Geography of India -5
भारताचा भूगोल भाग-5/10
भारतातील पर्वत:
★ भारतातील सर्वात मोठी पर्वत रांग : हिमालय
★ हिमालय भारताच्या उत्तर सीमेवर आहे.
★ माऊंट एव्हरेस्ट (गौरीशंकर) हे जगातील अत्त्युच्च शिखर आहे.
★ भारतातील सर्वात मोठे शिखर : कांचनगंगा
★ काराकोरम्, हिंदकूश आणि सुलेमान या हिमालय पर्वताच्या पश्चिम शाखा आहेत. नागा, खाशी व टेकड्या ह्या हिमालयाच्या पूर्व शाखा आहेत.
★ मध्य भारतात अरवली, विंध्य, सातपुडा व छोटा नागपूर पर्वताच्या रांगा आहेत.
★ दक्षिण पश्चिम भारतात सह्याद्री, पूर्वघाट आणि निलगिरी असे पर्वत आहेत.
X X
भारतातील प्रमुख पर्वतशिखरे:
(पर्वत शिखर -राज्य /प्रदेश -उंची)
1. कांचनगंगा हे पर्वत शिखर भारत नेपाळच्या मध्य असून त्याची उंची 8598 मीटर आहे.
2. नंदादेवी हे पर्वत शिखर उत्तर प्रदेशात असून त्याची उंची 7817 मीटर आहे.
3. कामेत हे पर्वत शिखर उत्तर प्रदेशात असून त्याची उंची 7756 मीटर आहे.
4. सासेर कांगरी हे पर्वत शिखर जम्मू व कश्मीर राज्यात असून 7672 मीटर उंची आहे.
5. चौरवंबा बद्रीनाथ हे पर्वत शिखर उत्तराखंडात असून त्याची उंची 7138 मीटर आहे.
6. त्रिशूल पर्वत शिखर हे उत्तर प्रदेशात असून त्याची उंची 7138 मीटर आहे.
7. पाऊ हुनरी हे पर्वत शिखर सिक्कीम मध्ये असून 7138 मीटर उंची आहे.
8. कांगतो हे पर्वत शिखर अरुणाचल प्रदेशामध्ये असून त्याची उंची 7090 मीटर आहे.
9. द्रूनागिरी हे पर्वत शिखर उत्तर प्रदेशात असून त्याची उंची 7066 मीटर आहे.
10. अन्नामुद्दी हे पर्वत शिखर केरळ राज्यात असून 2695 मीटर त्याची उंची आहे.
11. दोडाबेट्टा हे पर्वत शिखर तामिळनाडू राज्यात असून 2637 मीटर उंची आहे.
12. गुरुशिखर हे पर्वत अरवली येथे राज्यस्थान राज्यात असून त्याची उंची 1722 मीटर आहे.
13. महाराष्ट्रातील कळसुबाई हे शिखर सह्याद्री रांगेत असून त्याची उंची 1646 मीटर आहे.
14. महेंद्रगिरी पर्वत शिखर ओरिसा राज्यातील पूर्व घाटात असून त्याची उंची 1501 मीटर आहे.
15. मलयगिरी हे पर्वत शिखर ओरिसा राज्यात पूर्व घाटात असून 1187 मीटर त्याची उंची आहे.
