Subscribe Us

header ads

Necessity for Biodiversity Conservation: जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज

 जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज  

Necessity for Biodiversity Conservation 



भारतातील विविध जैविक घटकांचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे . 

शासनाच्या पातळीवर त्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत . पर्यावरणतज्ञ ,वन्यजीवप्रेमी, खाजगी संस्था यांच्या माध्यमातून सुद्धा याबाबतीत प्रत्यक्ष कार्य केले जात आहे.

 वन्यजीव व वनस्पतींच्या संवर्धनाबाबत काम करण्यासाठी भारत सरकारने पर्यावरण मंत्रालयाची स्थापना केली. इ. सन 1988 पासून नवीन जंगल धोरण तयार करण्यात आले.

 2 एप्रिल 1992 पासून प्राणी ,पशुपक्षी यांच्या व्यापारावर बंदी करण्यात आली .असून त्यांची आता निर्यात करता येणार नाही.

 आज जगाला संवाद व संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे वन्यजीव व प्रजातींचे संरक्षण होणार असून पुढील पाच फायदे होणार आहेत.

X X

1. निसर्गाचा समतोल राखणे 

Balance of Nature

जैव समतोल व संवर्धनामुळे निसर्गाचा समतोल राखला जातो. उदा. जर जंगलातील सर्व गवत खाणारे प्राणी मारून टाकले. तर वाघ ,सिंह, बिबटे याही सर्व प्राण्यांना त्यांचे भक्ष मिळणार नाही. आणि मग ते मानवी वस्तीवर व पाळीव प्राण्यावर हल्ला करतील व जनप्रक्षोभास बळी पडतील. अन्नसाखळीतील वरचे बलाढे वाघ-सिंह सारखे प्राणी जर कमी झाले. तर त्यांचे भक्ष गवत खाणाऱ्या प्राण्यांची संख्या प्रचंड वाढेल. त्यामुळे शेतीचेही खूप नुकसान होईल. निसर्गाचा समतोल ढासळेल जर हा समतोल राखला नाही. तर कातडी व विष यासाठी मारले जाणारे साप ,सापांचे भक्ष (अन्न) असा उंदरांचा सुळसुळाट वाढेल.

2. जनुक बँक 

Gene Bank

 नवीन संकरित जात तयार करण्यासाठी जंगली वनस्पती व प्राण्यांचे जनुक फार महत्त्वाचे आहे . रोगाला बळी न पडणाऱ्या अधिक उत्पन्न देणाऱ्या नवीन जातीसाठी जनुक संवर्धन काळाची गरज आहे .त्यासाठी त्यांची जपवणूक महत्त्वाची आहे. त्याकरिता जंगली वनस्पती व प्राण्यांचे संवर्धन गरजेचे मानले जाते.

3. आर्थिक मूल्य 

Economic Value

 वनस्पती या केवळ लाकूड देणारे वृक्ष नसून अन्न ,वस्त्र ,निवारा या बरोबर हवा ,पाणी व आरोग्य देणारी यंत्रे आहेत. तसेच वन्यजीव  ही देशाची संपत्ती असून त्यांच्यापासून मौल्यवान कातडी, फर (लोकर ), हाडे, दात ,कस्तुरी इत्यादी वस्तू मिळत असतात .तसेच वन्य प्राण्यांचे प्राणी संग्रहालय व सर्कस मधील महत्त्वही मोठे मानले जाते.

X X

4. शिक्षण 

Education

 विविध राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यास भेटी दिल्यावर आपणास निकोप पर्यावरणासंबंधी आपुलकी व प्रेम वाढते व त्यासंबंधी शिक्षण मिळते. त्यासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निसर्गाच्या सानिध्यात सहली आयोजित कराव्यात.

X X

5. मनोरंजन  

Recreation Value

जंगलामध्ये विहार करताना विविध आकर्षक वनस्पती ,पक्षी व वन्यप्राणी पाहून मन आल्हाददायक बनते. निसर्गाचे लोभस सौंदर्य पाहून मन भारावून जाते. मनाला आनंद मिळतो.  म्हणून मनोरंजनासाठी निसर्गात सहली आयोजित कराव्यात .अशाप्रकारे वन्यजीवांच्या संवर्धनातून फायदा होतो.







Comment and share

Post a Comment

2 Comments