G.B.Sardar: Marathi Writer
गं. बा. सरदार ऊर्फ सरदार गंगाधर बाळकृष्ण संतसाहित्याचे अभ्यासक, विचारवंत
स्मृतीदिन: 1 डिसेंबर
बालपण आणि शिक्षण:
सामाजिक दृष्टीने संतसाहित्याचा विचार करणारे मराठीतील महत्त्वाचे महाराष्ट्रातील अभ्यासक. महाराष्ट्रातील प्रबोधन काळातील व्यक्तींचे कार्य व समकालीन प्रश्न यांविषयी विचार करणारे विचारवंत अशी गं. बा. सरदार यांची महाराष्ट्राला ओळख आहे. ठाणे जिल्ह्यातील जव्हार संस्थानात गं. बा. सरदार यांचा 2 ऑक्टोबर 1908 रोजी जन्म झाला. जव्हार संस्थानात यांच्या वडिलांचे दुकान होते. पाच बहिणी, तीन चुलत भावंडे, काकू, आत्या, मावशी अशा एकत्र कुटुंबात त्यांचे बालपण गेले. मराठी सातवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण जव्हार येथील कृष्ण विद्यालयात झाले. शालेय शिक्षणासाठी चुलत्यांकडे मुंबईला आले होते. दादर येथील छबिलदास हायस्कूलमधून 1924 मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1925 च्या सुमारास महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्याला गेले. 1925 च्या सुमारास महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतरही स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा सतत संबंध आला. 1930 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या तुकडीतून ते सत्याग्रहात सामील झाले व त्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 'पुण्यातल्या सरकारमान्य महाविद्यालयातून सत्याग्रहात जाणारा मीच पहिला विद्यार्थी होतो', असे सरदारांनी म्हटले आहे. पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून 1932 मध्ये बी. ए. व 1934 मध्ये एम. ए. या पदव्या त्यांनी संपादित केल्या. 1934 मध्ये एम. ए. झाल्यानंतर 1941 पर्यंत सरदारांना नोकरी नव्हती. त्या काळात पीएच. डी. ची पूर्वतयारी म्हणून एकोणिसाव्या शतकातील गद्याचा त्यांनी अभ्यास केला. त्यामधून 'अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका' हा सरदारांचा पहिला ग्रंथ सिद्ध झाला (1937). अव्वल इंग्रजीतील मराठी गद्य केवळ शालोपयोगी व दर्जाने बेताचेच होते या दृष्टिकोनातून पोतदारांच्या ग्रंथातील विवेचन केले गेले होते. सरदारांनी आपल्या ग्रंथातून त्या गद्याची जमेची बाजू साधार विशद केली आहे, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य होय.
1934 ते 1941 या काळात त्यांना बेकारी अनुभवावी लागली. 1941 ते 1968 या काळात पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
गांधीवाद व मार्क्सवाद विचारसरणींचा संस्कार:
गं. बा. सरदार हे गांधीवाद व मार्क्सवाद या दोन्ही विचारसरणींचा संस्कार असणारे एक समाजवादी विचारवंत म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत. जव्हारमधील बालपणीच्या वास्तव्यात त्यांनी आजूबाजूचे जे जीवन अनुभवले, त्याचे खोल संस्कार त्यांच्या मनावर झाले.
या काळात सरदारांनी गांधीवादाचा स्वीकार केला. तो केवळ वैचारिकदृष्ट्याच केला असे नाही. गांधीवादाचे प्रत्यक्ष आचरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 'अंगात आचार्य पद्धतीचे खादीचे कुडते, कमरेला आखूड पंचा, वाढलेली दाढी आणि अनवाणी चालणे' अशा रूपात 1930-32 च्या सुमारास त्यांना पाहिल्याचे ह. श्री. शेणोलीकर यांनी नमूद केले आहे. 1942 च्या चळवळीनंतर त्यांचा मार्क्सवादी विचारसणींतील संबंध आला. गांधीवाद व मार्क्सवाद या दोन्ही विचारसरणीतील माणसाला केंद्रस्थानी ठेवून विचार करण्याची पद्धती त्यांनी स्वीकारली.
