Nobel Alfred : Swedish Chemist, Engineer, Businessman, and Philanthropist
अल्फ्रेड नोबेल: रसायनशास्त्रज्ञ, इंजिनिअर, डायनामाइटच्या शोधाचे जनक आणि नोबेल फाउंडेशनचे संस्थापक
जन्मदिन - 21 ऑक्टोबर
स्मृतिदिनी : 10 डिसेंबर
बालपण आणि शिक्षण:
रसायनशास्त्रज्ञ, इंजिनिअर, डायनामाइटच्या शोधाचे जनक आणि नोबेल फाउंडेशनचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. अल्फ्रेडने डायनामाइट व अन्य प्रचंड शक्तिशाली स्फोटकांचा शोध लावला आणि नोबेल पुरस्कारासाठी फाउंडेशनची या जगप्रसिद्ध संस्थेची स्थापना केली. जगात अतिशय प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या शांततेसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी केलेल्या संशोधनाला दिल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्काराची सुरुवात केली.
अल्फ्रेडची आई कॅरोलीना आणि वडील इमॅन्युएल नोबेल, त्यांचे वडील पेशाने इंजिनियर आणि संशोधक होते. लहानपणी अल्फ्रेड सतत आजारी पडत असे पण आईचे अल्फ्रेडवर खुप प्रेम होते. अल्फ्रेड लहानपणापासूनच अतिशय हुशार व चिकित्सक होता. त्याला स्फोटकांबद्दल खूपच आकर्षण वाटत होते. अभियांत्रिकीचे ज्ञान व शिक्षण त्याने आपल्या वडिलांकडून मिळविले होते.
अल्फ्रेडचे वडील इमॅन्युएल नोबेलनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून स्टॉकहोममध्ये अनेक ब्रिज आणि इमारती बांधल्या होत्या.सुरुवातीला वेगवेगळे अनेक व्यवसाय करत होते व त्या व्यवसायांमधून त्यांना झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे इमॅन्युएल नोबेलनी 1837 वर्षी स्वीडन मधून रशियातील पीट्सबर्ग येथे स्थलांतर केले.
रशिया मात्र खाणीतील स्फोट आणि त्यासंबंधीच्या हत्यारांच्या उत्पादनात त्यांनी प्रचंड यश मिळविले. त्यांनी अल्फ्रेडला उत्तम शिक्षण दिले. अल्फ्रेडही अभ्यासात व त्याची शास्त्रीय संशोधन प्रयोगात विशेष आवड होती. वयाच्या 16 व्या वर्षीच तो एक कार्यक्षम केमिस्ट झाला. सोबत इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि रशियन या भाषांवरही त्याने प्रभुत्व मिळविले. त्यांची मातृभाषा स्वीडिश होती.
अल्फ्रेड हे रशियामध्ये लहानाचे मोठे झाले. फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये त्यांनी रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण पुर्ण केले. 1850 वर्षी त्यांनी रशिया सोडल. पॅरिसमध्ये राहून त्यांनी एक वर्ष रसायनशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर अमेरिकेत जाऊन त्यांनी जॉन एरिक्सन या सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यानंतर परत त्यांनी आपल्या आई-वडिलांबरोबर सैनिकी अवजारे बनविण्याच्या कारखान्यात काम करायला सुरुवात केली. युद्धानंतर पुन्हा एकदा व्यवसाय दिवाळखोरीमुळे बंद करावा लागला आणि हे कुटुंब मायदेशी स्वीडनला परतले.
अल्फ्रेड नोबेल यांचे संशोधन:
स्वीडनला परत आल्यावर अल्फ्रेड यांनी आपले स्फोटकांचे संशोधन सुरूच ठेवले होते. 1863 साली त्यांनी 'डिटोनेटरचा' शोध लावला, तर 1865 साली 'ब्लास्टिंग कॅप' विकसित केली. एका स्फोटात त्यांना आपला भाऊ गमवावा लागला. पण हिमतीने आपले संशोधन पुढे चालूच ठेवले. तो आपल्या उत्पादनच्या विभागाचा विस्तारही करीत होते.
X X
1867 साली त्यांना अपघातानेच 'नायट्रोग्लिसरिन आणि 'किसेलगर' यांच्या संयोगाने एका महत्त्वाच्या नवीन रसायनाचा शोध लागला. या पदार्थाचे नामकरण त्यांनी 'डायनामाइट' (फ्रेंच भाषेत पावडरला डायनामाइट असे म्हणतात) असे केले. या पदार्थाचे त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनकडून पेटंटही मिळवले. या शोधामुळे अल्फ्रेड नोबेल जगप्रसिद्ध झाले.
डायनामाइटचा उपयोग बोगदे तयार करण्यासाठी, शेतीसाठी पाण्याचे कॅनॉल तयार करण्यासाठी, रेल्वे रुळांचा रस्ता तयार करण्यासाठी संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात करु लागले. डायनामाइटच्या उत्पादनाचे आणि विक्रीचे प्रचंड मोठे जाळे त्यांनी 1870 ते 1880 या काळात जगभर सर्वत्र पसरवले होते.
अल्फ्रेड नोबेलने आपले संशोधन त्यांनी सतत चालूच ठेवले. त्यातूनच 1887 साली 'बॅलिस्टाइट' या शक्तिशाली व सोईस्कर स्फोटकाचा शोध लागला. अल्फ्रेड नोबेलने संशोधन, उत्पादन आणि त्याच्या स्वताच्या कंपन्यांमधील गुंतवणूकीच्या साहाय्याने त्याने प्रचंड संपत्ती कमविली.
1893 वर्षी अल्फ्रेड नोबेलने स्वीडनमधील सैनिकांना लागणारी अवजारे, शस्त्रास्त्रे हे उत्पादन करण्यास सुरुवात केली होती. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्फोटके आणि दारूगोळा तयार करणाऱ्या 90 कारखान्यांचे जाळे जगभर पसरले होते. त्यातूनच जगप्रसिद्ध 'बोफोर्स' उत्पादनाची निर्मिती सुरू झाली. स्फोटकांबरोबरच अल्फ्रेड यांनी सिल्क, इत्यादींसारखे बरेच शोध लावले. वेगवेगळ्या देशांत त्यांच्या नावाने सुमारे 355 पेटंट्स आहेत.
निधन:
अल्फ्रेड नोबेल यांना 1895 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि 10 डिसेंबर 1896 रोजी मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांचे इटलीतील सॅन रेमो येथे निधन झाले.
अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा " नोबेल पुरस्कार" हा जगातील सर्वोच्च सन्मान पुरस्कार आहे.
अल्फ्रेड नोबेलचे मृत्युपत्र:नोबेल पुरस्काराचा जन्म
अल्फ्रेड नोबेल यांनी 27 नोव्हेंबर रोजी पॅरिस येथे आपल्या मृत्यूनंतरचे त्यांचे इच्छापत्र तयार करून स्टॉकहोमच्या बँकेत ठेवले होते.
नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे सुमारे 26.5 कोटी डॉलर्सची संपत्ती जागतिक पातळीवरचा नोबल पुरस्कार स्थापन करण्यासाठी दान केली.
आपल्या सर्व संपत्तीचा विनियोग एका ट्रस्टद्वारे मानवी कल्याण करणाऱ्या संशोधकांचा, साहित्यिकांचा आणि शांततेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी करावा अशी त्यांची शेवटची इच्छा होती.
लोककल्याणाच्या बाबतीत अल्फ्रेड अतिशय उदारमतवादी होते. अल्फ्रेड नोबेल यांच्या अमाप संपत्तीतून जगातील सर्वांत लोकप्रिय व सर्वोच्च सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'नोबेल' पुरस्काराची सुरूवात झाली होती.
ज्यांनी आधुनिक युद्धात वापरली गेलेली अतिशय शक्तिशाली स्फोटके निर्माण केली आणि त्याचबरोबर त्यातून मिळालेली सर्व संपत्ती मानवीकल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून जगात असे काम करण्याची प्रेरणा सतत निर्माण होत राहावी यासाठी वापरली.
जागतिक कीर्तीच्या सन्मानाचेही ते जनक ठरले. अल्फ्रेडच्या मृत्युपत्रातील तांत्रिक अडचणींमुळे पहिले नोबेल पारितोषिक 1901 वर्षासून देण्यास सुरूवात झाली होती. एकीकडे शक्तिशाली स्फोटकांचा निर्माता आणि दुसरीकडे नोबेल पुरस्काराचा जनक हे समीकरण विसंगत वाटण्याजोगे असले तरीही आपण स्वबळावर मिळविलेली संपत्ती जनहितार्थ काम करणाऱ्यांचा बहुमान करण्यासाठी वापरणे हे एक विलक्षण औदार्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता क्षेत्रातल्या कामगिरीसाठी दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. नोबेल पुरस्कार समिती दरवर्षी अर्थशास्त्रातल्या कामगिरीसाठीही पुरस्कार जाहीर करते.
X X
नोबेल पुरस्काराचे स्वरुप:
नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहीलं आहे,
"prizes to those who, during the preceding year, have conferred the greatest benefit to humankind"
म्हणजेच आधीच्या वर्षभरात मानवजातीसाठी महत्त्वाचं ठरणारं काम करणाऱ्यांना हे पुरस्कार देण्यात यावेत.
नोबेल मानपत्र, पदक आणि यासोबत विजेत्याला पुरस्कार निधी 90 लाख स्वीडिश क्रोना (Krona) म्हणजे सध्याच्या दरानुसार सुमारे 7.65 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जातं.
नोबेल पुरस्कार सोहळा स्टॉकहोम आणि ओस्लो या ठिकाणी आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी 10 डिसेंबरला संपन्न करुन विजेत्यांना सन्मानपूर्वक पारितोषिके प्रदान केली जातात.
