Subscribe Us

header ads

Annie Besant: British Socialist, Theosophist

Annie Besant: British Socialist, Theosophist 

ॲनी बेझंट (Annie Besant): थिऑसॉफिस्ट, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक ब्रिटिश महिला

जन्मदिन: 1 ऑक्टोबर

सृतिदिन: 20 सप्टेंबर


बालपण आणि शिक्षण:

विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा इ. क्षेत्रांत महान कार्य केलेली एक ब्रिटिश महिला ॲनी बेझंट (Annie Besant) यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1847 रोजी लंडनमध्ये झाला. 

त्यांची आई एमिली ही आयरिश होती आणि वडील विल्यम पेजवुड हेही मातृवंशाकडून आयरीशच होते 

आई धार्मिक, कष्टाळू व मानी आणि वडील विद्वान, तत्त्वज्ञ व बहुभाषी होते.

 ॲनी बेझंट या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील 1852 मध्ये वारल्यामुळे  या कुटुंबापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या. 

परंतु त्यांच्या आईच्या मॉरिएट नावाच्या एका श्रीमंत मैत्रिणीने त्यांना शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवून घेतले व त्यांना जर्मन, फ्रेंच इ. भाषा व संगीत यांचे शिक्षण दिले. तसेच समाजसेवेचीही आवड त्यांच्या ठिकाणी निर्माण केली. या काळात त्या वृत्तीने धार्मिक बनल्या. 

पुढे रेव्ह. फ्रॅंक बेझंट या ख्रिस्ती धर्मोपदेशकाशी त्यांचा 1867 मध्ये विवाह झाला. त्यांना दिग्बी हा मुलगा व मेबेल ही मुलगी अशी दोन अपत्ये झाली. परंतु मुलांच्या आजारपणामुळे त्या नास्तिक बनल्याने आणि पतीच्या इच्छेपुढे शरणागती पत्करणे हा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांना पतीपासून 1873 मध्ये अलग व्हावे लागले . 

त्यानंतर त्यांना खूप हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. त्यांच्या आईलाही या घटनेचा धक्का बसला व तिचा मृत्यू 1874 मध्ये झाला.

X X

नॅशनल रिफॉर्मर:

नॅशनल रिफॉर्मर पत्राच्या वाचनाने प्रभावीत होऊन त्या सुप्रसिद्ध नास्तिक चार्ल्झ ब्रॅडलॉ (1833-91) यांच्या "नॅशनल सेक्युलर सोसायटी" मध्ये 1874 वर्षी दाखल झाल्या. 

पुढे त्या सोसायटीच्या उपाध्यक्षा आणि सोसायटीचे मुखपत्र असलेल्या नॅशनल रिफॉर्मरच्या सहसंपादिका बनल्या. 

त्या काळात नास्तिकता, संततिनियमन, स्त्रियांचा मतदानाचा हक्क इत्यादींचा प्रचार केल्यामुळे त्यांचा खूप सामाजिक छळ झाला व त्यांच्यावर खटलेही भरले गेले. 

1985 साली त्या ‘फेबिअन सोसायटी’च्या सभासद बनल्या. जॉर्ज बर्नार्ड शॉ व इतर समाजवादी विचारवंतांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांनी समाजवादाचा प्रचार केला.

 लंडनमधील पहिल्या ट्रेड युनियन्स स्थापन करण्यास त्याच कारणीभूत झाल्या. त्यांनी काड्यापेट्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या 700 मुलींचा संप घडवून 1888 मध्ये आणला आणि अकुशल कामगार संघटित होऊ शकतात हे दाखवून दिले. 

या काळातील बहुतेक सर्व समाजसुधारणांसाठी त्यांनी लेखनभाषणादी मार्गांनी भरीव कार्य केले.

विचारवंत चार्ल्स ब्रॅडला स्त्री-सुधारणावादी होत्या. ब्रॅडला यांच्या नॅशनल रिफॉर्मरमध्ये त्यांनी सहसंपादिका या नात्याने अनेक लेख लिहिले. 

