Subscribe Us

header ads

World History- जागतिक इतिहास

जागतिक इतिहास

World History 


1. 4 ऑगस्ट, 1914 रोजी पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. 

2. लेनिन यास रशियन राज्यक्रांतीचा जनक म्हणतात.

3. कोमा-गाटा-मारू हे जहाज आहे. 

4. लुसितानिया ही बोट आहे.

5. इ. स. 1919 साली व्हर्सायचा तह झाला.

6. इ. स. 1920 साली राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. 

7. अंगकोर वॅट हे मंदिर कंबोडिया येथे आहे.

8. जगात शांतता नांदावी म्हणून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली. 

9. दुसरे महायुद्ध इ. स. 1939-45 साली झाले.

10. पॉलने ख्रिस्ती धर्मप्रसार व प्रार्थनेकरिता प्रार्थनामंदिरांची उभारणी केली. 

11. ख्रिस्ताच्या मनात दुःखी लोकांबद्दल अपार करूणा होती.

12. रोमच्या कॉन्स्टंटाईन सम्राटाने स्वतः ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.

13. 'इन प्रेज ऑफ फॉली' हा ग्रंथ इरॅस्मसने लिहिला.

14. लिओनार्दो-द- व्हिन्सी हा प्रसिद्ध चित्रकार होता. 

15. 'दी लास्ट सफर' हे जगप्रसिद्ध चित्र लिओनार्दो-द- व्हिन्सीने निर्मिले.

16. गिबर्तने फ्लॉरेन्स येथे धर्ममंदिराचे दरवाजे तयार केले.

17. शेक्सपियर हा प्रसिद्ध नाटककार होता. 

18. इंग्लंडच्या कंपनीने अमेरिकेमध्ये व्हर्जिनिया या ठिकाणी पहिली वसाहत स्थापन केली.

19. लॉर्ड कॉर्नवालिस हा अमेरिकन युद्धात ब्रिटीश सैन्याचा सेनापती होता. 

20. जॉर्ज वॉशिंग्टन हा अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.

21. 'कॉमन सेन्स' हा ग्रंथ थॉमस पेनने लिहिला.

22. जॉर्ज वॉशिंग्टनने अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी अमेरिकन सैन्याचे नेतृत्व केले.

23. 'ना प्रतिनिधी ना कर' ही घोषणा अमेरिकेतील लोकांनी केली होती.

24. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचे वेळी इंग्लंडचा राजा तिसरा जॉर्ज होता.

25. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा इ. स. 1776 साली घोषित झाला. 

26. इ. स. 1856 सालचा स्टॅम्प अॅक्ट अमेरिकन क्रांतीचे एक कारण आहे.

27. थॉमस जेफरसन यांनी अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला.

28. इंग्लंड, अमेरिकेतील वसाहतींना कन्या राष्ट्र नावाने संबोधत होते.

29. डाल्टनने दहशतवादी राज्याची सुरूवात केली. 

30. सोळावा लुई हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातील फ्रान्सचा सम्राट होता.

31. 'माझी सनदी कायदेसंहिता चिरंतन राहील,' हे उद्गार नेपोलियनचे आहेत.

32. नेपोलियनला 'क्रांतीचे अपत्य' मानले जाते.

33. मे, 1907 मध्ये व्हर्जिनिया ही वसाहत थॉमस स्टिव्हन्सनने स्थापन केली.

34. पिलग्रिम फादर्स हे मे. फ्लावर या जहाजाने अमेरिकेस आले.

X X

35. 23 मार्च, 1765 रोजी ब्रिटन देशाने स्टॅम्प ॲक्ट हा कायदा संमत केला. 

36. जॉर्ज वॉशिंग्टनची अमेरिकेतील वसाहतीच्या लढ्यासाठी सरसेनापती म्हणून निवड केली होती.

37. अमेरिकेतील वसाहतींची पहिली परिषद फिलाल्डेफियात भरली होती.

38. इ. स. 1789 साली फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली.

39. फ्रान्समध्ये 'फर्स्ट इस्टेट' म्हणून धर्मगुरू वर्ग ओळखला जाई.

40. फ्रान्समध्ये बुर्बोन घराण्याचे राज्य होते.

41. 'सामाजिक करार' हा ग्रंथ रूसोने लिहिला. 

42. बोस्टल तुरूंग हे जुलमी राजसत्तेचे प्रतिक होते.

43. बेवूफ हा जगातील पहिला समाजवादी विचारवंत होय.

44. अनियंत्रित राजसत्तेऐवजी सत्ता विभाजनाचा मार्ग मॉटेस्क्यूने सुचविला.

45. सत्ता विभाजनाच्या सिद्धांताचा पुरस्कार मॉटेस्क्यूने केला.

46. ऑस्ट्रिया व सेंट जर्मनीचा तह इ. स. 1919 साली करण्यात आला.

47. रासपुटीनला 'पवित्र सैतान' असे म्हटले आहे.

48. रशियाच्या लालसेनेची निर्मिती स्टॅलिनने केली.

49. रशिया व जपान यांच्यामध्ये इ. स. 1904 साली युद्ध झाले. 

