Subscribe Us

header ads

Isaac Newton: A storm and the laws of motion-3

 भाग 3

आयझॅक न्यूटन:  एक वादळ आणि गतीचे नियम - भाग 3

Isaac Newton: A storm and the laws of motion-3




न्यूटनच्या प्रयोग करण्याच्या पद्धती खूपच विचित्र आणि अघोरी असायच्या सूर्याकडे एकटक बघन सुईसारख्या गोष्टी डोळ्यात खूपच अशा तर्‍हेचे अघोरी प्रयोग परिणाम जाणून घेण्यासाठी करत असे आणि त्याला मग अनेक दिवस डोळे ठीक होण्यासाठी अंधाऱ्या खोलीत कोंडून बसावे लागेल. त्याला एका माणसाने लोलक दाखवला खूप मोठी किंमत सांगितली व त्याने तो लोलक विकत घेतला .खूप मोठया किमतीला घेतल्यामुळे लोक त्याला वेड्यात काढत होते. पण न्यूटनला आपण हे काय करतोय हे पूर्णपणे माहित होतं. 

x x

प्रकाशावर संशोधन केले आणि लोलकातून बाहेर पडणाऱ्या वेगवेगळ्या रंगाविषयी विस्तृत लिहिल. पण ते प्रकाशित मात्र केले नाही .पूर्वीच्या विज्ञान जगतावर अरिस्टोटल चा खूपच प्रभाव होता .तो म्हणे प्रकाश हा एकजिनसी आहे. न्यूटन मात्र प्रकाश किरण लोलकातून सोडला तेव्हा त्याला त्याचं अनेक रंगात विभाजन झालेला आढळले. यावरून असे स्पष्ट होते कि प्रकाश हा एक जन्सी मुळीच नाही .त्याने प्रकाशावर संशोधन केलं. त्याने लिहिलेले पुस्तक मेणबत्ती पडून जळाले होते. 

पण जिद्दीने त्याने 1704 मध्ये पुन्हा लिहून ते प्रकाशित केले. न्यूटन लिहून ठेवलेली संशोधन प्रकाशित केली नव्हती पण त्याने जुलै 1687 मध्ये लॅटिन भाषेत 'प्रिन्सिपिया' हे पुस्तक प्रसिद्ध केलं आणि विज्ञानाचा चेहरामोहराच बदलून गेला. हे पुस्तक खूपच कमी लोकांना कळत होतं कारण ते खूप अवघड लिहिलेलं होतं .पुस्तक अवघड असले तरी ते खपाव असे न्यूटनला वाटे .

x x

त्याने त्याच्यासाठी प्रचारही केला त्याच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी ते पुस्तक इंग्रजी भाषेत छापण्यात आलं. 'गृहिणी साठी न्यूटनचे सिद्धांत' अशा शिषकांच्ची पुस्तक लोकप्रिय व्हायला लागली. त्यानंतर त्याने 'ऑब्झर्वेशन ऑफ द प्रोफेसिज 'हे पुस्तक खूप गाजलं कारण ते सोप्या भाषेत लिहिले होतं. प्रिन्सिपिया वर सगळ्यात चांगलं 400 पानी पुस्तक हे भारतीय नोबेल पारितोषिक विजेते एस.चंद्रशेखर यांनी लिहिले ते 1995 सली प्रसिद्ध केले.

प्रिन्सिपिया न्यूटन गुरुत्वाकर्षणा विषयी गतीचे तीन नियम आणले होते. 

पहिल्या नियमाप्रमाणे कुठलीही वस्तू जोपर्यंत बाहेरून कुठला जोर (फोर्स) कोणी लावत नाही तोपर्यंत आहे त्या स्थितीतच राहते किंवा सरळ रेषेत प्रवास करीत राहते.

x

दुसऱ्या नियमाप्रमाणे कुठल्याही वस्तूतील प्रवेग( एकसिल रेशन )हा त्यावर लावलेल्या जोराच्या ( फोर्सच्या) प्रमाणात बदलतो. आणि 

तिसऱ्या नियमाप्रमाणे क्रिया '( ॲक्शन) प्रतिक्रिया (रिएक्शन )हे समानच असतात म्हणजे आपण भिंतीवर बोट दाबलं तर त्या बोटामुळे भिंतीवर जोर पडतो तेवढा जोर त्या बोटावर भिंतीमुळे पडतो.



क्रमश...............


View, Comments and share,..............

Post a Comment

3 Comments