मॅडम हेलेना ब्लाव्हॅटस्की या थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्याशी ‌अ‍ॅनीची गाठ पडली. त्यांचा 'सीक्रेट डॉक्ट्रिन' हा ग्रंथ अ‍ॅनीने वाचला. 

जगाचा सांभाळ करणारी एक अदृश्य शक्ती आहे व ती सदैव सावध आहे. यावर अ‍ॅनीचा विश्वास बसला व त्या विचारप्रचारासाठी 1893 साली त्या भारतात आल्या.

'जन्माने ख्रिश्चन व मनाने हिंदू' असे त्या स्वतःबद्दल नेहमी म्हणत. लोकमान्य टिळकांप्रमाणेच त्यांनी 'होमरूल' आंदोलन उभारले. 

भारताच्या स्वातंत्र्याचा त्यांनी सदैव पुरस्कार केला. त्यांना भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

X X

थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना:

विख्यात रशियन विदुषी हेलेना प्यिट्रॉव्हन्य ब्लॉव्हॅट्‌स्की (1831-91) आणि अमेरिकन लष्करी अधिकारी कर्नल हेन्री स्टील ऑल्‌कट (1832-1907) या दोघांनी थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875 साली न्यूयॉर्क येथे केली. 

हेलेना ब्लाव्हॅट्‌स्की यांचा द सीकेट डॉक्ट्रिन हा दोन खंडांत प्रसिद्ध झालेला ग्रंथ ॲनी बेझंट यांच्याकडे 1889 वर्षी परीक्षणार्थ आला. त्याच्या प्रभावाने त्यांनी ब्लाव्हॅट्‌स्की यांचे शिष्यत्व पत्करले आणि सोसायटीचे सभासदत्व स्वीकारून त्या पुन्हा आस्तिक बनल्या. 

1893 साली त्यांनी अमेरिकेस भेट दिली आणि तेथे त्यांनी शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत अत्यंत प्रभावी भाषण करून श्रोत्यांची हृदये हेलावून सोडली.

X X

भारतात आगमन व कार्य:

ॲनी बेझंट नोव्हेंबर 1893 साली भारतात आल्या आणि पुढे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या भारतातच राहिल्या. येथे त्यांनी प्रथम धर्म, शिक्षण व समाजसुधारणा या क्षेत्रांकडे लक्ष दिले. 

त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले. आपण पूर्वजन्मी हिंदू होतो आणि या जन्मातही जन्माने नाही तरी श्रद्धेने हिंदू आहोत, असे त्या मानू लागल्या.

 त्यांनी भारतभर प्रवास करून रामायण, महाभारत, उपनिषदे इत्यादींवर अनेक व्याख्याने दिली. 

गीतेचे इंग्रजीत भाषांतर 1905 मध्ये केले . भारतीयांनी आपली प्राचीन परंपरा विसरू नये, म्हणून त्यांनी भारताच्या प्राचीन श्रेष्ठत्वाचे चित्र लोकांपुढे उभे केले. त्यांनी वृत्तपत्रांतून प्रचंड लेखन केले.

 लेखन व व्याख्यानांतून मिळालेल्या पैशाच्या प्रचंड देणग्या दिल्या.

एका पाश्चात्त्य स्त्रीने भारतीय संस्कृतीचे मोठेपण सांगितलेले पाहून भारतीय लोक प्रभावित झाले. ते त्यांना ईश्वराचा, गार्गीचा वा सरस्वतीचा अवतार मानू लागले.

 मात्र ज्या कुटुंबसंस्थेचा आधार त्या शोधत होत्या, तो त्यांना भारतात पाहता आला.

एन्शंट आयडियल्स इन मॉडर्न लाइफ या ग्रंथात त्यांनी तमिळनाडूतील स्त्रियांचा व कौटुंबिक जीवनाचा गौरव केला आहे.लोकजागृतीसाठी त्यांनी प्राधान्याने शिक्षणावर भर दिला.

