Subscribe Us

header ads

Chandragupta Vikramaditya - II चंद्रगुप्त विक्रमादित्य ऊर्फ चंद्रगुप्त दुसरा -साम्राज्य विस्तार

Chandragupta Vikramaditya -II

चंद्रगुप्त विक्रमादित्य ऊर्फ चंद्रगुप्त दुसरा 

(इ.स.375  ते 414) 

भाग -1




चंद्रगुप्त विक्रमादित्यचा साम्राज्य विस्तार 

समुद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र चंद्रगुप्त विक्रमादित्य ऊर्फ चंद्रगुप्त दुसरा हा सत्तेवर आला.

 गुप्त वंशातील तो अत्यंत महत्त्वाचा सम्राट मानला जातो. कारण त्याचा कालखंड हा प्राचीन भारताच्या इतिहासातील सुवर्णयुगाचा कालखंड मानला जातो. 

एखाद्या कालखंडाला सुवर्णयुग ठरविण्याच्या ज्या कसोट्या असतात त्या कसोट्या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळात पूर्ण झाल्या होत्या.

चंद्रगुप्त दुसरा याचा अभ्यासासाठी खालील उपलब्ध साधने

1) विशाखादत्तचे 'देवीचंद्रगुप्तम' हे नाटक

2) बाणभट्टाचा 'हर्षचरित' हा ग्रंथ 

3) चिनी प्रवासी फाहियानचे प्रवासवर्णन

4) राजशेखरची काव्यमीमांसा

5) मथुरा स्तंभलेख, उदयगिरी गुहालेख

6) महारौली स्तंभलेख, सांची शिलालेख

7) चंद्रगुप्त दुसरा याची नाणी

8) राजा भोजचे 'शृंगाररूपकम' हे नाटक

रामगुप्त व त्याच्या ऐतिहासिकतेबद्दलचा वाद समुद्रगुप्तानंतर सत्तेवर कोण आले, तो किती वर्षे सत्तेवर होता, चंद्रगुप्त दुसरा व रामगुप्त यांचे नाते कोणते याबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. रामगुप्ताची काही, नाणी सापडली आहेत.

पुराणातील वंशावळीनुसार समुद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर चंद्रगुप्त विक्रमादित्य हा सत्तेवर आला; परंतु बाणभट्टाच्या 'हर्षचरिता'त व राजशेखरच्या 'काव्यमीमांसेत' तसेच 'देवीचंद्रगुप्तम' या विशाखादत्ताने लिहिलेल्या नाटकातील नोंदीनुसार समुद्रगुप्तानंतर रामगुप्त हा सत्तेवर आला. 

'देवीचंद्रगुप्तम' या नाटकातील कथानक संक्षेपाने  सांगता येईल की,समुद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर रामगुप्त हा राज्यावर आला. तो भित्रा व कर्तृत्वहीन राजा होता. तो सत्तेवर येताच शकांनी गुप्तांवर आक्रमणे केली. रामगुप्ताचा पराभव झाला. शक सम्राट रुद्रसिंह याने गुप्तांचे जिंकून घेतलेले राज्य परत देण्याची तयारी दर्शवली; पण त्यासाठी एक अट टाकली. ती अट म्हणजे रामगुप्ताने आपली पत्नी ध्रुवदेवी ही शक सम्राट रुद्रसिंहाला द्यावी. रामगुप्ताने ती अट मान्य केली. हे त्याचा धाकटा भाऊ चंद्रगुप्त दुसरा वाला आवडले नाही. म्हणून त्याने स्वतःच ध्रुवदेवीचा वेश परिधान केला व मोजक्या लष्करासह रुद्रसिंहाच्या छावणीत प्रवेश करून रुद्रसिंहाचा वध केला. ध्रुवदेवी ही चंद्रगुप्त दुसरा याच्या पराक्रमावर खूश होतो. ती रामगुप्ताचा धिक्कार करते. शेवटी चंद्रगुप्त दुसरा हा रामगुप्ताचा खून करतो. ध्रुवदेवीशी विवाह करतो व गुप्त साम्राज्याच्या राजपदावर बसतो.

