Equality: It's Types -2
समतेचे प्रकार : भाग 2
विविध राजकीय विचारवंतांनी खालील प्रमाणे सहा समतेचे प्रकार सांगितलेले आहेत.
1. कायदेशीर समता
2. राजकीय समता
क्रमश.......
X X
3. आर्थिक समता
विचारवंतांनी आर्थिक समतेचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला आहे.
व्यक्तीला आपल्या मर्जीप्रमाणे आर्थिक जीवनक्रम, व्यवसाय निवडीच्या अधिकारापासून तर प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजांचे समाधान होण्याच्या अधिकारा पर्यंत आर्थिक समतेचे अर्थ लावले गेले आहेत.
सर्वसाधारणपणे आर्थिक समता म्हणजे आर्थिक सत्तेत समता होय अर्थात याचा अर्थ म्हणजे राज्यातील सर्व संपत्तीचे समान वाटप करणे असे नाही.
संपत्तीच्या वितरणात प्रमाणशीरपणा असायला हवा प्रत्येकाच्या किमान गरजा पूर्ण होतील इतपत आर्थिक साधने व्यक्तीकडे असायला हवीत.
रुसोच्या मते,
" राज्यातील कोणताही नागरिक इतका श्रीमंत नको की इतरांना विकत घेईल आणि कोणताही नागरिक इतका गरीब नको की त्याला स्वतःला विकणे भाग पडेल परिणामी संपत्तीचे वितरण करताना हे दोन्ही अतिरेक टाळले जातील याची राज्याने काळजी घ्यायला हवी."
लास्कीच्या मते,
"आर्थिक समतेचा प्रकार हा प्रमाणशीरतेशी निगडीत आहे .प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजा भागवता येतील या प्रमाणात संपत्तीचे उत्पादन साधनांचे वितरण व्हायला हवे."
आर्थिक समता हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधार आहे. आर्थिक समता नसेल तर राजकीय आणि नागरी समतेला महत्त्व राहत नाही.
X X
4. सामाजिक समता
सामाजिक समता म्हणजे राज्यातील सर्व व्यक्तींना आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी समान संधीची उपलब्धता असणे.
जन्म, जात, धर्म, वेश, भाषा, लिंग इत्यादी कोणत्याही आधारावर भेदाभेद नसणे, सर्वांना समान विकासाच्या संधी मिळणे म्हणजे सामाजिक समता.
राजकीय आणि आर्थिक समतेप्रमाणेच सामाजिक समता ही महत्त्वपूर्ण असून ती लोकशाहीच्या यशस्वितेची अट आहे.
सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न गेल्या अनेक शतकांपासून विविध समाज व्यवस्था मधून चालू आहेत.
भारतामध्ये एकोणिसाव्या शतकापासून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न होत होते. या कार्यात राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू, महात्मा गांधी इत्यादी समाजसुधारकांचे मोठे योगदान आहे.
सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
भारतीय राज्यघटनेतील "अस्पृश्यता प्रतिबंधक" तरतूद सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारतात आज अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे.
5. नागरी समता
नागरी समता म्हणजे समान नागरी हक्क राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मिळणे होय. कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक नागरिकाला व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, विचारांचे स्वातंत्र्य असणे म्हणजे नागरी समता आहे.
नागरी समता प्रस्थापित होण्यासाठी कायद्याचे राज्य आणि कायद्याची समानता असणे गरजेचे आहे. कायद्यापुढे सर्वांना समान वागणूक असायला हवी.
खरी लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी नागरी समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे.
X X
6. नैसर्गिक समता
प्रत्येक व्यक्तीला एक माणूस म्हणून समान वागणूक मिळणे म्हणजे नैसर्गिक समता.
जन्माने प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आणि समान असतो. कोणत्याही मानवनिर्मित भेदभावाला बाजूला सारून व्यक्तीला एक माणूस म्हणून समान वागणूक देणे नैसर्गिक समतेत अपेक्षित आहे.
Comment and share


6 Comments
Very nice information
ReplyDeleteUseful Information
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDelete👍👍
ReplyDeleteNice information
ReplyDelete