Subscribe Us

header ads

Basaveshwara or Basavanna: Indian statesman, Philosopher, Poet, Lingayat Social Reformer

सामाजिक समरसतेचे जनक महात्मा बसवेश्वर जयंती 


बालपण
:

महात्मा बसवेश्वर यांचा जन्म प्रांतातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावी झाला. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया इ.स. 1105 मध्ये झाला.

 वडिलांचे नाव मादीराज व आईचे नाव मादलांबीका, हे दोघेही शैवोपासक होते.

 आई वडील विद्या प्रेमी, धार्मिक वृत्तीचे, सरळमार्गी गृहस्थ होते. या अशा घरी तीन अपत्ये होती त्यात मोठा मुलगा देवराज मधली बहिण नागलांबीका व छोटे श्री बसवेश्वर.

बसवेश्वरांच्या लहानपणीच एक दिवस कुंडलसंगमचे थोर सत्पुरूष जातवेदमुनी बागेवाडी ला मुक्कामी आले. त्यांच्या ज्ञानाचा प्रभाव बसवेश्वर यावर पडला व जातवेदमुनी कडून लिंग धारणा करून घेतली म्हणजे लिंग दीक्षा विधी करून घेतला. 

X X

बसवेश्वरांचे वय आठ वर्षाचे झाले. वडिलांनी मुंज करण्याचे ठरविले, पण लिंग दीक्षा घेतली म्हणून  त्याांनी वीरोध केला.वडिलांचे घर सोडून कुंडल संगम येथे गेले.

कुडल संगम हे स्थान कृष्णा नदी व मलप्रभा नदीचे संगम स्थळ आहे.येथेच जातवेद मुनीचा निवास होता. 

शिवभक्ती कडे या छोट्या बालकाचे ध्यान असल्याने त्यांनी त्याला आश्रय दिला तेथेच बसवेश्वरांनी बारा वर्ष साधना केली.

मोठ्या बहिणीचे सासर कुंडल संगम होते. तेथे त्यांचे मेहुणे शिवदेव राहात होते. 

X X

भक्तिभावाने शिवाची आराधना:

कुडल संगम येथे रोज बसवेश्वर भक्तिभावाने शिवाची आराधना करीत असत पूजाअर्चा करीत अनेक ग्रंथ, पोथ्या, भाषा, तत्वज्ञाने, धर्म अभ्यासली. आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला.

पुढे त्यांनी बौद्ध, जैन, वैदिक, शैव, वैष्णव, वेद,उपनिषदे, रामायण, महाभारत ,स्मृती- पुराणे इत्यादी तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. यामुळे कुंडल संगम आश्रमातील थोर व कुशाग्र बुद्धिमत्तेचे व वयाने खूप मोठे असूनही बसवेश्वरा पुढें नम्र होत असत, तेथील अनेक मोठमोठ्या पंडित, अभ्यासक यांच्याशी वेगवेगळ्या धार्मिक व अनेक विषयावर चर्चा करीत असत. व त्यातून सत्य शोधण्याचा ते प्रयत्न करीत असत. 

एवढेच नाही तर त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानातील षडदर्शने, पाशुपत, काश्मिरी शैवागम, शुद्धदैव, महाशैव, वीरशैव नाथ संप्रदाय इत्यादी शैवपंथी उपासना यांचा अभ्यास केला.

X X

श्री बसवेश्वर कुंडल संगम या तीर्थक्षेत्राचे थोर पंडित,अभ्यासक, ज्ञानी पुरुष म्हणून मान्यता पावले.

X X

कौटुंबिक जीवन:

सामान्य लोकांना शिवपासनेला लावायचा ते प्रयत्न करीत पण प्रापंचिक लोकांना सांगायचे तर प्रापंचिक असले पाहिजे त्यांच्यापासून आपण वेगळे असू नये यामुळे त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारयचा याचा निश्चय केला. 

तेव्हा बसवेश्वरांचे मामा बलदेव राजा बीज्जल याच्या दरबारात मंत्री होते. त्यांनी आपली मुलगी गंगाबिका हिचे श्री बसवेश्वर सोबत विवाह लावून दिला. 