X X
भारतातील थंड हवेची ठिकाणे:
थंड हवेचे ठिकाण- राज्य
★ अलमोडा- उत्तरप्रदेश
★ कसौली- पंजाब
★ कोडाईकॅनॉल- तामिळनाडु
★ कॉलीपाँग- पश्चिम बंगाल
★ चकरौता- उत्तरप्रदेश
★ डलहौसी- हिमाचल प्रदेश
★ उटकमंड- तामिळनाडु
★ कुलू- हिमाचल प्रदेश
★ कुन्नुर- तामिळनाडु
★ गुलमर्ग- काश्मीर
★ चेरापुंजी- मेघालय
★ दार्जिलिंग- पश्चिम बंगाल
★ नैनीताल- उत्तराखंड
★फहलगाव- जम्मू काश्मीर
★ भवानी- उत्तरप्रदेश
★ मसूरी- उत्तराखंड
★ मुक्तेश्वर- उत्तरप्रदेश
★ माथेरान- महाराष्ट्र
★ लॅन्सडाऊन- उत्तरप्रदेश
★ लोणावळा- महाराष्ट्र
★ शिलाँग- मेघालय
★ पंचमढी- मध्यप्रदेश
★ बंगलोर- कर्नाटक
★ मनाली- हिमाचल प्रदेश
★ महाबळेश्वर- महाराष्ट्र
★ माऊंट अबू- राजस्थान
★ रांची- झारखंड
★ राणीखोत- उत्तरप्रदेश
★ सिमला- हिमाचल प्रदेश
★ श्रीनगर- जम्मू काश्मीर
भारतातील सरोवरे :
1. वूलर सरोवर हे कश्मीर राज्यात आहे.
2. दल सरोवर हे कश्मीर मध्ये आहे.
3. नैनिताल हे सरोवर उत्तराखंडमध्ये आहे.
4. चिल्का सरोवर हे ओरिसा राज्यात आहे.
5. सांबर सरोवर हे राजस्थान मध्ये आहे.
6. किथाम सरोवर हे उत्तर प्रदेशात आहे.
7. पुलिकत सरोवर हे तामिळनाडूमध्ये आहे.
8. कोलार सरोवर हे कर्नाटक राज्यात आहे.
भारतातील नद्या:
प्रामुख्याने भारतातील नद्यांचे दोन विभाग पडतात.
1. हिमालयीन नद्या आणि
2. दख्खनी नद्या.
1. हिमालयीन नद्या
हिमालयीन नद्यांमध्ये मुख्यतः तीन नद्या मुख्य आहेत.
1. गंगा
2. सिंधू
3. ब्रह्मपुत्रा
1. गंगा
गंगा ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे.
गंगा नदीचा उगम हिमालयात गंगोत्री या ठिकाणी झाला.
गंगा नदीच्या मूळ मुख्य प्रवाहास भगीरथी असेही म्हणतात.
गंगा नदीच्या उपनद्या मंदाकिनी, अलकनंदा, बेतुआ, चंबळ, शोन, दामोदर, यमुना, गंडक, गोमती, शरयू व कोसी ह्या नद्या आहेत.
2. सिंधू
सिंधू नदीचा उगम कैलास पर्वतात झालेला आहे.
सिंधू नदीच्या उपनद्या ह्या रावी, बियास, चिनाब, सतलज व झेलम ह्या आहेत.
3. ब्रह्मपुत्रा
ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हिमालयात मानस सरोवर या ठिकाणी झालेला आहे.
ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या दिव्यांग लोहित व तिस्ता ह्या आहेत.
X X
2. दख्खनी नद्या.
दख्खनी नद्या ह्या दोन प्रकारच्या आहेत.
1. पूर्ववाहिनी नद्या आणि
2. पश्चिम वाहिनी नद्या
1. पूर्ववाहिनी नद्या
★ गोदावरी
गोदावरी नदी महाराष्ट्रात पश्चिम घाटामध्ये नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते.
गोदावरी नदीच्या उपनद्या ह्या मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्रवरा आणि सिंदफणा ह्या आहेत.
★ कृष्णा
कृष्णा नदी महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते.
कृष्णेच्या उपनद्या ह्या भीमा, तुंगभद्रा व कोयना आहेत.
★ कावेरी
कावेरी नदीचा उगम पश्चिम घाटातील निलगिरी पर्वतामध्ये आहे.
कावेरीची उपनदी भवानी नदी ही आहे.
★ महानदी
महानदी मध्य प्रदेशात उगम पावते.