50. रशियन राज्यक्रांतीच्या वेळेस दुसरा निकोलस हा रशियाचा झार होता.

51. ब्रेस्ट विस्टोव्हस्कचा शांतता तह इ. स. 1918 साली झाला.

52. लेनिनने रशियात नवीन धोरणांचा पुरस्कार केला.

53. 'ब्यूमा' हे रशिया देशाच्या संसदेचे नाव आहे.

54. 'इंस्का' या वृत्तपत्राचे संपादन लेनिनने केले होते.

55. इ.स. 1917 सालाच्या रशियन राज्यक्रांतीनंतर हंगामी सरकारचा केरेन्स्की हा नेता होता. 

56. कार्पोरेट स्टेटची कल्पना मुसोलिनीने मांडली होती.

57. ॲडॉल्फ हिटलर या लेखकाने 'माईन काम्फ' हे पुस्तक लिहिले.

58. न्यू डीलचा पुरस्कार रूझवेल्ट यांनी केला होता.

59. जर्मनीने 1 सप्टेंबर, 1939 रोजी पोलंड देशावर आक्रमण केले.

60. पर्ल हार्बरवर जपानने हल्ला केला होता.

61. अर्थशास्त्राचा अभिजात संप्रदाय 'मँचेस्टर संप्रदाय' या नावाने ओळखला जातो. 

62. सर ऑस्टिन लेअर्डने निनेव्ह येथील ऑसिरियन संस्कृतीचे अवशेष शोधून काढले.

63. हिरोटोडसला इतिहासाचा जनक म्हणून संबोधले जाते.

64. 'कुराण' हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ मानला जातो.

65. ख्रिश्चन धर्माचा 'बायबल' हा पवित्र ग्रंथ आहे.

66. चिनी लोकांनी लेखनाची पहिली योग्य पद्धती विकसीत केली.

67. लोकांवरील प्रभाव पाहून फ्रेंच सरकारने व्हॉल्टेअरला हद्दपार केले.

68. फ्रान्सचा 'विजय दिन' म्हणून 14 जुलै हा दिवस फ्रान्समध्ये पाळण्यात येतो.

69. कामाचे तास नियमित करणारा पहिला फॅक्टरी ॲक्ट इ. स. 1833 साली पास झाला. 

70. इंग्रज लोकांनी अमेरिकेत आपली पहिली वसाहत इ. स. 1607 साली स्थापन केली.

X X

71. कोलंबसने शोधलेल्या नव्या जलमार्गामुळे अमेरिका खंड युरोपियनांना ज्ञात झाला.

72. फ्रान्सीस ड्रेक हा समुद्रावर उघड-उघड चाचेगिरी सुरू करणारा प्रसिद्ध दर्यावर्दी होय.

73. जॉन रॉल्फने रेड इंडियनांकडून तंबाखूच्या लागवडीची कल्पना अवगत करून घेतली होती.

74. सशस्त्र फ्रेंच स्वयंसेवक लाफायतेच्या नेतृत्वाखाली बसाहतीच्या मदतीला गेले.

75. ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी पॅलेस्टाईन प्रांतातील लोकांना 'ज्यू' हा धर्म कायदा मोझेसने दिला.

76. 'घडलेली प्रत्येक घटना म्हणजे इतिहास होय' ही व्याख्या कीटींग या इतिहासकाराने केली.

77. कोलंबसने अमेरिकेच्या शोधासाठी 'सान्ता मारीया' नावाचे जहाज वापरात आणले होते. 

78. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटीश सेनापती कॉर्नवालिसने यॉर्कटाऊन ठिकाणी शरणागती पत्करली.

79. व्यापारवाढ व वसाहतीच्या स्पर्धेत इंग्लंड व फ्रान्स हे देश इतर देशांच्या तुलनेत उशिरा उतरते. 

80. अमेरिकेचा स्वातंत्र्यलढा 19 एप्रिल, 1775 रोजी सुरू झाला.

81. रूसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता होय.

82. मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र लिओनार्दो-द-व्हिन्सी या चित्रकाराने काढलेले आहे.

83. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात लाफायते या फ्रेंच सेनानीने अमेरिकावासीयांना मोलाचे सहाय्य केले. 

84. मॅसाच्युसेटस् ही बोस्टन टी पार्टी घटनेत प्रामुख्याने सहभागी होणारी वसाहत होय.

85. रशिया सर्व दृष्टीने समर्थ राष्ट्र बनविण्यासाठी पंचवार्षिक योजना स्टॅलिनने सुख केल्या.

86. पंतप्रधान चेंबरलेननंतर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळी ब्रिटनचा पंतप्रधान चर्चिल होता.

87. क्षमापत्र विकणे व विकत घेणे ह्या पोपच्या खोटेपणाविरूद्ध मार्टिन ल्यूथरने रान उठविले.

88. ख्रिस्ती धर्मांचे अनुयायी सुमारे 100 कोटी आहेत. 

89. येशू ख्रिस्ताचा जन्म 'ज्यू' समाजात झाला.

