Sir Ratan Naval Tata: Indian industrialist, philanthropist and former chairman of Tata
रतन टाटा: टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष
28 डिसेंबर: जन्मदिन
9 ऑक्टोबर: स्मृतिदिन
रतन टाटा यांचा जन्म मुंबईत दि. 28 डिसेंबर 1937 रोजी झाला.उच्च शिक्षणासाठी कॉर्नेलो येथे प्रयाण 1952 मध्ये केले.
अमेरिकेत 1960-62 या काळात ऑर्किटेक्ट म्हणून नोकरी केली. 1962 मध्ये भारतात परत आले. टाटा उद्योगसमूहात दाखल झाले. पहिली दोन वर्षे 'टिस्को', जमशेदपूर येथे शॉपफ्लोअरचे काम पाहिले.1963 या एका वर्षासाठी ऑस्ट्रेलियात वास्तव्य केले. तेथे टाटा ग्रुपचे काम पाहिले.
ऑस्ट्रेलियातून परतल्यावर कापड उद्योगाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर 'नेल्को' कंपनीची धुरा सांभाळली.
1980 च्या दशकात तीन वर्षे 'एअर इंडिया'चे अध्यक्षपद भूषविले.
1983 टाटा उद्योगसमूहासाठी 'टाटा स्ट्रॅटेजिक प्लान' तयार केला.
1988 'टेल्को'च्या अध्यक्षपदी नेमणूक. 'टेल्को'त ऐतिहासिक संप.
1991 टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून जेआरडी टाटांकडून सूत्रे हाती घेतली.
1997 'जेआरडी क्यूव्ही' पुरस्कारांना सुरुवात.
1999 'इंडिका' मोटरकारचे भारतीय बाजारपेठेत पदार्पण.
2000 'टेटली' ही चहा कंपनी विकत घेतली.
2002 करिगएज एंटरटेनमेंट ही कंपनी सुरू केली.
X X
विविध पदे, जबाबदाऱ्या, पुरस्कार, मानसन्मान :
1962 मध्ये रतन टाटांनी आपली टाटा उद्योगसमूहातील वाटचाल सुरू केली. पुढे 1991 मध्ये ते टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष झाले. 'भारतरत्न' जेआरडी टाटांसारख्या व्यक्तीनंतर एका महान उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रतन टाटांवर आली.
याखेरीज विविध नात्यांनी, विविध अधिकारांनी ते अन्य अनेक पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळीत असतात.
X X
महत्वपूर्ण जबाबदारी:
1. अध्यक्ष - गुंतवणूक आयोग, भारत सरकार.
2. सदस्य - पंतप्रधानांचे व्यापार व उद्योग मंडळ.
3. सदस्य - राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा मंडळ.
4. सदस्य - नॅशनल मॅन्युफॅक्चरिग कम्पिटिटिव्हनेस कौन्सिल.
5. अध्यक्ष - गुंतवणूक मंडळ, दक्षिण आफ्रिका सरकार.
6. सल्लागार - ब्रिटिश सरकारचे आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार मंडळ.
7. सदस्य -सिंगापूर आर्थिक विकास मंडळाची आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती.
8. सदस्य - न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज संचालक मंडळ, सल्लागार समिती.
9. सदस्य - मित्सुबिशी कॉर्पोरेशनची आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती.
10. अध्यक्ष - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स - बंगळूर.
11. अध्यक्ष - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च (टीआयएफआर) मुंबई.
12. सदस्य - रॅण्ड कॉर्पोरेशन.
13. सदस्य - कॉर्नेल विद्यापीठ, ओहायो स्टेट विद्यापीठ, दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ.
14. सदस्य - बिल व मिलिंडा गेटस् फाउंडेशन-भारतातील एड्ससंबंधी.
15. सदस्य - जागतिक एचआयव्ही व एड्स मंडळ.
16. अध्यक्ष - रॅण्ड सेंटर सल्लागार मंडळ एशिया-पॅसिफिक धोरणासंबंधी.
