Duties
कर्तव्ये
अधिकार आणि कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे ते एकत्रित आहेत आणि परस्पर पूरक आहेत.
आपले अधिकार उपभोगण्यासाठी व्यक्तीला काही कर्तव्ये पार पाडावीत लागतात.
एका व्यक्तीचे अधिकार ही दुसऱ्या व्यक्तीची कर्तव्ये असतात. कर्तव्याची निर्मिती ही अधिकारा विषयीच्या सामाजिक आशयातून झाली आहे.
व्यक्तीला समाजाचा सदस्य या नात्याने अधिकार प्राप्त होतात. या अधिकाराच्या माध्यमातून व्यक्तीला आपले व्यक्तिगत हित साधणे बरोबरच समाजहितही साधावे लागते.
x x
सामाजिक दायित्वाच्या या भावनेतून कर्तव्यांची संकल्पना पुढे आली. समाजहितासाठी, समाजकल्याणासाठी व्यक्तीला काही मूलभूत कर्तव्ये पार पाडावी लागतात.
ज्याप्रमाणे अधिकार उपभोगणे यातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वचा विकास होतो. त्याच प्रमाणे कर्तव्य पालनातूनही व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
कर्तव्ये पालनातून सामाजिक हित साधले जाते आणि सामाजिक हितातच व्यक्तीचे हित सामावलेले असते.
अशाप्रकारे अधिकारा प्रमाणेच कर्तव्येही व्यक्तीच्या विकासासाठी पूरक आहेत. कर्तव्यपालनामुळे समाजातील प्रत्येक घटकाला समान पद्धतीने आपले अधिकार उपभोगता येतात.
x x
कर्तव्ये: अर्थ आणि स्वरूप
कर्तव्ये म्हणजे सर्वसाधारणपणे समाजहित, समाजकल्याणाचे उद्दीष्ट गृहीत धरून काही कार्ये व्यक्तीला सक्तीने पार पाडावी लागतात.
सक्तीने पार पाडावयाची कार्ये ही कार्ये म्हणजे कर्तव्ये होय.
कर्तव्ये पार पाडण्याची शक्ती ही नीतिमत्ता आणि कायद्याच्या माध्यमातून केली जाते. व्यक्तीवर विशिष्ट कार्य करण्यासाठी कायदा आणि नितीमत्तेद्वारे बंधने टाकली जातात. ही बंधने म्हणजेच कर्तव्ये होय.
कर्तव्ये पालनातून व्यक्ती आणि समाज असा दोघांचाही विकास घडून येतो.
जसे नियमित कर भरणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. कायद्याने हे कार्य करण्यासाठी व्यक्तीवर बंधन टाकले आहे. कर भरणे हे समाजहित, समाजविकासासाठी आवश्यक आहे.
व्यक्तीने असा कर भरला नाही तर राज्याला लोककल्याणकारी योजना राबविता येणार नाहीत.
x x
अशा प्रकारे कर भरण्याच्या कर्तव्य पालनात समाजाचे व्यापक हित सामावलेले असते.
कर्तव्याच्या अर्थाविषयीचा दुसरा महत्त्वाचा दृष्टीकोण हा दायित्वाची भावनेचा आहे.
व्यक्ती समाजात लहानाचा मोठा होतो. समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला स्वातंत्र्य, अधिकार प्राप्त होतात.समाजाचे हे व्यक्तीवर चे उपकार आहेत.
उपकाराचे हे ऋण फेडण्यासाठी काही कार्य व्यक्तीला सक्तीने करावी लागतात. ही कार्य म्हणजे कर्तव्ये होय.
समाजाविषयीची ही दायित्वाची भावना कर्तव्यनिर्मितीचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे.
Comment and share
4 Comments
Nice information
ReplyDeleteNice sirji
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteNice
ReplyDelete