Vinayak Narahari Bhave or Acharya Vinoba Bhave: Indian advocate of nonviolence, human rights,Bhoodan Movement. National Teacher of India and spiritual successor of Mahatma Gandhi.
आचार्य विनोबा भावे ऊर्फ विनायक नरहरी भावे:पहिले सत्याग्रही, भारतीय स्वातंत्र्यसैनिक,सर्वोदयी नेते व भूदान चळवळीचे प्रणेते
जन्मदिन :11 सप्टेंबर
स्मृतिदिन: 15 नोव्हेंबर
बालपण आणि शिक्षण:
गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा तथा विनायक नरहर भावे यांचा कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी झाला.
आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई. अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते.
वाईच्या ब्राम्हणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर हे भावे यांच्या मालकीचे असून शंभुरावांनी अग्निहोत्र स्वीकारून अग्निहोत्र शाळा स्थापली होती.
आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रखुमाबाई होत.
वडील नोकरीच्या निमित्ताने कुटुंबासहित बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच पूर्ण झाले.
महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते 1916 वर्षी मुंबईस जाण्यास निघाले. परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे गेले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते.
एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदु विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले.
त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या.
त्यांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला व गांधींची कोचरब आश्रमात 7 जून 1916 रोजी भेट घेऊन सत्याग्रहश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली.
X X
विनोबांची सामाजिक व धार्मिक कार्य:
विनोबा भावे ऑक्टोबर 1916 रोजी महात्मा गांधींची एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता आले.
ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनाचा उद्देश होता.
वाई येथे प्राज्ञपाठशाळा मंडळाचे संस्थापक व मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वती (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांच्यापाशी विनोबांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्र शांकरभाष्य, पांतजलयोगसूत्रे इ. विषयांचे अध्ययन केले.
त्याठिकाणी माहुली येथील स्वामी कृष्णानंद यांच्या आश्रमातील काही प्रौढ विद्यार्थी-शिवनामे, वि. का. सहस्रबुद्धे इत्यादी मंडळीही त्यांच्याबरोबर सहाध्यायी होती. दिनकरशास्त्री कानडे व महादेवशास्त्री दिवेकर हे प्राज्ञपाठशाळेची व्यवस्थापनाची व अन्य प्रकारची कामे पाहत होते.
प्रत्येक सोमवार हा या पाठशाळेचा सुटीचा म्हणजे अनध्ययनाचा दिवस असे. त्या दिवशी पाठशाळेची अंगमेहनतीची कामे शिक्षक-विद्यार्थी उरकत असत आणि प्रज्ञानंदस्वामींच्या समाधिस्थानाच्या सभागृहात विद्यार्थी व शिक्षक यांच्या शास्त्रार्थ चर्चेकरता साप्ताहिक सभा भरत. चर्चेचे विषय सामाजिक, धार्मिक, तात्त्विक हे असतच; परंतु त्याबरोबर प्रचलित राजकारणाची अनेक बाजूंनी मीमांसाही चालत असे.
दिनकरशास्त्री कानडे हे सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद घोष इत्यादी सशस्त्र क्रांतीकारकांच्या मार्गाने चालणाऱ्या एका गुप्त कटाचे सदस्य होते.
सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा ते पुरस्कार करीत. विनोबांच्याप्रमाणेच त्यांचेही वक्तृत्व अमोघ होते.
अहिंसक क्रांताची वैचारिक भूमिका विनोबा मोठ्या परिणामकारक रीतीने या साप्ताहिक सभांमध्ये मांडीत असत. 1917 वर्षी हिवाळ्यात वाई येथे प्लेगची साथ उद्भवली.
कृष्णेच्या दक्षिण तीरावर राहुट्या आणि पर्णशाला उभारून त्यांत प्राज्ञपाठशाळेचे विद्यार्थी व शिक्षक जवळजवळ 4 महिने राहिले. वेदान्ताचे व इतर शास्त्रांचे पाठ त्यांतील एका विस्तृत पर्णशालेमध्ये चालत असत.
