Sir Pherozeshah Mehta: Indian Politician and lawyer
सर फिरोजशहा मेहता : भारतीय राजनीतितज्ञ व कायदेतज्ञ
जन्मदिन: 4 ऑगस्ट
स्मृतिदिन: 5 नोव्हेंबर
बालपण आणि शिक्षण:
भारतीय राजनीतितज्ञ व कायदेतज्ञ सर फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845 रोजी मुंबई या ठिकाणी एका पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबात गुजराती भाषा बोलली जात होती.
त्यांच्या वडिलांचे नाव मेरवांजी मेहता हे होते. वडीलाचे जास्त शिक्षण झाले नव्हते पण ते एक उत्कृष्ट मुंबईमधील व्यवसायिक होते. व्यवसायानिमित्त त्यांचा जास्तीत जास्त कालावधी हा कोलकत्ता या ठिकाणी राहत असत. शिक्षण कमी असूनही त्यांच्या वडिलांनी रसायनशास्त्र या विषयाचे पुस्तकाचे गुजराती भाषेत भाषांतर केले होते. तसेच त्यांनी भूगोलाचे सुद्धा पुस्तक लिहिले होते.
फिरोजशहा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मुंबई या ठिकाणी पूर्ण झाले व महाविद्यालयीन शिक्षण इ.स. 1865 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून बी.ए. पर्यंतचे पदवी शिक्षण पूर्ण करून त्यानंतर सहा महिन्यानंतर एम.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. सहा महिन्यात त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे मधून एम ए ची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली ही पदवी मिळवणारे ते पहिले पारशी समाजातील व्यक्ती होते.
युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे चे रूपांतर नंतर मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये झाले. त्यावेळेस त्यांचे प्राचार्य सर अलेक्झांडर ग्रँड हे होते. त्यांनी इ.स. 1868 मध्ये बॅरिस्टर ची पदवी इंग्लंडला जाऊन संपादन केली.
इंग्लंडमध्ये चार वर्षाच्या वास्तव्यात असताना ईस्ट इंडिया असोसिएशनच्या संपर्कात आले आणि तिथून त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनाला सुरुवात झाली. त्यांच्यावर दादाभाई नौरोजींच्या विचारांचा प्रभाव पडला .
X X
मुंबईत वकीलचा व्यवसाय व बॉम्बे असोसिएशन:
मुंबईमध्ये उच्च न्यायालयात 1868 पासून त्यांनी आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात केली. मेहतांनी दादाभाईंच्या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा बॉम्बे असोसिएशन अशी शाखा मुंबईत सुरू केली. गोऱ्या लोकांच्या मिराजदारी विरुद्ध त्यांनी प्रभावी प्रचार केला प्रत्येक प्रश्न हाती घेऊन त्यांनी वकिली बरोबर राष्ट्रीय जागृतीचे ही कार्य केले.
सुरतच्या आंदोलनातून उद्भवलेल्या दंगल फेस मध्ये आरोपींच्या वतीने समर्थपणे उभे राहून फिरोजशहांनी आपली कीर्ती मिळवली.
मुंबई महापालिकेचे अध्यक्ष:
फिरोजशहा मेहता यांना मुंबईतील नागरिक शासनाचे पिता म्हणून ओळखले जात होते, कारण 1982 च्या मुंबई महानगरपालिका विधायक कायद्यावर फिरोजशहांच्या सूचनांची पूर्ण छाप होती. त्यामुळे त्यांना 1873 मध्ये महापालिकेचे अध्यक्ष करण्यात आले.
1878 ते 1880 या तीन वर्षाच्या काळात वृत्तपत्रांची गळचेपी करणारा व्हरनक्युलार प्रेस ऍक्ट आणि ब्रिटिश कापडाला हुकमी बाजारपेठ चालू राहावी यासाठी आयात करातून देण्यात आलेली सूट या दोन प्रश्नावर फिरोजशहानी सनदशीर मार्गाचा अवलंब केला.
