Geography 6: Maharashtra State
महाराष्ट्राचा भूगोल: भाग 6/7
महाराष्ट्रातील शिक्षण:
★ महाराष्ट्राचा साक्षरतेच्या बाबतीत भारतात सहावा क्रमांक लागतो.
★ महाराष्ट्रातील मुंबई जिल्ह्यात सर्वात जास्त साक्षरता आहे.
★ नागपूर हे विदर्भातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे.
★ पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून संबोधले जाते.
★ १०+२+३ हा शैक्षणिक आकृतीबंध इ. स. १९७२-७३ मध्ये अंमलात आणला.
★ महाराष्ट्रात प्रौढ शिक्षण कार्यक्रम २ ऑक्टोबर १९७८ पासून राबविला जात आहे.
★ प्रौढ शिक्षण योजना १५ से ३५ वर्षे वयोगटासाठी आहे.
★ नागपूर हा मुंबई वगळता सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा आहे.
★ गडचिरोली हा निरक्षरतेचे सर्वात जास्त प्रमाण असलेला जिल्हा आहे.
★ मराठवाडा हा महाराष्ट्रातील शैक्षणिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला भाग आहे.
★ पुणे विद्यापीठाची स्थापना इ. स. १९४८ साली झाली.
★ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक संशोधन मंडळ इ. स. १९५१ साली स्थापन झाले.
★ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना इ. स. १९५९ साली झाली.
★ महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना इ. स. १९६० साली झाली.
★ शिवाजी विद्यापीठाची स्थापना इ. स. १९६३ साली झाली.
★ महात्मा फुले कृषि विद्यापीठाची स्थापना इ. स. १९६८ साली झाली.
★ पंजाबराव कृषि विद्यापीठाची स्थापना इ. स. १९७१ साली झाली.
★ मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्थापना इ. स. १९७२ साली झाली.
★ कोकण कृषि विद्यापीठाची स्थापना इ. स. १९७२ साली झाली.
★ अमरावती विद्यापीठाची स्थापना १ मे, १९८३ रोजी झाली.
★महाराष्ट्रात एकूण अकरा + दोन विद्यापीठे (कृषि विद्यापीठासह) आहेत.
★महाराष्ट्रातील बिगरशेती विद्यापीठांची संख्या नऊ आहे.
★ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.
★ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मुख्य कचेरी पुणे येथे आहे.
★ मुंबई विद्यापीठाची मुख्य कचेरी मुंबई येथे आहे.
★ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मुख्यालय अमरावती येथे आहे.
★ कोकण कृषि विद्यापीठ दापोली येथे आहे.
★ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे आहे.
★ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे आहे.
★ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ मुंबई येथे आहे.
★ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे आहे.
★ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आहे.
★महाराष्ट्रात चार कृषि (शेतकी) विद्यापीठे आहेत.
★महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ राहुरी विद्यापीठ आहे.
★ महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे आहे.
★ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे आहे.
★ मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.
★ डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.
★ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
★ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन पुणे येथे आहे.
★ डेक्कन कॉलेज पुणे येथे आहे.
★ श्री शिवाजी लोककला विद्यापीठ अमरावती येथे आहे.
★ नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर येथे आहे.
★ राज्य शिक्षण शास्त्र संस्था पुणे येथे आहे.
X X
महाराष्ट्रातील संशोधन संस्था:
★ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट पुणे येथे आहे.
★ अनंताचार्य इकॉलॉजीकल रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई येथे आहे.
★ भारतीय विद्या भवन मुंबई येथे आहे.
★ छत्रपती शाहू सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्यूकेशन ॲण्ड रिसर्च कोल्हापूर येथे आहे.
★ राष्ट्रीय रसायनी प्रयोगशाळा (नॅशनल केमिकल लॅबोरेटरी) पुणे येथे आहे.
★ फ्यूएल इन्स्ट्रुमेंटस् ॲण्ड इंजिनिअर्स लिमिटेड ही संस्था पांढरकवडा येथे आहे.
★ वॉटर ॲण्ड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट औरंगाबाद येथे आहे.
★ विकर पॉवर ही संस्था आर्वी येथे आहे.
★ हत्तीरोग संशोधन केंद्र वर्धा येथे आहे.
★ आय. एन. एस. शिवाजी सैनिकी प्रशिक्षण केंद्र लोणावळा येथे आहे.
★ सेंट्रल वॉटर ॲण्ड पॉवर रिसर्च स्टेशन खडकवासला येथे आहे.
