Dinvishesh)- January 2 दिनविशेष: जानेवारी 2

Day of Special (Dinvishesh)- January 2 

दिनविशेष: जानेवारी 2


2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन.


महत्त्वाच्या घटना:

2 जानेवारी 1757 रोजी ब्रिटीश सेनानी क्लाईव्ह व वॅटसन या दोन प्रकरणी सेनानींनी मोठ्या आरमारी काफील यासह कलकत्त्यावर हल्ला करून कलकत्ता काबीज केले व नवाबांच्या फौजेचा पराभव केला. त्यावेळेस घाबरून जाऊन नवाबांनी ब्रिटिशांशी तह केला.


2 जानेवारी 1930 रोजी कायदेभंगाच्या चळवळीचा कार्यक्रम निश्चित करण्याचे अधिकार काँग्रेस कार्यकारिणीने महात्मा गांधीजींना दिले.


2 जानेवारी 1757 रोजी प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.


2 जानेवारी 1839 रोजी लुई दागुएरे यांनी चंद्राचा पहिला फोटो प्रदर्शित केला होता.


2 जानेवारी 1881 रोजी लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.


2 जानेवारी 1885 रोजी पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.


2 जानेवारी 1905 रोजी मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.

2 जानेवारी 1932 मध्ये भारतातील पंजाब राज्यातील अकाली दल या राजकीय पक्षाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 20 ऑगस्ट 1985 रोजी झाला.

2 जानेवारी 1966 रोजी मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना


2 जानेवारी 1942 रोजी दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.


2 जानेवारी 1945 रोजी दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

X X

2 जानेवारी 1954 रोजी राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी 'भारतरत्‍न' पुरस्कारांची स्थापना केली.

                   भारतरत्‍न

https://www.insearchofknowledge.org/2023/10/bharat-ratna-indias-highest-honor-award.html

 👆Open link 


2 जानेवारी 1960 रोजी भारतातील भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील मेरठ या ठिकाणी झाला. त्यांचा मृत्यू 23 फेब्रुवारी 1998 रोजी झाला. त्यांनी कसोटी आणि 32 एक दिवशी आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. बांगलादेशच्या लीग क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण करताना क्रिकेटच्या बॉलने टेम्पोरल हाडावर आढळल्याच्या तीन दिवसानंतर अंतर्गत रक्तस्त्रावामुळे कोमात गेले आणि त्यांचा मृत्यू बांगलादेश मधील ढाका या ठिकाणी झाला. त्यांनी 1980 ते 81 मध्ये रणजी करंडक क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी एकूण 87 सामन्यांमध्ये 53.91 च्या सरासरीने 6300 धावा केल्या. पाच द्वी शतकासह 22 शतके ठोकली. दिल्ली येथे 1994 95 मध्ये हिमाचल प्रदेश विरुद्ध त्यांच्या कारकिर्दीस सर्वाधिक 312 धावा केल्या. 1994 95 च्या मोसमात त्यांनी आठ सामन्यांमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले त्यापैकी तीन जिंकले आणि पाच अनिर्णित रमण लांबा यांचा सर्वोच्च स्कोर 320 हा 1987 ते 88 मध्ये दुलीप ट्रॉफी फायनल मध्ये उत्तर विभाग विरुद्ध पश्चिम विभागासाठी होता.


2 जानेवारी 1985 रोजी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.


2 जानेवारी 1989 रोजी मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या


2 जानेवारी 1991 रोजी तिरुअनंतपुरम च्या विमानतळाला आंतराष्ट्रीय चा दर्जा देण्यात आला.


 2 जानेवारी 1998 रोजी डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली.


2 जानेवारी 1999 रोजी अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये 14 इंच टर शिकोगामध्ये 19 इंच हिम पडला. शिकागोचे तापमान -‌‍13°F इतके कमी झाले.


2 जानेवारी दोन हजार रोजी संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


2 जानेवारी 2000 रोजी पनामा सरकारने 85 वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.


2 जानेवारी 1878 रोजी भारताचे पद्मभूषण पुरस्कार विजेते मन्नत्तु पद्मनाभन यांचा जन्म झाला.


2 जानेवारी 1905 रोजी भारताचे पद्मभूषण पुरस्कार विजेते जैनेंद्र कुमार यांचा जन्म झाला.


2 जानेवारी 1920 रोजी अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचा जन्म झाला तर त्यांचा मृत्यू 6 एप्रिल 1992 मध्ये झाला. 


 2 जानेवारी 1932 रोजी  अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म झाला तर त्यांचा मृत्यू 20 ऑगस्ट 1985 रोजी झाला.

X X

2 जानेवारी 1940 रोजी अमेरिकी-भारतीय वैज्ञानिक एस. आर.श्रीनिवास वर्धन यांचा जन्म झाला.


2 जानेवारी 1959 रोजी क्रिकेटपटू आणि खासदार किर्ती आझाद यांचा जन्म झाला.


2 जानेवारी 1960 रोजी क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म झाला तर त्यांचा मृत्यू 23 फेब्रुवारी 1998 रोजी झाला.


               क्रिकेटपटू रमण लांबा

2 जानेवारी 1316 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी – दिल्लीचा सुलतान यांचा मृत्यू झाला.

2 जानेवारी 1935 रोजी स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1886 रोजी झाला होता.

2 जानेवारी 1944 रोजी अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन झाले त्यांचा जन्म 23 एप्रिल एकूण 1873 मध्ये झाला होता. 


           महर्षि विठ्ठल रामजी शिंदे

https://www.insearchofknowledge.org/2023/01/vitthal-ramji-shinde-social-and.html

👆 Open link 

X X

2 जानेवारी 1952 रोजी व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन झाले.

2 जानेवारी 1989 रोजी मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म 12 एप्रिल 1954 मध्ये झाला होता.


2 जानेवारी 1999 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन झाले.

2 जानेवारी 2015 रोजी भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन झाले.


            शास्रज्ञ वसंत गोवारीकर 


XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/january-1-day-of-special-dinvishesh.html

👆

Day of Special (Dinvishesh) -January 1 

दिनविशेष: जानेवारी 1

XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/january-3-day-of-special-dinvishesh.html

👆

Day of Special (Dinvishesh) -January 3 

जानेवारी,3- दिनविशेष

XX



X X

View, comments and share....



Post a Comment

1 Comments