Subscribe Us

header ads

Environmental Public Awareness पर्यावरणविषयक जनजागृती भाग-3

 पर्यावरणविषयक जनजागृतीची गरज भाग-3

Need for Environmental Public Awareness


पर्यावरण विषयक जागतिक जनजागृती परिषद

Environmental Public Awareness World Organizations

1. पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद


(First Environmental World Organization)

आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक "पहिली जागतिक परिषद "5 जून 1972 मध्ये स्वीडनमधील "स्टॉकहोम "या शहरात झाली या परिषदेत अनेक लहान मोठ्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यात पर्यावरणीय प्रदूषण औद्योगिक व रासायनिक प्रदूषण, हरितगृह परिणाम, ओझोन वायूचा क्षय ,आम्लपर्जन्य अशा विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यामुळे संपूर्ण जगात पर्यावरण चळवळीला चालना मिळाली .संयुक्त राष्ट्रसंघाने देखील पर्यावरण संरक्षणासाठी विविध कार्य सुरू केले उदा. युनेपद्वारा (UNEP)पर्यावरण अभ्यास व संशोधनाला चालना देण्यात आली. लोकसंख्या नैसर्गिक साधन संपत्ती हवामान, मृदा व्यवसाय इत्यादी बाबतच्या मानवी हस्तक्षेप बाबत सर्वेक्षणाला चालना मिळाली .हवामान बदलाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली. सागर प्रदूषण नियंत्रण विषयी आंतरराष्ट्रीय कायद्याचे निर्मिती व अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे जागतिक स्तरावर पर्यावरण विषयक जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाली.

X X

2. वसुंधरा शिखर परिषद

(Vasundhara Summit Organization)

वसुंधरा शिखर परिषद ही 3 जून ते 14 जून 1992 या कालावधीत ब्राझीलमधील" रिओडी जानेरो "या शहरात संपन्न झाली. या परिषदेमध्ये संपूर्ण जगातील लहान-मोठ्या 156 राष्ट्रांनी सहभाग घेतला या परिषदेत पर्यावरण विषयक विविध घटकांची चर्चा झाली पर्यावरण व नैसर्गिक संपदेचा विकास यावर चर्चा होऊन नैसर्गिक संपत्तीच्या वापराबाबत एक नवी दृष्टी देण्यात आली. यात मानव आणि पर्यावरण यांच्या अनुषंगाने खालील घटकावर चर्चा झाली.

1.उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर आणि वापराच्या पद्धती.

2.मानवी विकासाची पर्यावरणीय दृष्टीने छाननी करणे.

3. पृथ्वीवरील सतत बदलणाऱ्या हवामानाची चिकित्सा करणे.

4. जीव समूहाच्या अस्तित्वाचा प्रश्न अभ्यासणे.

5. प्रदूषण नियंत्रणाचे प्रभावी मार्ग कोणते अवलंबवायाचे.

6. मानवी जीवन पद्धतीची समीक्षा करणे.

7. उत्पादनाच्या पद्धतीत संवर्धन तत्त्वावरील गतिमानता.

X X

8.पृथ्वी संरक्षण निधीची उभारणी व त्यातून राष्ट्रा -राष्ट्रांमधील पारंपारिक तंत्रज्ञानाची सुलभ देवाणघेवाण करणे.

9. पर्यावरणाबरोबरच विश्वबंधुत्वाची भावना जनमानसात रुजविणे.

10. जागतिक विकसित राष्ट्रांनी पर्यावरणविषयक जास्तीत जास्त जबाबदारी उचलणे.

11. वैज्ञानिक चाचण्या ,अनुबॉम्ब निर्मिती, अनुस्फोट  चाचण्या ,प्रलयकारी शास्त्रांचा वापर याविषयी नियंत्रक उपाययोजना कार्यान्वित करणे.

X X

पर्यावरण शास्त्राचे इतर विद्याशाखांची असणारे संबंध

Relationship between Environmental Science and other Branches

पर्यावरणशास्त्राचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय व बहुविद्याशाखिय आहे. बहुतेक नैसर्गिक व सामाजिक शास्त्रांमध्ये पर्यावरण शास्त्राचा समावेश होतो. तसेच बहुतेक विद्याशाखा आणि शास्त्रांमध्ये पर्यावरण शास्त्राचा अभ्यास वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो .याच्या अभ्यासामध्ये पर्यावरण आणि मानव हा विषय मध्यवर्ती असला .तरी ह्याच्या अभ्यासाचा समावेश नैसर्गिक शास्त्राप्रमाणे समाजशास्त्र, अर्थशास्त्र, व्यापार शास्त्र, राज्यशास्त्र, इ.  सामाजिक शास्त्रांमध्ये करण्यात आलेला आहे.

पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासातील प्रदूषण हा एक अभ्यास घटक विचारात घेतला तर त्याचे अध्ययन पर्यावरण भूगोल, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ,प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र ,सूक्ष्मजीवशास्त्र, मृदा शास्त्र, सागर शास्त्र ,वातावरण शास्त्र, शरीरक्रिया शास्त्र व आरोग्यशास्त्र अशा अनेक शास्त्रांमध्ये केले आहे.







Comment and share.........

Post a Comment

5 Comments