गंगाबीका या सद्गुणी,साधक वृत्तीच्या होत्या या दोघांनी आपला संसार कुडलसंगम क्षेत्री सुरू केला.

X X

समाजकार्य :

एके दिवशी त्यांचे सासरे बलदेव, कुडल संगम शेत्रि आले आणि श्री बसवेश्वरांचे आयुष्य फक्त वैयक्तिक लाभासाठी न जाता त्याचा उपयोग समाजासाठी व्हावा व आपल्या राज्यातील कठीण, सामाजिक प्रश्न सोडविण्यास त्यांचा उपयोग होईल या हेतूने त्यांनी आपला विचार श्री जातवेद मुनिंना भेटून सांगितला आणि हे विचार जातवेद मुनींना पटले त्यांनी श्री बसवेश्वरांना जवळ बोलावले म्हंटले आता विद्यार्जन पुरे झाले .

आता काही समाजकार्य करावे व आपल्या नवीन विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणून मंगळवेढ्याला जावे व तेथे उपासना करावी असा आदेश देऊन शुभ आशीर्वाद दिला. 

श्री बसवेश्वरांनी भरल्या अंतःकरणाने राजधानी मंगळवेढ्याला दाखल झाले. त्यांनी आपल्याबरोबर मोठी बहीण नागलांबी का तिचे पती शिवदेव व भाचा चन्नबसवेश्वर व पत्नी गंगाबीका यांच्यासोबत मंगळवेढ्यात राहु लागले.

राजा बीज्जळाच्या राजधानीत श्री बसवेश्वरांना कोषागारात साध्या कारकुनाची नोकरी दिली गेली. 

तेथे श्रम व कर्तव्याला सर्वस्व मानून इमानेइतबारे नोकरी सुरू केली. तेथे प्रामाणिक पणे करवसुली व हिशेब व्यवस्थित ठेवला. 

खर्चावर नियंत्रण ठेवले. भ्रष्टाचार करू दिला नाही आणि स्वभावाने सर्वांना पूर्ण काम करावयास लावले या सर्व कारणांमुळे राज्याचा कोष वाढला कर वसुली पूर्ण होऊ लागली अनेक जण त्यांच्या प्रामाणिकपणा, सचोटी, कामावर असलेली निष्ठा, कर्तव्यास न चुकणे या बाबींमुळे चाहते झाले. 

वरिष्ठ अधिकारीही त्यांच्या या वागण्यामुळे राजा बिज्जला कडे बळती करण्याविषयी विनंती केली आणि लगेच राजाने ती मान्य केली व त्यांना भंडारी या पदावर बढती मिळाली व त्यांचा पगार वाढला तो होता एकशे एक सुवर्ण होन आणि अशाच प्रामाणिक पणा मुळे पुढे ते कोषागार मंत्री झाले व राज्याच्या खजिन्यात अफाट धन जमा होऊ लागले.

एक दिवस मजेशीर घटना मंगळवेढ्यात घडली, तेथे राज महालाची डागडूगी चालू असताना कामगारांना तेथे पुरलेला एक ताम्रपट मिळाला तो त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना दाखविला त्याच्यावर 'कुट' भाषेत काहीतरी लिहिलेले होते. 

ते कोणालाच वाचता येईना राजा पर्यंत ही गोष्ट गेली दरबार भरवून राजाने आव्हान केले की यावर काय लिहिले आहे ते सांगावे तेथेच बसवेश्वर होते त्यांनी सर्व अक्षरे समजून घेऊन राजाला सांगितले की त्यावर गुप्त खजिना या विषयी मजकूर आहे आणि खरेच तो खजिना राजा मिळाला राजा खूष होऊन दरबारात श्री बसवेश्वर यांचा सन्मान करून मंत्रिपद बहाल केले व आपली मानलेली बहीण नीलांबिका चा विवाह लावून दिला.

