भारतीय संविधानावर आधारित सर्वात मोठी प्रश्नावली
Largest Questionnaire based on Indian Constitution
📓
१)अस्पृश्यता पाळणे हा कोणत्या कलमाने दंडनीय गुन्हा आहे?
👉 कलम १७
२) संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३)संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत?
👉 १२ परिशिष्टे
४) संविधानात एकूण कलमे किती ?
👉 मूळ ३९५ कलमे (सध्यस्थितीत ४४८)
५) घटनेनुसार संघराज्याची अधिकृत भाषा कोणती?
👉 हिंदी {इंग्रजीचाही वापर होऊ शकतो} (हा घटनासमितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आठवणीत नमूद केले आहे.)
६) संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
👉 २ वर्ष ११ महिने १८ दिवस
७) भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य कोणत्या कलमाच्या अधिकारात येते?
👉 कलम १९ ते २२
८) नवीन राज्यांची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत येते?
👉 कलम २
९) कोणत्या कलमांतर्गत समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे?
👉 कलम ४६
१०) संविधानात कोणाचे हस्तलेखन आहे?
👉 बिहारी नारायण रायजादा (कॅलिग्राफी पद्धत), संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले.
X X
११) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या अधिकाराचे वर्णन 'संविधानाचे हृदय आणि आत्मा' असे केले होते?
👉 घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क
१२)संविधान सभेची प्रथम बैठक केव्हा पार पडली?
👉 ९ डिसेंबर १९४६
१३) संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात?
👉 मूलभूत कर्तव्य
१४) भारतीय संविधानाने कोणते मूल्य स्वीकारले आहे?
👉 धर्मनिरपेक्षतेचे
१५)घटनेनुसार निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते?
👉 निवडणूक आयोग
१६)संघशासनाला कोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार नाही?
👉 कायदा आणि सुव्यवस्था
१७) संघशासनाच्या अधिकारांविषयीच्या सूचीला काय म्हणतात?
👉 संघसूची
१८) 'शोषणाविरुद्धचा हक्क' या अंतर्गत संविधानाने कोणत्या बाबींवर बंदी घातली आहे?
👉 माणसांची खरेदी-विक्री, गुलामगिरी व वेठबिगारी, कारखाने, खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी मुलामुलींना कामावर ठेवणे.
१९)मूलभूत अधिकारांचे रक्षक (fundamental rights protector) कोणाला म्हंटले जाते?
👉 सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय
२०) भारतीय संविधान संपूर्ण ताकदीने केव्हा लागू झाले?
👉 २६ जानेवारी १९५०
२१) कोणत्या कलमान्वये ६ ते १४ वर्षांपर्यंत मुलांना प्राथ. शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली? (right to education)
👉 कलम २१
२२) सत्तेचे भारतात कोणत्या तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे?
👉 कार्यकारी (प्रशासकीय), कायदेकारी (विधिमंडळे), न्यायालयीन
२३) न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च अधिकार कोणाकडे असतात?
👉 सर्वोच्च न्यायालय
२४) आणीबाणीचे कोणते तीन प्रकार आहेत?
👉 राष्ट्रीय आणीबाणी, प्रादेशिक आणीबाणी, आर्थिक आणीबाणी (३५८व्या कलमानुसार कलम १९ मधील नागरिकांचे अधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात.)
२५) भारतीय संविधानानुसार देशाचा प्रथम नागरिक कोणास म्हंटले जाते?
👉 राष्ट्रपती
X X
२६) संविधानातील मूलभूत कर्तव्यांची संख्या किती? (Fundamental duties)
👉 ११
२७) भारतीय सैन्याचा सर्वोच्च सेनापती कोण? (Supreme commander)
👉 राष्ट्रपती
२८) लोकसभेची व राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती?
👉 ५५२, २५०
२९)लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळेचे अंतर किती असावे?
👉 ६ महिने
३०) राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो?
👉 राज्यपाल
३१) भारतात एकूण किती राज्यांत विधान परिषड अस्तित्वात आहे?
👉 ६ (सध्या प.बंगाल मध्येही)
३२)विधानसभेचे वर्षातून कमीतकमी किती अधिवेशन होणे गरजेचे आहे?
👉 २ अधिवेशने
३३) सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? व एकूण संख्या किती आहे?
👉 राष्ट्रपती करतात, एकूण संख्या ३४
३४) मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
👉 लोकसभेला
३५)कोणत्या कलमांतर्गत बालमजुरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून संरक्षण मिळाले आहे?
👉 कलम २३ व कलम २४
३६) अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमांतर्गत प्राप्त झाले?
👉 कलम २९ व कलम ३०
३७) मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीला कलम ३२ अन्वये कुठे तक्रार करता येते?
👉 थेट सर्वोच्च न्यायालयात
३८) अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन कोणत्या कलमांतर्गत करण्यात आले आहे?
👉 कलम ४६
३९) भारतीय संविधान लागू करण्यापूर्वी संविधान सभेच्या किती बैठका झाल्या?
👉 ११ सत्रे (बैठका)
४०) राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याची एकूण किती वाचने झाली?
👉 तीन
• प्रथम वाचन (४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर १९४८)
• दुसरे वाचन (१५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर १९४९)
• तिसरे वाचन (१४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर १९४९)
X X
४१) कितव्या वयानंतर सर्वांना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार दिलेला आहे?
👉 सुरुवातीला २१ वर्षे, परंतु १९८९ साली झालेल्या ६१ व्या घटनादुरुस्तीनंतर १८ वर्षे
४२) संविधानाच्या सरनाम्यातील शब्दांचा योग्य क्रम कोणता?
👉 सार्वाभोम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य
४३)कायद्यामोर सर्वाना समान वागणूक ही बाब कोणत्या मूलभूत हक्कांर्तगत येते?
👉 समानतेचा हक्क
४४) भारतीय संविधानानुसार कोणत्या अधिकारांवर निर्बंध टाकता येत नाही? किंवा उल्लंघनही करता येत नाही?
👉 मूलभूत अधिकार
४५) सध्यस्थितीत अस्पृश्यता निर्मूलन कायद्याचे नाव काय आहे?
👉 नागरी संरक्षण अधिनियम
४६) राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत झाली?
👉 कलम ५२, कलम ६३
४७) कलम ७८ नुसार राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे कोणाचे कर्तव्य आहे?
👉 प्रधानमंत्री यांचे
४८) राष्ट्रपतीला वटहुकुम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे?
👉 कलम १२३
४९) भारतीय संविधानाचे नागरिकांप्रती मुख्य उद्दीष्ट काय?
👉 न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता
५०) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हंटले जाते?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कारण संविधान बनवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्णपणे सिंहाचा वाटा व महत्त्वाचे योगदान होते आणि त्यांनी ते अथक परिश्रमाने, जोमाने व प्रभावीपणे जोपासले.
View, Comments and share...
0 Comments