Famous person's of medieval India-2
मध्ययुगीन भारतातील प्रसिद्ध व्यक्ति-2
1. अल्बेरूनी
भारतावर स्वारी करण्यासाठी आलेल्या गझनीच्या महंमदाबरोबर आलेला इतिहासकार व विद्वान.
2. धंग (950-999)
मध्ययुगीन भारतातील चांडेल वंशाचा शक्तीशाली राजा.
3. रामानुज
बाराव्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात दार्शनिक व दक्षिण भारतीय वैष्णव संप्रदायाचे महान आचार्य. 11 व्या शतकात हिंदु धर्माची वैभवशाली पताका फडकावली . रामभक्ती संप्रदायाची सुरुवात केली. वैष्णव गुरुंमध्ये सन्मानपूर्वक गणना. वेदांत दर्षणामध्ये मध्ये "विशिष्ट द्वैताचा" सिद्धांत मांडला.
4. महंमद घोरी
भारतामध्ये मुस्लिमांचे राज्य सूरू करणारा पहिला सुलतान. त्याने 12 शतकात भारतावर स्वारी केली.
1192च्या तरायनच्या दुसऱ्या युद्धात पृथ्वीराज चौहानचा त्याने पराभव केला व दिल्लीच्या तख्ताची स्थापना केली.
5. पृथ्वीराज चौहान
दिल्लीचा राजपूत राजा. प्रसिद्ध योद्धा व समर्थ शासक .
त्याने कन्नोज राजा जयचंद याची सुंदर कन्या संयोगिता हिला पळविले होते.
6. चांद बरदाई
पृथ्वीराज चौहानाच्या दरबारातील राजकवी. "पृथ्वीराज रासो" आणि "चंद्ररायसा" महाकाव्याचा रचनाकार.
7. जयदेव
जयदेव यांनी बाराव्या शतकात 'गीत गोविंद' हा ग्रंथ लिहिता. श्रीकृष्ण व राधा यांच्यावर लिहिलेली काव्यरचना प्रसिद्ध आहे.
8. कुतुबुद्दीन ऐबक
दिल्लीचा पहिला मुसलमान सुलतान,
9. चेंगीझ खान
मंगोल सैन्याचा प्रमुख, बलाढ्य आक्रमक, अत्याचारी व जुलमी. त्याने भा अल्तमशच्या कारकीर्दीत स्वारी केली.
तो क्रुर मंगोल सरदार होता. त्याला सिंघ मधुन माधार घ्यावी लागली.
10. रझिया बेगम
सुलतान अल्तमशची मुलगी. दिल्लीच्या तख्तावरची पहिली व शेवटची स्त्री-सुलतान
X X
11. अल्लाउद्दीन
खिलजी घराण्यातला सर्वात बलशाली सुलतान. दक्षिण भारतावर खिलजी आक्रमण करणारा पहिला मुस्लिम शासक. त्याने बाजार सुधारणेचे व (1296-1316) नियंत्रणाचे कार्य केले.
12. अमीर खुसरो
अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील पर्शियन कवी. तोता-ए-हिंद उपनावाने प्रसिध्द. प्रसिद्ध तुगलकनामा याने लिहिला.
13. फिर्दोसी
फिर्दोसी ह्या पर्शियन महाकवीने सुप्रसिद्ध शाहनामा हे महाकाव्य रचले आहे.
14. राणा प्रताप
राजपुतांच्या इतिहासातील प्रसिद्ध लढवय्या.
15. पद्मिनी
मेवाडच्या राणा रतनसिंहांची पत्नी. पद्मिनीच्या सौंदर्यावर भाळून अल्लाउद्दीन खिलजीने मेवाडवर स्वारी केली होती पण त्यात यश आले नाही.
16. राणा कुंभ
15व्या शतकातील मेवाडचा शूर राणा.त्याने माळवा आणि गुजरात सुलतानांशी विजयी लढत दिली व चितोड येथे विजय स्तंभ उभा केला. तो विद्वांनाचा आदर करीत असे.
17. महमद तुघलक
दिल्लीचा हुशार, तीक्ष्ण स्मरण शक्ती असलेला परंतु अव्यवहारी व अयशस्वी सुलतान. दिल्लीहून राजधानी हलवून देवगिरीला नेण्याचा अयशस्वी प्रयत्न. रयतेचा विरोध झाल्यावर राजधानी पुनश्च दिल्लीकडे हलवीली.
18. इबन बतूता
प्रसिद्ध आफ्रिका विद्वान,महमद तुघलक च्या कारकीर्दीत भरतात आला होता.
19. तैमुरलंग
मध्य आशियातील एक उपद्रवी मुस्लिम योद्धा. त्याने दिल्ली नष्ट केली होती.
