Baba Amte: Indian social worker and social activist known particularly for his work for the rehabilitation and empowerment of people suffering from leprosy
बाबा आमटे ऊर्फ डॉ. मुरलीधर देविदास आमटे: थोर समाजसेवक
26 डिसेंबर : जन्मदिन
बालपण आणि शिक्षण:
कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक बाबा आमटे ऊर्फ डॉ. मुरलीधर देविदास आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे झाला.
कुष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी त्यांनी चालवलेला कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अद्वितीय असे आहे.
त्यांनी चालवलेल्या या प्रकल्पामुळे त्यांना महाराष्ट्रात व भारतात एक थोर समाज सुधारक म्हणून ओळखले जातात.
'वन्य जीवन संरक्षण', 'नर्मदा बचाओ आंदोलन' अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे 'संत' या नावाने गौरवले आहे.
बाबा आमटे यांचे लग्न यांचा विवाह साधनाताई यांच्याशी झाला. त्यांना प्रकाश आमटे व विकास आमटे हि दोन मुले झाली.
X X
आनंदवनची स्थापना:
जगात महारोग हा एक भयानक रोग म्हणून समजला जातो. एखाद्या व्यक्तीला या रोगाचा उपसर्ग झाला तर तो दुर्दैवी जीव म्हणून माणसातूनच उठतो.
अशा या दुर्दैवी लोकांसाठी बाबा आमटे यांनी आपला वकिली व्यवसाय सोडून महा रोगांच्या सेवा कार्याला वाहून घेतले.
त्यांची सेवा केली या कार्यात त्यांची पत्नी साधनाताईंनी खूप मोलाची साथ दिली. त्यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या गावाजवळ आनंदवन या नावाची एक वसाहत व संस्था स्थापन केली.
या वसाहतीत महारोगांच्या पुनर्वसनाच्या कामास बाबा आमटे यांनी आपल्या पत्नीसमवेत सुरुवात केली.
कुष्ठरोग झालेल्या या महारोगी व्यक्तींची सेवा उपचार हे कार्य त्यांनी हाती घेतले.
तसेच अशा महारोगी व्यक्तींना स्वतः आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांनी त्यांच्या संस्थेच्या शेतामध्ये सर्व प्रकारची कामे या कुष्ठरोगी झालेल्या लोकांना दिली.
शेतामधून अन्नधान्य भाजीपाला फळे दुग्ध उत्पादन अशी काढली जात या महारोगी व्यक्तींच्या सहकार्याने या शेतीला जोडधंदा म्हणून प्रत्येक कुष्ठरोगी असलेल्या व्यक्तींच्या कौशल्याचा वापर त्यांनी हस्त व्यवसायासाठी केला व त्यातून विविध प्रकारच्या वस्तू तयार करणे व ते तयार झालेले साहित्य विकून त्यामध्ये संस्थेसाठी व त्यांच्या प्रपंचासाठी लागणारा जो पैसा मिळतो त्यातून त्यांना एक आत्मबळ व आत्मनिर्भर बनवण्याचं श्रेय बाबा आमटे यांना जातं.
केवळ दोन झोपड्यांमधून ( वसाहत) 1948 साली सुरू झालेला प्रकल्प आज सुमारे 5000 लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रूपांतरीत झाला आहे.
प्रकल्पाची सर्व व्यवस्था "महारोगी सेवा समिती" वरोरा यांच्या माध्यमातून व्यवस्थापन केल्या जाते.
आज येथे रूग्णालया व्यतिरिक्त अनेक संस्था उभा राहिलेले आहेत त्यात अनाथालय, शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रिटिंग कार्ड विभाग, प्रिंटीग प्रेस असे नानाविध उपक्रम राबवले जातात.
सुमारे 150 शारीरिक विकलांग व्यक्तींचा "स्वरानंदवन वाद्यवृंद"संगीत समूह तयार केलेला आहे.
केवळ पायाने सुईत दोर ओवून ग्रीटिंग कार्ड्स बनवणारी शकुंतला ही आनंदवनाची आणखी एक वैशिष्ट्य आहे.
X X
लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा:
लोकबिरादरी प्रकल्प (एलबीपी) हे महाराष्ट्र सेवा समिती वरोरा जि. चंद्रपूर अंतर्गत एक सामाजिक उपक्रम म्हणून राबविल्या जातो.
या प्रकल्पा च्या माध्यमातून रुग्णालय, शाळा व पशु अनाथालय चालविले जातात. 23 डिसेंबर 1973 रोजी बाबा आमटे यांनी "माडिया गोंड" यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे प्रकल्पाचे कार्य सुरू केले.
सदर प्रकल्प गडचिरोली जिल्हा मुख्यालय पासून 160 कि.मी. अंतरावर आहे .
डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे या मेडिकल डायरेक्टर व मेडिकल ऑफिसर म्हणून येथे काम करतात व परिसरातील लोकांना आरोग्य, शैक्षणिक सुविधा उपलब्द करून दिल्या आहेत.
