Subscribe Us

header ads

BalShastri Jambhekar: Father of Marathi journalism

BalShastri Jambhekar: Father of Marathi journalism

आचार्य बाळशास्त्री जांभेकर :

मराठी वृत्तपत्राचे जनक समाजसुधारक इतिहास संशोधक व विचारवंत

 6 जानेवारी : दर्पण दिन किंवा "पत्रकार दिन"

17 मे: स्मृतिदिन



आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 मध्ये मराठीतील "दर्पण" हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले. म्हणून महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस "दर्पण दिन" किंवा "पत्रकार दिन" म्हणून साजरा केला जातो. 

मराठी वृत्तपत्राचे जनक समाजसुधारक इतिहास संशोधक व विचारवंत म्हणून बाळशास्त्री जांभेकर ओळखले जातात.

 महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात बाळशास्त्रींचे नाव त्यांच्या "दर्पण" व "दिग्दर्शन" या नियतकालिकात मुळे सदैव स्मरणात राहिले.

X X

पाश्चात्य ज्ञानाचे स्वागत करावे. त्याशिवाय तरणोपाय नाही. अशी भूमिका प्रथम दर्पण मधून त्यांनी मांडली. 

लोकमतावर संस्कार करायचे काम या दोन नियतकालिकांनी केली हीच परंपरा पुढे इतर नियतकालिकांनी चालविली.

 आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते.

X X

बालपण आणि शिक्षण:

 आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोंभूर्ले या गावी  1812 मध्ये झाला. 

1825 च्या दरम्यान ते मुंबईला आले व इंग्रजी शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. 

इंग्रजी शिकत असताना त्यांनी गणित  या विषयातही प्रावीण्य मिळवले.

बालपणात त्यांनी रामदास, तुकाराम, मोरोपंत इत्यादी कवींच्या निवडक कविता आत्मसात केल्या होत्या व त्याचबरोबर संस्कृत वेदपठण, गीतपठण, पंचकाव्य यांचाही सूक्ष्म अभ्यास केला होता.

शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी  विद्यार्थीदशेतच 15 रुपये  या पगारावर गणिताचे अध्यापक म्हणून काम केले.

त्यांचे बुद्धिवैभव लक्षात घेऊन त्यांना "Bombay Native Education Society" चे डेप्युटी सेक्रेटरी पद देण्यात आले होते. 

अगदी लहान वयात हा मान त्यांना मिळाला व सरकारतर्फे अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.

त्या वेळेस त्या ठिकाणी त्यांनी कन्नड भाषा आत्मसात केली. 

त्या बरोबरच त्यांना फ्रेंच, लॅटिन व ग्रीक भाषेचे ज्ञान होते.

X X

जीवन कार्यकाल:

1834 मध्ये मुंबई या ठिकाणी असलेल्या एलफिन्स्टन महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी मराठी या विषयाचे प्राध्यापक म्हणुन काम केले. 

त्यानंतर सरकारने त्यांना शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक व मुंबई इलाख्यातील मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती केली. 

X X

वाङमय क्षेत्रातील कार्य: 

बाळशास्त्री जांभेकर यांमध्ये वाङमयगुण होते व अनेक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. 

इतिहास, धर्म,तत्त्वज्ञान, व्याकरण व विज्ञान या विषयावर त्यांनी ग्रंथ लिहिले. 

1.बाल व्याकरण (1836) 

2. सारसंग्रह (1837) 

3. हिंदुस्थानचा इतिहास (1846) 

4.संध्येचे भाषांतर 

5. इंग्लंड देशाची बखर (1832) खंड 1,2 

6. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास (1849)

7. हिंदुस्थानातील इंग्रजी राज्यांचा इतिहास 

8.नीतिकथा (1838) 8.शब्दसिद्धी निबंध 

9.भूगोलविद्या (1836) 

10. ज्योतिषशास्त्र (1835) 

11. शून्यलब्धी

 त्यांचे काही ग्रंथ मृत्यूनंतर प्रकाशित झाले. 

X X

ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपण पारंपारिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजेत असा विचार करून बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तींचे प्रकाशन केले. तीच पहिली छापील "ज्ञानेश्वरी" होय. 

त्यांच्याच प्रेरणेने "प्रभाकर" व "आदेशचंद्रिका" ही नियतकालिके निघाली.

X X

मराठी वृत्तपत्राचे जनक:

जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी "दर्पण" हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. 

