Subscribe Us

header ads

Teachings of Buddhism बौद्ध धर्माची शिकवण

Teachings of Buddhism

बौद्ध धर्माची शिकवण 



चार आर्य सत्ये:-

1. दुःख: 

जीवन दुःखमय व शोकमय आहे. जन्म, व्याधी, वार्धक्य, मृत्यू ,विरह ,निराशा इत्यादी दुःखांनी जीवन भरलेले आहे. 

जीवनातील सुखे ही दुःखांनी व संकटांनी भरलेली आहेत. जिवनाचा शेवटही दुःखात (मृत्यू) होतो.

2. दुःखसमुदाय:

एका दुःखातून दुसरे दुःख निर्माण होते. या सर्व दुःखानाही कारण आहे .दुःखाचे मूळ इच्छा किंवा आसक्ती हे आहे. एका इच्छेतून दुसरी इच्छा उत्पन्न होते .

अविद्या (अज्ञान)- संस्कार -- नामरूप (शरीर ) -इंद्रिये -- वेदना - तृष्णा -आसक्ती -- जन्म -जरामृत्यूवियोग अशाप्रकारे एका इच्छे पासून दुसरी इच्छा निर्माण होऊन अशा बारा इच्छांची शृंखला सुरू असते व तिचा शेवट जरामृत्यूवियोग वगैरे दुःखात होतो . ह्या इच्छा शृंखलेला प्रतीत्यसमुत्पाद असेही म्हणतात.

X X

3. दुःखनिरोध:

दुःखनिरोध म्हणजे इच्छा नाश करणे शक्य आहे. दुःखाची मुळे (इच्छा) खणून काढली की ,दुःख नाहीसे होते. दुःख नाहीसे झाले म्हणजे जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्तता होते . निर्वाण प्राप्त होते. निर्वाण म्हणजे दुःख रहित चिरंतन शांतता मृत्यू पासून मुक्तता.


4. दुःखनाशार्थ अष्टांगिक मार्ग:

खालील प्रमाणे अष्टांगिक मार्गाचे पालन करून दुःख नाश करता येतो.

1. सम्यक दृष्टी ( Right Views )

असत्य कल्पना व व्यवहार दुःखाचे मूळ आहे .म्हणून असत्य  सोडून सत्याचा स्वीकार करावा.

2. सम्यक संकल्प ( Right Intention)

 सत्यदृष्टी नुसार जीवन सुधारण्याचा संकल्प करावा

3. सम्यक वाणी  ( Right Speech )

सत्य वदावे वाणीचा सदुपयोग करावा .निंदा शीवी, गप्पा वगैरे द्वारा वाणीचा दुरुपयोग करू नये.

4. सम्यक कर्म  ( Right Action )

सत्य कार्य करावे. सदाचाराने वागावे . हिंसा, चोरी , संचय, व्यभिचार करू नये.

5. सम्यक अर्जन 

( Right means of Livelihood )

योग्य मार्गानेच जीवन कंठावे . योग्य साधना द्वारा उदरनिर्वाह करावा.

6. सम्यक प्रयत्न  ( Right Efforts )

मन शुद्ध ठेवावे .सत्य प्रयत्ना मने रमवावे.

7. सम्यक स्मृती 

(Right Reminafulness )

कोणत्याही कारणाने आसक्ती अथवा इच्छा  निर्माण होणार नाही याची आठवण ठेवावी

8. सम्यक समाधी 

( Right Meditation )

मनाची एकाग्रता करुन निर्वाण प्राप्त करावे.

अशाप्रकारे अष्टांगिक मार्गाच्या अवलंबनाने दुःखाचा नाश होऊन जीवनाचे अंतिम ध्येय अर्थात निर्वाण प्राप्त होते.

X X

त्रिरत्ने :-

प्रज्ञा, शील व करुणा

प्रज्ञा शील व करुणा अष्टांगिक मार्गाचा गाभा आहे. म्हणून त्यांना बौद्ध धर्माची त्रिरत्ने म्हणतात .

प्रज्ञा म्हणजे लोककल्याणकारी विद्वत्ता.

 शील हे प्रज्ञेचे सौभाग्य होय कारण विद्वत्ता असून शुद्ध चारित्र्य (शील )नसेल तर ती विद्वत्ता भ्रष्ट समजल्या जाईल.

 प्रज्ञा व शील सुद्धा जोडीला दुःखिताबदल दया, कळवळा किंवा करूणा सुद्धा अत्यावश्यक आहे .

प्रज्ञा, शील व करुणा हे बौद्ध धर्माचे आधारस्तंभ आहेत.


कर्म व पुनर्जन्म पण आत्मा अमान्य:-

बुद्धांचा कर्म तत्वावर विश्वास होता. 

जन्म हा पूर्व कर्माचे फळ आहे. मनुष्य जन्माने ब्राह्मण किंवा शूद्र ठरत नसून कर्माने ठरतो. पापकर्म केले नाही तर मृत्यू नाही व मग पुनर्जन्महि नाही म्हणून पुण्यकर्म करण्यासाठी सदाचारी बना. अशा पद्धतीने बुद्धाचा कर्म व पुनर्जन्म सिद्धांत सांगण्यात येतो.

गौतम बुद्धाला आत्म्याचे अस्तित्व मान्य नाही किंवा बुद्धाने त्याबद्दल मौन पाळले .

बुद्धाला वेद व देव मान्य नव्हते. वेदांचे अध्ययन व देवांची उपासना केल्याने मोक्ष मिळतो ही हिंदू धर्मातील मते बुद्धाला मान्य नाहीत. बुद्धाला वेदांचे प्रामाण्य अमान्य आहे .तसेच ईश्वराचे अस्तित्व ही मान्य नाही .स्वर्ग -नर्क कल्पनेला ही त्याचा विरोध आहे.

बौद्ध धर्मात जातीभेदाला स्थान नसून समानतेला मान होता. वर्ण, वर्ग, जात, पंथ वगैरे भेदभाव न पाहता बुद्धाने आपल्या धर्माची द्वारे सर्वांना उघडी करून दिली . 

"जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले"  असे बुद्धाचे धोरण होते. 

बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणतो , 

" सर्व देशातील सर्व लोकांना सांगा की उच्च-नीच गरीब-श्रीमंत सर्व एकच आहेत .जशा सर्व नद्या समुद्रात एकरूप होऊन स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व विसरतात .तशाच सर्व जाती बौद्ध धर्मात एकरूप होतात."

बौद्ध धर्मातील संन्यस्त अनुयायांना भिक्खू व भिक्खूनीची लोकशाही धर्तीवर शिस्तबद्ध  उत्तम संघटना ( संघ ) उभारला. भिक्खूना संघाची शिस्त पाळावी लागे. ब्रह्मचर्य, सत्य, अहिंसा ,अस्तेय ,अपरिग्रह यांचे पालन करून, नाचगाणी, मद्यपान, वगैरे दुर्गुण यापासून अलिप्त असणे अत्यावश्यक होत.

 सौंदर्यप्रसाधनांचा मोह व द्रव्यलोभ टाळावा. सदाचारी वृत्तीने राहून  निर्वाण प्राप्त करावे .

अशा प्रकारची बुद्धाची शिकवण होती.

X X

माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या म्हणण्याप्रमाणे, 

"We are unworthy descendants of the Great Master . We have to make ourselves different from what we are. We should follow Lord Buddha's teachings in spirit, not only in latter."

Bertrand Russell म्हणाले की, 

" Of all the religions in the world I am attracted only towards Buddhism."







Comment and share..


Post a Comment

10 Comments