स्वातंत्र्य चळवळीशी संबंध येऊनही 1930 च्या चळवळीनंतरच्या आयुष्यात सरदार क्रियाशील राजकारणाकडे वळले नाहीत. 'ज्याला मॅन ऑफ ॲक्शन म्हणावे, तसा मी नाही. काही प्रमाणात चिंतन, विचार हेच क्षेत्र मी निवडलं नि तेच माझ्या स्वभावाला मानवणारं आहे असं मला वाटत', असे याबद्दलचे सरदारांनी स्वतःच दिलें आहे.
X X
साहित्य निर्मिती/लेखन:
एकोणिसाव्या शतकातील सामाजिक प्रश्नांविषयी विचार करताना ज्या व्यक्तींचे कार्य सरदारांना महत्त्वाचे वाटले; अशा भाऊ महाजन, लोकहितवादी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, जोतीराव फुले व विष्णुशास्त्री पंडित यांच्या कार्याचे विवेचन करणारे सरदारांचे लेख महाराष्ट्र साहित्य पत्रिक या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. या लेखांचाच 1941 मध्ये 'महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी' हा ग्रंथ सिद्ध झाला. सरदारांचे हे दोन्ही ग्रंथ विषय व विवेचनपद्धती यामुळे मान्यता पावले.
महाराष्ट्राच्या या उपेक्षित मानकऱ्यांपैकी जोतीराव फुले यांच्याविषयी सरदारांनी पुन्हापुन्हा लिहिले. अनाथ विद्यार्थिगृहाच्या स्वाध्यायमालेसाठी 'जोतीराव फुले' ही पुस्तिका 1945 मध्ये त्यांनी लिहिली. तर पुढे 1981 मध्ये 'महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार' या ग्रंथात फुल्यांचे कार्य व विचार या विषयीचे विस्तृत विवेचन सरदारांनी केले.
अव्वल इंग्रजीतील गद्य, महाराष्ट्रातील समाजसुधारक, संतसाहित्य व ही सरदारांच्या लेखनाची प्रमुख क्षेत्रे आहेत. मराठी साहित्यक्षेत्रातील अलीकडील प्रवाशांचा विचार करताना दलित साहित्यावर त्यांनी समरसतेने लिहिले आहे. हे सर्व लेखन करीत असताना सरदारांची भूमिका केवळ अभ्यासकाची वा संशोधकाची नाही, ती ज्ञानप्रसाराची आहे.1968 मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अखेरपर्यंत लेखन व समाजप्रबोधन याच कार्याला त्यांनी वाहून घेतले.
संतसाहित्याचे अभ्यासक:
मराठी साहित्यक्षेत्रात सर्वाधिक मान्यता मिळालेला सरदारांचा ग्रंथ म्हणजे 1950 मधील 'संतवाङ्मयाची सामाजिक फलश्रुती' हा होय. (या ग्रंथाची अलीकडची आवृत्ती पाहिली तर 1947 ते 1982 या काळात संतसाहित्याविषयी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे.) मराठी समाजावरील संतसाहित्याचा प्रभाव लक्षात घेऊन सामाजिक दृष्टीने आहे. संतसाहित्याची मीमांसा करण्याची परंपरा मराठी साहित्यक्षेत्रात न्यायमूर्ती रानड्यांपासून गं. बा. सरदारही याच परंपरेतील विचारवंत होत. आपल्या ग्रंथातील विवेचनातून सरदारांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या भूमिकेचाच पुनरुच्चार केला आहे. संतांनी समाजाला पंगू बनविले, या वि. का. राजवाडे यांच्या निष्कर्षाचा साधार प्रतिवाद संतवाङ्मय ही एक प्रबोधनाचीच चळवळ होती. 'मध्ययुगीन समाजरचनेचा पाया खणून काढून स्वतंत्रपणे नवी समाजव्यवस्था स्थापण्याची प्रेरणा या प्रबोधनात नव्हती. ही मर्यादा ओळखून संतांचे कार्य पाहिले तर मोठ्या धैर्याने व चिकाटीने त्यांनी समाजजीवनावर मौलिक व चिरंतन संस्कार घडविले याबद्दल शंका उरत नाही', असे ठाम प्रतिपादन सरदारांनी प्रस्तुत ग्रंथात केले आहे. साहित्याचे साहित्य म्हणून असणारे महत्त्व अबाधित ठेवून सामाजिक दृष्टीने साहित्याकडे कसे पाहावे याचा एक चांगला नमुनाच या ग्रंथाद्वारे मराठीत सिद्ध झाला आहे. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर 'Saint Poets of Maharashtra : There Impact on Society' या नावाने 1969 मध्ये प्रसिद्ध झाला आहे. डॉ. कुमुद मेहता यांनी हे भाषांतर केले आहे.
