Geography of India
भारताचा भूगोल
भाग -1/10
भारताची भौगोलिक रचना:
★ भारताचे एकूण क्षेत्रफळ: 32,87,263चौ. कि. मी.
★ भारताचा दक्षिणोत्तर विस्तार: 8.4° उत्तर ते 37.6° उत्तर अक्षांश
★ भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार : 68.7° पूर्व ते 97.52° पूर्व रेखांश
★ भारताची उत्तरदक्षिण लांबी : 3214 कि.मी.
★ भारताची पूर्वपश्चिम लांबी : 2963 कि.मी.
★ भारताची किनारपट्टी : 6100 कि. मी.
★ भारताची जमीन सरहद्दीची लांबी : 15200 कि. मी.
★ भारताची चीनबरोबर सीमारेषा: 5689 कि. मी. (मॅकमोहन लाइन)
★ भारताची म्यानमारबरोबर सीमारेषा : 1200 कि.मी.
★ हिंदुस्थान अफगाणिस्तान सीमारेषा: ड्यूलँडलाईन
★ भारताची भूतानबरोबर सीमारेषा : 400 कि. मी.
★ भारताच्या पूर्वेकडे : बंगालचा उपसागर
★ भारताच्या पश्चिमेकडे : अरबी समुद्र
★ भारताच्या दक्षिणेकडे: हिंदी महासागर
★ भारताच्या उत्तरेकडे: हिमालयाची रांग
★ भारताचे क्षेत्रफळाच्या संदर्भातील जागतिक स्थान : सातवे
X X
भारताच्या शेजारील देश:
★ भारताच्या पूर्वेला: बांगलादेश व म्यानमार
★ भारताच्या उत्तरेला: चीन आणि नेपाळ
★ भारताच्या वायव्येला: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान
भारताचे नैसर्गिक विभाग:
★ पूर्वपश्चिम किनारपट्ट्या
★ गंगेचे सपाट खोरे
★ दख्खनचे पठार
★ उत्तरेकडे हिमालयाच्या रांगा
भारताची प्रमुख वैशिष्ट्ये:
★भारताचे नाव: रिपब्लीक ऑफ इंडिया
★ भारताची राजधानी: नवी दिल्ली
★ भारतीय सरकार: सार्वभौम, समाजवादी, धर्म निरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक संघराज्य
★ भारताची राष्ट्रलिपी: देवनागरी व इंग्रजी
★ भारताची राजमुद्रा: सारनाथ स्तंभावरील चार सिंह
★ भारताचे ध्येयवाक्य: सत्यमेव जयते
★ भारताचे राष्ट्रीय फूल: कमळ
★ भारताचे राष्ट्रीय फळ: आंबा
★ भारतातील कमाल पर्जन्यमान: चेरापुंजी 1130.40 सें मी.)
★ भारतातील किमान पर्जन्यमान: थरचे वाळवंट (4 इंच)
★ भारतातील कमाल उष्णतामान: राजस्थान (48.9 डि. सेंटीग्रेड)
★ भारतातील किमान उष्णतामान : काश्मीर (9.4 डि. सेंटीग्रेड)
★ भारतातील सर्वाधिक लोकवस्तीचे राज्य : उत्तरप्रदेश
भारताचे राष्ट्रगीत:
1. राष्ट्रगीत: जन-गण-मन
2. राष्ट्रगीताचे रचनाकार: रवींद्रनाथ टागोर
3. प्रथम गायन: कलकत्ता अधिवेशन (27 डिसेंबर 1911)
4. राष्ट्रगीत म्हणून मान्यता: 24 जानेवारी 1950
5. इंग्रजी अनुवाद: 1919 अनुवादक : रवींद्रनाथ टागोर
इंग्रजी भाषांतराचे नाव : मॉर्निंग सॉंग ऑफ इंडिया
6. मुळगीत: 5 कडव्याचे. समारंभ किंवा कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रगिताचे फक्त पहिलेच कडवे म्हणण्याचा प्रघात आहे.
X X
भारताचे राष्ट्रीय गीत:
1. राष्ट्रीय गीत: वंदे मातरम्
2. राष्ट्रीय गीताचे रचनाकार:बंकिमचंद्र चटर्जी
3. प्रथम गायन: काँग्रेस अधिवेशन 1896
राष्ट्रीय गीताचेही पहिलेच कडवे महणण्याचा प्रघात आहे. हे गीत बंकिमचंद्राच्या 'आनंदमठ' या 1882 साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीतील आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मातरम् या गीतालाच राष्ट्रगीत म्हणून मानले जात असे.
भारताचा राष्ट्रध्वज:
भारताचा राष्ट्रध्वज मादाम कामा व त्यांच्या सहकारी मित्रांनी तयार केला होता. त्यात तीन रंगाचे आडवे पट्टे, कमळे, सूर्य-चंद्र होते. म. गांधीनी मधल्या पट्टयात चरखा असलेला तिरंगी ध्वज तयार केला. सध्याचा राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी मान्य झाला.
1. भारतीय राष्ट्रध्वजास घटना समितीची मान्यता : 22 जुलै 1947
2. 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री सध्याचा राष्ट्रध्वज राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
3. राष्ट्रध्वज क्षीतीज समांतर तीन पट्ट्यांचा आहे. (म्हणजेच तिरंगी आहे)
4. सर्वात वरची पट्टी: केशरी रंगाची
5. मधली पट्टी : पांढऱ्या रंगाची
6. खालची पट्टी : गडद हिरव्या रंगाची
