Amartya Sen: Indian Economist and Philosopher
अमर्त्य सेन: भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ
जन्मदिन-3 नोव्हेंबर
बालपण आणि शिक्षण:
भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ अमर्त्य सेन यांचा जन्म आत्ताचे पश्चिम बंगाल राज्याततील व त्या वेळच्या ब्रिटिश भारतातील बंगाल मधील शांतीनिकेतन येथे एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत एका बंगाली हिंदू वैद्य कुटुंबात आशुतोष व अमिता या दांपत्यापोटी 3 नोव्हेंबर 1933 रोजी झाला. रवींद्रनाथ टागोर यांनी अमर्त्य सेन यांना त्याचे नाव दिले.
वडील आशुतोष सेन हे डाक्का विद्यापीठात रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते.
दिल्लीतील विकास आयुक्त आणि तत्कालीन पश्चिम बंगाल लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते.
1945 मध्ये ते आपल्या कुटुंबासमवेत पश्चिम बंगालमध्ये गेले. सेनची आई अमिता सेन प्रख्यात संस्कृतवादी आणि रवींद्रनाथ टागोर यांचे निकटवर्तीय असलेल्या प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील अभ्यासक क्षिती मोहन सेन यांची मुलगी होती.
अमर्त्य सेन यांनी डाक्का येथील सेंट ग्रेगरी स्कूलमध्ये सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतरचे पुढील शिक्षण विश्वभारती मध्ये इंटरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
अमर्त्य सेन यांनी 1953 मध्ये कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी. ए. हे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अमर्त सेन हे पुढील उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्या ठिकाणी 1955 मध्ये ट्रिनिटी कॉलेज केंब्रिजमधून त्यांनी दुसऱ्यांदा अर्थशास्त्र विषयात बी. ए. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी तेथूनच 1929 मध्ये एम. ए. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. आणि पीएच. डी. या ही सुद्धा संशोधनातील पदवी प्राप्त केली.
अमर्त्य सेन यांनी भारतातील जादवपूर विद्यापीठात 1955 ते 1958 या काळात अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये 1963 ते 1971 या काळात सुद्धा त्यांनी अध्यापनाचे कार्य केले व त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे 1971 ते 77 या काळामध्ये अध्यापनाचे कार्य केले.
यानंतर अमर्त्य सेन यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये 1977 ते 1988 मध्ये अध्यापनाचे कार्य केले होते.
अर्थशास्त्राबरोबरच त्यांनी तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी 1988-1998 या कालावधीत अमर्त्य सेन यांनी अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्यापनाचे कार्य केले.
अमर्त्य सेन यांची 1998-2004 या कालावधीत ‘मास्टर ऑफ ट्रिनिटी कॉलेज’ या पदावर नियुक्ती झाली व त्या ठिकाणी काम केले. या अशा महत्त्वाच्या पदावर काम करणारे ते पहिले भारतीय होते. यानंतर हार्व्हर्ड येथे लॅमाँट युनिव्हर्सिटीत अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केले.
X X
अमर्त्य सेन यांचे अर्थशास्त्रीय संशोधन व विचार:
1. भारतीय संस्कृती, भारताची ओळख आणि इतिहास या विषयांशी निगडित असे अनेक मार्मिक लेख समाविष्ट केलेले आहेत. अमर्त्य सेन यांचा "दी आयडिया ऑफ जस्टिस" हा ग्रंथ 2009 मध्ये प्रसिद्ध झाला. कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवडीचा सिद्धांत यांवर हा ग्रंथ आधारलेला असला, तरी त्यात त्यांचे तात्त्विक विवेचन आहे.
2. विकासाच्या संदर्भात अमर्त्य सेन यांनी क्षमतेची संकल्पना विकसित केली. ‘इक्वॉलिटी ऑफ व्हॉट?’ या त्यांच्या लेखात त्यांनी ती मांडली आहे. लोकांच्या क्षमता वाढायच्या असतील तर त्यांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे आणि ते बजाविण्याचे स्वातंत्र्य व योग्य त्या सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या पाहिजे. उदा., लोकांना मतदानाचा निव्वळ हक्क देऊन उपयोग नाही तर त्यांना तो बजावण्याचे योग्य व चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. सेन यांनी 1990 मध्ये न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्समध्ये ‘मोअर दॅन 100 मिल्यन विमेन आर मिसिंग’ असा एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी विकसनशील देशांतील लिंगभेद, दुष्काळ, दारिद्र्य आणि विषमता यांवर मूलगामी स्वरूपाची विश्लेषणात्मक चर्चा केली आहे. आर्थिक विकासाचा विचार करताना त्यांनी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यांतील सूक्ष्म फरक स्पष्ट केला आहे.