दोन सुंदर पत्नी वैभव, मान-सन्मान,पैसा, अधिकार या सर्व गोष्टी एहीकाला पोषक, लौकिक जीवनाला उपयुक्त असूनही अंतरी एका कुंडल संगम देवा शिवाय काहीही त्यांच्या मनात नव्हते. 

मोठे पद मिळवूनही शिव उपासना भक्ती साधनेत कधी खंड पडू दिला नाही.

 लौकिक कर्तव्य पार पाडीत असता परलौकीक चिंतन समृद्ध होत होते.

 राज्यकारभारात अग्रेसर असूनही त्यांनी सुख, विलास, ऐश्वर्य, चैन यांना चार हात दूर ठेवले. 

X X

राजसेवेपेक्षा त्यांची समाज सेवा,प्रजा सेवा केली. समाजातील भेदभाव दूर करून सर्व जमातींच्या लोकांना जवळ करण्याचे काम ते सतत करीत राहिले.

 अशा परिस्थितीत त्यांचा द्वेष करणारे त्यांना पाण्यात पाहणारा एक गट सक्रिय झाला व श्री बसवेश्वर यांना विरोध करायला सुरुवात केली.

पण श्री बसवेश्वर न डगमगता विरोधकांना कोणत्याही प्रकारचे उत्तर न देता आपले कार्य शांतपणे करीत व सर्वाशी समतेने वागत असत. 

त्यांनी लोकांशी संपर्क वाढविला खास करून दलित वस्तीत ते सतत जात असत कारण दलित वस्तीतील लोकांचे गैरसमज त्यांच्यातील न्यूनगंड कमी करणे व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हे कार्य ते सतत करत असत. व बघता-बघता अठरापगड जातीचे कुटुंबे त्यांच्या विचारांनी प्रभावित झाल्या.

श्री बसवेश्वर यांच्या विचारांची जादू फक्त समाजाच्या या वर्गा वर पडली असे नाही, तर उच्चवर्णीय, श्रीमंत, व्यापारी, योगी अंतःप्रेरणेने त्यांच्याकडे आकर्षित झाले. 

देशाच्या सर्व दिशेने महाराष्ट्र, विदर्भ, कुंतल, चोल, तेलंगणा, आंध्रा केरळ, ओरिसा, सौराष्ट्र, गुजरात ,काश्मीर व अफगाणिस्तानातून ही अनुयायी बसवेश्वरां कडे येऊ लागले त्यांच्या विचाराने प्रभावित बहुतेक सर्व वर्णांचे ,जातींचे ,पंथांचे लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. 

X X

अनुभव मंडप:

उच्च - नीच, स्पृश्य-अस्पृश्य, स्त्री-पुरुष असा भेदच त्यांच्यापुढे नव्हता. असे 850 स्त्री-पुरुष त्यांच्या संपर्कात आले आणि श्री बसवेश्वर मंगळवेढ्यात स्थिरस्थावर झाले असतानाच कल्याणचा राजा चालूक्य जगदेकमल्ल वारला त्याच्या जागी तैलप गादीवर बसला पण राज्य सांभाळण्याची कुवत त्याच्या कडे नव्हती. 

त्यामुळे राजा बीज्जलाने आक्रमण करून राज्य मिळविले व राजा बिज्जल कल्याणला राहू लागला व त्याने राजधानी कल्याणला नेली व श्री बसवेश्वरांना राजाने बोलावून घेतले.

कल्याण ला आल्यावर त्यांनी आपल्या कामाचे स्वरूप व्यापक केले.

आपले अपुरे राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

तेथे त्यांनी वर्णाश्रम व्यवस्था, जातिभेद, अस्पृश्यता ,धार्मिक श्रेष्ठत्वाचा अहंकार, सामाजिक विषमता, अत्याचार या सर्वांसाठी एक ज्ञानपीठ स्थापिले त्यास 'अनुभव मंडप' असे नामकरण केले.

