Subscribe Us

header ads

R.K.Laxman: Indian cartoonist

R.K.Laxman (Rasipuram Krishnaswami Laxman): Indian cartoonist, illustrator and humorist

आर. के. लक्ष्मण तथा रासीपुरम कृष्णस्वामी: व्यंगचित्रकार,चित्रकार

"द कॉमन मॅन"व्यंगचित्रसंग्रहाचे जनक

जन्मदिन- 24 ऑक्टोबर




बालपण आणि शिक्षण:

एक प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार, चित्रकार आणि विनोदी लेखक आर. के. लक्ष्मण या टोपण नावाने ओळखले जाणारे तसेच "द कॉमन मॅन"च्या निर्मिती साठी प्रसिद्ध असलेले आणि 1951 मध्ये सुरू झालेल्या टाइम्स ऑफ इंडियातील "यू सेड इट" च्या दैनिक व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1921 रोजी कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे झाला. म्हैसूर येथील शाळेत त्यांचे वडील मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी मागविलेले नियतकालिके त्यांच्या घरी येत असत.

X X

 त्यात 'हार्पर्स', 'पंच', 'ऑन पेपर', 'बॉइज', अ‍ॅटलांटिक', अमेरिकन मर्क्युरी', 'द मेरी मॅगझिन', स्ट्रॅन्ड मॅगझिन', अशी मासिके होते. त्यांना तिथे पहायला-वाचायला नियमीत मिळत असत. लक्ष्मण यांना त्यांतील विविध विषयांवरील चित्रे पाहण्यास मिळत होती व त्यातून त्यांना चित्रे काढण्याची प्रेरणा ही मिळाली. अशी चित्रे आपणही काढून पाहावी असे त्यांना वाटू लागल्याने लक्ष्मण मासिकातील चित्रे पाहून स्वतः चित्रे काढू लागले.

आर.केंनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. पुढे पदवीधर झाल्यावर नोकरी मिळविण्यासाठी  लक्ष्मण  दिल्लीला गेले होते.

 लक्ष्मण महाविद्यालयीन विद्यार्थी असतानाच त्यांचा मोठा भाऊ आर.के. नारायण यांच्या "द हिंदू" या नियतकालिका मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या कथांसाठी चित्रे रेखाटत होते.लक्ष्मण यांचे मोठे बंधू  प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांचा लक्ष्मण यांच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे.

 मुंबईतील " फ्री प्रेस" जर्नलसाठी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून पहिली पूर्णवेळ नोकरी करत होते. त्या नंतर  "टाइम्स ऑफ इंडिया" मध्ये नोकरी करत होते आणि "द कॉमन मॅन" या त्यांच्या वर्तमानपत्रातील पात्रासाठी प्रसिद्ध झाले जो "द कॉमन मॅन" लक्ष्मण यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य बदलून गेले.

X X

व्यंगचित्रकार:

आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे व त्यावरील टिप्पणी मार्मिक असतात. नियमित वर्तमानपत्रात भारतीय राजकारणातील नियमित चालणाऱ्या दैनंदिन गमती जमती ते नेहमी आपल्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर व्यंगचित्रातून दाखवीत असत त्यामुळे  राजकारणी मंडळींचा तो तंबास्फोट करण्यासाठी उपयोगगात आणत असत.

तत्कालीन भारतातील मान्यवर व्यक्ती जवाहरलाल नेहरु, महात्मा गांधीपासून अटलबिहारी वाजपेयी , सोनिया गांधीपर्यंत राजकीय व्यक्तींच्या अनेक एका नंतर एक येणाऱ्या पिढ्या आपल्या व्यंगचित्रातून त्यांनी रेखाटल्या आहेत. एका साध्या लक्ष्मण रेषेतून या नेत्याचे व्यक्तिवैशिष्ट्य स्पष्ट करण्याची कल्पनाशक्ती त्यांच्याकडे होती.

 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीवर लक्ष्मण त्यांच्या कल्पनाशक्तीने अतिशय मार्मिक असे व्यंगचित्र तयार करून ते प्रसिद्ध करून त्यात खूप मार्मिक भाषा वापरतात व त्यांत बोचक टीका सुद्धा असते.

X X

"द कॉमन मॅन"व्यंगचित्रसंग्रहाचे जनक:

आर. के. लक्ष्मण यांचे" द कॉमन मॅन" नावाचे सर्वसामान्य माणसाचे व्यंगचित्र हे खूप विशेष व्यंगचित्र सर्व देशात प्रसिद्ध आहे. हा "द कॉमन मॅन"ज्या वेळेस लक्ष्मण यांनी रेखाटला होता तसाच शेवटपर्यंत त्याची प्रतिमा त्याचा पेहराव हा सारखाच ठेवलेला आहे.  ज्यात चौकड्याचा कोट, धोतर, टोपी असा त्याचा साधा सरळ पेहराव आहे. आर. के. लक्ष्मण यांचा "द कॉमन मॅन" एवढा प्रसिद्ध आहे की तो वर्तमानपत्र वाचकांना इतका आवडतो की एक पूर्णाकृती पुतळाही बनविण्यात त्याचा बनवण्यात आला आहे. आर. के. लक्ष्मण यांनी रेखाटलेले व्यंगचित्रे व वर्तमानातील व्यंगचित्रे अशी निवडक व्यंगचित्रांची पुस्तके ही प्रसिद्ध केले आहेत.

आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रातील " द कॉमन मॅन' गेल्या पन्नास वर्षातील देशातील राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक घडामोडींचा व उलथापालथीचा प्रत्यक्ष साक्षीदारच आहे असे म्हणावे लागेल. चौकटीचा कोट व धोतर या पेहरावातील त्यांची प्रतिकृती सतत कायमच लोकांच्या लक्षात राहिली आहे.

आर. के. लक्ष्मण यांना देशातील सर्वसामान्य भारतीय माणसाच्या मानसिकतेचे अचूक भान त्यांच्या " द कॉमन मॅन" या व्यंगचित्रातून व्यक्त होते. कुठल्याही काळातील, कोणत्याही वयाच्या व्यक्तीला वाचकाला त्यांचे व्यंगचित्रातील मार्मिक विधान पटते आणि रुचते. म्हणूनच  " द कॉमन मॅन" या व्यंगचित्रसंग्रहचे त्यांना जनक म्हणतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता देशात व जगात दीर्घकाळ टिकून राहिली आहे. 

X X

ग्रंथ संपदा:

1. "आयडल अवर्स"

2. "आर.के. लक्ष्मण : दि अनकॉमन मॅन : कलेक्शन ऑफ वर्क्स फ्रॉम" 1948 ते 2008

3. "द इलोक्वेन्ट ब्रश" (व्यंगचित्रसंग्रह)

4. "The Tunnel of Time : An Autobiography" आत्मचरित्र 

5. "अ डोज ऑफ लाफ्टर" (विनोदी अर्कचित्रे)

6. "दि डिस्टॉर्टेड मिरर" (कथा, निबंध, प्रवासवर्णने -2003)

7. "फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण " (व्यंगचित्रसंग्रह)

8. "बेस्ट ऑफ लक्ष्मण" (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका, 4 पुस्तके)

9. "द मेसेंजर" (कादंबरी -1993)

10. "अ व्होट ऑफ लाफ्टर" (विनोदी अर्कचित्रे)

11. "द हॉटेल रिव्हिएरा" (कादंबरी -1989)

12. "लक्ष्मणरेषा" (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक: अशोक जैन)

X X

सन्मान व पुरस्कार:

1. भारत सरकारने 1971 मध्ये पद्मभूषण आणि 2005 मध्ये  पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

2. 1984 मध्ये "रॅमन मॅगसेसे" पुरस्कार –पत्रकारिता, साहित्य आणि क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्ट्ससाठी सन्मानित करण्यात आले.

3. 1983 मध्ये "कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार " कर्नाटक सरकारने सन्मानित केले.

4. 29 जानेवारी 2008 मध्ये पत्रकारितेसाठी "जीवनगौरव पुरस्कार" CNN IBN TV18 ने सन्मानित केले.

5. 2012 मध्ये 'क्रिएटिव्ह कम्युनिकेशन' मधील उत्कृष्टतेसाठी आर्ट अँड म्युझिक फाऊंडेशनतर्फे "पुणे पंडित पुरस्कार" (पुणे पुरस्काराचे विद्वान) ने सन्मानित केले.

6.2004 मध्ये म्हैसूर विद्यापीठाकडून मानद "डॉक्टरेट" ने सन्मानित केले.

7. सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये आर.के. लक्ष्मण यांच्या नावाची एक खुर्ची आहे.

8. मराठा विद्यापीठाने त्यांना "डी.लिट." ही सन्माननीय पदवी प्रदान केली.

9. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा "गोदावरी गौरव" पुरस्काराने सन्मानित केले.

X X

निधन:

व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांना 30 ऑगस्ट 2003 रोजी सकाळी 8 वाजता पक्षघाताचा झटका आला आणि त्यांची डावी बाजू निकामी झाली होती. या आजारातून लक्ष्मण सावरले. त्यानंतर ते पुणे आणि मुंबई येथे पत्नी कमला लक्ष्मण यांच्यासह राहत होते. पण काही अवयव निकामी झाल्यामुळे वयाच्या 93 व्या वर्षी 26 जानेवारी 2015 रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,पुणे महाराष्ट्र येथे निधन झाले.



View, comments and Share.......

X X


Post a Comment

3 Comments