Subscribe Us

header ads

Types of Democracy: Indirect Democracy लोकशाहीचे प्रकार: 2. अप्रत्यक्ष लोकशाही 👆

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Types of Democracy: Indirect Democracy

लोकशाहीचे प्रकार: 

2. अप्रत्यक्ष लोकशाही 

अप्रत्यक्ष लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही म्हणून ओळखली जाते.

 प्रातिनिधिक लोकशाही हा लोकशाहीचा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे.

 सर्व आधुनिक लोकशाही शासन व्यवस्था या प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत.

 हा प्रकार विसाव्या शतकात प्रामुख्याने प्रसिद्धीस आला.

 प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये जो लोकशाही प्रकार अस्तित्वात होता. तो प्रत्यक्ष लोकशाही म्हणून ओळखला जायचा.

 नगर राज्यांची लोकसंख्या मर्यादित होती. परिणामी प्रत्येक नागरिक शासन कारभारात आणि राजकीय निर्णय निर्मिती प्रक्रियेत सहभागी व्हायचा.

 तथापि पुढे आधुनिक राष्ट्र राज्याच्या निर्मिती बरोबरच आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पातळीवर महत्त्वाचे बदल घडून आले.

 लोकसंख्या वाढली. शासन कारभारासाठी विशेष कौशल्य बाळगण्याची गरज भासायला लागली.

 अशा परिस्थितीत राज्यातील प्रत्येक नागरिकाला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे अवघड होते.

 परिणामी प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रकार मागे पडला. 

X X

प्रातिनिधिक लोकशाहीच्या रुपाने अप्रत्यक्ष लोकशाहीचा प्रकार पुढे आला.

 नागरिक सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी निवडतात. हे प्रतिनिधी नागरिकांच्या वतीने शासन कारभार चालवितात. ते जनतेला उत्तरदायी आणि जबाबदार असतात. या प्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयांना, ठरविलेल्या धोरणांना जनतेची अधिमान्यता असते.

 जनतेला निवडणुकीच्या माध्यमातून शासनकर्त्यांना बदलण्याचा अधिकार असतो.

 याचाच अर्थ असा होतो की, प्रातिनिधिक लोकशाही जनता जरी प्रत्यक्ष शासन कारभारात सहभागी होत नसली तरी सत्तेची खरी सुत्रे जनतेच्या हातात असतात.

 जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताने आपल्या "कन्सिडरेशन्स रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रसी" या ग्रंथात हाच युक्तिवाद केला आहे.

 त्यामध्ये प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये जनतेला अशा प्रकारची नागरी आणि राजकीय स्वातंत्र्य उपलब्ध झालेली असतात की, ज्यामुळे शासनकर्त्यावर जनतेचे नियंत्रण प्रस्थापित होते.

प्रातिनिधिक लोकशाही या राजकीय बहुलतेवर (Political Pluralism) आधारलेले असतात.

 या लोकशाही मधून अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व असते. या राजकीय पक्षांमध्ये सत्ता प्राप्तीसाठी स्पर्धा असते. जनतेला योग्य उमेदवार आणि पक्ष निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध असतात.

 प्रातिनिधिक लोकशाहीची परिणामकारकता उत्तम नेतृत्वगुणावर अवलंबून असते.

 नेतृत्वाकडे शासन कारभारासाठी विशेष कौशल्य असावी लागतात. अशी कौशल्य असणार्‍या उमेदवारांची निवड जनता निवडणुकीच्या माध्यमातून करते.

 अशा प्रकारे प्रातिनिधिक लोकशाही मध्ये तीन महत्त्वाचे गुण आपल्याला दिसून येतात.

1.  या लोकशाहीमध्ये राजकीय उत्तरदायित्व असते. म्हणजेच शासनकर्ते आपल्या प्रत्येक कृत्यासाठी जनतेला जबाबदार असतात.

2.  या प्रकारात राजकीय नेतृत्वाकडे शासन कारभाराची कौशल्य असतात.

3.  प्रातिनिधिक लोकशाही ही व्यवसायिकता वादावर आधारलेली आहे.

X X

3. उदारमतवादी लोकशाही 

उदारमतवादी लोकशाहीची संकल्पना जॉन  लॉक, बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल, टी.एच.ग्रीन, हॉब्सहाऊस, बार्कर, लास्की इत्यादी विचारवंतांच्या विचारांमधून विकसित झाली.

 उदारमतवादी लोकशाहीचा उदय राजेशाही आणि सरंजामशाही राजवटीच्या विरोधात झाला.

 शासन व्यवस्थेत जनतेला मध्यवर्ती आणि सर्वोच्च स्थान देणारा हा प्रकार आहे.

 हा व्यक्तिकेंद्रित लोकशाही प्रकार आहे. व्यक्तीच्या बुद्धिप्रामाण्यवादावर, नैतिकतेवर विश्वास ठेवणारा आणि व्यक्तीच्या विकासासाठी तिला आवश्यक स्वातंत्र्य आणि अधिकार बहाल करण्यावर भर देणारा हा शासन प्रकार आहे.

 व्यक्तीला स्वतःचे हित व्यवस्थित कळत नसल्यामुळे शासनाने व्यक्तिगत क्षेत्रात कमीत कमी हस्तक्षेप करत व्यक्तीला विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करून द्यायला हवे या विचारांचे प्रतिनिधित्व करणारा हा लोकशाहीचा प्रकार आहे.

 व्यक्तीचा राजकीय सहभाग या लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाचा मानला जातो.

 राजकीय सहभागातून शासनावर नियंत्रण प्रस्थापित करणे, शासनाला अधिकाधिक उत्तरदायी बनविणे शक्य होते.

 राजकीय सहभागातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. व्यक्तीचा राजकीय सहभाग वाढावा यासाठी आवश्यक नागरी आणि राजकीय अधिकार व्यक्तीला या व्यवस्थेत बहाल केले जातात.

 उदारमतवादी लोकशाही शासन प्रकार म्हणून प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार करते. 

X X

परिणामी निर्वाचित शासन करते. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, नियमित निवडणुका, गुप्त मतदान, व्यक्तिस्वातंत्र्य आणि अधिकारांचे अस्तित्व ही उदारमतवादी लोकशाहीचीदेखील अंगभूत वैशिष्ट्ये आहेत.






Comment and share


Post a Comment

5 Comments