X X

डॉ. ए. एस. अळतेकर यांच्या मते, '

या नाटकातील प्रस्तुत कथानकात ऐतिहासिक सत्य आहे. समुद्रगुप्तानंतर रामगुप्त व रामगुप्तानंतर चंद्रगुप्त दुसरा हा सत्तेवर आला. पण ही आख्यायिका आहे असे एक मत आहे.

चंद्रगुप्त दुसरा: साम्राज्यविस्तार

 1) वैवाहिक संबंधांच्या माध्यमातून साम्राज्यविस्तार 

 गुप्त सम्राटांनी वैवाहिक संबंधांच्या माध्यमातून साम्राज्यविस्तार केला होता. चंद्रगुप्त दुसरा याने मध्य प्रदेशातील नागवंशी राजाची कन्या कुबेरनागाशी विवाह करून नाग राजाशी मैत्री केली होती. चंद्रगुप्ताला नागवंशीय राजांचे सामर्थ्य माहीत होते. समुद्रगुप्तालाही नागवंशीय राजांविरुद्ध दोनदा मोहीम हाती घ्यावी लागली होती. नागवंशीय राजांचा तो पूर्णपणे बीमोड करू शकला नव्हता याची त्यास कल्पना होती. 

दक्षिणेतील वाकाटकांचा राजा रुद्रसेन दुसरा यास चंद्रगुप्त दुसरा याने स्वतःची कन्या प्रभावती गुप्ता दिली होती. दक्षिणेतील वाकाटक राजवंश ही एक प्रबळ सत्ता होती. समुद्रगुप्तानेही वाकाटकांविरुद्ध कोणतीही युद्धमोहीम काढली नाही. गुप्त-वाकाटक विवाहामुळे या दोन सत्ता एकमेकांच्या खूप जवळ आल्या.

 दक्षिणेतील कदंब वंशातील कन्या त्याने आपला पुत्र कुमारगुप्तास करून घेतली होती. या वैवाहिक संबंधामुळे नागवंशीय राजे, वाकाटक व कदंब वंशाचे राजे हे गुप्तांचे स्नेही बनले. म्हणूनच चंद्रगुप्ताला साम्राज्यविस्तार करता आला व विशेषतः शक या परकियांविरुद्ध तो लढा देऊ शकला.

 2) शकांचा पूर्णपणे बंदोबस्त 

 गुप्तांच्या सत्तेला शक या परकियांकडून धोका निर्माण झाला होता. कारण ते गुप्ताच्या प्रदेशावर वारंवार हल्ले करत. शकांविरुद्ध मोहीम हाती घेण्यापूर्वी त्याने त्यासाठी वाकाटकांचे सहकार्य मिळवले होते. वारसाहक्काबद्दलचे तंटे, अंतर्गत कलह, सरदारांची स्वतंत्र वृत्ती यामुळे शक साम्राज्य खिळखिळे झाले होते. 

शक सम्राट रुद्रसिंह तिसरा याचा पराभव करून त्याने शकांची सिंधू नदीच्या पलीकडे हकालपट्टी केली. शकांचा पूर्णपणे पराभव झाला. 

सौराष्ट्र व काठेवाड हे सुपीक प्रदेश गुप्तांच्या साम्राज्यात विलीन झाले. शक सत्तेचे कायमचे उच्चाटन झाले. कच्छ, सौराष्ट्र, गुजरात, माळवा, सिंघ आदी प्रांतांत शकांच्या वर्चस्वातून त्याने मुक्त केलेला तो प्रदेश भारतीय साम्राज्यात समाविष्ट केला. त्यामुळे चंद्रगुप्तास 'शकारी' असे म्हणतात. 

महारौली लोहस्तंभावरही चंद्र राजाचा शिलालेख कोरला असून हा चंद्र म्हणजेच चंद्रगुप्त विक्रमादित्य होय असे इतिहासकार मानतात. या चंद्रराजाचे कार्य जे या शिलालेखात आहे ते चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या कार्याशी मिळतेजुळते आहे. 

वि. दा. सावरकर यांनी लिहिलेल्या 'भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने' या ग्रंथात चंद्रगुप्त विक्रमादित्याने शक क्षत्रपांचा जो पराभव केला व त्यांची भारतभूमीवरून जी हकालपट्टी केली त्या घटनेस 'भारतीय इतिहासातील 'सोनेरी पान' असे म्हटले आहे. 