नोबेल पुरस्कार प्राप्त महत्वाच्या व्यक्ती:
अल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूच्या तब्बल 5 वर्षांनी 1901 मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आले. पहिले नोबेल पारितोषिक रेड क्रॉसच्या हेन्री डनंट यांना यांना प्रदान करण्यात आले होते.
6 पैकी 5 पुरस्कार विजेत्यांची निवड स्वीडनमध्ये केली जाते तर नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची निवड नॉर्वेमध्ये केली जाते.पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान हे पुरस्कार देण्यात आले नव्हते.
1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर (2002)
2. मुलींच्या शिक्षणासाठी चळवळ उभारणारी कार्यकर्ती मलाला युसुफजाई (संयुक्तपणे 2014मध्ये)
3. युरोपियन युनियन (2012)
4. युनायटेड नेशन्स आणि त्यांचे सरचिटणीस कोफी अन्नान (2001मध्ये संयुक्तपणे)
5. मदर टेरेसा (1979) यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
6. अल्बर्ट आईनस्टाईन (1921 भौतिकशास्त्र),
7. मेरी क्युरी (1903 भौतिकशास्त्र आणि 1911 रसायनशास्त्र)
8. हॅरल्ड पिंटर (साहित्य 2005) यांनाही नोबेल पुरस्कार मिळाला होता.
9. रविंद्रनाथ टागोर यांना 1913 साली साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार मिळणारे ते पहिले युरोपियन नसलेले साहित्यिक होते.
10. 2016 मध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार गायक बॉब डिलन यांना देण्यात आला होता.
नोबेल पुरस्कारांमध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने 1968 मध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली. पण याला नोबेल पुरस्कार म्हटलं जात नाही. हा. पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येतो.
भारतीय नोबेल पुरस्कार सन्मानीत व्यक्ती:
1. 1913 मध्ये रविंद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल सन्मानीत करण्यात आले होते.
2. 1930 मध्ये भौतिकशास्त्र विषयातील "रमण इफेक्ट" या संशोधनाबद्दल सर चंद्रशेखर वेंकट ऊर्फ सी. व्ही. रमण यांना सन्मानीत करण्यात आले होते.
3. 1968 मध्ये वैद्यकशास्त्र यासाठी हरगोविंद खुराणा यांना सन्मानीत करण्यात आले होते.
4. 1979 मध्ये शांतता पुरस्कार मदर टेरेसा यांना सन्मानीत करण्यात आले होते.
5. 1983 मध्ये भौतिकशास्त्र सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना सन्मानीत करण्यात आले होते.
6. 1998 मध्ये अर्थशास्त्रासाठीचा नोबेल समितीने सुरू केलेला पुरस्कार अमर्त्य सेन यांना सन्मानीत करण्यात आले होते.
7. 2001 मध्ये साहित्य सर व्ही. एस. नायपॉल यांना सन्मानीत करण्यात आले होते.
8. 2009 मध्ये रसायनशास्त्र वेंकटरमणन रामकृष्णन यांना सन्मानीत करण्यात आले होते.
9. 2014 मध्ये शांतता पुरस्कार कैलाश सत्यार्थी यांना सन्मानीत करण्यात आले होते.
10. 2019 मध्ये अर्थशास्त्रासाठीचा नोबेल समितीने सुरू केलेला पुरस्कार अभिजीत बॅनर्जी यांना सन्मानीत करण्यात आले होते.
X X
नोबेल पारितोषिक विजेते यांनी केलेल्या निधीचा उपयोग:
1. मेरी आणि पिअर क्युरी यांना 1903 मध्ये भौतिकशास्त्रासाठीचं नोबेल मिळालं. त्यांनी या बक्षीसाच्या पैशांचा वापर पुढच्या वैज्ञानिक संशोधनासाठी केला.
2. 2006 चे भौतिकशास्त्राच्या नोबेलचे विजेते जॉन मॅथर यांनी हा निधी त्यांच्या फाऊंडेशनला दान केला.
3. 1993चं वैद्यकशास्त्राचं नोबेल मिळालेल्या ब्रिटीश जैववैज्ञानिक रिचर्ड रॉबर्ट्स यांनी या पैशांनी क्रोके (Croquet) खेळासाठीचं लॉन तयार केलं.
4. 1993 सालीच नोबेल मिळालेल्या फिलिप शार्प यांनी बक्षीसाच्या पैशांनी भलंमोठं घर घेतलं.
5. 2001 सालचं वैद्यकशास्त्राचं नोबेल मिळालेल्या सर पॉल नर्स यांनी एक हायएन्ड मोटरसायकल विकत घेतली.
6. 2006 चे नोबेल साहित्य पुरस्कार विजेते ऑहन पामुक (Orhan Pamuk) यांनी या निधीतून इस्तंबूलमध्ये म्युझियम सुरू केलं.
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/nobel-prize-bhartiya.html
👆
Nobel Prize: The world's largest international award
नोबेल पुरस्कार: जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
नोबेल पुरस्काराचे भारतीय मानकरी
View, comments and Share......
2 Comments
Nice
ReplyDeleteNice Information sirji
ReplyDelete