20. कृष्णदेवराय
विजयनगरच्या साम्राज्याचा महत्त्वपूर्ण व सर्वात यशस्वी राज्यकर्ता. त्यांच्या कारकिर्दित विजयनगरला सुवर्णयुगाची संधी मिळाली. तो कलेचा भोक्ता होता.
21. डेमिन पीस
पोर्तुगीज प्रवासी, विजयनगर साम्राज्याच्या कृष्णदेवरायाचा समकालीन
22. मार्कोपोलो
मार्कोपोलो हा इटालीयन प्रवासी इ. स. 1288 मध्ये भारतात आला.
23. वास्को-द-गामा
पोर्तुगीज दर्यावर्दी. त्याने भारताकडे केप ऑफ गुड होपमार्गे येणाऱ्या जलमार्गाचा शोध इ. स. 1498 मध्ये लावला. तो प्रथम कालिकत बंदरात उतरला. नवीन जलमार्गाच्या शोधामुळे भारताबरोबर व्यापार करण्याची संधी पोर्तुगीजांना सर्वप्रथम मिळाली.
24. अल्बुकर्क
भारतामध्ये पोर्तुगीजांची सत्ता रोवणारा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर इ.स. 1510 (1469-1549) मध्ये गोवा सर केला आणि तेथे आपली राजधानी बसविली.
25. गुरुनानक
शीख धर्माचे संस्थापक. अकबराचे समकालीन. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते.
26. चैतन्य महाप्रभु
बंगालमधील कृष्णभक्त संत. वैष्णव संप्रदायाचे पुरस्कर्ते.
27. रामानंद
14 व्या शतकातील भक्तीमार्गाचे उत्तरकालीन प्रचारक.
28. सायन
14 व्या शतकातील चार वेदांचा सर्वात प्रसिद्ध भाष्यकार.
X X
29. कबीर
हिंदी भाषेत काव्यरचना करणारे प्रसिद्ध मुस्लिम संत . भक्ति संप्रदायाचे प्रवर्तक. ईश्वराच्या अस्तित्वावर व सर्व धर्मसमानतेवर त्यांच विश्वास होता. हिंदु मुसलमान धर्मात एकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला . कबीरांनी बरेचसे विचार हिंदु धर्मावून घेतले होते. मुस्लिम सूफी पंथावर त्यांचा विश्वास होता. कबीरांचे दोहे प्रसिद्ध आहेत.
30. अर्जुनदेव
शिखांचे पाचवे गुरू. त्यांनी शीख धर्माच्या आदिग्रंथाचे संकलन केले.
31. चंडीदास
पश्चिम बंगालचे 14 व्या शतकातील प्रसिद्ध वैष्णव कवी.
32. एकनाथ
16 व्या शतकातील महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध संत आणि धर्मसुधारक
33. गुरूगोविंदसिंग
शिखांचे 10 वे व अखेरचे गुरू, भारतामध्ये शिखांच्या सामर्थ्याचा पाया घातला. आपली बरीचशी कारकीर्द मोगलांविरुद्ध लढण्यात घालविली.
34. सूरदास
कृष्णभक्तीत न्हाऊन निघालेला अंध कवी. भक्त सूरसागर व साहित्य लहरी ह्या त्यांच्या लोकप्रिय काव्यकृती आहेत.
35. शेरशहा सुरी
मोगल सम्राट हुमायूनाला पदच्यूत करून भारताची सत्ता काबीज केली. ग्रँड ड्रंक रोड हा महत्वपूर्ण राजरस्ता बांधला.
36. अकबर
भारतातील सर्वश्रेष्ठ मोगल बादशहा. मोगल वंशाचा तिसरा बादशहा. कुशल (1556-1605) प्रशासकही होता. भारतातील मुसलमान राजांमध्ये अकबराचे स्थान आहे.
सर्व धर्माच्या बाबतीत त्याची सहिष्णु वृती होती. त्यामुळे त्याच्या दरबारात अनेक हिंदुकलावंत आणि विद्वान होते. दीन-ए-इलाही धर्माचा संस्थापक. जमीन महसुलात सुधारणा. झिजिया कर काढून टाकला. हिंदु-मुस्लिम संबंध सुधारावे म्हणून प्रयत्न केले.
37. अबुल फजल
सम्राट अकबराचा प्रधानमंत्री. अकबरकालीन कवी. अकबरनामा व ऐन ए-अकर्बरी यांचा कर्ता.
38. तोरडमल
अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न. प्रसिद्ध योद्धा व राजकारणी. अकबराचा महसूल मंत्री, जमिनविषयक सुधारणांसाठी प्रसिद्ध
39. तानसेन
अकबराच्या दरबारातील नवरत्नापैकी एक श्रेष्ठ संगीतकार व गायक. भारतीय संगीताचा एक महान मानबिंदु. अभिजात भारतीय संगीताचा निर्माता.
