August 21 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 21 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
International Day Of Remembrance And Tribute To The Victims
Internet Self-Care Day
World Senior Citizen’s Day
21 ऑगस्ट 1934 रोजी गहुली ता. पुसद जि. यवतमाळ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव राजुसिंग नाईक यांचा जन्म झाला.
21 ऑगस्ट 2016 रोजी पुणे येथे पुण्यभूषण फाउंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार सन 2016 चा समाजवादी नेते भाई वैद्य यांना संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
21 ऑगस्ट 2017 रोजी भारत सरकारने "आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना" ची सुरुवात केली.
X X
21 ऑगस्ट 1841 रोजी जॉन हॅम्प्टन यांनी व्हेनेशियन शैलीच्या खिडकीचे पेटंट केले.
21 ऑगस्ट 1888 रोजी विल्यम बरोज याने बेरजा मारणार्या यंत्राचे पेटंट घेतले.
21 ऑगस्ट 1911 रोजी पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे ’मोनालिसा’ हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
21 ऑगस्ट 1915 रोजी पहिल्या महायुद्धा दरम्यान इटलीने तुर्की विरुद्ध युद्धाची घोषणा केली.
21 ऑगस्ट 1938 रोजी इटली देशांतील शाळांमध्ये ज्यू शिक्षकांवर बंदी घालण्यात आली.
21 ऑगस्ट 1965 रोजी रोमानियाने संविधान स्वीकारले.
21 ऑगस्ट 1972 रोजी वन्यजीव संरक्षण कायद्यास मान्यता मिळाली.
X X
21 ऑगस्ट 1988 रोजी भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर आलेल्या तीव्र स्वरूपाच्या भूकंपामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले.
21 ऑगस्ट 1991 रोजी लाटव्हियाने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.
21 ऑगस्ट 1993 रोजी मंगळाच्या शोधमोहिमेसाठी पाठवण्यात आलेल्या ‘मार्स ऑब्झर्व्हर’ या यानाचा पृथ्वीशी (NASA) संपर्क तुटला.
21 ऑगस्ट 1765 रोजी विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 जून 1837 मध्ये झाला.
21 ऑगस्ट 1789 रोजी ऑगस्टिन कॉशी – फ्रेन्च गणितज्ञ यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 23 मे 1857 रोजी झाला.
X X
21 ऑगस्ट 1871 रोजी गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 नोव्हेंबर 1935 मध्ये झाला.
21 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 सप्टेंबर 1981 मध्ये झाला.
21 ऑगस्ट 1907 रोजी भारतीय वकील आणि राजकारणी पी. जीवनवंश यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 जानेवारी 1965 मध्ये झाला.
21 ऑगस्ट 1909 रोजी नागोराव घन:श्याम तथा ‘ना. घ.‘ देशपांडे – कवी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 मे 2000 मध्ये झाला.
21 ऑगस्ट 1910 रोजी नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार चा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 फेब्रुवारी 1992 मध्ये झाला.
21 ऑगस्ट 1915 रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कादंबरीकार, लघुकथा लेखक, आणि चित्रपट निर्माता इस्मत चुग़ताई यांचा जन्म झाला.
X X
21 ऑगस्ट 1922 रोजी अमेरिकन खजिनदार शोधक आणि मेल फिशर मरीन हेरिटेज म्युझियमचे संस्थापक मेल फिशर यांचा जन्म झाला.
21 ऑगस्ट 1924 रोजी श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 एप्रिल 2001 मध्ये झाला.
21 ऑगस्ट 1927 रोजी भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी राजकारणी आणि उत्तरप्रदेश, उडीसा आणि पश्चिम बंगाल राज्याचे माजी राज्यपाल बी. सत्य नारायण रेड्डी यांचा जन्म झाला.
21 ऑगस्ट 1934 रोजी सुधाकरराव नाईक – प्रसिद्ध भारतीय राजकारणी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य तसचं, महाराष्ट्र राज्याचे माजी 13 वे मुख्यमंत्री यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 मे 2001 मध्ये झाला.
21 ऑगस्ट 1939 रोजी बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष फेस्टस मोगे यांचा जन्म झाला.
21 ऑगस्ट 1961 रोजी व्ही. बी. चन्द्रशेखर – भारताचा फिरकी गोलंदाज यांचा जन्म झाला.
X X
21 ऑगस्ट 1971 रोजी प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि अरुणाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा जन्म झाला.
