Equality: It's Types -1
समतेचे प्रकार : भाग 1
विविध राजकीय विचारवंतांनी खालील प्रमाणे सहा समतेचे प्रकार सांगितलेले आहेत.
1. कायदेशीर समता
2. राजकीय समता
3. आर्थिक समता
4. सामाजिक समता
5. नागरी समता
6. नैसर्गिक समता
X X
1. कायदेशीर समता:
कायदेशीर समते मध्ये दोन गोष्टी अपेक्षित आहेत .
A.कायद्याचे राज्य
Rule of Law
कायद्याचे राज्य म्हणजे कायदा हा सार्वभौम आहे आणि राज्यातील कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही.
B. कायद्याची समानता
Equality of Law
कायद्याची समानता म्हणजे कायदा प्रत्येकाला समान स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची हमी देतो.
कायद्याच्या समानतेत दोन गोष्टी अंतर्भूत आहेत.
X X
a. कायद्यापुढे समानता
(Equality before Law) आणि
b. कायद्याचे समान संरक्षण
(Equal Protection of Law)
स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत -कामगार -भांडवलदार अशा कोणत्याही भेदा शिवाय कायदा समान पद्धतीने सर्वांना लागू असेल. कायद्याचे सर्वांना समान संरक्षण प्राप्त होईल.
X X
2. राजकीय समता
राजकीय समतेचा प्रकार हा आधुनिक काळात लोकशाहीच्या विकासाबरोबर विकसित झाला.
कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना समान राजकीय अधिकार प्राप्त होणे म्हणजेच राजकीय समता होय.
सर्वांना समान मतदानाचा, निवडणूक लढविण्याचा, शासकीय पद धारण करण्याचा, सरकारवर टीका करण्याचा अधिकार प्राप्त होणे म्हणजे राजकीय समता होय.
राजकीय समतेमुळे प्रत्येक नागरिकाला समान पद्धतीने राजकीय प्रक्रियेत सहभागी होता येते.
एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात अनेक राष्ट्रांमधून केली गेलेली " एक व्यक्ती एक मत" ही मागणी राजकीय समतेसाठीची मागणी होती.
मतदानाचा अधिकार विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत अनेक राष्ट्रांमधून विशिष्ट वर्गा पुरताच मर्यादित होता.
आज जवळपास सर्वच राष्ट्रांमधून सार्वत्रिक प्रौढ मताधिकार पद्धतीचा स्वीकार होऊन राजकीय समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला आहे.
Comment and share
Comment and share


2 Comments
Nice
ReplyDeleteNice
ReplyDelete