X X
सन्मान आणि पुरस्कार:
1. भारतीय प्रजासत्ताकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात 26 जानेवारी 2000 या दिवशी भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' या बहुमानाने सन्मानित केले.
2. 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'ने अलीकडेच त्यांना मानद डॉक्टरेट दिली आहे. तर 'फॉर्च्यून' या मासिकाने नोव्हेंबर 2007 मध्ये जगाच्या व्यापार- उद्योग क्षेत्रातील सर्वांत शक्तिशाली 25 उद्योजकांच्या यादीत समावेश केलेला आहे.
3. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बँकॉक तसेच युनिव्हर्सिटी ऑफ वॉसिक यांनीही त्यांना विज्ञान शाखेची मानद डॉक्टरेट बहाल केली आहे.
4. इ. स. 2003 मध्ये त्यांना विश्वविख्यात 'अर्नेस्ट ॲण्ड याँग आंत्राप्रिन्युअर ऑफ द इयर' हा अत्यंत मोलाचा मानला जाणारा पुरस्कार देण्यात आला.
5. महाराष्ट्र सरकारने त्यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार 2007 पुरस्कार देऊन सन्मानित केले.
6. 'यूकेटीआय इंडिया बिझनेस ॲवार्ड 2007'. या पुरस्काराने सन्मानित केले.
7. 26 जानेवारी 2008 या दिवशी भारत सरकारने त्यांना 'पद्मविभूषण' या बहुमानाने सन्मानित केले.
8. 14 फेब्रुवारी 2008 नॅसकॉम ग्लोबल लीडरशीप ॲवार्डने सन्मानित करण्यात आले.
9. 2008 टाइम मॅगझिनच्या 100 प्रभावी व्यक्तींच्या यादीत समावेश त्यांचा समावेश होता.
10. 29 ऑक्टोबर 2008 सिंगापूर सरकारने नागरिकत्व बहाल केले.
11. मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने रतन टाटा यांना डी.लीट ही पदवी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
X X
याखेरीज श्री. रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहात कार्य करायला लागल्यापासूनच्या तीस वर्षांत केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा, निर्णयांचा आणि त्यांच्या पराक्रमांचा वृत्तांत अन्य प्रकरणांतून आलेला आहेच. आंतरराष्ट्रीय स्तरांवरचे काही पुरस्कारच केवळ इथे झलक म्हणून दिले आहेत. इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स यांच्या (दुसऱ्या) विवाहाचे निमंत्रण (आपल्या देशाचे राष्ट्रपती- पंतप्रधान वा अन्य कोणाही व्हीआयपीला नव्हते.) केवळ तीनच भारतीयांना होते. त्यात श्री. रतन टाटा यांचे नाव पहिले होते आणि दुसरे दोघे होते राजपुत्र चार्ल्स यांचे भारतीय 'मित्र' मुंबईचे दोन 'डबेवाले' सर्वश्री रघुनाथ मेदगे व गंगाराम तळेकर! या अल्पशिक्षित, श्रमजीवी डबेवाल्यांची इंग्लंडमध्ये कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, भाषेची, पदाची व अन्य कोणती अडचण होऊ नये म्हणून खुद्द रतन टाटा यांनी या दोघांकडे मोठ्या आत्मीयतेने लक्ष दिले होते. हिथ्रो विमानतळानजीक टाटा उद्योगसमूहाचे मोठे हॉटेल आहे. तिथे भारतीय खाद्यपदार्थ या दोघांना मिळतील याची त्यांनी व्यवस्था केली होती. डबेवाला - इंग्लंडचा राजपुत्र आणि रतन टाटा यांच्या दोस्तीची कहाणी आगळीवेगळीच म्हटली पाहिजे.
X X
टाटा उद्योगसमूहाचा ठळक कालपट:
1. 1868 : जमशेदची नौसेरखानजी टाटा यांनी एक व्यापारी फर्म सुरू केली, तीच टाटा उद्योगसमूहाची मुहूर्तमेढ ठरली.