X X

होमरूल लीगची स्थापना :

भारताच्या राजकीय नेतृत्वात 1914 च्या सुमारास एक प्रकारची शिथिलता आली होती. यावेळी राजकीय उन्नतीशिवाय भारताची खरी उन्नती नाही हे त्यांनी ओळखले आणि त्या राजकारणात उतरल्या. 

अल्पावधीतच त्या अत्यंत लोकप्रिय झाल्या. त्यांनी होमरूल लीगची स्थापना 1916 मध्ये केली . त्यांना लो. टिळकांचे सहकार्य मिळाले. 

महायुद्ध सुरू होताच ब्रिटिशांची अडचण तीच भारतीयांची संधी असे त्यांनी घोषित केले. 15 जून 1917 रोजी मद्रास सरकारने त्यांना ऊटकमंड येथे तीन महिने स्थानबद्ध केले. 

1917 सालीच भारतीय काँग्रेसच्या कलकत्त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्यांनी जहाल व मवाळ या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढे काँग्रेसचे नेतृत्व म. गांधीजींकडे गेले. 

त्यांची असहकारिता व सामुदायिक सत्याग्रह ही आंदोलने ॲनी बेंझंटना मान्य नसल्यामुळे त्यांचे गांधीजींशी पटू शकले नाही. त्यामुळे 1919 नंतर त्यांनी जवळजवळ काँग्रेस सोडल्यासारखेच केले आणि त्या राजकारणात अत्यंत अप्रिय झाल्या. 

त्यांना भारतासाठी स्वातंत्र्य हवे असले तरी भारताने कॉमनवेल्थमध्ये राहावे, असे त्यांना वाटत असे.
अलौकिक वक्तृत्व, प्रकांड पांडित्य, प्रचंड कार्यक्षमता, विलक्षण स्मरणशक्ती, दीर्घोद्योग, वक्तशीरपणा, जन्माने ब्रिटिश असूनही भारतीयांविषयीची आत्मीयता, समाजाच्या उत्थानाची तळमळ इ. सद्‌गुणांमुळे त्यांचे व्यक्तीमत्त्व अष्टपैलू बनले होते. त्यामुळेच त्या ज्या ज्या क्षेत्रात गेल्या त्या त्या क्षेत्रात अल्पावधीतच त्यांना नेतृत्व प्राप्त झाले.

X X

ग्रंथ संपदा:

ॲनी बेझंट यांच्या ग्रंथांची संख्या 450 आहे. त्यांपैकी काही महत्त्वाचे ग्रंथ
1. द पोलिटिकल स्टेटस ऑफ विमेन (1874)
2.  चार्ल्स ब्रॅडलाफ या समाजवादी विचारवंताबरोबर त्यांनी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारा 'द फ्रुट्‌स ऑफ फिलॉसॉफी' हा प्रबंध 1875 मध्ये लिहिला.
3. माय पाथ टू अथेइझम (1877)
4.  मॅरेज, ॲज इट वाज, ॲज इट इन, अँड ॲज इट शूड बी : अ फ्ली फॉर रिफॉर्म (1878)
5. ऑटोबायोग्राफिकल स्केचेस (1885)
6.  रॅडिकॅलिझम अँड सोशिॲलिझम (1887)
7.  द एन्शंट विजडम (1897)
8.  धर्म (1898)
9.  थॉट-पॉवर : इट्स कंट्रोल अँड कल्चर (1901)
10.  एन्शंट आयडियल्स इन मॉडर्न लाइफ (1901)
11.  एज्युकेशन ॲज अ नॅशनल ड्युटी (1903)
12.  अ स्टडी इन कॉन्शसनेस (1904)
13.  हिंदू आयडियल्स (1904)
14.  हिंट्‌स ऑन द स्टडी ऑफ द भगवद्‌गीता (1905)
15.  फोर ग्रेट रिलिजन्स (1906),
16.  इंट्रोडक्शन टू योग (1908)
17.  द रिलिजस प्रॉब्लेम्स इन इंडिया (1909)
18.  यूनिव्हर्सल टेक्स्ट बुक ऑफ रिलिजन अँड मॉरल्स (3 खंड, 1911-15)
19.  सोशल प्रॉब्लेम्स (1912)
20. द फ्यूचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स (1922)
21.  वर्ल्ड प्रॉब्लेम्स ऑफ टुडे (1925)
22. हिस्टरी ऑफ द फ्रेंच रेव्होल्यूशन (1931)

