Dr. Rajendra Prasad: Indian politician, lawyer, Indian independence activist, journalist & first president of Republic of India from 1950 to 1962.
डॉ.राजेंद्रप्रसाद: स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती , वकील, बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते
जन्मदिन: 3 डिसेंबर
स्मृतिदिन: 28 फेब्रुवारी
बालपण आणि शिक्षण:
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती,घटना समितीचे अध्यक्ष, भारतरत्न डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय यांचा जन्म ब्रिटिश भारत हा देशातील बिहार राज्यात जिरादेई जि. सारन येथे 3 डिसेंबर 1884 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महादेव सहाय तर आईचे नाव कमलेश्वरीदेवी हे होते.राजेंद्र प्रसाद हे त्यांच्या भावंडात सर्वात लहान होते आणि त्यांना एक मोठा भाऊ आणि तीन मोठ्या बहिणी होत्या. राजेंद्र प्रसादांचे प्राथमिक शिक्षण मौलवींतर्फे घरीच पारंपारिक पद्धतीने झाले. त्यात उर्दू आणि फारसी या भाषाशिक्षणावर अधिक भर होता. पारंपारिक प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना छपरा येथील जिल्हा विद्यालयात पाठवण्यात आले.
X X
त्यांनी कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयांतून 1906 मध्ये बी. ए. पास झाले. त्यांनी 1907 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीसह एम. ए. चे शिक्षण पूर्ण केले व 1909 मध्ये बॅचलर ऑफ लॉ परीक्षा उत्तीर्ण झाले.1915 मध्ये मास्टर ऑफ लॉ परीक्षा उत्तीर्ण केली. मॅट्रिकपासून एम्. एल्. पदवीपर्यंत त्यांनी पहिली श्रेणी सोडली नाही. त्यांना अनेक पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळाल्या.
विद्यार्थिदशेत त्यांच्यावर जगदीशचंद्र बोस व प्रफुल्लचंद्र रे यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडली होती.
जून 1896 मध्ये वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचा विवाह राजवंशी देवी यांच्याशी झाला.
X X
वैयक्तिक जीवन:
राजेंद्रबाबूंच्या पुढाकाराने 1906 मध्ये 'बिहारी क्लब' स्थापन झाला होता. त्याचे चिटणीस म्हणून ते राहिले.1906 मध्ये पाटणा कॉलेजच्या हॉलमध्ये बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत प्रसाद यांचा मोलाचा वाटा होता. ही भारतातील अशा प्रकारची पहिली संघटना होती. 1908 मध्ये राजेंद्रबाबूंनी मुझफ्फरपूरच्या ब्राह्मण कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकाची नोकरी मिळवली. काही काळ ते या कॉलेजच्या प्राचार्यपदावरही राहिले.1909 मध्ये कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्र या विषयाचे त्यांनी अध्यापन केले.1911 मध्ये राजेंद्रबाबूंनी कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली व्यवसा सुरू केला.
1914 मध्ये बिहार व बंगाल या दोन प्रांतामध्ये पुरामुळे हजारो लोकांना बेघर होण्याची पाळी आली. राजेंद्रबाबूंनी दिवस-रात्र एक करून पूरपीडितांना मदत केली. 1916 मध्ये त्यांनी पाटणा उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. 1921 मध्ये राजेंद्रबाबूंनी बिहार विद्यापीठाची स्थापना केली.
X X
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग:
1917 मध्ये महात्मा गांधी चंपारण्यात सत्याग्रह करण्यासाठी गेल्या कळताच राजेंद्रबाबूही तिकडे गेले व त्या सत्याग्रहात सामील झाले.1920 मध्ये महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत ते सामील झाले, तेव्हा त्यांनी नोकरी सोडली. त्यांच्या दातृत्वामुळे त्यांच्या बँक खाती फक्त 15 रूपये शिल्लक होते. याच वर्षी त्यांनी 'देश' नामक हिंदी भाषेतील साप्ताहिक काढले.1928 मध्ये हॉलंडमध्ये जागतिक युवक शांतता परिषद भरली होती त्यात राजेंद्रबाबूंनी भारतातर्फे भाग घेतला व भाषणही केले.