X X
विविध संस्थांची स्थापना:
बाबा आमटे यांनी महारोगी, कुष्ठरोगी असलेल्या लोकांसाठी विविध संस्था व वसाहती समाजसेवा कार्यासाठी स्थापन केल्या त्यात,
1. आनंदवन हे वरोरा येथील वसाहत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थापन केली.
2. नागपूर जिल्ह्यामध्ये अशोकवन नावाची संस्था स्थापन केली.
3. सोमनाथ नावाची मुल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संस्था स्थापन केली.
4. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हेमलकसा या ठिकाणी नागेपल्ली नावाची वसाहत स्थापन केली.
5. गडचिरोली चिरोली जिल्ह्यातच लोक बिरादरी ही संस्था स्थापन केली.
X X
भारत जोडो अभियान:
बाबा आमटे हे राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर समर्थक व पुरस्कर्ते होते. त्यांनी भारतीय जनतेच्या मनात राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी व त्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा या उद्देशाने त्यांनी 1985 ते 86 मध्ये शंभर दिवसांचे "भारत जोडो अभियान " पार पाडले.
X X
नर्मदा बचाव आंदोलनातील योगदान:
भारत सरकारने नर्मदा नदीवर मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यात "नर्मदा सागर" आणि "सरदार सरोवर" ही दोन मोठी धरणे बांधण्याची योजना आखली.
परंतु या मोठ्या प्रकल्पामुळे त्या ठिकाणी राहणारे जे गरीब आदिवासी लोक व जनता आणि हजारो सामान्य शेतकऱ्यांना विस्थापित होण्याचा धोका निर्माण झाला होता.
त्यांचे स्थलांतर होणार होते त्यांच्या स्थलांतर रोखण्यासाठी किंवा त्यांची पुनर्वसनाची जबाबदारी ही संबंधित राज्यांनी घेतली नाही.
त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनतेने श्रीमती मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली "नर्मदा बचाव आंदोलन" उभारले. या आंदोलनात बाबा आमटे यांनी नेतृत्व केले त्यामुळे नर्मदा बचाव आंदोलनाला फार मोठे सामर्थ्य व नैतिक बळ बाबा आमटे यांच्यामुळे प्राप्त झाले.
परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ते प्रकल्प विकसित होण्याच्या मार्गावर आहेत. अशी मोलाची कामगिरी त्यांनी लोकांसाठी पूर्ण आत्मविश्वासाने पार पडली.
X X
ग्रंथसंपदा व निर्मिती:
बाबा आमटे यांनी समाजसेवेचा वसा चालवत असतानाच जनतेच्या गरजा लक्षात घेऊन महारोग यांची सेवा केली.
संपूर्ण कार्यात कार्य करत असताना कार्यमग्नता असताना सुद्धा त्यांनी ग्रंथ लिखाण केले.
1. "ज्वाला आणि फुले" (कवितासंग्रह)
2. "उज्वल उद्यासाठी" (काव्य)
3. "माती जागवील त्याला मत"
X X
पुरस्कार व सन्मान:
1. 1985 मध्ये त्यांना कम्युनिटी लीडरशिपसाठी "रॅमन मॅगसेसे पारितोषिका" ने सन्मानित करण्यात आले.
2. 1986 मध्ये भारत सरकारने त्यांना "पद्मश्री" व 'पद्मविभूषण' हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
3. पहिल्या "जे. डी. बिर्ला पुरस्कार" चे ते मानकरी ठरले.
4. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या महान कार्याबद्दल 1988 चा "मानवी हक्क पुरस्कार" त्यांना मिळाला.
5. मानवतावादी कार्याबद्दल त्यांना 1990 चा "टेंपलटन पुरस्कार" ही प्रदान केला गेला.
6. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्याबरोबर संयुक्तपणे ते 1991 च्या "राईट लाइव्हलीहूड ॲवॉर्ड" चेही मानकरी ठरले.
7. 1999 च्या "महात्मा गांधी शांतता पुरस्कारा" चेही ते मानकरी ठरले.
8. 16 नोव्हें 2002 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांचे कडून 'डी लिट' सन्माननीय पदवी प्रदान करण्यात आली.
9. "डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
10. महाराष्ट्र सरकारने त्यांना "महाराष्ट्र भूषण" हा पुरस्कार देऊन गौरव केला.
X X
निधन:
थोर समाज सुधारक कुष्ठरोग्यांसाठी आपले स्वतःचे आयुष्य ज्यांनी सेवेसाठी समर्पित केले,कुष्ठरोग्यांची सेवा केली व सेवा करत असतानाच डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा मृत्यु 9 फेब्रुवारी 2008 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील "आनंदवन " येथे झाला.
X X
View, Comments and share




.jpg)
6 Comments
Nice
ReplyDelete👌👌👌👌
ReplyDeleteGood
ReplyDelete👍👍
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice 👍
ReplyDelete