Subscribe Us

header ads

Public Administration लोकप्रशासन : व्याख्या व स्वरूप

 लोकप्रशासन

Public Administration 


"Administration is now so vast an area that a philosophy of Administration comes to being a philosophy of life." Dimock

कोणत्याही देशातील समाजाची उन्नती ही त्या देशातील सार्वजनिक धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या लोक प्रशासनाच्या भूमिकेवर अवलंबून असते. म्हणूनच आधुनिक काळातील लोकप्रशासन व्यक्तींच्या सामाजिक जीवनाचा आत्मा ठरले आहे .

X X

प्रत्येक व्यक्ती एका अर्थाने आपल्या जीवनाची प्रशासनच असते.

विशिष्ट उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी केलेल्या योजनाबद्ध प्रयत्नातून जो अनुभव व्यक्तीला मिळत असतो तो प्रशासकीय स्वरूपाचा असतो एवढेच, अर्थात प्रशासनाची प्रक्रिया व्यक्तिगत प्रयत्नांची संबंधित नसून अशा सांघिक कार्याशी निगडित आहे ,की ज्यात अनेक व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नाने सुसंघटितरित्या विशिष्ट हेतू साधण्याचे प्रयत्न केले जातात.

एखाद्या मानवी समूहाने विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी केलेल्या विवेकपूर्ण सांघिक प्रक्रियेलाच प्रशासन म्हणता येते. अशा प्रकारची प्रक्रिया जेव्हा खाजगी स्वरूपाच्या संघटनातील कार्याशी संबंधित असते. तेव्हा ते खाजगी प्रशासन म्हणून ओळखले जाते.

 परंतु जेव्हा ही प्रक्रिया केंद्र, राज्य अथवा स्थानिक सरकारच्या संघटनांमधून घडून येत असते .तेव्हा त्याला लोकप्रशासन म्हटले जाते. 

सहाजिकच लोकप्रशासन हे देशाच्या सार्वजनिक धोरणांच्या अंमलबजावणीची आणि त्यांच्या असणाऱ्या यंत्रणेशी निगडित असते.

X X

अर्थ आणि व्याख्या

Meaning and Defination

प्रशासन या शब्दाचा उपयोग एखाद्या कार्याची व्यवस्था करणे किंवा प्रबंध करणे, या अर्थाने केला जातो. परंतु शास्त्रोक्त दृष्टीने विचार केल्यास एखाद्या विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी  हेतु प्राप्त करून घेण्यासाठी जाणीवपूर्वक योजना तयार करून उपलब्ध साधन सामग्री व मनुष्यबळ यांचे उचित संघटन करून योग्य मार्गदर्शनाखाली जे सुसंघटित व  व्यवस्थित कार्य केले जाते, त्या कार्य प्रक्रियेस प्रशासन असे म्हटले जाते.

प्रशासन हा इंग्रजी शब्द'Administer' चे मराठी भाषांतर आहे. 'Administer' या इंग्रजी शब्दांची रचना लॅटिन भाषेतील ' Ad' व 'Minister' या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून झाली आहे .याचा अर्थ 'सेवा करणे 'असा होतो. 

मराठी 'प्रशासन' हा शब्द 'प्र' आणि ' शास ' या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. याचा अर्थ अधिकार गाजवणे सत्ता गाजवणे ,असा होतो. अर्थात प्रकार्य करणारे सत्तास्थान म्हणजे प्रशासन व जनतेसाठी प्रकार्य करणारी व्यवस्था म्हणजे 'लोकप्रशासन' असा सामान्य अर्थ काढला जातो.

प्रशासन म्हणजे काय ?

What is Administration ?

प्रशासनाच्या काही महत्त्वाच्या खालील प्रमाणे विविध व्याख्या,

प्रा. एल. डी. व्हाईट यांच्या मते,              " कोणतेही उद्दिष्टे किंवा हेतू साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तींचे मार्गदर्शन, समन्वय व नियंत्रण करणे यासच प्रशासनाची कला म्हणतात."

सायमन, स्मिथबर्ग व थॉमसन यांच्यामते, " समान उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी मानवी समूहाद्वारे केल्या जाणाऱ्या क्रियेस  स्थूलमानाने प्रशासन  म्हणतात."

प्रा. एफ. निग्रो यांच्या मते, "  एखादा उद्देश साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तींचा आणि सामग्रीचा वापर करणारी संघटना म्हणजे प्रशासन होय."

वरील व्याख्या वरून असा निष्कर्ष निघतो की, प्रशासन अशी यंत्रणा आहे ज्याद्वारे निश्चित ध्येय प्राप्त करून घेतले जाते.

X X

 ज्यात, 

निश्चित उद्देश असणे .

मानवी समूह असणे.

 मानवी समूहाद्वारे केल्या जाणाऱ्या क्रिया.

 अनेक व्यक्ती व व्यक्तींचा वापर करणारी संघटना.

 मानवी व भौतिक साधनांचे संघटन व निर्देशन.

 संघटनेत कार्य करणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शन.

 संघटनेतील सर्व स्तरावर परस्पर समन्वय .

संघटनेतील व्यक्ती व इतर घटकांवर नियंत्रण.

 कार्य करणे व कार्य करून घेणे .

इत्यादी बाबींचा अंतर्भूत प्रशासनामध्ये समावेश होतो.



Comment and share......

Post a Comment

7 Comments