परिसंस्था: स्वरूप आणि व्याप्ती
Nature and Scope of Ecosystem
पर्यावरणातील सजीव व त्यांच्या सानिध्यातील अजैविक पर्यावरण एकमेकांशी निगडीत असून त्यांच्या परस्पर संबंधास परिसंस्था म्हणतात.
प्रसिद्ध विचारवंत ट्रान्सले यांनी 1935 साली सर्वात प्रथम परिसंस्था ही संकल्पना रुढ केली.
त्यांच्यामते पर्यावरणातील सजीव व अजैविक या दोघाच्या समाकलनामुळे ( Integration ) परिसंस्था अस्तित्वात येते.
X X
परिसंस्थेची व्याख्या
Definition of Ecosystem
ए. जी . ट्रान्सले यांच्या मते,
परिसंस्थेचे व्याख्या करण्याचा पहिला बहुमान 1935 मध्ये यांनी पटकावला.
"सजीव व त्यांचे वसतिस्थान ही एकत्रित संरचना म्हणजे परिसंस्था होय."
एफ आर फोसबर्ग यांच्या मते,
"A functioning interacting system composed of one or more living organisms and their effective environment, both physical and biological."
"एक किंवा एकापेक्षा अधिक जीव आणि त्यांचे परिणामक्षम प्राकृतिक तसेच जैविक पर्यावरण यांच्यातील आंतरक्रिया व कार्ययंत्रणा म्हणजे परिसंस्था होय."
नेबल यांच्या मते,
"पृथ्वीवरील विविध वर्गीय जीवांच्या परस्पर आंतरक्रिया व त्यांचे पर्यावरण होय."
X X
परिसंस्थेचे स्वरूप आणि व्याप्ती
Nature and Scope of Ecosystem
पर्यावरणातील अजैविक पदार्थ जैविकाकडे ,जैविका कडून विघटकाकडे व परत पर्यावरणाकडे सजीवांमार्फत मार्गक्रमण करतात . या चक्राकार प्रणालीस परिसंस्था असे म्हणतात.
विशिष्ट अधिवासात पर्यावरणातील अजैविक व जैविक घटकांतील आंतरक्रिया उर्जेचा सतत वापर करून कार्यरत होतात यास परिसंस्था असे म्हणतात.
पृथ्वीवर सजीव निर्माण झाल्यापासून सजीवांचा जैविक व अजैविक घटकांशी क्षेत्रीय अंतरसंबंध दिसून येतो .
या क्षेत्रीय अंतरसंबंधात स्थान ,भूरचना ,जलप्रणाली, हवामान ,वनस्पती व खनिजे यासारख्या भौगोलिक घटकांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो.
सजीवांचे पृथ्वीवरील अस्तित्व व आकृतिबंध यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन परिसंस्थेच्या रूपात आढळून येते .
परिसंस्थेत जीव अथवा जीवसमूह आपापसात व पर्यावरणातील काही घटकांशी अंतरक्रियेमुळे रचनाबद्ध होतात.
अशा प्रकारे जैविक व अजैविक घटकांतील आंतरक्रिया यांचे ऊर्जा वापर करून झालेले क्रमबद्ध संघटन व संयोजन यामुळे परिसंस्था साकार होतात.
परिस्थितीकीशास्त्रात परिसंस्था हे अभ्यासाचे एकक (Unit) मानले जाते.
पृथ्वीवर सौरऊर्जा ,भौतिक घटक, रासायनिक द्रव्य यांचे वितरण सर्वत्र सारखे नाही .
परिसंस्थेला आवश्यक घटकांचे क्षेत्रीय वितरण वैविध्यपूर्ण असल्याने जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात परीसंस्थाची वैशिष्टे बदलतात.
उदा. अंटार्टिका खंडावरील परिसंस्था आदर्श वा परिपूर्ण नाही .या ध्रुवीय अधिवासात प्रतिकूल पर्यावरणामुळे प्रबल समायोजन गुणधर्म असलेले पेंग्विन, सील, लीचेन यासारखे तुरळक सजीवच स्वतःचे अस्तित्व टिकूवू शकतात. म्हणून येथील ध्रुवीय परिसंस्था पृथ्वीवरील व इतर परिसंस्थेचे पेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आढळतात.
X X
याउलट विषुववृत्तीय अधिवास क्षेत्रात अनुकूल परिस्थितीमुळे वैविध्यपूर्ण परिसंस्थेची रेलचेल आढळते.
अशा प्रकारे परिसंस्थेत सजीव ,निर्जीव घटकांचे विशिष्ट परिस्थितीत क्रमबद्ध व्यवस्थापन निर्माण होते .
या व्यवस्थेत सौर ऊर्जा अजैविक (भौतिक आणि रासायनिक) मूलद्रव्ये व जैविक घटक कार्यान्वित होतात .यालाच कार्यान्वित परिसंस्था (Functional Ecosystem ) असे म्हणतात.
या परिसंस्थेत प्रत्येक घटकांचे स्थान व कार्य ठरलेले असते. हे स्थान व कार्य बऱ्याच वेळा इतर घटकांना प्रेरक व पूरक स्वरूपाचे असल्यामुळे परिसंस्था कार्यान्वित होतात.
सौर ऊर्जेच्या सतत स्त्रोतामुळे परिसंस्थेचे अस्तित्व अबाधित आहे.
परिसंस्था जिवंत व चिरस्थायी स्वरूपाच्या आहेत. कारण परिसंस्था मधील सजीव व त्यांचे अस्तित्व नवनवीन पिढ्यच्या रूपात अबाधित ठेवतात.
काळाच्या ओघात पर्यावरणातील घटकांचे गुणधर्म व वर्तन बदलते. त्यामुळे काळाला देखील महत्त्व आहे.
डार्विनच्या तत्त्वाप्रमाणे हे बदल संघर्ष, स्पर्धा ,समायोजन व अस्तित्व या घटकांमुळे परिसंस्थेत समाविष्ट होतात. या सर्वांचा अभ्यास परिसंस्थेच्या व्याप्तीमध्ये विशेष करून केला जातो.
Comments and share...

.webp)
10 Comments
Very good
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNife
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteUseful information sir
ReplyDeleteVery usefull
ReplyDeleteVery very nice
ReplyDelete