Janapadas -2: Mahajanapadas and the rise of Magadha-2
जनपद व महाजनपदे आणि मगधचा उदय: 2
'जनपद' व 'महाजनपद' असा उल्लेख तत्कालीन साहित्यात येतो. अनेक गावे व शहरे मिळून जनपद तयार होई.
अनेक लहान लहान जनपदे मोठ्या जनपदांत विलीन होत असत.
मोठ्या 'जनपदाला'च 'महाजनपद' असे म्हणत असत, जैन भगवती सूत्रात १६ महाजनपदांची नावे आहेत तर 'महागोविंद सूत्र' या ग्रंथात ७ महाजनपदांच्या राजधानीचे संदर्भ आहेत.
'अंगुत्तरनिकाय' या बौद्ध ग्रंथात १६ महाजनपदांची माहिती आहे. या १६ महाजनपदांच्या भौगोलिक सीमा, राजांची नावे इ. त्यांच्यातील सत्तास्पर्धा व संबंध आदींबाबतचा इतिहास जुळवण्याचे काम इतिहासकारांनी केलेले आहे.
१६ महाजनपदांचा अभ्यास खालीलप्रमाणे करता येईल.
XX
१) अंग:
हे महाजनपद बिहारमधील मोंधीर व भागलपूरच्या परिसरात होते. महाभारतात अंगचे उल्लेख आहेत.
चंपा या नदीच्या काठी हे महाजनपद वसलेले होते व मगध हे त्याच्या शेजारचे राज्य होते.
चंपा ही अंगची राजधानी होती. चंपा हे अत्यंत वैभवसंपत्र शहर व व्यापारी केंद्र होते. गंगा व चंपा या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसलेले होते.
'दीघनिकाय' या ग्रंथातील नोंदीनुसार तत्कालीन भारतातील प्रमुख ६ शहरांमध्ये चंपा एक होते. चंपा शहराचा सुवर्णभूमीशी व्यापारी संबंध होता.
इ. स. पू. ६ व्या शतकात 'अंग' हे गणराज्य मगध राज्यात विलीन झाले. मगधाचा राजा बिंबीसार याने ब्रह्मदत्ताची हत्या करून अंग गणराज्य ताब्यात घेतले.
२) काशी:
काशी है प्रमुख महाजनपद होते व वाराणसी ही त्याची राजधानी होती.
वरुणा व अशी या दोन नद्यांच्या मध्ये वसलेले शहर म्हणून वाराणसी हे नाव पडले.
काशीचे धार्मिक महत्त्व आरंभापासून आजपर्यंत अबाधित आहेत.
गौतम बुद्धाने काशी परिसरातील सारनाथ येथे आपले पहिले धर्म प्रवचन दिले होते.
गंगा- यमुनेच्या परिसरातील काशी हे महामार्गाचे केंद्र होते. बौद्ध जातककथा व पुराणातून काशीसंबंधीच्या कथा आल्या आहेत.
काशी जातककथांनी 'काशी' या जनपदाचे व वाराणसी शहराचे खूप विस्ताराने वर्णन केले आहे. काशी हे ३०० योजने विस्तारलेले होते.
काशी या जनपदाचा कोसल, अंग व मगध या तीन महाजनपदांशी सतत संघर्ष सुरू होता.
जैन तीर्थकार पार्श्वनाथाचे वडील अश्वसेन हे काशीचे राजा होते असा उल्लेख जातककथात आला आहे.
काशीने कोसलवर आक्रमण करून कोसल जिंकले असले तरी कालांतराने काशीचे राज्य प्रभावशून्य झाले व शेवटी कोसल या महाजनपदानेच काशीचे राज्य आपल्या राज्यात सामावून घेतले.
XX
(३) कोशल (लखनौ व फैजाबाद जिल्हे) :
अयोध्येच्या आवतीभोवतीच्या प्रदेशाचा कोशल राज्यात समावेश होता. श्रावस्ती ही त्याची राजधानी असून कोशलवर इक्ष्वाकू वंशाची आधिसत्ता होती.
शेजारच्या शाक्य, कोलिया वगैरे गणराज्यावर कोशलचे वर्चस्व होते. अयोध्या श्रावस्ती व साकेत ही प्रसिद्ध नगरे या राज्यात होती.
खिस्तपूर्व सातव्या शतकात कोशलपेक्षा बलाढ्य असलेले काशीचे राज्य विस्तारवादी कोशल नरेशाने काबीज केले.