3. सेन यांचा "पॉव्हर्टी अँड फेमिन्स : ॲन एसे ऑन एन्टायटलमेंट अँड डीप्राइव्हेशन" हा ग्रंथ 1981 मध्ये प्रसिद्ध झाला. दुष्काळ हा केवळ अन्नधान्याच्या तुटवड्यामुळेच होत नसून अन्नवाटपाच्या यंत्रणांमधील विषमतेमुळेही तो होऊ शकतो, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या ग्रंथात केले. शहरांमधून निर्माण झालेली आर्थिक तेजी आणि त्यामुळे वाढलेल्या अन्नधान्याच्या किमती यांमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होणे शक्य असते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी दुष्काळ प्रत्यक्ष पाहिला होता. त्यात उपासमारीने लाखो लोक मरण पावले होते. वाढलेल्या किमतीत धान्य घेणे ज्यांना शक्य नव्हते, अशी माणसे (उदा., भूमिहीन मजूर) मृत्युमुखी पडली. माहितीच्या आधारे सेन यांनी असे दाखवून दिले होते की, बंगालमध्ये त्या वेळी धान्यसाठा पुरेसा होता; तथापि साठेबाजीमुळे धान्य महाग झाले. परिणामतः सामान्य लोकांना ते खरेदी करणे अशक्यप्राय झाले. त्यामुळे लोकांची उपासमार झाली.
4. अर्थशास्त्रीय धोरणांचे समाजाच्या हितावर काय परिणाम होतात, त्या धोरणांचे मूल्यमापन करणे हे कल्याणकारी अर्थशास्त्राचे उद्दिष्ट होय. अमर्त्य सेन यांनी 1970 मध्ये लिहिलेल्या आपल्या कलेक्टिव्ह चॉइस अँड सोशल वेल्फेअर (1970) या ग्रंथात व्यक्तींचे हक्क, बहुसंख्याकांचे शासन आणि व्यक्तीच्या स्थितिगतीबाबतच्या माहितीची उपलब्धता यांसारख्या प्रश्नांचा परामर्श घेतला आहे. यांतून संशोधकांना अशा प्रश्नांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.
X X
5. अमर्त्य सेन यांनी समाजातील दारिद्याचे व कल्याणाचे निर्देशांक निश्चित केले. हे निर्देशांक खालील प्रमाणे दोन कारणांसाठी महत्त्वाचे ठरतात हे मत त्यांनी आपल्या अभ्यासांती मांडले.
1. देशातल्या वेगवेगळ्या समाजगटांत दारिद्याचे प्रमाण किती आहे; त्याचे विभाजन कसे आहे; त्यांत वेळोवेळी कसे आणि कोणते बदल झाले आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.
2. देशातले दारिद्र्याचे प्रमाण आणि आर्थिक कल्याणाचे प्रमाण ह्यांच्या तुलनेसाठीही हे निर्देशांक महत्त्वाचे ठरतात. त्यांनी 1990 मध्ये देशांची क्रमवारी ठरविण्यासाठी तेथील लोकांचे आयुर्मान, शिक्षण व उत्पन्न यांवर आधारित ‘युनायटेड नेशन्स ह्यूमन इंडेक्स’ ही प्रणाली विकसित झाली.
6. 1981 मध्ये अमर्त्य सेन यांनी गरिबी आणि दुष्काळ : अ निबंध ऑन राइक्ट्रिशन अण्ड फेन्स (1981) हे पुस्तक प्रकाशित केले या पुस्तकात त्यांनी संशोधनात्मक ठाम मत असे मानले की दुष्काळ केवळ अन्नाच्या अभावामुळेच नव्हे तर अन्न वितरणासाठी यंत्रणेत बांधलेल्या विषमतेमुळे होतो. सेन यांनी असेही पुस्तकात प्रतिपादन केले की, बंगालचा दुष्काळ शहरी आर्थिक तेजीमुळे अन्नधान्याच्या किंमती वाढल्या आणि त्यामुळे लाखो ग्रामीण भागातील कामगारना त्यांचे वेतन न मिळाल्यामुळे उपाशी पोटी राहावे लागले.
7. "ॲन अनसर्टन ग्लोरी : इंडिया ॲन्ड इट्स कॉनट्रॅडिक्शन" हे डिन ड्रेज आणि अमर्त्य सेन लिखित पुस्तक लंडनच्या पेग्विन प्रकाशनाने 2013 साली प्रकाशित केले आहे.
त्यात त्यांनी नागरिकांच्या विशेषतः गरीब लोकांकडे आणि स्त्रियांकडे लक्ष न दिल्यामुळे भारतामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. लोकांच्या जगण्याच्या पद्धतीमध्यधे सुधारणा व्हावी यासाठी लोकांना विकासात सहभागी करून घेण्याशिवाय दुसरा उपाय नाही. शालेय शिक्षण, वैद्यकीय सुविधा या सारख्या सेवा/सुविधाआणि शुद्ध पाणी, वीज, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक स्वछता अश्या सोयी पुरवण्यातही कमतरता आहे.आर्थिक समृद्धी आणि मानवी विकास या संदर्भात जपान, दक्षिण कोरिया आणि चीन इत्यादी देशांचा एक विशिष्ट दृष्टिकोन आहे. त्या दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करून, भारताने सामाजिक आणि भौतिक सुविधांकडे पाठ फिरवल्यामुळे मानवी क्षमतांचा न केलेला विकास हा आर्थिक प्रगतीवर परिणाम करू शकतो. सामाजिक आणि आर्थिक आघाड्यांवरील निराशाजनक कमतरतांविषयी केवळ सरकारने धोरणात्मक बदल करून चालणार नाही. तर जनतेलाही यासंबधी स्पष्ट जाणीव असली पाहिजे, तरच ते योग्य ठरेल. अलीकडे, योजना आयोगाने 2011-12 या मध्ये दारिद्ऱ्य रेषेखालील भारत 1.2 अब्ज लोकसंख्येच्या एक पेक्षा कमी तिमाहीत झाली की अंदाज जाहीर केला.
मिलेनियम डेव्हलपमेंट गोल संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) पासून ताज्या अहवालात 1990 आणि 2010 दरम्यान, जगभरातील गरिबी कमी आर्थिक वाढ परिणाम केले गेले आहे हे लक्षात येते. येथील विषमतेमुळे सुस्थित लोकांची आयुष्य आणि मुद्दे यावरच चर्चा घडताना दिसते.
लोकांची आयुष्य आणि मुद्दे यावरच चर्चा घडताना दिसते. ड्रेझ आणि सेन हे विषमतेचे समर्पक विश्लेषण करून लोकशाही पद्धतीतून बदल घडवून आणणे कसे शक्य आहे, ते दाखवून देतात. तसेच वर्ग, जात, लिंग, इत्यादींमधील विषमतेकडे लक्ष केंद्रित करतात. या दोघांनी देशातील स्त्रियांच्या एकूणच स्थितीचा व त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाचा आढावा घेतला आहे.
X X
अमर्त्य सेन: नोबेल पुरस्कार
दारिद्र्याच्या प्रश्नावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना 1998 मध्ये अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार देण्यात आला.
अमर्त्य सेन यांचे कल्याणकारी अर्थशास्त्रातील मुलभूत समस्यांवरील पुढील योगदान अतिशय महत्त्वाचे आहे :
(1) सामाजिक निवडीचा सिद्धांत
(2) दारिद्र्याचे निर्देशांक
(3) कल्याणाचे निर्देशांक आणि
(4) दुष्काळाचे विश्लेषण.
X X
ग्रंथ संपदा:
अमर्त्य सेन यांनी स्फुटलेखन व ग्रंथलेखन केले आहेत. काही ग्रंथ त्यांचे तीस भाषांमध्ये भाषांतरीत झालेले आहेत.
