Subscribe Us

header ads

Sankalia Hasmukh Dhirajlal : Indian Archaeologist

Dr. Sankalia Hasmukh Dhirajlal : Indian Archaeologist in ancient Indian history. He is considered to have pioneered archaeological excavation techniques in India.

डॉ.सांकलीया हंसमुख धीरजमल: पद्मभूषण,पुरातत्त्वशास्त्रज्ञ

10 डिसेंबर: जन्मदिन


बालपण आणि शिक्षण:

भारतातील पुरातत्त्व संशोधनाला जागतिक मान्यता मिळवून देणारे पद्मभूषण,पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. हंसमुख धीरजमल सांकलिया यांचा जन्म 10 डिसेंबर 1908 रोजी मुंबई येथे झाला. 

त्यांनी बी.ए., एल.एल.बी.पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1932 साली मुंबई विद्यापीठातूनच प्राचीन भारतीय इतिहासात त्यांनी एम. ए. ही पदव्यूत्तर पदवी मिळवली. त्यानंतर 1935 साली चान्हुदारो येथे व 1936 साली मेडन कैसल येथे त्यांनी क्षेत्रीय पुरातत्त्वाचे प्रशिक्षण घेतले. 

1937 मध्ये लंडन विद्यापीठातून पुरातत्त्वात त्यांनी संशोधनातील पीएच.डी. उच्च पदवी मिळवली. त्यासाठी त्यांनी 'गुजरातचा पुरातत्त्वीय अभ्यास' संशोधनासाठी केला होता.

X X

वैयक्तिक जीवन प्रवास:

डॉ. हंसमुख धीरजमल सांकलिया हे 1939 ते 1973 सालापर्यंत डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्वविभागाचे प्रमुख म्हणून काम केले होते. 

1956 ते 1959 सालापर्यंत डेक्कन कॉलेजचे प्रभारी संचालक पदी नियुक्ती झाली होती. 

1960 ते 1968 सालापर्यंत डेक्कन कॉलेजचे सहसंचालक होते व 1970 ते 1973 सालापर्यंत डेक्कन कॉलेजचे संचालक पदी होते. अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. याशिवाय 1974 ते 1976 सालापर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाचे शिक्षक म्हणुन महत्वपूर्ण कामगिरी केली होती. 

1973 ते 1989 सालापर्यंत पुरातत्त्वातील एमेरिटस प्रोफेसर पद व 1975 ते 1989 सालापर्यंत टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे मानद संचालक म्हणून त्यांनी काम केले.


पुरातत्त्वीय संशोधन कार्य:

काश्मीरपासून केरळपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत संपूर्ण भारतभर पुरातत्त्वीय ठिकाणांच्या शोधासाठी त्यांनी क्षेत्रीय सर्वेक्षण केले. 

सांकलियांच्या मार्गदर्शनाखाली गुजरातमध्ये लांघनाज, अखज, वलसाना, द्वारका व सोमनाथ येथे व महाराष्ट्रात कोल्हापूर, जोर्वे, नाशिक, नेवासा, चिर्की-नेवासा व इनामगाव येथे, तर मध्यप्रदेशातील महेश्वर, नवदातोली,त्रिपुरी व कायथा याठिकाणी कर्नाटकात संगतकल्लू व टेक्कलाकोटा येथे, राजस्थानातील अहार व आंधप्रदेशातील बेटमचेरिया येथे उत्खनन झाले. 

उत्खननाच्या आधारे द्वारकेची प्राचीनता महाभारत काळापर्यंत जात नाही, हे त्यांनी सिद्ध केले होते. तसेच, भूगोल व वाङ्मयाच्या आधारे रावणाची लंका म्हणजे सध्याचा श्रीलंका देश नाही, असे मत त्यांनी मांडले होते. 

ते संस्कृत चे अभ्यासक होते त्यामुळे संस्कृतवरही त्यांचे प्रभुत्व होते.


ग्रंथ संपदा /निर्मिती:

डॉ. हंसमुख धीरजमल सांकलिया यांची संशोधनात्मक 24 पुस्तके प्रसिद्ध.

1. 'आर्किऑलॉजी ॲण्ड द रामायण'

2. इंट्रोडक्शन आर्किऑलॉजी' मराठीत प्रकाशित

3. 'प्री हिस्टरी ॲण्ड प्रो हिस्टरी इन इंडिया ॲण्ड पाकिस्तान'1963 साली प्रमाण पुस्तक म्हणून प्रथम प्रकाशित.

X X

सन्मान व पुरस्कार:

1. ऑल इंडिया संस्कृत अकॅडमी, लखनऊ, यांचे सन्माननीय फेलो म्हणून त्यांची निवड.

2. द हेरास सोसायटी, यांचे सन्माननीय फेलो म्हणून त्यांची निवड.

3. सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई यांचे सन्माननीय फेलो म्हणून त्यांची निवड.

4. महेश्वर, मध्य भारत स्टेट, मानपत्र देऊन गौरवले 

5. 1954 मध्ये अहमदनगर महानगरपालिका, मानपत्र देऊन गौरवले 

6. 1973 व पुणे महानगरपालिकेने मानपत्र देऊन गौरवले .

7. 1974 साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण देऊन त्यांना गौरविण्यात आले. 

8. इंट्रोडक्शन आर्किऑलॉजीच्या मराठीत प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकाला भारत सरकारचा पुरस्कार.

9. 'आर्किऑलॉजी ॲण्ड द रामायण' या पुस्तकाच्या गुजरातीतील आवृत्तीला गुजरात सरकारचा पुरस्कार. 

10. एशियाटिक सोसायटी, मुंबई यांचे कॅम्पबेल स्मृती सुर्वणपदक.

11. मुंबई विद्यापीठाचा भगवानलाल इंद्रजी पुरस्कार.

रॉयल एशियाटिक सोसायटी, मुंबई यांचे रौप्यपदक.

12. गुजरात साहित्य सभा, अहमदाबाद यांचे सुवर्णपदक. दादाभाई नवरोजी पुरस्कार.

13. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल, कोलकाता यांचे चक्रवर्ती रौप्यपदक.

14. कोलकाता विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागातर्फे रॉबर्ट ब्रूस फूट पदक.

15. दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत यांचा ओम हरी पुरस्कार 

16. अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालयातर्फे त्यांना प्रा. एन. जी. नारळकर विद्वत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 X X

निधन:

भारतातील पुरातत्त्व संशोधनाला जागतिक मान्यता मिळवून देणारे पद्मभूषण डॉ. हंसमुख धीरजमल सांकलिया यांचे 28 जानेवारी 1989 रोजी पुणे येथे निधन झाले.









View, Comments and share....

Post a Comment

2 Comments