X X

संस्था स्थापनेत योगदान:

1. बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज 1898 मध्ये काढले आणि सरकारी अनुदान न घेता ते चालविले. त्याच्याच आधारावर पुढे बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना झाली.
2. कर्नल ऑल्‌कट यांच्या मृत्यूनंतर थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून त्यांची प्रचंड बहुमताने निवड 1907 मध्ये झाली. मृत्यूपर्यंत त्याच अध्यक्षा होत्या.
3. जिद्‌दू कृष्णमूर्ती (जे. कृष्णमूर्ती) या लहान मुलाला मसीहा मानून त्यांनी त्याचे शिक्षण केले त्याच्यासाठी ‘पूर्वतारक संघ’ स्थापन करून हेरल्ड ऑफ द स्टार हे मुखपत्र सुरू 1909 मध्ये केले.
4. मद्रास येथे कॉमनवील आणि न्यू इंडिया ही दोन वृत्तपत्रे 1914 मध्ये सुरू केली.
5. मदनपल्ली येथे नॅशनल कॉलेज ची स्थापना 1915 मध्ये केली.
6. होमरूल लीगची स्थापना 1916 मध्ये केली. या बाबतीत त्यांना लो. टिळकांचे सहकार्य मिळाले.
7. ‘इंडियन बॉइज स्काउट्‌स असोसिएशन’ स्थापन 1917 मध्ये केली.
8. राष्ट्रीय शिक्षणाला चालना देण्यासाठी एक संस्था 1917 स्थापना केली.
9. विमेन्स इंडियन असोसिएशनची 1917 मध्ये स्थापना केली
10. अड्यार येथे नॅशनल युनिव्हर्सिटीची 1918 मध्ये स्थापन केली.

X X
सन्मान व पुरस्कार:

1. ‘नॅशनल सेक्युलर सोसायटी’मध्ये दाखल झाल्या (1874). पुढे त्या सोसायटीच्या उपाध्यक्षा आणि सोसायटीचे मुखपत्र असलेल्या नॅशनल रिफॉर्मरच्या सहसंपादिका बनल्या.
2. 1885 साली त्या ‘फेबिअन सोसायटी’च्या सभासद बनल्या.
3. 1907 'जागतिक थिऑसॉफिकल' सोसायटीची अध्यक्षा.

X X

निधन:

थिऑसॉफिकल सोसायटीचे केंद्र असलेल्या अड्यार या उपनगरात अ‍ॅनी बेझंट यांचे निधन 20 सप्टेंबर 1933 रोजी झाले. त्यांच्या पार्थिव देहाचे दहन करण्यात येऊन त्यांच्या अस्थींचा काही अंश बनारस येथे गंगेत विसर्जित करण्यात आला.







X X

View, comments and Share 

Post a Comment

6 Comments

  1. जिद्‌दू कृष्णमूर्ती (जे. कृष्णमूर्ती) या लहान मुलाला सुरूवातीला मसीहा मानून 'Order of the star in the east' ही संस्था उभारल्यानंतर, मसीहा हा कन्सेप्ट सामान्य मनुष्याला मानसिक दृष्टीने तेवढा उपयोगी ठरत नाही, या विचाराने जे कृष्णमूर्ति यांनी ती संस्था बर्खास्त केली पण, "First and last freedom' 2.freedom from known इ. पुस्तकातुन तसेचं, पब्लिक डिस्कशन मधून आपला Awareness, self knowledge चा कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न केला... एकंदर,यावरून ॷॅनी बेझंट यांच्या सामाजिक प्रबोधनासाठीच्या दुरदृष्टीची प्रचीती येते.... त्यांच्या स्मृतीस... विनम्र अभिवादन....

    ReplyDelete