Scope of Public Administration - 1
लोकप्रशासनशास्त्राची व्याप्ती - भाग 1
Scope of Public Administration
लोकप्रशासनाच्या व्याप्तीविषयीसुद्धा शास्त्रज्ञांमध्ये दुमत आहे. एक विचारप्रवाहप्रमाणे लोकप्रशासनाची व्याप्ती अत्यंत व्यापक असते . तर दुसर्या विचार प्रवाहाने लोकप्रशासनाचे व्याप्तीला मर्यादा घालून संकुचित केले आहे.
व्यापक दृष्टिकोनातून लोकप्रशासनशास्त्राचा अभ्यास करावयाचा म्हटले तर शासन संस्थेच्या तीन शाखांचा म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ या शाखांचा व त्यांच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनाच्या अभ्यासात करावा लागेल. तसेच शासनाच्या दोन किंवा तीन पातळ्या असतात .
केंद्रीय सरकार ,प्रादेशिक सरकार व स्थानिक सरकार यांचाही समावेश करावा लागेल. म्हणजे व्यापक दृष्टिकोनानुसार लोकप्रशासनाच्या अभ्यासक्रमात आपल्याला सरकारच्या तिन्ही शाखा व तीन पातळ्या यांच्या विविध संघटना, सरकारी धोरणांची पूर्तता करण्यासाठी करण्यात आलेली नानाविध स्वरूपाची कार्य यांचा संपूर्ण व पद्धतशीर विचार करावा लागेल.
लोकप्रशासनाच्या व्याप्तीविषयीच्या संकुचित दृष्टिकोनाप्रमाणे लोकप्रशासनाच्या अभ्यासात सरकारच्या फक्त कार्यकारी शाखेचाच समावेश करण्यात येतो.
कायदे मंडळ व न्यायमंडळ या दोन शाखांना वगळण्यात येते. म्हणजे या दृष्टिकोनाप्रमाणे सरकार जेव्हा कायद्याची अंमलबजावणी करण्याचे कार्य करते तेव्हाच फक्त प्रशासन करते. कार्यशील शासन संस्था म्हणजेच लोकप्रशासन असे मानणारे यांच्या मते लोकप्रशासनात प्रशासकीय कर्मचारी वर्ग व त्यांची कार्य व कार्यपद्धती यांचा अंतर्भाव असावा.
या संकुचित दृष्टिकोनातून बघितल्यास कायदेमंडळ, न्यायमंडळ राजकीय कार्यप्रमुख ,लष्करी संघटना यांचा समावेश लोकप्रशासनाच्या अभ्यासात करता येत नाही.
आधुनिक काळात मात्र लोकप्रशासनाच्या अभ्यासकांनी लोक प्रशासनाची व्याप्ती तीन भिन्न दृष्टिकोन स्पष्ट केल्याचे दिसते.
X X
1. व्यवस्थापकीय दृष्टिकोन किंवा " POSDCORB" दृष्टिकोन
( Managerial View)
व्यवस्थापकीय दृष्टिकोण हा लोकप्रशासनाची औपचारिकता औपचारिक बाजू स्पष्ट करतो. तसेच हा दृष्टीकोन लोकप्रशासनाच्या कार्य प्रणालीवर ही प्रकाश टाकतो.
हेन्री फेयोल, विलोबी, पर्सी मौकविन , ल्युथर गुलिक इत्यादी विचारवंतांनी या दृष्टिकोनाचे समर्थन केले आहे.
X X
हेन्री फेयोल:
यांनी आपल्या "General and Industrial Management administration."( 1916) या पुस्तकातून POCCC हा सिद्धांत मांडला.
POCCC
P- Planning- नियोजन
O- Organization- संगठन
C- Command- आज्ञा
C- Coordination - समन्वय
C- Control - नियंत्रण
पर्सी मौकविन:
यांनी M-3 हा सिद्धांत मांडला आहे.
M-3= M x M x M
M- Men -मानव
M- Material - सामग्री
M- Method - पद्धती
X X
प्रो. वीलोबी:
प्रो. विलोबि यांनी आपल्या "Principles of Public Administration" ( 1927 ) या ग्रंथातून लोक प्रशासनाच्या व्याप्ती च पाच घटक सांगितले आहेत.
1. सामान्य प्रशासन ( General Administration) यात कार्य विभाजन मार्गदर्शन पर्यवेक्षण व नियंत्रण यांचा समावेश होतो.
2. संघटना ( Organization ) प्रशासकीय यंत्रणेची रचना व स्वरूप.
3. कर्मचारी वर्ग ( Personnal )यात भरती नियुक्ती प्रशिक्षण बढती व निवृत्ती इत्यादींचा समावेश होतो.
4. साधन सामग्री ( Material )प्रशासन कार्य करताना लागणारी सामग्री.
5. वित्त ( Finance ) पैशाचे आहे व वे यांचे व्यवस्थापन.
क्रमश....

.jpg)
4 Comments
Very nice
ReplyDeleteUseful blog👌
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery good information
ReplyDelete