स्वदेशी लोकांमध्ये विदेशी विद्याचा अभ्यास अधिक व्हावा देशाची समृद्धी व लोकांचे कल्याण व्हावे हा दर्पण चा हेतू असल्याचे पहिल्याच अंकात बाळशास्त्रींनी स्पष्ट केले होते.

"दर्पण" हे वृत्तपत्र इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रसिद्ध करण्यात येत असे. हे पत्र 8 पानी होते.  त्रैमासिक वर्गणी 6 रुपये  होती. 

वृत्तपत्र हे समाज शिक्षणाचे साधन आहे असे त्यांना वाटे. इंग्रजी राज्यकर्ते व भारतीय समाज यांचे मन सांभाळून आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली.

 "दर्पण" पत्राने मराठी वृत्तपत्रसृष्टीत एक नवे पर्व सुरु झाले. 

X X

जांभेकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, भौतिकवाद, बुद्धिप्रामाण्यवाद इत्यादी.

 पाश्चात्य सुधारणांची तत्त्वे आपल्या लेखणीतून लोकांसमोर मांडली. ही तत्वे महाराष्ट्राची जडणघडण करण्यासाठी पोषक ठरली व त्यातून नवा प्रगतशील समाज भक्कमपणे उभा राहिला.

20 जून1840 मध्ये "दर्पण" साप्ताहिक त्याचा शेवटचा अंक निघाला.

 त्यानंतर हे पत्र " Limited service Gazzet and Literacy Chronical" या पत्रात विलीन करण्यात आले. 

त्यानंतर जांभेकरांनी "दिग्दर्शन " हे मासिक सुरू केले. ते स्वतः या मासिकाचे जनक व संपादक होते.

  X X

शिक्षण क्षेत्रातील कार्य:

एक शिक्षक, प्रोफेसर, लेखक व शिक्षण तज्ञ म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी मोलाचे कार्य केले.

1830 मध्ये  "Bombay Native Education Society" च्या डेप्युटी सेक्रेटरी या पदावर त्यांची नियुक्ती झाली.

एलफिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी गणित,खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र व मराठीही विषय शिकवले.

महाराष्ट्रातील शिक्षण प्रसाराच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी विविध विषयावरची पाठ्यपुस्तके तयार करण्याचे अतिशय कठीण काम केले.

पाठ्यपुस्तकाची निर्मिती करून महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया त्यांनी मजबूत केला.

X X

प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट यांचे त्यांनी वाचन केले होते व त्यावर अनेक विद्वत्तापूर्ण लेखही त्यांनी लिहिले.

 त्यांचे हे सर्व शोधनिबंध " Royal Asiatic Society" या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. म्हणूनच "पहिले इतिहास संशोधक" अशीही त्यांची ओळख आहे.

X X

सामाजिक कार्य:

सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या बाबतीत त्यांनी त्यांची वृत्ती पुरोगामी होती.

स्त्री-शिक्षण, बालविवाह, पुनर्विवाह या प्रश्नांचा विचार करताना त्यांनी धर्मशास्त्राचे अनुसंधान कधी सोडले नाही.

विधवा विवाहाचा त्यांनी पुरस्कार केला होता. विधवाविवाहाला शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ लिहून पूर्ण केली. 

स्त्रीशिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला. विधवांच्या पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते.

 तसेच मुलींची विक्री, समाजातील अंधश्रद्धा यास त्यांनी विरोध केला.

X X

"दर्पण"च्या माध्यमातून जांभेकरांनी समाजाला ज्ञानाचे डोस पाजले.

 विद्या ही कोणा एका देशापुरते असत नाही. या त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन 

गव्हर्नर सर जेम्स कर्नक 1840 मध्ये जांभेकरांना "जस्टिस ऑफ द पीस" ही पदवी दिली.

X X

निधन:

17 मे 1846 रोजी बाळशास्त्री जांभेकर मृत्यू पावले. 

त्यांच्याबद्दल डॉ. दादाभाई नवरोजी यांनी म्हटले आहे की, 

"अद्वितीय विद्वान" पश्चिम भारतातील "अर्वाचीन विद्यामुकुटमणी" " प्रख्यात पंडित" 

या शब्दांनी त्यांचा गौरव केलेला आहे.

बाळशास्त्री हे पश्चिम भारतातील नवयुगाचे प्रवर्तक व आधुनिक महाराष्ट्राचे जनक होते. 

महाराष्ट्रातील शिक्षण प्रणालीचा त्यांनी पाया घातला.

X X


आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना.


X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/january-6-day-of-special-dinvishesh.html

👆

January 6 - Day of Special (Dinvishesh)


जानेवारी 6 : दिनविशेष








Comment and share

Post a Comment

8 Comments