संतसाहित्य हा सरदारांच्या आस्थेचा एक विषय राहिला आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरांचे व्यक्तित्व, तत्त्वचिंतन व कामगिरी यांचे समालोचन करणारी तीन व्याख्याने 1971 मध्ये त्यांनी 'कौशिक व्याख्यानमालेत दिली. तीच 'ज्ञानेश्वरांची जीवननिष्ठा' या नावाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली. पु.मं. लाड व्याख्यानमालेत दिलेल्या 'संतसाहित्याची सामाजिक व राष्ट्रीय कामगिरी' या आकाशवाणीवरील व्याख्यानांचाही पुस्तकात समावेश झाला आहे.
X X
ग्रंथ संपदा:
2. 'रामदास दर्शन' (1972)
3. 'एकनाथ दर्शन' (1978)
4. 'महाराष्ट्र जीवन परंपरा, प्रगती आणि समस्या' खंड 1 व खंड 2 (1960), 'महाराष्ट्र जीवन' च्या पहिल्या खंडात इतिहास, परंपरा, धर्मसंस्था, तत्त्वमीमांसा, समाजकारण, राजकारण, अर्थकारण हे विषय आले आहेत. तर दुसऱ्या खंडात साहित्य व कला यासंबंधीचे उपविषय आहेत.
5. 'संक्रमण काळाचे आव्हान' (1966) संपादित ग्रंथ
6. 'न्यायमूर्ती रानडेप्रणित सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा' (1975)
7. 'आगरकरांचा सामाजिक । तत्त्वविचार' (1975)
8. 'महाराष्ट्राच्या प्रबोधनाची वाटचाल' (1986)
9. 'गांधी आणि आंबेडकर' (1987)
10. स्फुटलेखन
1. 'प्रबोधनातील पाऊलखुणा' (1978)
2. 'नव्या युगाची स्पंदने' (1982)
3. 'नव्या ऊर्मी नवी क्षितिजे' (1987)
4. 'परंपरा आणि परिवर्तन' (1988)
11. 'ज्ञानेश्वरांची जीवननिष्ठा'
12. 'संतवाङ्मयाची सामाजिक फलश्रुती' -1950या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर 'Saint Poets of Maharashtra : There Impact on Society'( द सेंट पोएट्स ऑफ महाराष्ट्र : देअर इम्पॅक्ट ऑन)
13. अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका (1937)
14. धर्म आणि समाजपरिवर्तन (1982)
15. महात्मा फुले - व्यक्तित्व आणि विचार (1981)
16. महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी (1951)
17. महाराष्ट्र जीवन (1960)
18. संक्रमणकालाचे आवाहन (1966)
19. सोसायटी (इंग्लिश) (1969)
सन्मान व पुरस्कार:
1. 14 जानेवारी 1978 सालच्या मुंबई येथे भरलेल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
2. बार्शी येथील चौपन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
3. महाराष्ट्र साहित्य परिषद, भारत इतिहास संशोधन मंडळ, गोखले एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र मानव विज्ञान परिषद, समाज प्रबोधन संस्था, लोकायन प्रतिष्ठान, पुणे इत्यादी संस्थांच्या कार्यात सरदारांचा सहभाग.
4.'नवभारत' मासिकाच्या सुरुवातीच्या काळात त्या नियतकालिकाशी ग. बा. सरदार संबंधित होते.
निधन:
संतसाहित्याचे अभ्यासक, विचारवंत गं. बा. सरदार ऊर्फ सरदार गंगाधर बाळकृष्ण यांचे निधन 1 डिसेंबर 188 रोजी झाले.
View, Comments and share


1 Comments
Nice
ReplyDelete