तीन शतकांपासून शकांचे भारतात वास्तव्य होते, ते आता संपुष्टात आले. उज्जैयनी ही गुप्तांची उपराधानी बनली व तो व्यापारी केंद्र म्हणून पुढे आली. पश्चिम किनाऱ्यावरील सागरी व्यापार गुप्तांच्या हाती आला. पश्चिमेकडील रोमन साम्राज्याशी गुप्तांचा संबंध आला. या विजयामुळे चंद्रगुप्ताने 'विक्रमादित्य' हे विरुद धारण केले.

X X

3) कुशाणांचा शेवट 

कुशाणांच्या सत्तेचा अस्त झाला असला तरी कुशाणांचे काही सरदार मथुरा, कंबोज व गांधार प्रदेशात राज्य करीत होते. चंद्रगुप्ताने या सर्वांना पराभूत केले. गुप्त-कुशाण यांच्यात वारंवार जे खटके उडत त्याचा आता कायमचा शेवट झाला.

4) हुणांचा बंदोबस्त 

 हुणांच्या टोळ्या पंजाबात व सरहद्दीवर उपद्रव निर्माण करीत होत्या. चंद्रगुप्ताने त्यांच्यावरही स्वारी करून त्यांचा बंदोबस्त केला.

5) बल्ख (बॅक्ट्रिया) वर आक्रमण 

 दिल्लीच्या लोहस्तंभावरील आलेखात चंद्रराजाने बल्ल जिंकल्याचा उल्लेख आहे. चंद्रगुप्ताने सिंधू वगैरे सात नद्या पार करून बाल्टिक देश जिंकला. 

एका भारतीय सम्राटाने बल्ख (बॅक्ट्रिया) प्रांतावर आक्रमण केल्याने हे ऐतिहासिक उदाहरण आहे. त्या प्रदेशातील कुशाणांना त्याने आपले मांडलिक बनवले होते. 

6) बंगालवर स्वारी 

महारौली येथील लोहस्तंभावर या स्वारीचे वर्णन केलेले आहे. चंद्रगुप्त हा शक-कुशाणांचे पारिपत्य करण्यात गुंतला आहे हे पाहून बंगालमधील सरदारांनी आपापसांत ऐक्य प्रस्थापित करून चंद्रगुप्ताविरुद्ध आघाडी निर्माण केली होती; परंतु चंद्रगुप्ताने स्वतः बंगालमध्ये लष्करासह जाऊन त्या सर्व सरदारांना पराभूत केले व बंगाल प्रांतावर पुन्हा गुप्तांचे वर्चस्व प्रस्थापित केले.

7) कामरूपमधील मोडून काढलेली बंडाळी 

समुद्रगुप्ताने आसाममधील कामरूप आपल्या वर्चस्वाखाली आणले होते. समुद्रगुप्ताच्या कारकीर्दीच्या शेवटी ते स्वतंत्र झाले. चंद्रगुप्ताने तेथील बंडाळी मोडून काढली व पुन्हा कामरूपवर गुप्ताने वर्चस्व प्रस्थापित केले.

X X

8) पाटलीपुत्र, उज्जैन, विदिशा या शहरांचा विकास 

फाहियान या चिनी प्रवाशाने पाटलीपुत्र या शहराचे अत्यंत सुंदर वर्णन त्याच्या प्रवासवर्णनात केले आहे. फाहियानचे तेथे काही दिवस वास्तव्य होते. तेथील लोक सुखी व समृद्ध होते अशी नोंद तो करतो. पाटलीपुत्र हे त्याच्या राजधानीचे शहर होते. ते अत्यंत गजबजलेले होते. त्याशिवाय विदिशा व उज्जैन या दोन शहरांना त्याने उपराजधानीचा दर्जा दिला होता. तो स्वतः 'विदिशाधिपती', 'उज्जैनाधिपती' अशा उपाध्या लावी. कुशीनगर, वैशाली, अयोध्या, कोसंबी, मथुरा, कनोज ही शहरे त्याच्या काळात भरभराटीस आली होती.








View, comments and Share...

Post a Comment

2 Comments