प्रसेनजित उर्फ पसेनादी हा पराक्रमी पुरुष कोशलचा राजा होता, तक्षशिला विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. तो उत्तम राजकारणपटू व श्रेष्ठ प्रतीचा सेनापती होता.
प्रसेनजिताने आपली बहीण कोशलादेवी मगध सम्राट बिंबिसार यास दिली. तिला लग्नातील सप्रेम भेट म्हणून काशीनगरीचे उत्पन्न दिले. यामुळे कोशल व मगध ह्या बलाढ्य राज्यात सख्य स्थापन झाले.
पुढे बिंबिसार व कोशलादेवीच्या मृत्युनंतर प्रसेनजिताने काशीचे उत्पन्न मगध सम्राटास देणे बंद केले. त्यामुळे बिंबिसारचा पुत्र मगध सम्राट अजातशत्रू व प्रसेनजित यांच्यातील वैमनस्य वाढले दोघांत अनेकदा यद्ध झाले.
अखेर तह व सख्य होऊन प्रसेनजिताने अजातशत्रुला काशीनगरी व आपली कन्या वजिरा दिली.
प्रसेनजिताला गौतमबुद्धाबद्दल आदर असल्यामुळे गौवनाच्या शाक्य कुलाशी नातेसंबंध व्हावा या हेतूने त्याने शाक्य राजकन्येशी विवाह ठरविला.
पण उद्घट शाक्य लोकांनी राजकन्या म्हणून दासकन्येशीच प्रसेनजिताचा विवाह लावून दिला. पित्याच्या या फसवणुकांचा प्रसनजितपुत्र विदूदभ याने बदला घेतला.
विदूदभ आपल्या क्रूर कृत्याबद्दल कुप्रसिद्ध होता त्यान शाक्य गणराज्यावर हल्ला चढविला व खूप कत्तल करून चांगलाच सूड उगविला.
विदूदभने आपला पिता प्रसेनजित याला मंत्र्याच्या मदतीने पदच्यूत करून कोशलची गादी बळकावली.
तेव्हा निराश्रित प्रसेनजित स्वरक्षणासाठी आपला भाचा व जावई मगध सम्राट अजातशत्रूची मदत मिळविण्यासाठी राजगृहाला निघाला. पण राजगृहाला पेहचताच मृत्यू पावला.
प्रसेनजित बौद्ध धर्माचा मोठा आश्रयदाता होता. प्रसेनजित व बुद्धभेट प्रसिद्ध आहे. ब्राह्मणांनाही त्याने उदार देणग्या दिल्या.
कोशलचा पुढील इतिहास अज्ञात असला तरी कोशलचे राज्य पुढे मग साम्राज्यात सामील करण्यात आले हे स्पष्ट होते.
XX
४) वृज्जी महाजनपद :
वृज्जीचा उल्लेख अत्तहकुळांक (आठ कुळांचे) जनपद असा केला जातो. ही आठ कुळे म्हणजे वृज्जी, विदेह, लिच्छवी, ज्ञातृक, उग्र, भोग,ऐनाव, वगरचे गणराज्य होय.
हे गणराज्य आजच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात पसरलेले असावे. वैशाली हे शहर या संपूर्ण महाजनपदाची राजधानी होती.
वैशालीनगरीचे संदर्भ रामायणात, बौद्ध व जैन वाङ्मयात आढळतात.
'वृज्जी' या राज्यसंघाचे लिच्छवी मल्ल, काशी व कोसल या महाजनपदाशी मैत्रीचे संबंध होते.
वृज्जी महाजनपदातील लिच्छवीची राजधानी वैशाली तर विदेहची राजधानी मिथिला होती.
वैशाली हे अतिशय वैभवसंपन्न समृद्ध तटबंदी असणारे शहर होते. धर्मप्रसारासाठी गौतमाने वैशालीला अनेक वेळी भेट दिली.
आजच्या बिहारमध्ये मुज्जफरपूर जिल्ह्यातील बसरा गाव म्हणजे प्राचीन वैशाली होय.
वैशाली येथेच बौद्ध धर्माची दुसरी परिषद भरली होती.
लिच्छवीची राजकन्या चेल्लना हिचा विवाह मगधचा राजा बिंबिसारशी झाला होता. परंतु वृज्जी हा राज्यसंघ फार काळ टिकला नाही.
मगध राजा अजातशत्रूने वृज्जी राज्यसंघाला आपल्या साम्राज्यात सामावून घेतले.
Comment and share
3 Comments
Useful information sir
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteNice
ReplyDelete