त्यामुळे फिरोजशहांची मुंबई महापालिकेच्या अध्यक्षपदी 1884 ते 1885 मध्ये निवड करण्यात आली या पदावर पुन्हा फेर निवड त्यांची 1905 मध्ये झाली.
राजकारणातील महत्त्वपूर्ण कामगिरी:
फिरोजशहा मेहता हे 1872 मध्ये मुंबई महापालिकेचे सदस्य बनले. सलग तीन वेळा ते अध्यक्षही महापालिकेचे झाले. त्यांचे 38 वर्षे मुंबई महापालिकेवर एक हाती वर्चस्व होते.
मुंबईच्या संपूर्ण विकासाच्या योजना , मुंबई शहराचे नियोजन अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी त्याकाळी जबाबदारीने पूर्ण केली.फिरोजशाह मेहता यांनी 1872 साली मुंबई पालिका कायदा लागू केला होता, त्यामुळे त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या घटनेचे शिल्पकार आणि मुंबई महानगरपालिकेचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
फिरोजशहा यांनी 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली या असोसिएशनचे त्यांनी सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली. "मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिल" चे ते 1886 मध्ये सदस्य झाले.
मुंबई विद्यापीठाचे 1989 मध्ये "सिनेट सदस्य" म्हणून सुद्धा त्यांनी विद्यापीठ पातळीवर शैक्षणिक क्षेत्रामध्ये केले. त्यांनी बी ए आणि एम ए चा अभ्यासक्रमात मराठी आणि गुजराती भाषा आणून त्यांचे उपयुक्त आणि महत्त्वाचे कार्य त्यावेळेस केले.
फिरोजशहा मेहता यांनी 1911 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या स्थापनेत अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिले व बँकेची स्थापना केली. तसेच त्यांनी "बॉम्बे क्रॉनिकल" नावाच्या वृत्तपत्राचे प्रकाशन 1913 मध्ये केले होते.
X X
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधील सहभाग:
मुंबईमध्ये 1989 मध्ये झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात साठी त्यांनी स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडली व अधिवेशन यशस्वीरित्या संपन्न केले. पुढे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1990 येथे भरलेल्या कोलकत्ता अधिवेशनात त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले व 1909 मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर येथील अधिवेशनात सुद्धा त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते.याशिवाय त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आणि आपली कायदेशीर धोरणे बनवून ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला.
फिरोज शहा मेहतांनी स्वदेशीच्या प्रचारासाठी त्यांनी आणि तेलंगणी स्वदेशी साबण काढण्याचा कारखाना कढण्याचा उपक्रम केला.
सन्मान:
1. फिरोजशहा मेहता यांनी 1812 मध्ये मुंबई येथे झालेल्या पाचव्या प्रांतिक संमेलनाचे अध्यक्ष स्थान भूषविले.
2. मुंबई विद्यापीठाचे 1989 मध्ये "सिनेट सदस्य"
3. मुंबई महापालिकेचे सलग तीन वेळा अध्यक्ष पद.
4. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून 1915 मध्ये त्यांची नियुक्ती झाली.
5. मुंबई विद्यापीठाने त्यांना 1915 मध्ये एलएलडी ही मानद पदवी बहाल केली.
6. 1894 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना सी आय ई हा किताब दिला. तेव्हापासून त्यांना सर फिरोजशहा लोक म्हणत होते.
7. फिरोज शहा मेहता यांना मुंबईचा सिंह असे ही संबोधतात.
X X
निधन:
फिरोजशहा मेहता यांचे निधन 5 नोव्हेंबर 1915 मध्ये मुंबई या ठिकाणी झाले. इंग्रजांनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मुंबई महानगरपालिकाच्या मुख्यालयासमोर पूर्ण कृती पुतळा लोकवर्गणी सुमारे 80 हजार रुपये जमा करून उभारला त्याचे उद्घाटन 3 एप्रिल 1923 रोजी समारंभपूर्वक त्याचे अनावरण करण्यात आले.
View, Comments and share..........
1 Comments
👍
ReplyDelete