1930 मध्ये कायदेभंगाच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला. त्यांना अटक करून तुरूंगात टाकण्यात आले. तुरूंगात खराब अन्न खाऊन त्यांना दम्याचा विकार जडला.31 मे 1935 च्या क्वेट्टा भूकंपानंतर, जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली, तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये क्वेटा केंद्रीय मदत समितीची स्थापना स्वतःच्या अध्यक्षतेखाली केली. प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांना तुरूंगातून सोडण्यात आले. भूकंपग्रस्तांना मदतीसाठी त्यांनी 'बिहार सेंट्रल रिलीफ' ची कमेटी स्थापन केली. त्यांनी त्या काळात 28 लाख रुपयांची मदत गोळा करून भूकंपग्रस्तांना वाटली.
X X
8 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेसने मुंबईत भारत छोडो ठराव मंजूर केला ज्यामुळे अनेक भारतीय नेत्यांना अटक करण्यात आली. प्रसादला पाटणा येथील सदाकत आश्रमात अटक करण्यात आली आणि त्याची रवानगी बांकीपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. जवळपास तीन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर 15 जून 1945 रोजी त्यांची सुटका झाली.1946 मध्ये पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झाले. गांधीजींच्या आग्रहामुळे त्यांनी अन्न व कृषी खात्याचे मंत्रिपद स्वीकारले.
1947 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तत्पूर्वीच ते घटना समितीचे अध्यक्ष बनले होते. घटना समितीचे कामकाज दोन वर्षे, अकरा महिने आणि अठरा दिवस चालले.घटनेचा मसुदा तयार केला 26 नोव्हेंबर, 1949 ला तो मंजूर झाला आणि 26 जानेवारी, 1950 रोजी तो अंमलात आणला गेला. भारत प्रजासत्ताक राज्य बनले.
X X
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष:
मुंबई अधिवेशनात ऑक्टोबर 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. सुभाषचंद्र बोस यांनी 1939 मध्ये राजीनामा दिल्यावर ते पुन्हा अध्यक्ष झाले.17 नोव्हेंबर 1947 रोजी जे बी कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
X X
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती:
स्वातंत्र्यानंतर अडीच वर्षांनी, 26 जानेवारी 1950 रोजी, स्वतंत्र भारताच्या संविधानाला मान्यता देण्यात आली आणि ते भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याचा बहुमान राजेंद्रबाबूंना मिळाला. 1950 ते 1956 अशा बारा वर्षांपर्यंत त्यांच्याकडे राष्ट्रपतीपद राहिले.
भारताचे राष्ट्रपती या नात्याने, प्रसाद यांनी राज्यघटनेच्या आवश्यकतेनुसार कार्य केले आणि ते कोणत्याही राजकीय पक्षापासून स्वतंत्र होते. त्यांनी भारताचे राजदूत म्हणून जगभर प्रवास केला, परदेशी राष्ट्रांशी राजनैतिक संबंध निर्माण केले. 1952 आणि 1957 मध्ये ते सलग दोन वेळा पुन्हा निवडून आले आणि ही कामगिरी करणारे ते भारताचे एकमेव राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन्स त्यांच्या कार्यकाळात प्रथमच सुमारे एक महिना लोकांसाठी खुले होते . नंतर उर्वरित जीवन त्यांनी स्थापन केलेल्या पाटणा येथील सदाकत आश्रमात घालवले.
X X
ग्रंथसंपदा:
2. भारतीय शिक्षा
3. आत्मकथा
4. डॉ. राजेंद्र प्रसाद एट द फीट ऑफ महात्मा गांधी
5. महात्मा गांधी आणि बिहार
6. चम्पारण मधील सत्याग्रह
7. द युनिटी ऑफ इंडिया
8. संकृत आणि संकृती
9. 'देश' नामक हिंदी भाषेतील साप्ताहिक.
X X
सन्मान व पुरस्कार:
1. 1962 मध्ये भारत सरकारने 'भारतरत्न' हा सर्वोच्च भारतीय सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
2. 1934 मध्ये मुंबई येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले.
3. 1936 मध्ये नागपूर येथे झालेल्या आखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
4. 1947 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष.
5. घटना समितीचे अध्यक्ष.
6. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती.
7. 1924 मध्ये पाटणा महापालिकेचे अध्यक्ष.
X X
निधन:
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती,घटना समितीचे अध्यक्ष, भारतरत्न डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय मे 1962 मध्ये भारताच्या राष्ट्रपती पदाचा त्याग केल्यानंतर, ते 14 मे 1962 रोजी पाटणा येथे परतले आणि त्यांनी बिहार विदयापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणे पसंत केले. यांचे 28 फेब्रुवारी 1963 रोजी बिहार मधील पटना येथे निधन झाले.
X X
View, Comments and share..





.jpg)


2 Comments
Nice
ReplyDeleteNice 👍
ReplyDelete