Nature of Public Administration
लोकप्रशासनाच्या अर्थाविषयी विचार करताना प्रामुख्याने व्यापक व संकुचित असे दोन विचार प्रवाह असल्याचे दिसून येते .त्यावरून लोकप्रशासनाच्या अर्थाविषयी व व्यप्तीविषयी शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत.
प्रशासनाची प्रक्रिया सर्व प्रकारच्या समूहामध्ये आढळून येते. सरकारी संघटनेतील प्रशासन प्रक्रियांना सामान्यतः लोकप्रशासन असे म्हटले जाते.
लोकप्रशासनातील तीन भिन्न दृष्टिकोन
लोकप्रशासन: अभ्यास विषय
Public Administration :as a Discipline
लोकप्रशासन हा एक अभ्यास विषय आहे .या ज्ञान शाखेचे अभ्यासात साधारणतः सरकारी धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या संघटना त्यातील अधिकारी व कर्मचारी यांची कार्य व कार्य प्रक्रिया यांचा समावेश असतो.
X
X
लोकप्रशासन: प्रक्रिया
Public Administration :as a process
लोकप्रशासन ही एक प्रक्रिया आहे. सरकारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व प्रक्रियांना लोकप्रशासन म्हणतात .सामाजिक व आर्थिक ध्येय साकार करण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे लोकप्रशासन.
लोकप्रशासन : व्यवसाय
Public Administration: as a profession
लोकप्रशासन हा एक व्यवसाय आहे .सरकारी संघटनेत कार्य करणाऱ्या पूर्ण वेळ पगारी व्यवसायिक कर्मचाऱ्यांसाठी लोकप्रशासन करणे हा एक पेशा व व्यवसाय आहे .शासकीय संघटनेतील कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थितपणे काम करून घेणे, त्यांच्यावर देखरेख करणे व त्यांना मार्गदर्शन करणे हा प्रशासकाचा व्यवसाय असतो.
X
X
लोकप्रशासन: तत्त्वज्ञानाच्या रूपात
Public Administration : as a philosophy
तत्वज्ञान हे व्यक्ती जीवनाला मार्गदर्शक असते तत्त्वज्ञानाशी वाय मानवाची वास्तव प्रतिमा स्पष्ट होऊ शकत नाही तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून विचारांची सैद्धांतिक अंमलबजावणी होत असते. लोक प्रशासन ही अशी प्रणाली आहे की ज्या माध्यमातून व्यक्ती जीवनाला मार्गदर्शन होत असते म्हणून लोक प्रशासनाला तज्ञानाच्या रूपात पाहिले जाते.
डिमॉक म्हणतो "आता प्रशासनाचे क्षेत्र इतके व्यापक झाले आहे की प्रशासनात प्रशासनाचे तत्त्वज्ञान हेच जीवनाचे तत्त्वज्ञान बनू पाहत आहे."
"Administration is now so vast an area that a philosophy of Administration comes close to being a philosophy of life."
लोकप्रशासन शास्त्रशुद्ध कला आणि व्यवहार्य शास्त्र
पूर्वी लोकप्रशासन ही एक कला आहे .असे मानले जात असे .आज सुद्धा लोकप्रशासन एक कला की शास्त्र याबद्दल विचारवंतात मतभिन्नता आहे.
प्राचीन व मध्ययुगीन काळाच्या शेवटपर्यंत प्रशासन करणे ही एक कला मानली जात होती. प्राचीन काळी भारत,चीन, मिश्र रोम, ग्रीस या देशात प्रशासनाच्या या प्रक्रियेला एक महत्त्वाची कला मानण्यात येई.
राज्यकर्त्यांच्या व प्रशासकांच्या कार्यकुशलतेवर व योग्यतेवर प्रशासनाचे यशापयश अवलंबून असायचे प्रत्येक राज्यकर्त्याला प्रशासनाची ही कला अवगत असावी असे प्रतिपादन करण्यात येई. प्रशासन ही एक कला आहे ,या दृष्टिकोनातून तुरळक लिखाणही झालेले आहे.
X
X
उदा.
भारतातील "कौटिल्याचे अर्थशास्त्र ",
अबुल फजल ने लिहिलेले "ऐन- ए- अकबरी" ,
चीनमधील कन्फ्युसीयशचे विचार व मीसीमोने केलेले लिखाण ,
रोममधील सिसीरोन व
जर्मनीतील मॅकीव्हेली ने केलेले लिखाण.
या सर्व लिखाणातून लोकप्रशासन ही एक कला आहे व राज्यकर्त्याला कला आत्मसात केल्याशिवाय व्यवस्थित राज्यकारभार चालविणे कठीण होते. अशा संदर्भातच लोकप्रशासनाविषयी विचार मांडण्यात आले आहेत.
आर्डवे टीड व लिंडल उर्विक, यांनी "अन्य कलेप्रमाणे लोकप्रशासन ही एक कला असल्याचे म्हटले आहे."
Comment and share..


6 Comments
Very nice
ReplyDeleteVery informative
ReplyDelete- Gaurav
https://youtu.be/qA-oyN8opCU
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice information
ReplyDelete