★ वूल रिसर्च असोसिएशन महाराष्ट्रात मुंबई येथे आहे.
★ सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च नागपूर येथे आहे.
★ आर्मामेन्ट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ही विकास संस्था पुणे येथे आहे.
★ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी ही संस्था पुणे येथे आहे.
★ सिल्क ॲण्ड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च ऑफ इंडिया मुंबई येथे आहे.
★ नॅशनल ब्यूरो ऑफ ऑईल सर्व्हे ॲण्ड लँड युजप्लॅनिंग नागपूर येथे आहे.
★ इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेन्ट टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात पुणे येथे आहे.
★ भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर मुंबई येथे आहे.
★ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम ही संस्था मुंबई येथे आहे.
★ नॅशनल एनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर येथे आहे.
★ एक्सप्लोझीव्ह रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी ही संशोधन संस्था पुणे येथे आहे.
★ बॉम्बे टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन ही संस्था मुंबई येथे आहे.
★ ऑर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे येथे आहे.
★ कॉलेज ऑफ ॲम्ब्युलन्स संस्था मुंबई येथे आहे.
★ ॲटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
★ ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्रात मुंबई येथे आहे.
★ रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट (इंजिनिअर्स) संस्था रिधी (पुणे) येथे आहे.
★ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथे आहे.
★ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे आहे.
★ आय. एन. एस. राजेंद्र ही सैनिक प्रशिक्षण देणारी संस्था मुंबई येथे आहे.
★ शुगरकेन रिसर्च स्टेशन पुणे येथे आहे.
★ कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी मुंबई येथे आहे.
★ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स मुंबई येथे आहे.
★ इंडियन ड्रग्ज रिसर्च लॅबोरेटरी पुणे येथे आहे.
★ भांडारकर ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे येथे आहे.
★ प्रताप सेंटर ऑफ फिलॉसॉफी अंमळनेर येथे आहे.
★ जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मुंबई येथे आहे.
★ महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स पुणे येथे आहे.
★ इन्स्टिट्यूट ऑफ केटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाईड न्यूट्रिशन मुंबई येथे आहे.
★ जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई येथे आहे.
★ सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज ॲण्ड ॲक्टिव्हिटी पुणे येथे आहे.
★महाराष्ट्र अभियांत्रीकी संशोधन संस्था (मेरी) नाशिक येथे आहे.
★ अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था बांद्रा येथे आहे.
★ बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी मुंबई येथे आहे.
★ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई येथे आहे.
★ उर्दू रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई येथे आहे.
★ जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई येथे आहे.
★ राजेंद्र प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज, भारतीय विद्याभवन मुंबई येथे आहे.
★ व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई येथे आहे.
★ ज्ञान प्रबोधिनी पुणे येथे आहे.
★ नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मुंबई येथे आहे.
X X
★ भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे आहे.
★ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट मुंबई येथे आहे.
★ नरोत्तम मोरारजी इन्स्टिट्यूट ऑफ शिपींग मुंबई येथे आहे.
★ हाफकिन इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात मुंबई येथे आहे.
★ नेव्हल केमिकल ॲण्ड मेटरॉलॉजीकल लॅबोरेटरी मुंबई येथे आहे.
★ आर्मद् कोर सेंटर ॲण्ड स्कूल अहमदनगर येथे आहे.
★ फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे येथे आहे.
★हेईकल रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ही विकास संस्था अहमदनगर येथे आहे.
★ स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली (नाशिक) येथे आहे.
★ इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज मुंबई येथे आहे.
★ इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसिन, आय. एन. एस. अश्विनी मुंबई येथे आहे.
★ कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग खडकी (पुणे) येथे आहे.
★ जसलोक रिसर्च सेंटर ही वैद्यकीय संशोधन संस्था मुंबई येथे आहे.
★ हिंदूस्तान ऑर्गेनिक केमिकल्स कारखाना पनवेल येथे आहे.
★ आय. एन. एस. हमला ही सैनिकी प्रशिक्षण देणारी संस्था मुंबई येथे आहे.
★ रिजनल कॅन्सर सेंटर (टाटा मेमोरियल हॉस्पिटल) मुंबई येथे आहे.
★ खार जमीन संशोधन केंद्र पनवेल येथे आहे.
★ ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन ॲण्ड रिहॅबिलीटेशन मुंबई येथे आहे.
View, Comments and share...
1 Comments
Nice 👍
ReplyDelete