राष्ट्रध्वजावरील रंग देखील काही थोर परंपरा, गुण यांचे दर्शन घडवितात. केशरी रंग साहस आणि त्यागाचा सूचक आहे. पांढरा रंग सत्य आणि शांतीचा सूचक आहे. तर गर्द हिरवा रंग पराक्रम आणि विश्वासाचा सूचक आहे. निळे चक्र प्रगतीच्या चाकाचे प्रतिक आहे. अशा रीतीने आपला हा ध्वज साहस, त्याग, सत्य, शांती, पराक्रम, विश्वास व प्रगती यांची शिकवणूक आपल्याला देत असतो.
राष्ट्रध्वजावरील मधल्या पांढऱ्या पट्टीवर निळसर रंगाचे अशोकचक्र आहे. हे सारनाथ येथील सिंहस्तंभावरील धर्मचक्रासारखे आहे. अशोकचक्रात 24 आरे (SPOKES.) आहेत. राष्ट्रध्वजातील साऱ्या पट्ट्यांची रूंदी समान असून ध्वजाच्या रूंदी लांबीचे प्रमाण 2:3 आहे. राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी फक्त सुती कापडाचाच उपयोग केला जातो.
राष्ट्रध्वज जाहीरातीसाठी वापरू नये. तो उलटा लावू नये, तो पायदळी पडू देऊ नये, त्याचा योग्य मान राखावा, तो कुठेकुठे वापरावा, तो अर्ध्यावर केव्हा लावावा तसेच तो वर केव्हा चढवावा, केव्हा उतरवावा याबद्दल सविस्तर नियम केलेले आहेत.
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी जयंती व इतर राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रध्वज खाजगीरित्या लावता येतो.
भारताचे राष्ट्रचिन्ह:
भारत सरकारने अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेतलेले आहे. राष्ट्रीय चिन्ह 26 जानेवारी 1950 रोजी मान्य केले. हा राष्ट्रीय चिन्हात एकूण चार सिंह असून त्यापैकी तीन सिंह दिसतात. सिंहाच्या खालच्या पट्टीवर अशोकग्रक व त्याखालील उजव्या बाजूला घोड्याचे व डाव्या बाजूस बैलाचे चित्र आहे. राष्ट्रचिन्हाच्या खालील बाजूस मुंडक उपनिषदातील 'सत्यमेव जयते' हे वचन देवनागरी लिपीमध्ये कोरलेले आहे.
राष्ट्रीय पक्षी:
भारत सरकारने 1964 साली मोरास राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारीत केले.
राष्ट्रीय प्राणी:
भारतीय वाईल्ड लाईफ बोर्डाने वाघाची राष्ट्रीय प्राणी म्हणून निवड केली. त्यापूर्वी सिंहास राष्ट्रीय प्राणी मानले जात असे.
राष्ट्रीय कालगणना:
भारत सरकारने 1952 मध्ये राष्ट्रीय पंचांग तयार करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने शक संवत्सरावर आधारित राष्ट्रीय पंचांग तयार केले हयाचा पहिला महिना चैत्र असुन शेवटचा महिना फाल्गुन आहे. 22 मार्च 1957 ला हा पंचांगाला (कॅलेंडर) मान्यता दिली गेली.
भारतीय कालगणना : 22 मार्च 1957 पासून सुरू झाली, भारतीय कालगणनेत इसवी सनाच्या 78 वर्षे मागे असलेल्या शालिवाहन शकाचा वापर केला आहे.
भारतीय कालगणनेचा पहिला महिना चैत्र आहे.
राष्ट्रीय कॅलेंडर सध्या प्रचलित असलेल्या इंग्रजी कॅलेंडरशी जोडलेले असून चैत्र 1 हा दिवस 22 मार्च रोजी (साध्या वर्षात) आणि 21 मार्च रोजी (लीप वर्षात) येतो. वर्षाचे दिवस 365 मानले जातात.
ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणेच ह्या कॅलेंडरचा अधिकृत उपयोग खालील कामकाजासाठी करतात.
1. भारताचे राजपत्र (गॅझेट)
2. आकाशवाणीवरील बातमीपत्रे
3. केंद्र-राज्य सरकारच्या कॅलेंडरांसाठी
4. केंद्र-राज्य सरकारांच्या पत्रव्यवहारांसाठी
X X
भारतातील भाषा:
घटनाप्रणित भाषा : 18
आसामी, उर्दू, ओरिया, कानडी, काश्मिरी, गुजराथी, तामिळी, तेलगू, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळी, संस्कृत, हिंदी, सिंधी, नेपाळी, मणीपुरी व कोकणी.
★ भारतातील बोलल्या जाणाऱ्या पोटभाषा : 720
भारतातील बँक व्यवसाय:
भारतीय रिझर्व्ह बँक
स्थापना: 1 एप्रिल 1935.
राष्ट्रीयीकरण 1 जानेवारी 1949
मुख्यालय : मुंबई
प्रमुख उद्दिष्टे:
भारतात चलनपुरवठा करणे, देशातील चलनाचा साठा कायम राखणे. सरकारतर्फे पैसे स्वीकारणे किंवा सरकारचे पैसे देणे, सरकारला गरज भासल्यास तात्पुरता कर्जपुरवठा करणे, थोडक्यात देशात आर्थिक स्थैर्य राखून, आर्थिक प्रगतीस पोषक कार्य करणे, 2 रुपये व त्यावरील किंमतीच्या नोटा छापणे इ.
महत्त्वाचे कार्य:
1 रुपयाची नोट व सर्व नाणी भारत सरकारसाठी चलनात आणणे व सर्व बँकांच्या व वित्तीय संस्थांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे.
View, Comments and share





.jpg)

.jpg)





1 Comments
👍👍
ReplyDelete