40. तुलसीदास
प्रसिद्ध हिंदी संतकवी.हिंदूचे धार्मिक नेते. "रामचरितमानस" हा प्रभुरामचंद्रांच्या जीवनावरील लोकप्रिय व परम आदरणीय ग्रंथ लिहिला.
41. राणासंग
मेवाडच्या या राजाने एक डोळा एक हात व एक पाय गमावलेला असूनही त कुठेही कमतरता दाखविली नाही. मात्र इ. स. 1527 च्या खनुआच्या लढाईत बाबराकडून पराभूत.
42. दुर्गावती
16 व्या शतकातील गोंदवनची प्रसिद्ध शासक.
43. पुरुषोत्तम
एक हिंदु दर्शनवेता. अकबराने इ. स. 1580 मध्ये फतेपूर शिक्री जवळील ईबादात खान्यातील वाद-विवादासाठी बोलविले होते.
44.जय मल्ल
राजस्थानचा योद्धा. अकबराने चित्तोड गडावर हल्ला केला असता त्याच्याशी प्राणपणाने लढत दिली.
45. पीटर मंडी
युरोपियन प्रवासी. जहांगीरच्या शासनकाळात भारतात आला. त्यावेळच्या भारताबद्दल रोजची माहिती लिहिली.
X X
46. शहाजहान
प्रसिद्ध मोगल सम्राट . शहाजहानच्या कारकिर्दिसस मोगल काळाचे सुवर्ण युग म्हणतात. आपली पत्नी मुमताजच्या प्रेमप्रित्यर्थ त्याने ताजमहाल बांधला.दिल्लीतील लाल किल्ला व जामा मशिदही बांधली.
47. चांदबिबी
अहमदनगरच्या सूलतानाची मुलगी. विजापूरचा सुलतान अली आदिलशहाची बिबी. अकबराशी तिने शौयनि लढत दिली, परंतु स्वतःच्याच सैन्याकडून वध झाला.
48. गुरू तेग बहाद्दूर
शिखांचे नववे गुरु. मुस्लिम होण्यास नकार दिल्यामुळे औरंगजेबने त्यांना मृत्युदंड दिला.
49. राजमाता जिजाबाई
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आई.
५०. छत्रपती शिवाजी महाराज (1630-1680)
शहाजी महाराजांचे पुत्र, स्वतंत्र मराठा राज्याचे संस्थापक. आपल्या मातोश्री जिजाबाई, गुरुजी संत तुकाराम, दादोजी कोंडदेव यांच्याकडून स्वराज्य स्थापनेची स्फूर्ति घेतली. मोगलांना धुळ चारली. दक्षिणे कडील मुस्लिमांना सळो की पळो करून सोडले. शौर्य, औदार्य, दृढनिश्चयता अनेक गुणांचा महामेरू. अष्टप्रधान मंडळ नेमून त्यांनी एक संघटित शासन प्रणाली निर्माण केली.
51. संत तुकाराम
महाराष्ट्राचे प्रसिद्ध संतकवी. छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन व गुरू. तुकारामांची गाथा व अभंग प्रसिद्ध आहेत.
52. अहिल्याबाई होळकर
इंदूरचे प्रसिद्ध राजे मल्हारराव होळकरांची सून. मल्हाररावांच्या निधनानंतर अहिल्याबाईने राज्यकारभार सांभाळला. अहिल्याबाईने भारतात ठिकठिकाणी अन्नछत्रे घातली, अनेक ठिकाणी घाट बांधले. मोठे कौशल्यपूर्वक व धूर्तपणे त्यांनी राज्यकारभार सांभाळला.
53. हैदरअली
म्हैसूरचा सुलतान. शिपायाच्या हुद्यापासून सेनापतीच्या पदापर्यंत चढत गेलेला महत्त्वाकांक्षी पुरुष.
54. टिपू सुलतान
म्हैसूरचा वाघ म्हणून प्रसिद्ध. आपला पिता हैदरअली यांच्या मृत्युनंतर त्यानेच राज्य केले. फ्रेंचांशी हातमिळवणी करून इंग्रजांविरूद्ध दंड थोपटले. श्रीरंगपट्टणमच्या युद्धात हार न पत्करता मृत्युला सामोरा गेला.
55. अहमदशाह अब्दाली
अब्दालीने इ. स. 1747 मध्ये नादिरशाहच्या मृत्युनंतर अफगाण सिंहासनावर अधिकार. त्याने इ.स. 1761 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव केला.
56. बहादूरशहा
बहादूरशहा दुसरा यालाच बहादूरशहा जफर या नावाने संबोधले जाते. मोगल साम्राज्याचा अखेरचा बादशहा.
View, Comments and share.....






.jpg)









2 Comments
Nice sirji
ReplyDelete👍
ReplyDelete