Buddhist Mahasabha / Council
बौद्ध महासभा /परिषदा
1. प्रथम बौद्ध महासभा /पहिली धर्म परिषद ( इ. स. पू. 487)
गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर सातव्या दिवशीच बौद्ध भिक्षू व भिक्षुणी साठी विनय अथवा वर्तणुकीचे नियम करणे आवश्यक होते. यास्तव बुद्धाची शिकवण, वक्तव्य व उपदेश यांचे एकत्रीकरण करून नियम निर्मितीसाठी प्रथम बौद्ध महासभा " महाकश्यप, आनंद, उपालि "नामक अनुयायांनी बोलावली.
सभेला फार मोठा शिष्यवृत्ती जमला होता जवळपास 500 भिक्षूंनी यात भाग घेतला म्हणून या परिषदेस " पंचशतीका" असे सुद्धा म्हणतात.
गौतमाच्या वचनांचे तीन भाग करण्यात आले. त्या "त्रीपिटके" म्हणतात.
या परिषदेत भिक्षूंनी मंगल गीते म्हटली. म्हणून या परिषदेला "संगिती "सुद्धा म्हणतात .
या परिषदेत एक महत्त्वाची गोष्ट घडली ती अशी की भगवान बुद्धाच्या पूर्वीचा एक सारथी " छन्न " याला त्याच्या गैरवर्तना मुळे शिक्षा देण्यात आली.
ही परिषद "राजगृह" येथे वैराभगिरीच्या उत्तरेला 'सप्तपर्णी ' गुहेमध्ये संपन्न झाली.त्यावेळी "शिशुनागवंशी मगध सम्राट अजातशत्रू" (इ. स.पूर्व 493 ते 462 ) यांनी या सभेसाठी मोठा मंडप तयार केला होता.
या महासभेत "सुत्तपिटक व विनयपिटक " या दोन धर्मग्रंथांची सुरुवात झाली.
X X
2. द्वितीय बौद्ध महासभा/ दुसरी धर्म परिषद (इ. स. पू. 387)
भगवान गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी म्हणजे इ. स. पू. 387 मध्ये ही परिषद "वैशाली" येथे भरली.
'राजा कालाशोक ' याने ही परिषद भरविण्यात पुढाकार घेतला होता. या परिषदेत 700 भिक्षूंनी सहभाग घेतला म्हणून या परिषदेत " सप्तशतीका " असे म्हणतात.
पहिल्या परिषदेत "विनयपिटक " या ग्रंथात बौद्ध भिक्षु साठी जे नियम तयार केले होते. ते अतिशय कडक वाटल्याने यज्जिदेशाच्या ( प्रांत ) भिक्षूंनी त्यास विरोध करण्यास प्रारंभ केला . हा विरोध नष्ट करणे . शमविणे यासाठी ही परिषद बोलावण्यात आली होती. ही परिषद आठ महिने चालली या परिषदेचे अध्यक्ष " महास्थवीर रेवत" हे होते.
या परिषदेत फूट पडून "स्थविर व महासांघिक " कसे गट पडले. कारण ज्या गोष्टी बुद्धाच्या शिकवणीतून आचरणात आणायच्या होत्या त्यावर कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये.
व्रजच्या भिक्षु ना वरिष्ठांनी दिलेला सल्ला मान्य झाला नाही. म्हणून सुमारे 1000 भिक्षु वैशालीहून कोसंबी येथे गेले व त्यांनी स्वतंत्र धर्म परिषद बोलावली.
त्यामुळे विनययात (गौतमाची शिकवण) कोणताही बदल मान्य नसलेले "स्थविरवादी " व परिवर्तन हवे असणारे "महासांघिक" म्हणून ओळखले जाऊ लागले.
3. तृतीय बौद्ध महासभा /तिसरी धर्म परिषद (इ. स. पू. 240)
बौद्धधर्म संघातील दुसऱ्या परिषदेतील मतभिन्नता दूर करण्यासाठी सम्राट अशोकाने पुढाकार घेतला व त्यावेळी " पाटलीपुत्र" येथे 'मोगलीपुत्त तिस्स' यांचे अध्यक्षतेखाली ही धर्म परिषद इ. स. पू. 240 या कालावधीत संपन्न झाली.