विनोबा पर्णशालेबाहेरच्या कृष्णाकाठच्या आम्रवृक्षाच्या छायेखाली उपनिषदांचे व शांकरभाष्याचे उच्च स्वरात वाचन करीत, हळूहळू सावकाश फेऱ्या मारीत असत.
त्यांचे ते प्रसन्न वाचन ऐकून स्वामी केवलनंदांच्या मनावर विनोबाजींच्या व्यक्तिमत्त्वाची खूप खोल छाप पडली, विनोबांनी वेदान्ताविषयामध्ये खूप वेगाने 10 महिन्यांत प्रगती केली.
आपण कोणकोणत्या ग्रंथांचे व विषयांचे अध्ययन केले याचा सविस्तर वृतान्त त्यांनी महात्मा गांधींना कळवला.
गांधीं हे वृत्तान्तपत्र वाचून अत्यंत विस्मित झाले. त्या पत्राच्या उत्तरात म. गांधींनी अखेर म्हटले की,
" ए गोरख, तूने मच्छिंदरको भी जीत लिया है !".
X X
कौटुंबिक आघात:
विनोबा वाईहून परत अहमदाबादला फेब्रुवारी 1918 मध्ये परतले.
1918 साली एन्फ्ल्यूएंझाची साथ देशभर पसरली. लक्षावधी लोक त्या साथीला बळी पडले. त्यात विनोबांचे वडील, मातुश्री आणि सगळ्यात धाकटा भाऊ दत्तात्रय हे आजारी पडले. ही गोष्ट महात्मा गांधीना कळल्यावर त्यांनी विनोबांना मातुश्रींच्या शुश्रूषेकरता बडोद्यास जाण्याचा आग्रह धरला.
विनोबा तयार नव्हते. गांधीनी त्यांचे मन वळवले. आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले. वडील बरे झाले.
विनोबा सर्वांत ज्येष्ठ पुत्र, म्हणून आईचा अंत्यविधी त्यांनीच करणे प्राप्त होते.
पुरोहिताकडून अंत्यविधीचा संस्कार करवून घेणे विनोबांना मान्य नव्हते. म्हणून ते स्मशानात गेले नाहीत. वडिलांनी अंत्यविधी उरकून घेतला.
X X
वर्ध्यात सत्याग्रह आश्रमाची शाखा स्थापन:
गांधींजीचे भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी 1921 वर्षी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून म. गांधीनी विनोबांची रवानगी वर्ध्यास केली.
8 एप्रिल 1921 रोजी विनोबा वर्ध्याला पोहोचले. आतापर्यंत संबध आयुष्य 1951 ते 73 पर्यंतची भूदानयात्रा सोडल्यास या वर्ध्याच्या आश्रमातच राहून विनोबांनी तपश्चर्या करीत जीवन घालविले. हा वर्ध्याचा आश्रम क्रमाने मगनवाडी, बजाजवाडी, महिलाश्रम, सेवाग्राम व पवनार ह्या ठिकाणी फिरत राहिला. ही सर्व ठिकाणे वर्ध्याच्या 8 किमी. परिसरातच आहेत.
दिवसातले सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम यांमध्ये त्यांनी घालविले. रोज नेमाने शरीरश्रम प्रत्येक माणसाने करावे, असा त्यांचा सिद्धांत आहे. 'शरीरश्रमनिष्ठा' हे त्यांच्या जीवन-तत्त्वज्ञानाप्रमाणे महत्त्वाचे व्रत होय.
X X
शरीरश्रमांबरोबरच त्यांनी मानसिक, आधात्मिक साधनाही प्रखरतेने केली. 1930 व 32 च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला व त्यांनी कारागृहवास भोगला.त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली.
सुप्रसिद्ध गीताप्रवचने या कारागृहात त्यांनी दिली. शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांस्तव शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत.
त्यांमध्ये शेठ जमनालाल वजाज, गुलजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरूजी इ. मंडळी उपस्थित असत.
X X
वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :
महात्मा गांधीनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन 1940 वर्षी आरंभले.
त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली.
जवाहरलाल नेहरू हे दुसरे सत्याग्रही म्हणून निवडले.
आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलला शत्रुमित्रसमभावी तपस्वी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक, म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली.
कारण सत्याग्रह हे शत्रूच्या हृदयपरिवर्तनाचे नैतिक शुद्ध साधन होत, अशी म. गांधीची मुलभूत राजकीय भूमिका होती.
उच्चतम आध्यात्मिक जीवनसाधनेस वाहिलेला शत्रुमित्रभाव विसरलेला माणूसच असे हृदय-परिवर्तन करू शकतो, अशी म. गांधींची धारणा होती.
20 ऑक्टोबर 1940 रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात गांधींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिली आहे.
X X
गांधी आणि विनोबा संवाद:
वैयक्तिक सत्याग्रहानंतर 7 मार्च 1951 पर्यंत पवनार येथील परंधाम आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्येत जीवन व्यतीत केले.
1966 पासून म. गांधी साबरमतीचा आश्रम सोडून सेवाग्रामला म्हणजे पवनारजवळच येऊन राहिले.
त्यामुळे गांधी आणि विनोबा यांचा चिरकाल संवाद चालू राहिला. गांधीच्या देहान्तानंतर सर्वसेवासंघ व सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना झाली.
मार्च 1948 मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी (सर्व बाजूंनी जीवन उद्ध्वस्त झालेले) दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले.
त्यांना धीर देण्याकरता विनोबांना पंडितजींनी बोलावून घेतले. या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न विनोबांनी केला.
X X
भूदान चळवळीचे प्रणेते:
सशस्त्र क्रांतिवादी कम्युनिस्टांनी 1951 वर्षी तेलंगणामध्ये जमीनदार वर्गावर हल्ले सुरू केले.
अहिंसक क्रांतीचा संदेश म. गांधीनी जगाला दिला. परंतु तो भारतालाही समजला नाही, तर जगाला कसा समजेल ? असा प्रश्न त्यामुळे उत्पन्न झाला.
गांधीवाद हा गांधींबरोबरच स्वर्गवासी झाला की काय, असा प्रश्न उपस्थित झाला.
त्याचे उत्तर अस्तिपक्षी म्हणजे या भूतलावरच शांतिमय क्रांतीचे कार्य पुरे व्हावयाचे आहे अशा तर्हेचा विश्वास निर्माण करण्याकरता 'सब भूमी गोपाल की' व 'जय जगत्'ची घोषणा विनोबांनी केली.
विनोबांनी सेवाग्रामहून 7 मार्च 1951 रोजी आंध्रमधील शिवरामपल्ली या गावाला पोहोचण्यासाठी पदयात्रा सुरू केली.
सर्वोदय संमेलनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी 5 मुद्यांचा कार्यक्रम सांगितला.
आंतरिक शुद्धी, बाह्य शुद्धी, श्रम, शांती व समर्पण हे ते पाच मुद्दे होत. ही पदयात्रा म्हणजे भूदानाचे ऐतिहासिक आंदोलन होय.
18 एप्रिल 1951 रोजी तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात पोचमपल्ली गावी विनोबा पोहोचले. हे कम्युनिस्ट नक्षलहाद्यांचे केंद्र होते.
त्या ठिकाणी विनोबांनी जाहीर केले की, 'मी आजपासून भारतातील भूमिहीनांसाठी जमीन मागण्याचा प्रयोग करीत आहे. जमिनीची योग्य वाटणी झाली तरच खरी सामाजिक क्रांती-विशेषतः स्वयंपूर्ण ग्रामराज्याकडे नेणारी क्रांती-निर्माण होऊ शकेल' ही यात्रा सुरू झाल्यानंतर 70 दिवसांत एकूण 12 हजार एकर जमीन मिळाली.
त्यानंतर पं. नेहरूंच्या निमंत्रणावरून पंचवार्षिक योजनांसंबंधी विचारविनिमय करण्याकरता विनोबा पायीच दिल्लीकडे निघाले.
12 सप्टेंबर 1951 रोजी दिल्लीला पोहचले. त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, आंध्र, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र इ. राज्यांमधून सु. साडेतेरा वर्षे पदयात्रा करून सेवाग्रामला विनोबा पोहोचले.
साऱ्या जगाचे लक्ष या ग्रामदानच्या आंदोलनाकडे त्यांनी वेधून घेतले. वय वर्षे 55 ते 68 पायी यात्रा करून सारा भारत देश त्यांनी पाहिला. चाळीस हजार मैल चालले.
मध्य प्रदेशात आले. तेथील डाकूंच्या क्षेत्रात पदयात्रा चालू असता 19 दरोडेखोरांनी आत्मसमर्पण केले. 1970 वर्षी पवनार येथे येऊन क्षेत्रसंन्यास घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.
X X
ग्रंथ संपदा:
विनोबांजीचे बहुतेक पुस्तके मूळ मराठी अथवा हिंदीत भाषेत आहेत.
गुजरातीत भाषेत काही प्रवचने आहेत. सर्व आधुनिक भारतीय भाषांत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत.
त्यांच्या ग्रथांची संख्या 200 वर आहे. त्यांतील त्यांची विशेष महत्त्वाची पुस्तके :
1. मराठी भाषेततील पुस्तके:
1. मधुकर
2. गीताई
3. गीताप्रवचन
4. ईशावास्यवृत्ति ( 13 श्लोकांच्या तत्वज्ञानावरील पुस्तक)
5. स्वराज्यशास्त्र आणि सर्वोदय विचार
6.लोकनागरी लिपि
7. गांधी तत्त्वज्ञान
8. सर्वोदयाची विविध घोषणा
9. ज्ञानदेव चिंतनिका
10. भागवत धर्म मीमांसा
11. स्थितप्रज्ञ-दर्शन
12. भूदानयज्ञ-समग्रदर्शन
13. स्त्री-शक्ती, दीक्षा
X X
2. हिंदी भाषेततील पुस्तके:
1. जपुजी
2. विनोबाके विचार (3 भागांत)
3. जीवन और शिक्षण
4. शिक्षण विचार
5. भूदानगंगा (८ भागांत)
6. ग्रामदान
7. भूदानयज्ञ
8. सर्वोदय विचार और स्वराज्यशास्त्र
9. सर्वोदय की ओर
10. भाषा का प्रश्न
11. गावगाव मे स्वराज्य
12. सयंम और संतति
13.प्रेमपुर्ती ईसा
14. विनोबा चिंतन (48 भागांत)
15. तीसरी शक्ती
16. नामघोषानवनीत (संपादित)
17. बापू के चरणो मे (संपा.)
18. कुरान सार
X X
3. संस्कृत भाषेतील साहित्य:
1. ऋग्वेद सार संकलन
2. साम्यसूत्रे
3. वेदान्तसुधा (संकलन) इत्यादी.
X X
4. इतर ग्रंथ:
1. अष्टादशी (सार्थ)
2. उपनिषदांचा अभ्यास
3. गीताई-चिंतनिका
4. गीता प्रवचने
5. गुरूबोध सार (सार्थ)
6. जीवनदृष्टी
7. भागवत धर्म-सार
8. मनुशासनम् (निवडक मनुस्मृती - मराठी)
9. लोकनीती
10. विचार पोथी
11. साम्यसूत्र वृत्ति
12. स्थितप्रज्ञ-दर्शन
X X
5."गीताई" ग्रंथाचे लेखन:
"गीताई" हे विनोबा भावे यांनी भगवद्गीताचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर होय.
गीतेतील श्लोकांच्या अर्थाचा आशय न बदलता त्यातील श्लोकांचे भाषांतर किंवा समश्लोकी रचना विनोबा यांनी केली आहे. हे लेखन विनोबा भावे यांनी 1932 वर्षी केले.
याच्या 2017 पर्यंत 268 आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.
आपल्या आईला भगवत गीता समजावी म्हणून त्यांनी भगवद्गीतेचे भाषांतर मराठीत केले.
