Buddhism: Gautama's Discovery and Realization of Truth
बौद्ध धर्म: गौतमाला सत्याचा शोध व बोध
गौतमाला सत्याचा शोध व बोध
तत्कालीन परंपरेप्रमाणे सत्य शोधार्थ गौतम गुरूचा शोध करू लागला. त्याने वैशाली च्या "आडारकालाम" यांचे शिष्यत्व पत्करून योगाभ्यास केला.
नंतर राजगृह येथे 'उदक' नामक योग्या जवळ राहून त्याने आत्मक्लेष व ध्यानयोग सुरू केले .पण आत्मशांती लाभली नाही.
नंतर तो गयेजवळ "उरुवेल "अरण्यात आला व त्या ठिकाणी आत्मक्लेश व शारीरिक कष्ट सहन करू लागला.
या सहा वर्षाच्या तपश्चर्येने गौतम अत्यंत कृश झाला. केवळ अस्थिपंजर बनला .तरीपण त्याला सत्याचा बोध झाला नाही. दिव्य ज्ञान मी मिळाले नाही .त्यानंतर हे त्याने बंद केले.
अन्नपाणी घेणे प्रारंभ करून इच्छा-आकांक्षा व भावना नष्ट करण्याचा नवा मार्ग स्वीकारला. त्यामुळे त्याचे पाच-सहाध्यायी मित्र त्याला सोडून गेले .
X X
त्याच दिवशी पुत्रप्राप्तीसाठी वटवृक्ष पूजेस येणारी "सुजाता" नावाची एका व्यापार्याची मुलगी गौतमाला भेटली .सुजाताने वटवृक्षाखाली वाहिलेले अन्न घेऊन गौतमाने आपला उपवास सोडला.
वटवृक्षाखाली ध्यानस्थ (समाधिस्त) बसला. चार सप्ताहाच्या समाधीनंतर सिद्धार्थाला सत्याचा साक्षात्कार झाला. निर्वाण प्राप्त झाले ,नवा मार्ग मिळाला, सत्याचा बोध झाला, गौतम बुद्ध झाला.
ज्या वृक्षाखाली सिद्धार्थाला सत्याचा बोध झाला. त्या वृक्षाला "बोधीवृक्ष" हे नाव पडले .अशा रितीने सहा वर्षाच्या तपानंतर वयाच्या 35 व्या वर्षी गौतमाला हे दिव्य ज्ञान प्राप्त झाले.
X X
धर्मचक्र प्रवर्तन व पदयात्रा
गौतम बुद्धाने आपले पहिले प्रवचन बनारस जवळ" सारनाथ "च्या मृगदाववनामध्ये आपल्या पाच पूर्व सहाध्यायी मित्रांना ऐकविले.
आपल्याला मिळालेल्या नव्या मार्गाचा उपदेश करून नवधर्मप्रचारकाचे चक्र सुरू केले. यालाच "धर्मचक्रप्रवर्तन" म्हणतात .
आनंद , अश्वजीत, सारीपुत्र ,मोदगल्यान विद्वान वैरागी गौतमाचे शिष्य झाले.
बौद्ध धर्मात जातिभेद नसल्यामुळे " उपाली" नामक नापितानेही बौद्ध धर्म स्वीकारला.
बुद्धाने आपल्या अनुयायांचा संघटित केलेला संघ साठ अनुयायांचा होता .
बुद्ध स्त्रियांना संघात प्रवेश देण्याच्या विरुद्ध होता. पण सावत्र आई महाप्रजापती व शिष्य आनंद यांच्या आग्रहामुळे बुद्धाने स्त्रियांना संघात प्रवेश देण्यास मान्यता दिली.
सन्यासी अनुयायांना " भिक्खू" व संसारी अनुयायांना "उपासक" असे म्हणत.
दुःख निवारणार्थ आपला नवधर्ममार्ग शिकविण्यासाठी बुद्धाने पदयात्रा प्रारंभ केली .
मगध पासून अवंती (माळवा) पर्यंत खूप फिरला . बनारस , राजगृह, वैशाली ,श्रावस्ती, कोषांबी, पाटलीपुत्र, कपिलवस्तू या नगराना भेटी दिल्या.
हजारो लोकांना आपल्या धर्माची दिक्षा दिली. बुद्धाने भेदभाव न पाहता आपल्या धर्माची दारे सर्वांना खुली केली. राव आणि रंक, ब्राह्मण आणि शूद्र ,सर्वांनीच बौद्ध धर्म स्वीकारला.
अनेक शाक्य राजे बौद्ध बनले .शेकडो कुटुंबांनी बौद्ध धर्म अवलंबिला.
X X
महापरिनिर्वाण ( इ. स.पूर्व 487)
हजारो लोकांना धर्म दीक्षा देत बुद्ध जागोजागी फिरू लागला. वयाच्या 35 व्या वर्षी निर्वाण प्राप्त झाल्यावर त्याने आपले उरलेले आयुष्य लोक सेवेला व बौद्ध धर्माच्या प्रचाराला वाहून दिले.
अशाप्रकारे 45 वर्षे सतत सेवा व प्रचारकार्य केल्यानंतर वयाच्या 80 व्या वर्षी इ. स. पूर्व 487 कुशीनगर येथे सिद्धार्थ गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण (मृत्यू ) झाले .
बुद्धाच्या मृतदेहाचे अवशेष त्यांच्या अनुयायांनी आठ राज्यात वाटून देऊन त्यावर स्तूप उभारले.
गौतम बुद्धाची योग्यता
प्रभावशाली व्यक्तिमत्त्व
गौतम क्षत्रिय कुलोत्पंन होता. गौरकाय सुडौल बांधा असलेला देखणा पुरुष होता .
त्याच्या तोंडावर तपश्चर्येचे तेज तळपत होते. त्यामुळे त्याची इतरांवर चांगली छाप पडत असेल.
विद्वान तत्त्वज्ञ
गौतम विद्वान तत्त्वज्ञ असून तो उत्तम वाद-विवाद पटू होता. प्रसंगावधानी उत्तम वक्ता होता.
वक्तृत्वाला कर्तुत्वाची जोड मिळाल्यामुळे त्याचे नेतृत्व अधिकच प्रभावी ठरले.
X X
दयाशील समतावादी
सिद्धार्थ समानतेचा समर्थक होता. मानवा बद्दल त्याला सहानुभूती वाटत होती.
राज वैभव सुखोगभोग सोडून तो बहुजन समाजाच्या सुख-दुःखात सहभागी झाला .
त्याने ब्राह्मण - शूद्र ,गरीब-श्रीमंत, स्वकीय - परकीय या सर्वांनाच समानतेने वागविले.
अहिंसावादी
बुद्ध अहिंसावादी होता.
अहिंसेने हिंसेला जिंकावे व अक्रोधाने क्रोधाला जिंकावे ,अशुभाचा शुभाने पराभव करावा .असे त्याचे मत होते.
विनयशील
बुद्धाच्या विनयाने त्याच्या विद्वत्तेला शोभा येत होती. तो कधी रागावत नसे.
वादविवादात शांतपणे उत्तर देत असे .तो अत्यंत प्रेमळ होता.
अनेक शिष्य राजे बुद्धाला वंदन करीत असताना सुद्धा बुद्ध भिक्षापात्र घेऊन दारोदारी ,गल्लोगल्ली फिरत असे व भिक्षा मिळेपर्यंत दारात उभा राहत असे. केवढी ही नम्रता!
Comment and share..

9 Comments
Nice
ReplyDeleteUseful Information
ReplyDeleteNice information
ReplyDeleteGood
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteज्ञानवर्धक जानकारी दी गई है।
ReplyDeleteNice
ReplyDelete