जैविक विविधता संरक्षणाच्या पद्धती आणि उपाय
Methods and Remedies of Conservation of Biodiversity
1. जैविक विविधता संरक्षणाच्या पद्धती
Methods of Conservation of Biodiversity
जैवविविधतेच्या नाशामुळे भविष्यकाळात संपूर्ण मानवजातीसमोर अनेक संकटे निर्माण होणार आहेत .याची जाणीव झाल्यामुळे त्याचे संरक्षण करण्यासाठी जागतिक ,राष्ट्रीय व स्थानिक पातळीवर संरक्षण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. मूलस्थानी संरक्षण आणि परस्थानी संरक्षण असे दोन प्रकार आहेत.
1. मूलस्थानी संरक्षण
In-Situ Conservation
या पद्धतीत सजीव ज्या जंगलात किंवा ठिकाणी राहतात. त्यात अधिवासात त्याला वाढविले जाते . त्याला जपले जाते व त्याचे संरक्षण केले जाते. या पद्धतीत अनेक नैसर्गिक जंगलातून वनस्पतींना वाढू देण्यात येते व त्यांची नैसर्गिक परिस्थिती न बदलता त्यांचे संरक्षण केले जाते .
उदा. अरण्यात हिरडा, बेहडा अशा प्रकारचे वृक्ष वाढतात. त्यामुळे वाघ ,सिंह वगैरे ज्या जंगलातून राहतात त्या जंगलांची कटाई होत नाही.
उदा. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात" पाल" हरणाचे अभयारण्यात ज्या हरणांना लागणारी नैसर्गिक स्थिती वृक्ष, टेकड्या, झरे यांची निर्मिती केली जाते .तसेच माणसांची ये-जा बंद केली जाते.
आशियाई सिंहासाठी गुजरातमधील " गीर " अभयारण्य प्रसिद्ध आहे .तर गेंड्या साठी "काझीरंगा " चे अभयारण्य प्रसिद्ध आहे.
त्यांचे प्रजनन, त्यांची वाढ, जैविक घटक ,खाण्याच्या पद्धती यामध्ये कोणताच बदल केला जात नाही .त्यामुळे सारेच सुरक्षित राहतात.
2. परस्थानी संरक्षण
Ex-Situ Conservation
या पद्धतीत सजीवांना त्यांच्या मूळ अधीवसापासून दूर करून नव्याने निर्माण केलेल्या अधिवास क्षेत्रात सोडले जाते. त्यासाठी जैविक उद्याने ,वनस्पती उद्याने ,प्राणीसंग्रहालय ,हरणांच्या बागा, जीन बँका ,मत्स्यालय यांची उभारणी केली जाते .अशा परस्थाणी संरक्षण क्षेत्रात काही प्रयोगशाळा कार्यरत असून सजीवांवर निरनिराळे प्रयोग केले जातात व त्यांच्या प्रजाती संरक्षित ठेवल्या जातात.
X X
2. जैविक विविधता संरक्षणाच्या उपाय
Remedies of Conservation of Biodiversity
1. कायदे
Acts
भारतामध्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी विविध असे कायदे केलेले आहेत. त्यातील काही मोजकेच कायदे .
1. पर्यावरण संरक्षण कायदा 1986
हा कायदा पर्यावरणाच्या संरक्षणाच्या उपाययोजनाशी संबंधित आहे.
उदा. विशिष्ट भागात औद्योगिक आणि इतर प्रक्रियावर निर्बंध, धोकादायक पदार्थांचे उत्पादन ,वापर इत्यादीवर प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली व त्याची अंमलबजावणी शासन स्तरावर नियमित होत असते.
2. मासेमारी कायदा 1987
या कायद्याने मासेमारीसाठी स्फोटके किंवा विषारी पदार्थ वापरण्यास प्रतिबंध केला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीनेच मासेमारी हा व्यवसाय करावा. अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असेही कडक निर्बंध या कायद्यात केलेले आहेत.
X X
3. वन कायदा 1927
राखीव, संरक्षित आणी गाव वनांचे नियोजन आणि व्यवस्थापन इत्यादी विषयी माहिती या कायद्यात आहे.
4. वनसंवर्धन कायदा 1980
जंगला खेरीज इतर कारणांसाठी जंगल जमिनीचा वापर करण्यास प्रतिबंध करणे किंवा असा वापर नियमबद्ध करणे यासाठी या कायद्याचा वापर केला जातो.
5. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1991
प्राण्यांच्या शिकारीना प्रतिबंध करणे किंवा निर्बंध घलने तसेच काही विशिष्ट वनस्पतींचे संरक्षण करणे या संबंधी कायदे हे वन्यजीवांचा व्यापार त्यांच्या पासून बनवलेल्या वस्तू आणि विजयचिन्ह यांच्या विक्रीचे नियंत्रण करतात.
Comment and share..


5 Comments
खुप छान👏👍
ReplyDeleteNice
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteNice
ReplyDeleteV. Nice
ReplyDelete