Equality : Concept
समता : संकल्पना
समता ही एक अशी संकल्पना आहे की जी स्वातंत्र्य, न्याय, अधिकार, संपत्ती इत्यादी संकल्पनामध्ये अंतर्भूत आहे.परिणामी या संकल्पनेचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
दोन हजार वर्षापूर्वीच्या प्राचीन ग्रीक नगर राज्यापासून ते एकविसाव्या शतकापर्यंत सर्वाधिक चर्चिली गेलेली संकल्पना म्हणजे समता आहे.
सर्व आधुनिक लोकशाही शासन व्यवस्था या समतेच्या तत्त्वाची बांधील आहेत आणि बहुतांश व्यवस्थांनी या तत्वाला घटनात्मक दर्जा बहाल केलेला आहे.
X X
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध या पासून ते अलीकडच्या काळात दक्षिण आफ्रिकेतील वंशवादाविरुद्धच्या लढ्यापर्यंत समतेचे तत्व या संघर्षाच्या केंद्रस्थानी राहिले आहे.
समतेच्या तत्वांच्या आधारावरच सामाजिक परिवर्तनाची मागणी अनेक समाजापासून केली गेली आणि समतेचे हे तत्त्व अनेक सामाजिक चळवळींचे आधार तत्व बनले.
समतेसाठीचा हा संघर्ष असमानतेच्या तत्त्वाविरुद्ध आहे. हजारो वर्षापासून जगभरात असमानता हे सामाजिक व्यवस्थांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे.
प्राचीन ग्रीक नगर राज्यांमध्येही सामाजिक आणि राजकीय जीवनात असमानता होती. समाजातील काही विशिष्ट वर्गांना नागरिकत्वाचा दर्जा बहाल करण्यात आला होता.
X X
महिला आणि गुलामांना नागरिकत्वाच्या दर्जा पासून वंचित ठेवण्यात आले होते. या वर्गांना राज्यकारभार या पासून अलिप्त ठेवण्यात आले होते.
असमानतेची ही परंपरा नंतर राजेशाहीच्या काळात, मध्ययुगीन सरंजामशाहीच्या काळात टिकून राहिली.
भारतीय समाजमनातही समानतेचे तत्व प्राचीन काळापासून चालत आलेल्या वर्ण आणि जातिव्यवस्थेमुळे खोलवर रुतून बसले होते.
या असमानतेविरुद्ध जागतिक पातळीवर अनेक राष्ट्रांमधून संघर्ष गेल्या अनेक शतकापासून चालू आहे.
भारतातील एकोणिसाव्या शतकापासून समतेच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तन चळवळी झाल्या.
विसाव्या शतकात वसाहतवादा विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य चळवळी, रशिया आणि चीनमधील राज्यक्रांती यांच्या केंद्रस्थानी समतेचे तत्व होते.
X X
संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 10 डिसेंबर 1948 रोजी "मानव अधिकारांचा जाहीरनामा" घोषित करण्यात आला. या जाहीरनाम्यात समतेच्या तत्त्वांचा "मूलभूत मानवी अधिकार" म्हणून समावेश करण्यात आला.
जागतिक पातळीवर या अधिकाऱ्यांच्या प्रचारासाठी आणि संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्र संघटना बांधील असेल असे या संघटनेच्या घटनेतच नमूद करण्यात आले आहे
Comment and share


5 Comments
Very nice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDelete