Buddhism - Siddhartha Gautama Buddha
बौद्ध धर्म - सिद्धार्थ गौतम बुद्ध
(इ. स. पूर्व 567 ते 487 एकूण 80 वर्षे)
सिद्धार्थचे बालपण
कपिलवस्तु ही नगरी कोशल राजाच्या वर्चस्वाखाली शाक्य प्रदेशाची राजधानी होती.
येथील शुद्धोधन राजाची राणी महामाया हि कपिलवस्तु वरून माहेरी जात असताना मार्गामध्ये लुंबिनीप्राम नावाच्या सुंदर, सुगंधी पुष्पयुक्त अशा राईमध्ये (बागेत) सिद्धार्थ यांचा जन्म झाला.
( वैशाखी पौर्णिमा इ. स. पूर्व 567.)
X X
सिद्धार्थ यांचा पिता शुद्धोधन हा क्षत्रिय असून शाक्य प्रदेशाचा राजा होता. सिद्धार्थाची माता मायादेवी (महामाया) जन्मानंतर सातव्या दिवशी मृत्यू पावली.
त्यामुळे माया देवीची बहिण म्हणजे सिद्धार्थाची मावशी प्रजापती गौतमी सिद्धार्थाची सावत्र आई बनली. सिद्धार्थाचे गौतमाने स्वतःच्या मुलासारखे संगोपन केले .
बालकाप्रमाणे खेळण्यात ,खाण्यात व खोडकर पणात गौतम रंगत नसून तो एकांतात अधिक रमत असे. त्यामुळे सिद्धार्थ राजा बनण्यापेक्षा तत्कालीन वैराग्य वृत्ती कडेच आकर्षिला जाईल की काय याची माता-पित्यांना चिंता वाटत होती. म्हणून त्यांनी लहानपणापासूनच सिद्धार्थाचे लालन-पालन लाडात, सुखात व विलासात केले .
त्याच्यासाठी पावसाळा ,हिवाळा ,उन्हाळा या तीनही ऋतू अल्हाददायक होतील असे तीन शृंगारीक महाल बांधले योग्य शिक्षकांची नियुक्ती केली.
अशाप्रकारे जीवनात सिद्धार्थाच्या मनोरंजनासाठी समवयस्क सुंदर तरुणींचा तांडा त्याच्या सभोवती ठेवला .
अशाप्रकारे जीवनात सर्व सुखे व विलास उपलब्ध करून देऊन चिंता व दुःख काय आहे याची कल्पना सिद्धार्थाला येऊ नये असा पित्याने प्रयत्न केला. सिद्धार्थाला संतवृत्ती पासून संसारीवृत्तीकडे वळवण्यासाठी हा प्रयत्न होत.
X X
सिद्धार्थचे वैवाहिक जीवन
वयाच्या सोळाव्या वर्षी सिद्धार्थाचा विवाह दंडपाणी यांची सौंदर्यवती कन्या यशोधरा हिच्याशी लावण्यात आला. त्यामुळे गौतमाच्या गळ्यात संसारी पाश पडला. यशोधरेला राहुल नावाचा मुलगा झाला. संसारी पाश पक्का झाला.
अशा प्रकारे सर्वस्व परिपूर्ण शृंगारिक महान ,विशाल राजवैभव, सुंदर व प्रेमळ पत्नी आणि कोमल बालक हे सर्व मायावी पाश तोडून गौतम गृहत्याग करील असे कोणाला वाटेल ?
पण सिद्धार्थ या सुखसोयीत स्वस्थ नव्हता. ह्या सर्वांचा त्याच्या मनावर उलट परिणाम झाला. या मायावी शृंगारिक वातावरणाच्या पलीकडेचे विश्व पाहण्याची त्याला इच्छा झाली.
गौतमाने पाहिलेली रस्त्यावरील चार दृश्ये
गौतम आपल्या छन्न नावाच्या सारथ्या बरोबर रथात बसून महालाबाहेर पडल्यावर नगरात फिरताना त्याने रस्त्यामध्ये चार दृश्य पाहिली त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला.
1. वृद्ध :
एक वार्धक्याने एक वार्धक्याने वाकलेल्या वृद्ध काठी टेकीत मोठ्या कष्टाने चालला होता. त्यास बघताच वृद्घवस्थेचे दुःख प्रत्येकाला भोगावे लागते याची तीव्र जाणीव गौतमाला झाली.
2. रोगी :
रोगाने पीडित वेदनेने विव्हळनारा व आप्तांनी परित्यक्त रोगी मार्गावर पडलेला आढळला. प्रत्येकाला या अवस्थेतून जावे लागते. याची जाणीव होताच गौतम अधिकच चिंतातुर झाला.
3. प्रेत :
प्रेत पाहिल्यावर प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. याची कल्पना आली. गौतम अगदी अस्वस्थ झाला.
4. संन्याशी :
मार्गात एका विरक्त संन्याशाला पाहिल्यावर सिद्धार्थाला संसारातील दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मिळाल्याचे समाधान झाले .गौतमाची वैराग्य वृत्ती अधिकच प्रगत झाली प्रखर झाली.
X X
वृद्ध ,रोगी, प्रेत ,संन्याशी यांची कल्पना यापूर्वी वयाच्या 28व्या वर्षापर्यंत गौतमाला मुळीच नव्हती असे समजणे बुद्धीला पटण्यासारखे नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असेच मत आहे. त्यांच्या मते शेजारच्या कुलिया राजाशी रोहिणी नदीच्या पाण्यावरून उपस्थित झालेले युद्ध गौतमाला नको असल्यामुळे सेनापती व दरबारी व्यक्तींशी गौतमाचे मतभेद झाले . त्यामुळे त्याने गृहत्याग करून हद्दपारी स्वीकारली व प्रवज्जा ( वैराग्य ) घेतली.
महाभीनिष्क्रमण (गृहत्याग ) व परिव्राजक ( वैरागी )
महालाबाहेर बघितलेल्या दृश्यामुळे जीवन दुःखमय आहे. याची तीव्र जाणीव गौतमला झाली आणि तो अस्वस्थ झाला.
त्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्गाबद्दल तो विचार करू लागला.
जगातील दुःख व चिंता दूर करण्याचा मार्ग शोधून काढण्याचा त्याने निश्चय केला. इच्छाशक्तीमुळे त्याने सर्वस्वाचा त्याग करण्याचे ठरविले . गौतमाच्या जीवनात क्रांतीचे नवे युग सुरू झाले.
वयाच्या 29व्या वर्षी एका मध्यरात्री राजवैभव ,श्रंगार संपन्न महाल, सौंदर्यवती पत्नी व मोहक बालक या सर्वांचा त्याग करून गौतम राजवाड्याबाहेर पडला .
महाभीनिष्क्रमण मुंडन केले आणि पितवस्त्रे परिधान करून तो परिव्राजक ( वैरागी ) बनला.
क्रमश....
XX
https://www.insearchofknowledge.org/2021/10/blog-post_11.html
👆
Buddhism: Gautama's Discovery and Realization of Truth
बौद्ध धर्म: गौतमाला सत्याचा शोध व बोध
XX
https://www.insearchofknowledge.org/2021/10/blog-post_12.html
👆
Teachings of Buddhism
बौद्ध धर्माची शिकवण
XX
https://www.insearchofknowledge.org/2021/10/blog-post_13.html
👆
Buddhist Mahasabha / Council
बौद्ध महासभा /परिषदा
XX
https://www.insearchofknowledge.org/2021/10/blog-post_14.html
👆
Buddhism: Sect ( Panth) and Literature in
बौद्ध धर्मातील पंथ आणि वाङमय
XX
XX
Comment and share..

10 Comments
Nice
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteखूपच मार्गदर्शक माहिती🙏
ReplyDeleteदुखमुक्तीचा मार्ग
ReplyDeleteछान
Nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteबहुत ही बढ़िया प्रस्तुति और जानकारी दी है।
ReplyDelete