हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद: राष्ट्रीय क्रीडा दिन
29 ऑगस्ट
मेजर ध्यानचंद वाढदिवस.......
२९ ऑगस्ट १९०५ रोजी भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू व हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंग यांच्या जन्म झाला. ते विश्वातील सर्वोत्कृष्ट हॉकीचे खेळाडू म्हणून ओळखले जात होते त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. भारत सरकारने १९५६ साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. त्यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणुन साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले आहे.
ध्यानचंद सिंग (२९ ऑगस्ट १९०५ ते ३ डिसेंबर १९७९) हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते.
त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते.
त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.
X X
ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता कि भारताने १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी ७ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८-१ ने नामावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती जी त्यांनी नाकारली.
त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक त्यांनी एकूण 580 गोल केले.गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भा
सरकारने १९५६ साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. त्यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणुन साजरा केला जातो.
X X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त Fit India चळवळ सुरू झाली.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व लोक जमतात आणि राष्ट्रीय क्रीडा दिन उत्सव यशस्वी करतात.
View, comments and Share.
2 Comments
Very nice
ReplyDeleteNice 👍
ReplyDelete