★ दामोदर
दामोदर नदी छोटा नागपूरच्या पठारावर उगम पावते.
★ सुवर्णरेखा व ब्राह्मणी
सुवर्ण रेखा व ब्राह्मणी नदी ही ओरिसा राज्यात उगम पावते.
2. पश्चिम वाहिनी नद्या
★ नर्मदा नदी मध्यप्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी उगम पावते.
★ तापी नदी मध्य प्रदेशातील महादेवांचे डोंगररांग यांच्यामध्ये उगम पावते.
★ मही व साबरमती नदी अरवली पर्वतातून उगम पावते.
★ लुनी नदी अरवलीच्या पश्चिमेकडे वाळवंटी भागातून उगम पावते.
★ शरावती व पेरियार नदी ही पश्चिम घाटातून उगम पावते.
बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या:
★ गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी, सुवर्णरेखा, ब्राह्मणी, पालार, पेंनार.
अरबी समुद्रास मिळणाऱ्या नद्या:
★ नर्मदा, तापी, शरावती, पेरियार.
खंबायतच्या आखातास मिळणाऱ्या नद्या:
★ महिनदी ,साबरमती नदी
कच्छच्या आखातास मिळणाऱ्या नद्या:
★ लूनी नदी
भारतातील प्रमुख नद्या व त्यांची लांबी:
1. सिंधू नदीची लांबी 2900 किलोमीटर आहे.
2. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी 2900 किलोमीटर आहे.
3. गंगा नदीची लांबी 2510 किलोमीटर आहे.
4. गोदावरी नदीची लांबी 1450 किलोमीटर आहे.
5. नर्मदा नदीची लांबी 1290 किलोमीटर आहे.
6. कृष्णा नदीची लांबी 1290 किलोमीटर आहे.
7. महानदी ची लांबी 890 किलोमीटर आहे.
8. कावेरी नदीची लांबी 760 किलोमीटर आहे.
X X
भारतातील नदीकाठी वसलेली महत्त्वाची शहरे:
1. उत्तर प्रदेशात यमुना नदीवर आग्रा हे शहर वसलेले आहे.
2. उत्तर प्रदेशात प्रयागराज पूर्वीचे अलाहाबाद हे शहर गंगा यमुना संगमावर वसलेले आहे.
3. उत्तर प्रदेशात अयोध्या हे शहर शरयू नदीच्या काठी वसलेले आहे.
4. गुजरात मध्ये अहमदाबाद हे शहर साबरमती नदीच्या काठी वसलेले आहे.
5. केरळ राज्यात अलवाय हे शहर पेरियार नदीच्या काठी वसलेले आहे.
6. बिहार राज्यात गंगा नदीच्या काठी भागलपूर हे शहर वसलेले आहे.
7. ओरिसामध्ये महानदीच्या काठी कटक हे शहर बसलेले आहे.
8. आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी दिब्रुगड हे शहर वसलेले आहे.
9. बिहारमध्ये सुवर्णरेखा नदीच्या काठी जमशेदपूर हे शहर वसलेले आहे.
10. पश्चिम बंगाल मध्ये हुगळी या नदीच्या काठी हावडा हे शहर वसलेले आहे.
11. मध्यप्रदेशात नर्मदा नदीच्या काठी जबलपूर हे शहर वसलेले आहे.
12. राजस्थानमध्ये चंबळ नदीच्या काठी कोटा हे शहर वसलेले आहे.
13. पंजाब मध्ये सतलज नदीच्या काठी लुधियाना हे शहर वसलेले आहे.
14. बिहारमध्ये गंगा नदीच्या काठी पटना हे शहर वसलेले आहे.
15. कश्मीरमध्ये झेलम नदीच्या काठी श्रीनगर हे शहर वसलेले आहे.
16. ओरिसा मध्ये महा नदीच्या काठी संबळपूर हे शहर वसलेले आहे.
