भाग 2
इयत्ता 12 बारावी (विज्ञान) शाखेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी.
मागील भागात आपण इयत्ता 12 बारावी (विज्ञान) शाखेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी पुढील शिक्षणासाठी सांगितल्या त्यात बारावी( विज्ञान )मध्ये (फिजिक्स ,केमिस्ट्री ,बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स )विषय घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्याला आपण (जनरल सायन्स) असं म्हणतो.
आज आपण 12 बारावी (विज्ञान )शाखेत (फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी )विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खालील प्रमाणे शिक्षणाच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. ह्या ग्रुप ला आपण (बायलॉजी ग्रुप )असं सुद्धा संबोधतो. जनरल सायन्स मधील बरेच कोर्सेस ला बायोलॉजी ग्रुप च्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेता येतात ज्या विषयाला मॅथेमॅटिक्स ची आवश्यकता आहे असे विषय सोडून.
x x
1. 12 बारावी (विज्ञान) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नीट, एम्स, जीपमर, आर्मी मेडिकल कॉलेज (NEET/AIIMS/JIPMER/AFMC) सीईटी परीक्षेच्या माध्यमातून आपणास मेरिट बेसवर आपण खालील प्रमाणे कोर्सला प्रवेश घेऊ शकतो.
1.एम .बी .बी .एस .(MBBS)ॲलोपॅथी चार वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी सीईटी च्या माध्यमातून एम .एस. /एम.डी .(MS/MD)हे कोर्स करता येतात किंवा पदवी प्राप्त झाल्यानंतर डिप्लोमा कोर्स ही करता येतात व त्यातून सरकारी नोकरी मध्ये किंवा स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय करता येतो सध्या विविध प्रकारच्या तज्ञ डॉक्टरांची खूप मोठी आवश्यकता आहे.
x
2.बी. ए .एम .एस .(BAMS)आयुर्वेद मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर एम.डी .(MD)विशेष तज्ञ विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी करता येते. भारतीय आयुर्वेद पद्धत खूप जुनी आहे व तिचा खूप मोठा चांगला परिणाम भारतीय औषध व चिकित्सा परंपरेतून भारित भारतीयांना अवगत आहे.
3.बी .एच. एम .एस .(BHMS)होमिओपॅथी मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर एम.डी .(MD)ही होमिओपॅथिक मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण करता येते.
4.बी.डी.एस .(BDS)दंत शास्त्र यानंतर एम.डी.एस.(MDS) ही पदव्युत्तर पदवी दंत शास्त्र या विषयावर प्राप्त करता येते.
5.बी. व्ही .एससी. (B.V.Sc)व्हेटर्नरी सायन्स पदवी घेतल्यानंतर एम .व्ही .एससी (M.V.Sc.)ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करून सरकारी नोकरी किंवा मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक म्हणून काम करता येते.
6.डी. फार्मा, बी. फार्मा.(D Pharm../B.Pharm.) फार्मासिटिकल डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स पूर्ण करून एम. फार्मा(M.Pharm.). ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करून एमबीए(MBA) केल्यास ोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ नोकर्या मिळू शकतात.
7.बी.एस्सी .(B.Sc.)नर्सिंग होम सायन्स हा पदवी कोर्स करून आपण सरकारी नोकरी किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारचे नोकरी प्राप्त करू शकतो.
8. बी.एससी .(B.Sc.)बायोटेक्नॉलॉजी ,मायक्रोबायोलॉजी, फिशरी सायन्स, जनरल जनरल सायन्स चे विषय मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर एम. एससी.(M.Sc.) आणि त्यानंतर सेट नेट पीएच.डी.(SET/NET/Ph.D.) करून प्राध्यापक क्षेत्रात किंवा संशोधन क्षेत्रात काम करता येते.
9. एन डी ए (NDA) नॅशनल डिफेन्स अकॅडमी ची सीईटी परीक्षा दिल्यानंतर भारतीय संरक्षण दलातला कोर्स पूर्ण केल्यानंतर कॅप्टन या पदावर आपली नेमणूक होऊ शकते.
x x
10. 12 बारावी (विज्ञान ) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पाच वर्षाचा प्लॅनिंग अँड डिझायनिंग हा पदवी कोर्स करू शकतात किंवा तीन वर्षाचा टेक्निकल एंट्री इन इंडियन आर्मी हा कोर्स सुद्धा करता येतो.
11. 12 बारावी (विज्ञान )उत्तीर्ण विद्यार्थी तीन ते चार वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंट पदवी कोर्स सुद्धा करू शकतात व एक ते दोन वर्षाचा फिल्म अँड टेलिव्हिजन डिप्लोमा ,फिल्म एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, फिल्म प्रोसेसिंग , जॉब इन फिल्म प्रोडक्शन ,ॲनिमेशन डिप्लोमा किंवा पदवी कोर्स करू शकतात.
विद्यार्थी मित्रहो वरील भाग 1 आणि भाग 2 बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती शैक्षणिक संधी कोणती कोणती आहे ही नमूद केलेली आहे वरील माहिती आवडल्यास कॉमेंट्स आणि शेअर करा.
Please comments and share......
5 Comments
बेस्ट
ReplyDeleteNo 1 sir
ReplyDeleteVery good
ReplyDeleteGood
ReplyDeleteVery good
ReplyDelete