Subscribe Us

header ads

Sanctuaries and National Park in India भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने

 भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने 

 Sanctuaries and National Park in India 

भारतात प्राकृतिक रचना व हवामान यात भिन्नता असल्यामुळे विविध जातींचे वन्य प्राणी व पशु-पक्षी आढळतात.

 एका सर्वेक्षणानुसार भारतात 300 पेक्षा जास्त वन्यप्राण्यांच्या जाती आणि एक हजार पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार आहेत.

 पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वन्य पशुपक्षी आणि वनस्पतींना अतिशय महत्त्व आहे. परंतु मध्यंतरी मोठ्या प्रमाणात झालेली पशुपक्ष्यांची हत्या आणि जंगलतोड यामुळे पशु पक्षी आणि वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरज आहे. 

या उद्देशाने भारताच्या निरनिराळ्या भागात अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने निर्माण करण्यात आली. हे अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने पर्यटनाची केंद्रे बनली.

 भारतामध्ये 250 च्या आसपास अभयारण्ये आणि 50 च्या दरम्यान राष्ट्रीय उद्याने आहेत.

1. नागार्जुन सागर अभयारण्य :

आंध्र प्रदेशात कृष्णा नदीवर बांधलेल्या धरणाच्या नागार्जुन सागर जलाशयाच्या सानिध्यात हे भारतातील सर्वात मोठे व्याघ्र अभयारण्य आहे.

 या अभयारण्यात विस्तृत पठारे ,खोल दऱ्या असून येथे पानझडी वृक्ष आढळतात. त्याचे क्षेत्रफळ  3560 चौरस किलोमीटर असून ऑक्टोबर ते जून हा काळ पर्यटनासाठी योग्य आहे. वाघ अभयारण्याचे वैशिष्ट्य असून चित्ते, बिबट्या, अस्वले, नीलगाय, सांबर ,माकडे हे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात.

2. कान्हा राष्ट्रीय उद्यान :

मध्य प्रदेशातील हे उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे .

या उद्याना इतके विविध प्राणी भारतातील अन्य उद्यानात आढळत नाहीत. याचा उल्लेख "व्याघ्र भूमि" असा केला जातो.

 पठारावरील घोड्यांच्या टापां सारख्या नदी खोऱ्यात वसलेल्या या उद्यानात वेगवेगळ्या बावीस जातींचे प्राणी आढळतात .येथे पानझडी वृक्षांची मोठी जंगले आहेत . 

त्याचे क्षेत्रफळ 940 चौरस किलोमीटर आहे .तसेच येथे वाघ ,चित्ता ,हरसिंगा, सांबर, माकडे आढळतात.

X X

3. गीर अभयारण्य :

 जुना गड पासून 125 किलोमीटरवर भारतातीलच नव्हे तर सबंध जगात सिंहा साठी प्रसिद्ध आहे . 

याचे एकूण क्षेत्रफळ 360 चौरस किलोमीटर असून लहान-मोठे डोंगर ,टेकड्या दऱ्या यांनी व्यापलेला आहे. येथे मोसमी प्रकारचे वृक्ष व गवत आढळते. यात सिंहांची संख्या जास्त आहे .तसेच इतर चितळ, सांबर, डुक्कर, कोल्हे व अनेक प्रकारचे पक्षी येथे आढळतात.

4. काझीरंगा अभयारण्य :

आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील गुवाहाटी पासून 220 किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य एक शिंगी गेंड्या साठी प्रसिद्ध आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ 430  चौरस किलोमीटर आहे. येथे 1978 साली 1000 गेंडे होते.

5. भरतपूर अभयारण्य :

राजस्थान मध्ये भरतपुर याठिकाणी पक्षांसाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य सुमारे तीस चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. या भागात पानथळी चे भाग असल्याने येथे विविध जातींचे पक्षी आढळतात. येथे पक्षांच्या  सर्वात जास्त जाती आढळतात. 

भारताशिवाय सैबेरिया व मध्य अशियातील स्थलांतरित पक्षी येथे आढळतात.

X X

6. कार्बेट राष्ट्रीय उद्यान :

 हे उद्यान ई. स. 1836 मध्ये सुरू करण्यात आले.

 भारतातले पहिले उद्यान आहे.

 नैनिताल पासून 120 किलोमीटर अंतरावर वाघांसाठी प्रसिद्ध असलेले 530 चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ  आहे .

डोंगरदऱ्यांनी साल ,पाईन वृक्ष व गवत यांनी व्यापलेल्या भागातून "रामगंगा" नदी वाहते. शिवाय हत्ती, चितळ, हरीण व विविध पक्षी येथे आढळतात. 

नरभक्षक वाघांची शिकार करणाऱ्या "जिम कार्बेट" या जगप्रसिद्ध शिकाऱचे या उद्यानाला दिले आहे. त्यापूर्वी त्या उद्यानाचे नाव "हॉले  नॅशनल पार्क" असे होते.

7. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान:

 राजस्थान मधील रणथंबोर या उद्यानातील वाघ देशातील इतर अभयारण्यातील वाघापेक्षा अधिक माणसाळलेले आहेत . हे उद्यान अरवली पर्वत क्षेत्रात विखुरलेले आहे. पानझडी वृक्षांची जंगले व ढोक पक्ष्यांचे मोठे प्रमाण या उद्यानाची प्राकृतिक वैशिष्ट्ये मानली जातात . याचे एकूण क्षेत्रफळ 392 चौरस किलोमीटर आहे .

8. नॉर्थ सिमलीपाल  राष्ट्रीय उद्यान :

पश्चिम बंगाल मधील हे राष्ट्रीय उद्यान देशातील पहिले व्याघ्र अभयारण्य म्हणून ओळखले जाते. 

भारतातील व्याघ्र प्रकल्पाची येथूनच सुरुवात झाली. 

मयूरगंज संस्थांच्या महाराजांचे हे राखीव जंगल होते. 

हे उद्यान 303 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले असून या ठिकाणी हत्ती, चित्ते ,बिबट्या ,सांबर ,रानटी कुत्रे, मोठी खार, माकड इत्यादी प्राणी आढळतात.

9. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान:

 गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन प्रचंड नद्यांच्या सलग पसरलेल्या गाळाच्या सखल मैदानी भागात सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान नद्यांचे प्रवाह खाड्या व नद्यांची पात्रे यांनी बनले आहे.

 याचे क्षेत्रफळ सुमारे 2600 चौरस किलोमीटर आहे .

येथे सुंदरी (Mangrove )वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात.

 वाघ हा या जंगलातील प्रमुख प्राणी असून अनेक शतकापासून वाघाचे वास्तव्य आहे. त्याचबरोबर मांजरी व नदीत मगरी आढळतात.

10. मदुमलाई अभयारण्य :

तामिळनाडू राज्यात उटी पासून 65 किलोमीटर अंतरावर निलगिरी पर्वत परिसरात 320 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे अभयारण्य हत्तीसाठी विशेष प्रसिद्ध आहे.

 या भागात पर्जन्याचे प्रमाण खूप आहे त्यामुळे साग ,बांबू आणि निलगिरीची दाट वने आहेत. या क्षेत्रात हत्ती मोठ्या संख्येने आढळतात. शिवाय वाघ, चित्ते ,बिबटे, चितळ, माकडे इत्यादी प्राणी व वनस्पती आढळतात.

11. बंदीपूर अभयारण्य:

 हे अभयारण्य दक्षिण कर्नाटकात नांजूनगड पासून 55 किलोमीटर अंतरावर आहे. येथे घनदाट जंगल असून विविध प्रकारचे प्राणी आढळतात .जंगले पानझडी ,सदाहरित प्रकारची मिश्र असून काटेरी झुडपे येथे आढळतात.  

या अभयारण्यातून प्रसिद्ध "मोयार" नदी वाहते  वाघांचे राखीव हे अभयारण्य असून याचे क्षेत्रफळ सुमारे 874 चौरस किलोमीटर आहे .हत्ती सुद्धा येथे मोठ्या संख्येने आढळतात.

X X

12. पेरियार राष्ट्रीय उद्यान :

हे राष्ट्रीय उद्यान केरळ राज्यात कोलायम पासून 115 किलोमीटर वर आहे .त्याचे क्षेत्रफळ 780 किलोमीटर असून" पेरियार" नदीवर बांधलेल्या जलाशयाच्या परिसरात हे भारतातील एक सुंदर राष्ट्रीय उद्यान समजले जाते. या भागात भरपूर पाणी उपलब्ध आहे व जंगल दाट आहे येथे वाघ ,रानडुक्कर, सांबर ,रानटी कुत्रे व अनेक पक्षी आढळतात.

13. पालामाऊ अभयारण्य :

हे अभयारण्य छोटा नागपूरच्या पठारावर पालामाऊ राखीव जंगलात आहे .त्याचे क्षेत्रफळ 970 चौरस किलोमीटर असून हे भारतीय  चित्त्यां साठी प्रसिद्ध अभयारण्य आहे. हे अभयारण्य पानझडी जंगलांनी अच्छा दिलेले आहे. येथे चित्ते मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात.

14. मानस अभयारण्य :

हे असाम मधील गुवाहाटी पासून 175 किलोमीटरवर उत्तरेस भूतांनच्या सीमेवर आहे. याचे क्षेत्रफळ 2840 चौरस किलोमीटर असून एक सुंदर अभयारण्य आहे. येथील भौगोलिक परिस्थिती वन्य प्राणी व पक्षांसाठी अनुकूल आहे. येथे हत्ती, गेंडे, सोनेरी माकड, हरीण व अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.





Comment and share...

Post a Comment

7 Comments