Subscribe Us

header ads

Rigvedic Period : Social Life during Rigvedic Period ऋग्वेदकालीन सामाजिक जीवन

 ऋग्वेदकालीन सामाजिक जीवन 

Social Life during Rigvedic Period 


वैदिक कालखंड किंवा ऋग्वेद कालखंडातील सामाजिक जीवनाची रूपरेषा खालील गोष्टींच्या आधारे स्पष्ट सांगता येईल.

1. पितृसत्ताक कुटुंब पद्धती 

सामाजिक जीवनात कुटुंब हा घटक सर्वात महत्त्वाचा होता .पुरुष प्रधान कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबावर गृहपतीची अनियंत्रित सत्ता चाले. कुटुंब सांभाळणे ,शिस्त लावणे ,कुटुंबाची प्रतिष्ठा कायम ठेवणे ,लग्नकार्य करणे ,आर्थिक व्यवहार सांभाळणे, धार्मिक कृत्य करणे ही सर्व कामे कुटुंब प्रमुखास करावी लागत.

2. एकत्र कुटुंब पद्धती 

ऋग्वेदकालीन समाजजीवनाचा हा महत्त्वाचा पैलू होता. तीन -तीन पिढ्यांचे लोक एकत्र राहात एकत्र कुटुंबावर सर्वात वडील मुलाचा अधिकार चाले. कुटुंबाची जबाबदारी ती त्याची होती .अर्थार्जन, अतिथी सत्कार ,धर्मविधी ही ज्येष्ठ पुत्रावर जबाबदारी असे.

3. वर्ण व्यवस्था 

ऋग्वेद काळात जाती संस्थेचा उदय झाला नव्हता. वर्णव्यवस्था अस्तित्वात होती .प्रारंभी चातुर्वर्ण्य पद्धती नव्हती. पण लोक पुढे ऋग्वेद काळाच्या शेवटी चातुर्वर्ण्य पद्धती समाजात रूढ झाली .ही वर्णव्यवस्था गुणावर, कर्मावर व व्यवसायावर अवलंबून होती रोटी-बेटी व्यवहार होत असत पण जाती संस्थेचे स्वरूप आलेले नव्हते.

 ऋग्वेदातील दहाव्या मंडलात सांगितल्याप्रमाणे आदिमानवाच्या निरनिराळ्या भागापासून समाजात चार प्रमुख वर्ण निर्माण झाले. 

X X

समाजपुरुषाचे मुखमंडल म्हणजे ब्राह्मण ,बाहू म्हणजे क्षत्रिय, वैश्य म्हणजे मांड्या तर शूद्र हे समाजपुरुषाचे पाय आहेत.

1. ब्राह्मण -अध्ययन,अध्यापन, यज्ञकर्म ,संस्कार विधी करणे, दानधर्म, वैद्यकी.

2. क्षत्रिय - समाजाचे संरक्षण, राज्य करणे, यज्ञ करणे, शांतता प्रस्थापित करणे.

3. वैश्य-  शेती ,व्यापार ,सावकारी, धार्मिक कार्य करणे .हा वर्ग अर्थव्यवस्थेचा आधार होता.

4. शूद्र - समाजाची सेवा करणे ,कनिष्ठ दर्जाची व कष्टाची कामे करणे.

कालांतराने वर्णव्यवस्थेत कर्मठपणा आला. उच्चनीचतेची भावना रूढ झाली. आणि व्यवसायानुसार जाती निश्चित होऊ लागल्या. त्यातून जातिसंस्थेचा उगम झाला.

4. स्त्रियांचा दर्जा

 ऋग्वेद कालखंडात स्त्रियांना समाजातील दर्जा श्रेष्ठ होता .अपत्य संगोपन व गृहकृत्ये ही स्त्रियांची मुख्य कर्तव्य होती .

स्त्री म्हणजे घराचे सर्वस्व असे विश्वामित्र सांगतात. पती बरोबरच ती घराची स्वामिनी होती. 

ऋग्वेद काळातील काही सूक्ते स्त्रियांनी रचली आहेत. त्यांची नावे विश्वास ,घोषाल ,लोपामुद्रा, अपाला, इंद्रानी इत्यादी. ऋग्वेद काळात पडदा पद्धती नव्हती. सतीची चाल नव्हती. प्रेमविवाह होते .सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषाप्रमाणे वावरत होत्या. यावरून या कालखंडात स्त्रियांचा दर्जा श्रेष्ठ होता असे सांगता येईल.