2. 1874 : 'सेंट्रल इंडिया स्पिनिंग, विव्हिंग ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग' कंपनीची स्थापना केली. अशा प्रकारे टाटा उद्योगसमूहाने वस्त्रोद्योग/ कापड उद्योगात पाऊल ठेवले.
3. 1902 : 'द इंडियन हॉटेल्स कंपनी'ची स्थापना केली आणि त्याद्वारे 'ताजमहाल पॅलेस ॲण्ड टॉवर' या हॉटेलची उभारणी सुरू. हे देशातील पहिले लक्झरी हॉटेल होय. 1903 मध्ये ते सुरू झाले.
4.1907 : 'द टाटा आयर्न ॲण्ड स्टील कंपनी'ची स्थापना आणि देशातील पहिल्या पोलाद कारखान्याची जमशेदपूर येथे उभारणी सुरू. तिथे उत्पादनास 1922 मध्ये सुरुवात झाली.
5.1910 : विद्युतऊर्जा निर्मितीसाठी 'टाटा इलेक्ट्रिक कंपनी'ची सुरुवात.
6. 1911 : 'द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' या संस्थेची बंगळुरात स्थापना. विज्ञानाच्या प्रगत अभ्यासासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली.
7. 1912 : टाटा स्टील कंपनीने आठ तासांची 'शिप्ट' पद्धत सुरू केली. आठ तासांची शिष्ट पद्धत भारतात सुरू करणारी ही पहिलीच कंपनी, अनेक पाश्चिमात्य देशांतील कंपन्यांच्याही पुष्कळ अगोदर टाटांनी हे पाऊल उचलले.
8.1932 : 'टाटा एअरलाइन्स'ची सुरुवात, यातूनच हवाई वाहतूक व्यवसाय भारतात सुरू झाला.
9. 1939 : टाटा केमिकल्स कंपनीची सुरुवात.
10.1945 : 'टेल्को'ची स्थापना (टाटा इंजिनिअरिग ॲण्ड लोकोमेटिव्ह कंपनीचे नंतर नाव टाटा मोटर्स असे झाले.) डैमलर बेंझ या विदेशी कंपनीच्या सहकार्यातून टेल्को उभी राहिली.
11.1952 : पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या विनंतीवरून टाटा उद्योगसमूहाचे सौंदर्यप्रसाधन निर्मिती क्षेत्रात 'लॅक्मे' या कंपनीद्वारे पदार्पण
12. 1954 : 'टेल्को'तर्फे ट्रक्स व वाणिज्य वाहनांची निर्मिती सुरू.
13.1984 : 'टायटन' घड्याळ कंपनीची तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्यातून सुरुवात.
14. 1998 : 'इंडिका' मोटरगाडीचे बाजारपेठेत पदार्पण. संपूर्णपणे भारतात आरेखन केलेल्या, विकसित केलेल्या आणि उत्पादित केलेल्या या 'स्वदेशी' मोटरगाडीच्या रूपाने टाटाचे 'पॅसेंजर कार' क्षेत्रात पदार्पण.
15.2000 : टाटा टी कंपनीने इंग्लंडची 'टेटले' चहा कंपनी घेतली. एका भारतीय कंपनीने आंतरराष्ट्रीय कंपनी घेण्याचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण.
16.2001 : 'टाटा-एआयजी' या कंपनीद्वारे टाटा ग्रुपचे इन्शुरन्स क्षेत्रात यशस्वी पुनरागमन.
17.2002 : विदेश संचार निगम (व्हीएसएनएल) या भारताच्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन सेवा देणाऱ्या कंपनीचे नियंत्रण टाटा ग्रुपने स्वतःकडे घेतले.
18.2002 : 'टायटन' घड्याळ कंपनीने 'एज' ही घड्याळशृंखला बाजारात आणली. 'एज' हे जगातील सर्वांत 'स्लिम' (पातळ) घड्याळ होय!
19. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) दहा कोटी डॉलर्सचा व्यवसाय करून साफ्टवेअर क्षेत्रातील सर्वाधिक व्यवसाय करणारी भारतीय कंपनी ठरली.
20. 2004 : टाटा मोटर्सने दक्षिण कोरियातील डेवू मोटर्स कंपनीचा ट्रकनिर्मिती कारखाना घेतला.
21. टाटा स्टील कंपनीने सिंगापूरच्या 'नॅटस्टील एशिया' या आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठी आर्थिक गुंतवणूक केली.
22. टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसने आपले शेअर्स जनतेसाठी विक्रीस आणले.
23. 2005 : इंडियन हॉटेल्सने न्यूयॉर्कस्थित 'द पेरी' हे हॉटेल घेतले. तसेच 'जिंजर स्मार्ट बेसिक्स' ही हॉटेलशृंखला भारतात सुरू केली.
24. 2007 : इंग्लंडमधील प्रख्यात स्टील कंपनी 'कोरस' फार मोठी किंमत देऊन टाटा स्टीलने विकत घेतली. एवढा मोठा व्यवहार करणारी ही पहिली भारतीय कंपनी बनली. या व्यवहारामुळे टाटा स्टील जगातील सर्वांत मोठी स्टील कंपनी बनली.
टाटा उद्योगसमूहात अनेक कंपन्या आहेत. त्यांतील काही ठळक नोंदीच या कालपटात दिलेल्या आहेत. समूहातील काही ठळक कंपन्यांच्या वैशिष्ट्यांची थोडक्यात माहिती अन्य परिशिष्टांमध्ये दिलेली आहेच.
X X
टाटा उद्योगसमूहातील काही नव्या कंपन्या:
1. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस :
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ही कंपनी आहे. जगाच्या पाठीवरील पन्नासेक देशांतून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे एक लाख तज्ज्ञ आणि अभियंते या कंपनीसाठी काम करीत असतात. टाटा कन्सल्टन्सीतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध प्रगत सेवांची सूची खरोखरच खूप मोठी आहे.
2. टाटा टेलिसर्व्हिसेस :
टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील विविध सेवा पुरविणारी ही कंपनी आहे. त्या अंतर्गत टेलिफोन सेवा, प्रसारमाध्यम व करमणूक सेवा, डाटा व माहिती सेवा इत्यादी सेवा दिल्या जातात. कंपनीची स्थापना डिसेंबर 2002 मध्ये झाली.
X X
3. टाटा कम्युनिकेशन्स :
जागतिक स्तरावर कम्युनिकेशनसंदर्भात काम करणारी ही कंपनी आहे. तीसपेक्षा अधिक देशांत ती कार्यरत आहे आणि चार हजारांहून अधिक तज्ज्ञ- अभियंते तीमध्ये काम करतात.
4. टाटा स्काय :
स्थापना 2004 मध्ये टाटा ग्रुप आणि 'स्टार' यांचा संयुक्त उपक्रम. 140 हून अधिक टेलिव्हिजन वाहिन्यांची प्रसारण सेवा ग्राहकांना ही कंपनी पुरविते.
5. टाटा बीपी सोलर :
सौरऊर्जा वापराबाबत स्थापन केलेली स्वतंत्र कंपनी. सौरऊर्जेची नाना प्रकारची उपकरणे, यंत्रे तयार करते आणि विकते. निर्यातीत आघाडीवर. 'आयएसओ' मिळालेली कंपनी.
या कंपन्यांच्या माध्यमातून काळाच्या गरजेनुसार माहिती तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जाक्षेत्र यांसारख्या क्षेत्रांत टाटा उद्योगसमूहाने दमदार वाटचाल सुरू केलेली आहे. काळाची आणि देशाची गरज लक्षात घेऊन त्याबाबत पुढाकार घेऊन काम सुरू करण्याची टाटा उद्योगसमूहाची परंपराच आहे.
X X
View, comments and share....
0 Comments