 या अनुभव मंडपाचे अध्यक्ष अल्लंप्रभू ना केले. या अनुभव मंडपात सामाजिक सौदर्य वाढीला लागावे समाजात प्रेमाची स्नेहाची बुज राखली जावी म्हणून श्री बसवेश्वरांनी हा अनुभव मंडप चा नवा प्रयोग केला. 

समाज संघटन त्यामागचा उद्देश होता संघटनेचा आधार जात-जमात मानला नव्हता त्यामुळे त्यात त्यांना यश आले.

 अनुभव मंडपा द्वारे त्यांनी वर्ग वर्ण समन्वयाची भूमिका घेतली त्यामुळे जातीयता नष्ट करण्याचे कार्य अत्यंत सहजतेने घडवून आणले त्यांनी उच्च-नीच या कल्पनेला मूठमाती देण्यासाठी फक्त चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करायला सुरुवात केली होती. 

त्यांचे वर्तन अत्यंत प्रेरक होते या अनुभव मंटपात सर्व जातींचे स्त्री-पुरुष एकत्र येऊन चर्चा करत शिवभक्ती करत स्त्री अनुयायांना शिवचरणी व पुरुषांना शिवचरण म्हणत असत अनुभव मंडप हे जगातील धर्मेतिहासातील अनन्यसाधारण समजली जावी अशी थोर संस्था लोकजागृतीचे केंद्र सर्व जाती-जमातींच्या स्त्री-पुरुषांसाठी मुक्तद्वार असलेले संस्कार पीठ असे होते. 

या अनुभव मंडपात शिवशरण व शिवचरणी आपली अनुभूती मुक्तछंद प्रकारात व्यक्त करीत असत त्याला वचने म्हणून संबोधले जात असे. वचने म्हणजे कन्नड भाषेतील मुक्तछंदात काही मर्यादित ओळीत उस्फुर्त अनुभूतीतून लोकभाषेत साकारलेले एक गद्य काव्य होय वचनकारा कडून लिहिलेल्या वचनांची संख्या सुमारे 160 कोटी पर्यंत जाते वचन भांडार म्हणजे जीवन अनुभवाचे ज्ञान भांडारच होय अनुभव मंडप ही जगातील पहिली संसद म्हणूनच लक्षात घेतली पाहिजे. 

दैनंदिन व्यवहारात ज्या अडचणी व समस्या निर्माण होतात त्यासाठीच अनुभव मंडपाची उभारणी केली होती.

 अनुभव मंडपासाठी जी तत्त्वे स्वीकारण्यात आलेली होती तिचा जवळपास स्वीकार आजच्या संविधानातील सरनाम्यात आणि मूलभूत हक्कांमध्ये झाल्याचे दिसून येते.

X X

आंतरजातीय विवाह आयोजन:

आंतरजातीय विवाह याचे आयोजन श्री बसवेश्वरांनी केले . या आंतरजातीय विवाहाची बातमी वाऱ्यासारखी कल्याण नगरीत पसरली उच्चवर्णीयांच्या गटात जळफळाट झाला अनेक कर्मठांनी राजाचा महाल गाठला व झालेली घटना सांगितली आणि महाराज आपले आसन धोक्यात आहे धर्म बुडवे मातले आहेत असे राजाचे कान भरले आणि राजाने आदेश सोडला बसवेश्वरांना ठार करा.

 याचा परिणाम कल्याण क्रांतीमध्ये झाला आणि यातूनच उद्विग्न बसवेश्वरांनी कल्यान नगरी सोडली आणि कुडल संगम येथे जाऊन पोहोचले. 

कल्याण मध्ये सुरू झालेला संघर्ष श्री बसवेश्वरांच्या सहकाऱ्यांनी पुढे चालू ठेवला. आपला अंत जवळ आल्याची त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली.

X X

निधन:

इ.स. 1167-68 मध्ये कुंडल संगमावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला .आणि श्री बसवेश्वर संमेश याच्या सान्निध्यात निर्माण झाले म्हणजेच ते संगमेश स्वरूपात लीन झाले.



महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव मालेगाव

X X





View,Comment and share....










Post a Comment

3 Comments