1. चॉइस ऑफ टेक्निक्स (1968)
2. कलेक्टिव्ह चॉइस अँड सोशल वेल्फेअर (1970)
3. बिहेविअर अँड दी कन्सेप्ट ऑफ प्रिफरन्स (1971)
4. ऑन इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी (1973)
5. पॉव्हर्टी अँड फेमिन्स : ॲन एसे ऑन एन्टायटलमेंट अँड डीप्राइव्हेशन (1981)
6. डिस्काउटिंग फॉर टाइम अँड रिस्क इन एनर्जी पॉलिसी (1982)
7. चॉइस, वेलफेअर अँड मेजरमेंट (1982)
8. रिसोर्सेस व्हॅल्यूज अँड डेव्हलपमेंट (1984)
9. कोमोडिटिज अँड कॅपॅबिलिटी (1985)
10. ऑन इथिक्स अँड इकॉनॉमिक्स (1987)
11. फूड, इकॉनॉमिक्स अँड एन्टायटलमेंट्स (1987)
12. हंगर अँड पब्लिक ॲक्शन (1989)
13. इनइक्वॅलिटी रेक्झामाइंड (1992)
14. इंडिया : इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड सोशल अपोर्च्युनिटी (1995)
15. सस्टेनेबल ह्यूमन डेव्हलपमेंट : कन्सेप्ट्स अँड प्रायोरिटिज (1996)
16. ह्यूमन राइट्स अँड एशियन व्हॅल्यूज (1997)
17. दी अमर्त्य सेन अँड जीन ड्रेस ओम्निबल (1998)
18. डेव्हलपमेंट ॲज फ्रिडम (1999)
19. रिजन बिफोर आयडेंटी (1999)
20. भारतीय राज्योंका विकास (2000)
21. आर्थिक विकास और स्वातंत्र्य (2001)
22. डिलिव्हरी दी मॉन्टेरी कॉन्शेन्सस : विच कॉन्शेन्सर? (2002)
23. रॅशनॅलिटी अँड फ्रीडम (2002)
24. रिकन्स्ट्रक्टिंग दी वर्ल्ड : बी. आर. आंबेडकर अँड बुद्धिज्म इन इंडिया (2004)
25. दि ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडिया (2005)
26. आयडेन्टिटी अँड व्हॉयलन्स (2006)
27. सिव्हिल पॅथ टू पिस (2007)
28. दी आयडिया ऑफ जस्टिस (2009)
29. मिसमेजरिंग : अवर लाइव्ह्ज (2010)
30. ॲन ग्लोरी : इंडिया अँड इट्स कॉन्ट्रॅडिक्शन (2013)
31. निती और न्यायता (2013)
32. ए विश ए डे ए विक (2014)
33. डेमॉक्रसी ॲज ए युनिव्हर्सल व्हॅल्यू (2014)
34. दी कन्ट्री ऑफ फर्स्ट बॉइज (2015)
35. एड्स सूत्र : अन्टोल्ड स्टोरीज फ्रॉम इंडिया (भारतातील एड्सच्या संकटावरील निबंध)
X X
सन्मान व पुरस्कार:
1. 1984 मध्ये इकॉनॉमिक सोसायटीचे अध्यक्ष होते.
2. 1986 ते 89 या काळात "दी इंटरनॅशनल इकॉनॉमिक असोसिएशन"चे अध्यक्ष पदावर काम केले.
3. 1989 मध्ये इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष होते.
4. 1994 मध्ये अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष होते.
5. जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्यानी सन्मानित करण्यात आले. कारण त्यांनी आज अर्थशास्त्राला एक नवा अर्थ नवी दिशा दिली होती त्याला तात्विक नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले होते.
6. भारत सरकारने त्यांना 1999 मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले.
7. 1999 वर्षी बांगला देशाने त्यांना आपल्या देशाचे सन्माननीय नागरिकत्व दिले.
8. 2012 मध्ये अमेरिकेने त्यांना नॅशनल ह्यूमॅनिटी मेडल देऊन सन्मानित केले. पहिल्यांदाच हा पुरस्कार बिगर अमेरिकन तज्ज्ञाला मिळाला होता.
9. जर्मनीकडून जर्मन बुक ट्रेडच्या 2020च्या शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैश्विक न्याय, शिक्षण आणि आरोग्य सेवा यांमध्ये सामाजिक असमानता नसावी, या मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या असामान्य कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. त्यात सन्मानचिन्ह व 25000 युरो (सुमारे 21 लाख रुपये) या स्वरूपात तो पुरस्कार दिला जातो.
10. दारिद्र्याच्या प्रश्नावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना 1995 मध्ये अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आला.
11. भारत सरकारने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी 2007 साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समितीचे ते अध्यक्ष आहेत.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/bharat-ratna-indias-highest-honor-award.html
👆
Bharat Ratna: India's highest honor award
भारतरत्न : भारतातील सर्वोच्च सन्मान पुरस्कार
View, comments and share


2 Comments
लोकांना मतदानाचा निव्वळ हक्क देऊन उपयोग नाही तर त्यांना तो बजावण्याचे योग्य व चांगले शिक्षण मिळाले पाहिजे.
ReplyDeleteNice
ReplyDelete