90. ज्यूंचे सर्वात पवित्र देऊळ जेरूसलेम या ठिकाणी होते.

91. महंमद पैगंबरांनी सातव्या शतकाच्या पूर्वार्धात इस्लामची शिकवण दिली.

92. मक्का येथे 'काबा' हे पवित्र स्थळ आहे.

93. मंगोपार्कने आफ्रिकेतील नायजेर धबधब्याचा व नदीचा शोध लावला. 

94. व्यापारवाढ व वसाहतीच्या मालकीसाठी युद्धे यातून साम्राज्यशाहीचा उदय झाला.

95. एकेकाळी युरोपातील धर्मगुरू लोकांकडून टाईथ कर वसूल करीत. 

96. अमेरिकन प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनची निवड झाली.

97. पहिले महायुद्ध चार वर्ष चालले होते. 

98. पहिल्या महायुद्धात अंदाजे बीस अब्ज रुपयांची आर्थिक हानी झाली.

99. तुर्कस्थानातील 'खलिफाची गादी' हे मुसलमानांचे आंतरराष्ट्रीय धर्मपीठ होते. 

100. 20 व्या शतकातील युद्धे ही 'महायुद्धे' म्हणून ओळखली जातात.

101. हिटलरने 'युयुनिक' करार मोडला. 

X X

102. पहिल्या महायुद्धामुळे जगात मोठी आर्थिक क्रांती घडून आली.

103. जर्मनीत लष्करवादामुळे नवचैतन्य निर्माण झाले. 

104. पहिल्या महायुद्धाचा शेवट व्हर्सायच्या तहाने झाला.

105. सोळाव्या लुईची पत्नी मेरी अँटोनिओ ऑस्ट्रिया देशाची होती. 

106. इस्टेटस् जनरलची सभा राष्ट्रीय कर्ज निवारण्याच्या हेतूने बोलाविण्यात आली होती.

107. सरदारपुत्र मिर्रेबो यास थर्ड इस्टेटने त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले. 

108. फ्रान्समधील मुख्य प्रश्न शेतकरी क्रांतीचा होता. 

109. फ्रान्समध्ये दहशतीचे राज्य संपल्यावर अखेरीस डिरेक्टरी राज्य सुरू झाले.

110. महंमद पैगंबराने मक्केहून मदिनेला केलेल्या स्थलांतरास 'हिजरा' म्हणतात 

111. अज्ञात खंडाच्या शोधात जिवाचे मोल देणाऱ्या संशोधकांत मंगोपार्क हे अग्रेसर नाव होते.

112. भारतावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी इंग्रज व फ्रेंच यांच्यात स्पर्धा सुरू झाली. 

113. 'दि स्पिरिट ऑफ द लॉज' हा ग्रंथ मॉटेस्क्यूने लिहिला.

114. रूसोने 'सोशल कॉंट्रॅक्ट' हा ग्रंथ लिहिला.

115. ऑस्ट्रियाचा वारस राजपुत्र फर्डिनंड याचा 28 जून, 1914 रोजी सर्व्हियात एका सर्दियन माथेफिरूने खुन केला.

116. इस्लामच्या शिकवणुकीप्रमाणे स्त्रियांना आदराची वागणूक मिळावी असा इस्लामचा कायदा आहे.

117. स्टुअर्ट राजे कॅथॉलीक पंथाचे असल्यामुळे इंग्लंडमध्ये प्रॉटेस्टंट पंथीयांचा छळ सुरू झाला.

118. चौदाव्या लुईने 50 कोटी फ्रैंक्स खर्च करून व्हर्साय या ठिकाणी भव्य राजवाडा बांधला.

119. दक्षिणेतील वसाहतकारांनी शेतीवर राबविण्यासाठी आफ्रिकन लोकांमधून गुलामांचा वर्ग निर्माण केला.

120. दर वर्षी रमझानच्या महिन्यात सूर्योदयापासून रोझा करावा, ही एक इस्लामची शिकवण आहे. 

121. 'देवा तू ह्या लोकांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाही.' हे उद्गार येशू ख्रिस्तांनी काढले.

122. अमेरिका खंडाचा पूर्व किनारा शोधून काढणाऱ्या अमेरिको बेस्पुसी संशोधकाच्या नावांवरून अमेरिका नाव पडले. 

123. 'कॉसमॉस' हा सहा खंडांचा भूगोल ग्रंथ अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ड याने लिहिला.

124. युरोपातील ब्रुनो व इस या प्रख्यात धर्मसुधारकांना पोपच्या हुकूमावरून जिवंत जाळण्यात आले होते. 

125. स्पेनची राणी इझाबेला हिने कोलंबसच्या सागरी सफरीस पाठिंबा दिला होता.

126. बोस्टनच्या पाडावाचे महत्त्व म्हणजे अन्यायाचे प्रतिक उध्वस्त झाले.

127. रॉबेस्पिअरचा शिरच्छेद हे दहशतवाद्यांचा शेवट होण्याचे कारण होय. 

128. बोस्टनच्या पाडावानंतर फ्रेंच राज्यक्रांतीला सुरूवात झाली.












View, Comments and share.....

Post a Comment

2 Comments