डिसेंबर 29 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
29 डिसेंबर 1790 रोजी "मानसिक कॅल्क्युलेटर" म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गणितज्ञ थॉमस फुलर यांचा मृत्यू झाला. थॉमस फुलर हा एक आफ्रिकन गुलाम होता. जो त्याच्या गणितातील कौशल्यांसाठी ओळखला जातो. त्याला आफ्रिकेत गोऱ्या गुलामांनी पकडले आणि 1724 मध्ये तो फक्त 14 वर्षांचा असताना यूएसएला पाठवला.तो गणितात इतका हुशार होता, तो अकल्पनीय गणिते करू शकत होता. एके दिवशी जेव्हा त्यांनी त्याला विचारले की दीड वर्षात किती सेकंद आहेत, तेव्हा त्याने अंदाजे दोन मिनिटांत उत्तर दिले, 47304000. निर्मूलनवादी आणि गोरे परोपकारी यांनी त्याच्या प्रतिभेचा पुरावा म्हणून केला की काळे गुलाम बुद्धिमत्तेत गोऱ्यांच्या बरोबरीचे आहेत. थॉमस फुलर, एक महान गणितज्ञ होता,
29 डिसेंबर 1889 रोजी मुंबई येथे मुंबई काँग्रेसचे अधिवेशन संपताच त्याच मंडपात तिसरी सामाजिक परिषद भरली. या परिषदेला चार हजार श्रोते उपस्थित होते. या परिषदेत विधवा केशवपणास बंदी असावी.असा ठराव श्री. सुब्रमण्यम अय्यर यांनी मांडला. पंडिता रमाबाई यांनी त्यास अनुमोदन देणारे भाषण केले. त्यात त्यांनी ही प्रथा बंद करण्याचे कळकळीचे आव्हान केले होते.
X X
29 डिसेंबर 1948 रोजी काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात भाषावार प्रांत रचनेचे साठी नियुक्त केलेल्या "दार कमिशन" चा अहवाल नाकारला व भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा पुन्हा अभ्यास करण्यासाठी नवीन समिती नेमली या समितीमध्ये जवाहरलाल नेहरू ,वल्लभभाई पटेल आणि पट्टाभिसीतारामय्या यांचा समावेश होता. या तीन सदस्यांच्या अद्यआक्षरावरून ही समिती ओळखली जाते. तिघेही संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला अनुकूल नव्हते.
29 डिसेंबर 1953 रोजी भारत सरकारने न्यायमूर्ती एस. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली "राज्य पुनर्रचना आयोग" ची स्थापना केली. या आयोगाचे सदस्य म्हणून हृदयनाथ कुंझरू व सरदार के.एम. पनिकर यांची नियुक्ती केली.
X X
29 डिसेंबर 1845 रोजी टेक्सास हे अमेरिकेचे 28 वे राज्य बनले.
29 डिसेंबर 1930 रोजी सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.
29 डिसेंबर 1959 रोजी नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
29 डिसेंबर 1959 रोजी पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
29 डिसेंबर 1972 रोजी कोलकता मध्ये मेट्रो रेल्वे च्या कामाला आजच्या दिवशी सुरुवात झाली.
29 डिसेंबर 1983 रोजी भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीस विरुद्ध 236 रन बनविले, तेव्हा हा स्कोर कसोटी सामन्यामधील सर्वात जास्त होता.
X X
29 डिसेंबर 2006 रोजी चीन ने राष्ट्रीय सुरक्षेसाठी श्वेत पत्र जारी केले.
29 डिसेंबर 2012 रोजी पाकिस्तान मध्ये पेशावर जवळ आतंकवादी हल्यात 21 सुरक्षाकर्मी मरण पावले.
X X
29 डिसेंबर 1800 रोजी चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक यांचा जन्म झाला. 1 जुलै 1860 रोजी यांचे निधन झाले.
29 डिसेंबर 1808 रोजी अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे 17 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म झाला. 31 जुलै 1875 रोजी यांचे निधन झाले.
29 डिसेंबर 1809 रोजी ब्रिटीश पंतप्रधान विल्यम ग्लँडस्टोन यांचा जन्म झाला.
29 डिसेंबर 1844 रोजी कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्म झाला.
29 डिसेंबर 1900 रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते यांचा जन्म झाला. 24 एप्रिल 1942 रोजी यांचे निधन झाले.
X
29 डिसेंबर 1904 रोजी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी यांचा जन्म झाला. 11 नोव्हेंबर 1994 रोजी यांचे निधन झाले.
29 डिसेंबर 1917 रोजी रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते यांचा जन्म झाला. 12 डिसेंबर 2005 रोजी यांचे निधन झाले.
29 डिसेंबर 1921 रोजी फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष डोब्रिका कोसिक यांचा जन्म झाला. 18 मे 2014 रोजी यांचे निधन झाले.
X X
29 डिसेंबर 1942 रोजी राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि राज्यसभेचे सदस्य यांचा जन्म झाला. 18 जुलै 2012 रोजी यांचे निधन झाले.
29 डिसेंबर 1974 रोजी अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांचा जन्म झाला.
29 डिसेंबर 1960 रोजी ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड बून यांचा जन्म झाला.
29 डिसेंबर 1967 रोजी पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, 1955 मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित यांचे निधन झाले. 24 जून 1897 रोजी यांचा जन्म झाला.
29 डिसेंबर 1971 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन झाले.
29 डिसेंबर 1980 रोजी भारतीय चित्रपट निर्माते नंदुभाई वकील यांचे निधन झाले.
29 डिसेंबर 1986 रोजी हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान यांचे निधन झाले. 10 फेब्रुवारी 1894 रोजी यांचा जन्म झाला.
X X
29 डिसेंबर 2008 रोजी प्रसिद्ध चित्रकार मंजीत बावा यांचे निधन झाले.
29 डिसेंबर 2012 रोजी टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक यांचे निधन झाले. 6 आक्टोबर 1946 रोजी यांचा जन्म झाला.
29 डिसेंबर 2013 रोजी भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती यांचे निधन झाले. 17 फेब्रुवारी 1951 रोजी यांचा जन्म झाला.
29 डिसेंबर 2014 रोजी भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी हरी हरिलेला यांचे निधन झाले. 10 ऑगस्ट 1922 रोजी यांचा जन्म झाला.
29 डिसेंबर 2015 रोजी पंजाबचे 25 वे राज्यपाल ओमप्रकाश मल्होत्रा यांचे निधन झाले. 6 ऑगस्ट 1922 रोजी यांचा जन्म झाला.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/09/december-28-day-of-special-dinvishesh-28.html
👆
Day of Special (Dinvishesh) -December 28
डिसेंबर 28 : दिनविशेष
X X
X X
X X
View, Comments and Share...........
X X
X X
X X
View, Comments and Share...........
0 Comments