पडता रडता घेई उचलुनी कडेवरी||
या शब्दात विनोबांनी 'गीताई'चे वर्णन केले आहे.
X X
सन्मान व पुरस्कार:
2. 1983 मध्ये भारत सरकारने विनोबांना "भारतरत्न" पुरस्कार (मरणोत्तर) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.
X X
निधन:
विनोबांना 5 नोव्हेंबर रोजी ताप आला, त्याबरोबरच हृदयविकारही उद्भवला आणि प्रकृती चिंताजनक झाली.
उपचार त्वरित सुरू झाले. त्यांनी परंधाम आश्रम सोडण्यास नकार दिला व तेथेच उपचार सुरू झाले.
मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. मेहता मुंबईहून आले होते. परंतु 8 नोव्हेंबर रोजी रात्री अन्नपाणी आणि औषधे या तिन्ही गोष्टी घेण्यास त्यांनी नकार दिला.
इंदिरा गांधी विनोबाजींना 10 नोव्हेंबर रोजी भेटल्या. अन्नपाणी, औषधे घेण्याची विनंती त्यांनीही केली.
विनोबा म्हणाले
" आता देह आत्म्याला साथ देत नाही. रखडत जगण्यात अर्थ नाही. जराजर्जर शरीर टाकणेच ठीक !"
विनोबांनी प्रायोपवेशनाच्या द्वारे दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 15 नोव्हेंबर 1982 रोजी सकाळी 9.40 वाजता पवनार, महाराष्ट्र, भारत येथे परंधाम आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. त्यानी देहत्याग केला.
हिंदु धर्मात यास ' प्रायोपवेशन ' म्हणतात.
प्राय म्हणजे तप. तपाचा एक मुख्य अर्थ ' अनशन ' असा आहे.या निधनाला कोणी महानिर्वाण म्हणाले, कोणी युगपुरूषाची समाधी म्हणाले.
X Xविनोबा भावे यांचा आश्रम व स्मारक:
आचार्य विनोबा भावे यांचे पवनार येथील परमधाम आश्रम तहसील सेलु जिल्हा वर्धा, महाराष्ट्र शासन.
येथील धाम नदी तीरावर स्थित ब्रह्मविद्या मंदिर (परमधाम आश्रम) ही आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी होय. येथे त्यांनी जगण्याचे विविध प्रयोग केले.
संतांची ही कर्म व प्रेरणाभूमी आहे. या भूमीतून प्रेरणा घेण्याकरिता देशभरातून दररोज शेकडो पर्यटक तथा अनुयायी येथे भेट देतात. विनोबांची समाधी सुद्धा याच ठिकाणी आहे.
X X
विनोबांचे विचार:
1) वर्तमानाला बंधन असावे म्हणजे वृत्ति मोकळी राहते.
2) सत्य, संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे .
3)आध्यात्मिक व्यवहार म्हणजे स्वाभाविक व्यवहार म्हणजे शुद्ध व्यवहार .
4) हिंदुधर्माचे स्वरूप : आचार-सहिष्णुता, विचारस्वातंत्र्य, नीति- धर्माविषयी दृढता.
5) प्राप्तांची सेवा, संतांची सेवा, द्वेष कर्त्याची सेवा ही सर्वोत्तम सेवा.
6) असत्यात शक्ति नाही. आपल्या अस्तित्वासाठी ही त्याला सत्याचा आश्रय घेणे भाग आहे.
7) सत्य , संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे.
8) ईश्वर, गुरू ,आत्मा, धर्म, आणि संत ही पाच पूजास्थाने .
9) इतिहास म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंतचे सर्व जीवन. पुराण म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंत टिकलेला
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/bharat-ratna-indias-highest-honor-award.html
👆
Bharat Ratna: India's highest honor award
भारतरत्न : भारतातील सर्वोच्च सन्मान पुरस्कार
X X
View, Comments and share.....


.jpg)
.jpg)
.jpg)
















4 Comments
Nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDelete👍
ReplyDelete