Attitudes towards governance
प्रशासनाविषयीचे दृष्टीकोन
प्रशासनाच्या अध्ययनाचे सर्वव्यापी व व्यवस्थापकीय असे दोन दृष्टीकोन आहेत. प्रशासन ही एक सांघिक स्वरूपाची प्रक्रिया असते.
फक्त व्यवस्थापक व अधिकारी व त्यांचे कार्य हेच महत्त्वाचे आणि एखाद्या कारकुनाचे किंवा शिपायाचे कार्य कमी महत्त्वाचे असे म्हणणे योग्य वाटणार नाही.
सर्व व्यक्ती मिळून संघटना चालवतात म्हणून सर्वांना योग्य ते महत्त्व मिळालेच पाहिजे; म्हणून सर्वांना प्रशासक म्हणणे सुद्धा योग्य वाटणार नाही.
कारण संघटनेतील कार्य करणाऱ्या सर्वांचे कार्य प्रशासकीय स्वरूपाचे नसते.
X X
1. व्यवस्थापकीय दृष्टिकोन
Managerial view
व्यवस्थापकीय दृष्टिकोनानुसार प्रशासनात नियंत्रण, समन्वय, मार्गदर्शन, आदेश व निर्देशन करण्याचे कार्य प्रशासनातील उच्च अधिकारी किंवा व्यवस्थापक वर्ग करतात .म्हणून प्रशासन ही व्यवस्था करणे ,देखरेख ,मार्गदर्शन करणे व इतरांकडून कार्य करून घेणे एवढ्या पर्यंतच मर्यादित अशा प्रकारची प्रक्रिया आहे.
कार्य करणे व कार्य करून घेणे यापैकी कार्य करून घेणे हाच व्यवस्थापकीय दृष्टिकोनाचा पैलू आहे.
2. सर्वव्यापी दृष्टिकोन
Overaul View
प्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोन एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन समजला जातो .
यालाच एकीकृत किंवा समन्वित दृष्टिकोण सुद्धा म्हणतात. या सर्वव्यापी दृष्टिकोनानुसार एखाद्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी केलेल्या सर्व कार्याचा समावेश प्रशासनात केला जातो.
म्हणजेच प्रशासनाचा संबंध संघटनेच्या सर्व क्रियांची आहे .
थोडक्यात उच्च अधिकार यापासून ते कनिष्ठ, सहाय्यक ,लिपिक, सेवक वर्गापर्यंत प्रत्येक व्यक्ती हाप्रशासनाचा घटक आहे.
X X
लोकप्रशासन म्हणजे काय ?
What is Public Administration ?
प्रशासनाची प्रक्रिया सर्व प्रकारच्या संघटनात आढळून येत असते.
खाजगी आणि सरकारी दोन्ही प्रकारच्या संघटना मध्ये केल्या जाणाऱ्या प्रक्रिया मूलतः सारख्याच असल्या तरी खासगी संघटनांचे उद्दिष्ट वैयक्तिक हित असते. तर सरकारी संघटनांचे उद्दिष्ट सार्वजनिक स्वरूपाचे हित असत.
सरकारी संघटनांच्या प्रशासनात लोकप्रशासन म्हणतात तर खाजगी संघटनांच्या प्रशासनास खाजगी प्रशासन म्हणतात.
लोकप्रशासनाच्या काही व्याख्या,
वूड्रो विल्सन यांच्या मते,
"कायद्याची सविस्तर व पद्धतशीर अंमलबजावणी म्हणजे लोक प्रशासन होय."
"Public Administration is detailed and systematic application of law."
X X
सायमन ,स्मिथबर्ग व थामसन यांच्या मते,
"साधारणतः राष्ट्रीय सरकार घटक राज्य सरकार आणि स्थानिक सरकार याच्या कार्यकारी शाखेच्या कार यांनाच लोकप्रशासन असे म्हटले जाते."
"By public administration is meant, in common usage the activities of the executive branches of the National State and Local governments."
पर्सी मैक्वीन यांच्या मते,
"लोकप्रशासन म्हणजे असे प्रशासन की, ज्यांचा संबंध केंद्रीय अथवा स्थानिक प्रशासनाच्या क्रियांशी येतो."
"Public Administration is the administration related to the operation of the government weather local or Central."
ब्रिटिश ज्ञानकोश,
"शासन संस्थेद्वारा राज्यसंस्थेच्या धोरणांचे उपयोजन म्हणजे लोकप्रशासन होय."
"Public Administration is the application of a policy of a throught its Government."
Comments and share.....


4 Comments
Nice sir ji
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice information
ReplyDelete