17. आंध्र प्रदेश मध्ये कृष्णा नदीच्या काठी विजयवाडा हे शहर वसलेले आहे.
18. तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या काठी त्रिचनापल्ली हे शहर वसलेले आहे.
19. पश्चिम बंगाल मध्ये हुबळी नदीच्या काठी कलकत्ता शहर बसलेले आहे.
20. भारताची राजधानी दिल्ली हे शहर यमुना नदीच्या काठी वसलेले आहे.
21. उत्तर प्रदेशात गंगा नदीवर हरिद्वार हे शहर वसलेले आहे.
22. आंध्रप्रदेश मध्ये मुसी नदीच्या काठी हैदराबाद हे शहर वसलेले आहे.
23. उत्तर प्रदेशात गंगा नदीच्या काठी कानपूर हे शहर वसलेले आहे.
24. उत्तर प्रदेशात गोमती नदीच्या काठी लखनऊ हे शहर वसलेले आहे.
25. उत्तर प्रदेशात यमुना नदीच्या काठी मथुरा हे शहर वसलेले आहे.
26. महाराष्ट्रात गोदावरी नदीच्या काठी नाशिक हे शहर वसलेले आहे.
27. गुजरात मध्ये तापी नदीच्या काठी सुरत हे शहर वसलेले आहे.
28. कर्नाटक राज्यात कावेरी नदीच्या काठी श्रीरंगपट्टणम हे शहर वसलेले आहे.
29. मध्यप्रदेशात शिप्रा नदीच्या काठी उज्जैन हे शहर वसलेले आहे.
30. उत्तर प्रदेशात वाराणसी हे शहर गंगा नदीच्या काठी वसलेले आहे.
31. बिहारमध्ये बोध गया हे शहर फाल्गुन नदीच्या काठी वसलेले आहे.
32. महाराष्ट्रात नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे.
33. महाराष्ट्रात पैठण हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे.
34. महाराष्ट्रात पुणे हे शहर मुळा मुठा नदीच्या काठी वसलेले आहे.
35. मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या काठी महेश्वर हे शहर वसलेले आहे.
भारतातील महत्त्वाचे पूल:
1. अलेक्झांड्रा पूल हा चिनार या ठिकाणी असून त्याची लांबी 9088 फूट आहे.
2. इज्जत पूल हा अलाहाबाद आत्ताचे प्रयागराज या ठिकाणी असून त्याची लांबी 6830 फूट आहे.
3. गंगापूल माकामा येथे असून त्याची लांबी 4048 फूट आहे.
4. डफरीन पूल हा वाराणसी येथे असून त्याची लांबी 3578 आहे.
5. तापी पूल हा सुरत या ठिकाणी असून त्याची लांबी 3578 आहे.
6. नैनी पूल हा प्रयाग या ठिकाणी असून त्याची लांबी 3235 फूट आहे.
7. मालवीय पूल हा बिहारमध्ये असून त्याची लांबी 5.6 किलोमीटर आहे.
8. महात्मा गांधी पूल वाराणसी या ठिकाणी असून त्याची लांबी 4210 फूट आहे.
9. यमुना पूल हा दिल्ली या ठिकाणी असून त्याची लांबी 2740 फूट आहे.
10. रवी पूल पठाणकोट येथे असून त्याची लांबी 2800 फूट आहे.
11. विवेकानंद पूल हा कलकत्ता या ठिकाणी असून त्याची लांबी 2610 फूट आहे.
12. सोनपुर पूल हा बिहारमध्ये असून त्याची लांबी 10052 फूट आहे.
13. हावडा पूल हा कलकत्ता या ठिकाणी असून त्याची लांबी 2150 फूट आहे.
14. हुबळी पूल हा कलकत्ता या ठिकाणी असून त्याची लांबी 1213 फूट आहे.
View, Comments and share.....
1 Comments
Nice sir 👍
ReplyDelete