पर्यावरणशास्त्र परिचय
An introduction to Environmental Science
पर्यावरणशास्त्राला सध्याच्या काळात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. इसवी सन 1972 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या जागतिक परिषदेनंतर विकसनशील देशात पर्यावरणाच्या समस्या कडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली.
एखाद्या देशाचा आर्थिक विकास साधताना पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या विषयाचा अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने करणे काळाची गरज आहे.
पर्यावरणाचे संतुलन कसे साधता येईल याबाबत विचार होऊ लागल्याने विविध नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे यांच्यातून पर्यावरण शास्त्र या नवीन शास्त्राचा उगम झाला.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इसवी सन 1960 च्या सुमारास हा स्वतंत्र विषय उदयास आला. औद्योगिक क्रांतीनंतर नवीन नवीन शोध लागले .दुसऱ्या महायुद्धाचे गंभीर परिणाम लोकांना भोगावे लागले. त्यातून पर्यावरणशास्त्राकडे लोक आकर्षिले गेली.
x x
अलीकडच्या काळात वैद्यकीय शास्त्रात व अभियांत्रिकी शाखेत पर्यावरणीय आरोग्य ,अभियांत्रिकी म्हणून विशेष स्वतंत्र अभ्यास होत आहे.
औद्योगिक क्षेत्रात पर्यावरणाचे अध्ययन आणि संशोधन होत आहे. त्यासाठी पर्यावरण परिरक्षण म्हणून स्वतंत्र प्रशासकीय विभाग विविध देशांमध्ये सुरू झालेले आहेत.
त्यामुळे आर्थिक पर्यावरण ,सामाजिक पर्यावरण, जागतिक पर्यावरण नियोजन ही संकल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर दृढ होत आहे.
पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती असे असले तरी उत्पत्ती शास्त्राच्या दृष्टीने पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील विशिष्ट भागाशी निगडित असलेली सभोवतालची परिस्थिती होय. Environ म्हणजे to surround या मूळ फ्रेंच भाषेतील शब्दापासून Environment इंग्रजी शब्द प्रचलित झाला आहे.
पर्यावरण शास्त्र आणि भूगोल शास्त्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .
x x
पर्यावरणाच्या काही व्याख्या खालील प्रमाणे आहेत.
Definitions of Environmental Science
जॉन्सन टर्क ,"पर्यावरणशास्त्र म्हणजे पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवी जीवनाचा पर्यावरणावर होणारा प्रभाव यांचा अभ्यास होय.
"Environmental science provides an approach to understanding the environment of our planet all human life upon that environment .it is also a search for solution to the environmental problems that control us.
पार्क सी, या तज्ञाने त्याच्या 'Ecology and Environmental management 'या ग्रंथात इसवी सन 1980 ला पर्यावरणाची व्याख्या केली "विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी मानवाला वेढणारी नैसर्गिक किंवा सांस्कृतिक परिस्थितीची एकात्मिक अवस्था असते तिलाच पर्यावरण असे म्हणतात .
"("Environment refers to the sum total of condition which surrounded man at a given point in space and time.")
जॅकी स्मिथ (Jackie Smith), "सजीवांचे अनुभवलेल्या प्राकृतिक, रासायनिक व जैविक परिस्थितीची गोळाबेरीज म्हणजे पर्यावरण .त्यात हवामान ,मृदा ,जल ,प्रकाश आसपासच्या वनस्पती ,सजीवांच्या स्वतःच्या जातीचे अन्य सदस्य तसेच इतर सजीव जातींचे सदस्य यांचा समावेश होतो ,पर्यावरणाची स्थिती, दिवसाची वेळ ,ऋतु हवास्थिती व अन्य घटकानुसार बदलते.
" 'Environment means the sum of physical, chemical and biological condition experienced by an organism ,including climate, water,soil,light neighbouring vegietation, individuals of its own sort and members of the species .Environment conditions vary according to the time of the day, season, weather and other factors.'
x x
सर्वसामान्यपणे पर्यावरण ही संकल्पना निसर्ग या अर्थाने ही रूढ झाली. त्यामुळे ही प्राकृतिक आणि जैविक संकल्पना आहे. ज्यामध्ये पृथ्वीवरील जैविक व अजैविक घटकांचा समावेश होतो.
जैविक घटकांचे पृथ्वीतलावरील अस्तित्व निसर्ग नियमांनी बद्ध अशा संतुलित परीससंस्थावर अवलंबून आहे.
अशा विविध परिसंस्थातील समतोल निसर्ग नियमावर आधारित होत असतो. परिसंस्थांचा समतोलाचा व मानवी हस्तक्षेपाचा वापर पर्यावरण शास्त्राचा अभ्यास होतो.
पर्यावरणातील मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे प्रदूषण ,नागरीकरण, ऊर्जेचा क्षय ,वृक्षतोड ,अवर्षण, ओझोन क्षय इत्यादी सारख्या भयानक समस्या निर्माण झाल्या आहेत.
View, comments and Share


9 Comments
नंबर 1
ReplyDeleteInformative
ReplyDeleteGreat info.
ReplyDeleteखूप छान माहिती मिळत���� आहे धन्यवाद सर��
ReplyDeleteVery beautiful blog
ReplyDeleteInteresting information
ReplyDeleteखूप छान माहिती सर
ReplyDeleteKharch Khup information bhetat aahe Thnx Sir
DeleteNice Sir🎉
ReplyDelete