बौद्ध धर्म संघटनेतील शिथिलता दूर करणे, बौद्ध धर्मातील गट दूर करणे, बौद्ध धर्माची घडी व्यवस्थित बसविणे यासाठी धर्म परिषद बोलावली होती. ही परिषद नऊ महिने चालली. धार्मिक मतभेद मिटवून प्रमाणित बौद्ध धर्म ग्रंथांची रचना करणे हा या सभेचा उद्देश होता .
'मोगलीपुत्त तीस्स ' यांनी मिथ्यावादी 17 संप्रदायांचे खंडन करणारा "कथावस्तू" हा ग्रंथ लिहिला.
या परिषदेला 1000 भिक्षुक हजर होते. अशोकाच्या साम्राज्यातच नव्हे तर सीमेवरील प्रांतात देखील या धर्माचा प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात आले .भारता बाहेररील प्रदेशात कोण बुद्ध धर्मप्रचारक पाठवायची त्यांची नावे निश्चित करण्यात आली.
हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत बौद्ध धर्मातील तत्त्वांचा उद्घोष करणारे स्तंभलेख ,शिलालेख, ताम्रपट ठीक ठिकाणी लावण्याची योजना हाती घेण्यात आली.
या धर्म परिषदेचा मुख्य उद्देश तत्कालीन प्रचलित विविध संप्रदायांचे निराकरण करून स्थविरवादाचे प्रस्थापन करणे हा होता. तो काही अंशी का होईना सफल झाला.
X X
4. चतुर्थ बौद्ध महासभा /चौथी धर्म परिषद ( इ. स. प्रथम शतक)
चौथी धर्म परिषद कुशाणवंश सम्राट कनिष्काने ( इ. स.पूर्व 78 ते 101) यांच्या कारकिर्दीत कश्मीर मध्ये "कुंदनवन "येथे वसुमित्र व नागार्जुन यांनी बोलावली.
वसुमित्र हा परिषदेचे अध्यक्ष होता .तर अश्वघोष हा उपाध्यक्ष होता.
या धर्म परिषदेत भाग घेण्यासाठी देश-विदेशातून 500 पेक्षा जास्त भिकू आले होते. बौद्ध धर्माच्या विकासाच्या व भवितव्याच्या दृष्टीने ही धर्मसभा अतिशय महत्त्वाची ठरली. कारण या धर्मपरिषदेत बौद्ध तत्त्वांचे संकलन, परीक्षण व संपादन केले गेले व बौद्ध धर्मातील विविध मतांचा संयोग घडवून आणणे हा या परिषदेचा हेतू होता .
या सभेने बरेच मतभेद मिटवून त्रिपिटका वर "महाविभाषा " या नावाचा ग्रंथ तयार केला गेला. हा ग्रंथ संस्कृत भाषेत होता पण हा ग्रंथ उपलब्ध नाही.
शिवाय या परिषदेत "बुद्धचरित" या ग्रंथाची रचना करण्यात आली.
X X
एकंदरीत बौद्ध धर्माच्या इतिहासात वरील चार धर्म परिषद यांना महत्त्वाचे स्थान आहे .या धर्म परिषदांचे खालील प्रमाणे योगदान सांगता येईल.
1. बौद्ध धर्माच्या अनुयायांत निर्माण झालेली मतभिन्नता दूर केली.
2. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासंदर्भात परिषदात चर्चा होऊन निर्णय घेतले गेले.
3. बौद्ध धर्मास या सुसंघटित करण्याचे, बौद्ध धर्मासाठी प्रमाणभूत ग्रंथांची निर्मिती व त्यास मान्यता देण्याचे काम या धर्मपरिषदानी केले.
Comments and share....


6 Comments
Nice
ReplyDeletenice information
ReplyDeleteNice
ReplyDelete👍👍
ReplyDeleteअतिशय महत्त्वाची माहिती.
ReplyDeleteNice
ReplyDelete