5. अन्न 

दुधापासूनचे सर्व पदार्थ तसेच फळे व भाजीपाला यांचा अन्नात वापर केला जात असे. आर्य हे पशुपालक होते .

गाय ही पवित्र मानली जाई. 

ऋग्वेदात "यव" या धान्याचा उल्लेख आहे. "यव "हा शब्द" बार्ली" साठी वापरला असावा.

6. सोमरस 

यज्ञप्रसंगी सोमवल्लीचा रस काढून त्याचा पेय म्हणून ऋग्वेद कालीन लोक वापर करीत असत. ऋग्वेदात सोमरस आला देवासमान मानले आहे. सोमरस ही देवास दिली सर्वोत्कृष्ट आहुती  होय.

 सोम प्रसन्नता, सामर्थ्य व उत्साह प्रदान करून चित्तशुद्धी व बुद्धी शुद्धी करतो असा त्या काळी समज होता.

7. वेशभूषा 

आर्य सुती व लोकरी कपडे वापरत असत. स्त्री-पुरुष कमरेभोवती जे वस्त्र गुंडाळतात त्यास "निवी" म्हणत अंगात घातलेले "वासन" आणि डोक्यावरून परिधान केलेले "अधिवासन"  ही प्रमुख वस्त्र होती. वस्त्रे ही विविध रंगाची होती.  वस्त्र कापूस, लोकर व कातडीपासून बनवीत असत. याशिवाय अल्क , पेशस, द्रापी या वस्त्रांचा ही उल्लेख वैदिक वांङमयात आला आहे.

8. केशभूषा

 ऋग्वेदात केशकर्तनाचा उल्लेख आहे. पुरुष केसांचा चुडा डोक्यावर बांधीत तर स्त्रिया विविध प्रकारची केशभूषा करीत. 

स्त्रिया कित्येकदा आपल्या केसांचे चार कपद बांधीत ऋग्वेदात अशा "चातुष्कपरदा" युवतींचा उल्लेख आलेला आहे.

X X

9. संगीत 

ऋग्वेद काळात संगीताची प्रगती झाली होती असे ऋग्वेदा वरून दिसते. ऋग्वेदाची रचनाही छंदोबद्ध आहे .

बेबरच्या मते, " सप्तसूरांचा मूळ उगम हा भारतातच झाला असून तेथून ते इराणातून पाश्चिमात्यांच्या कानावर गेले असावेत."

 तंतुवाद्य, वायुवाद्य, आघा वाद्य असे वादयांचे तीन प्रकार होते. 

दुंदुभी , वेणू, वीणा, कर्करी ही प्रमुख वाद्य होती .या वाद्य प्रकारावरून आर्यांना संगीताची जाण ऋग्वेद काळापासूनच आहे असे म्हटले जाते. 

भारतीय संगीतशास्त्राचा उगम हा ऋग्वेद ,सामवेद या दोन ग्रंथातून आढळून येतो.

10. काव्यकला 

निसर्गाला देवता कल्पून त्या दैवतांची आराधना करण्यासाठी अप्रतिम अशी काव्यनिर्मिती ऋग्वेद काळात झाली होती.

 गृत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्रि, भारद्वाज ,वशिष्ठ , कण्व या ऋषीमुनींच्या काव्यातून प्रभावी असे काव्यसौंदर्य आढळते. या कवींच्या कित्येक पिढ्यात कवित्व दिसते .विविध देवदेवता विषयीची सुक्ते, काव्य सौंदर्याने पूर्णपणे नटलेली होती. ही सूक्ते वाचतांना एखाद्या आधुनिक भावकवींचे काव्य वाचत आहोत असे वाटत.

X X

11. वैद्यकशास्त्र 

ऋग्वेद काळात आर्यांनी वैद्यकशास्त्रात बरीच प्रगती केली होती. क्षयरोग, कावीळ व अतीमद्यपानामुळे होणाऱ्या रोगांचा उल्लेख ऋग्वेदात आहे .

रक्तस्त्राव न होऊ देता जखम शिवणे, लोखंडी पाय बसविणे ,असा उल्लेख अश्विन सुक्तात आहे. आंधळ्या दृष्टी देणे, भाजलेल्या बरे करणे, बुडालेल्यास वाचवणे, अशक्तला सशक्त करणे इत्यादी गोष्टी अश्विनी देव करीत असल्याचे उल्लेख आहेत.






Comment and share...

Post a Comment

5 Comments

  1. एकदम उत्कृष्ट आणि अभ्यास पूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद

    ReplyDelete