21 ऑगस्ट 1973 रोजी गूगल चे सहसंस्थापक सर्गेइ ब्रिन यांचा जन्म झाला.
21 ऑगस्ट 1981 रोजी कनेक्ट्यू चे सहसंस्थापक कॅमेरॉन विंकल्वॉस यांचा जन्म झाला.
21 ऑगस्ट 1986 रोजी उसेन बोल्ट – जमैकाचा धावपटू यांचा जन्म झाला. यांनी अनेक विश्व विक्रम आपल्या नावे केली आहेत.
21 ऑगस्ट 1931 रोजी ’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1872 मध्ये झाला होता.
21 ऑगस्ट 1940 रोजी लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1879 मध्ये झाला.
21 ऑगस्ट 1947 रोजी बुगाटी कंपनी चे संस्थापक इटोर बुगाटी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1881 मध्ये झाला होता.
X X
21 ऑगस्ट 1976 रोजी पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (cinematographer) यांचे निधन झाले.
21 ऑगस्ट 1977 रोजी प्रेमलीला ठाकरसी – एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू यांचे निधन झाले.
21 ऑगस्ट 1978 रोजी विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज यांचे निधन झाले. पहिल्या क्रमांकापासून ते अकराव्या क्रमांकापर्यंत सर्व क्रमांकांवर फलंदाजी करण्याचा विक्रम. अशी कामगिरी करणारे फक्त तीनच खेळाडू आहेत. सर्वात कमी कसोटी (23) सामन्यांमध्ये 1000 धावा व 100 बळी घेण्याचा विक्रम. हा विक्रम बरीच वर्षे अबाधित होता. पुढे इंग्लंडच्या इयान बोथम यांनी 21 कसोटी सामन्यात ही कामगिरी करून तो विक्रम मोडला. एका कसोटी सामन्यात 10 बळी घेणारे पहिले भारतीय गोलंदाज. 1956 मध्ये पंकज रॉय बरोबार न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्यांनी पहिल्या विकेटसाठी 413 धावांची भागीदारी केली. हा विक्रम 52 वर्षे अबाधित होता. नॉन स्ट्रायकर एन्डला असणारा ऑस्ट्रेलियाचा बिल ब्राऊन हा सारखा क्रीजच्या बाहेर जात असल्यामुळे मांकड यांनी त्याला धावबाद केले. बाद करण्यापूर्वी मांकड यांनी त्याला दोनदा ताकीद दिली होती. या नियमाला पुढे Mankading असे नाव पडले. 1947 चे विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1917 मध्ये झाला होता.
X X
21 ऑगस्ट 1981 रोजी आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक, गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (1928), राज्यसभा सदस्य (1952 – 1958), अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (1953), गुजराथी साहित्यपरिषदेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष (1959), हिन्दी विश्वकोश निर्मिती समितीचे सदस्य, साहित्य अकादमी पारितोषिक (1966) व फेलोशिप (1971) विजेते, पत्रकार व गुजराथी साहित्यिक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म एक डिसेंबर 1985 मध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला.
21 ऑगस्ट 1991 रोजी गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 20 एप्रिल 1914 मध्ये झाला होता.
21 ऑगस्ट 1995 रोजी सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी 1983 मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय-अमेरिकन खगोल वैज्ञानिक व गणिती यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील (Black Holes) संशोधनासाठी खर्च केला. यांचे काका सी. व्ही. रामन यांनाही भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (1930) मिळाले आहे. भौतिकशास्त्रात नोबेल मिळवणारे हे दोघेच भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील संशोधनासाठी खर्च केला. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1910 मध्ये झाला होता.
21 ऑगस्ट 2000 रोजी निर्मला गांधी – समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा यांचे निधन झाले.
21 ऑगस्ट 2000 रोजी विनायकराव कुलकर्णी – स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत यांचे निधन झाले.
X X
21 ऑगस्ट 2001 रोजी मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर यांचे निधन झाले.
21 ऑगस्ट 2001 रोजी शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार यांचे निधन झाले. त्यांचा जन्म एक नोव्हेंबर 1921 मध्ये झाला होता.
21 ऑगस्ट 2004 रोजी भारतीय उडिया भाषा कवी सच्चिदानंद राऊत यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 13 मे 1916 मध्ये झाला होता.
21 ऑगस्ट 2006 रोजी बिस्मिला खाँ – भारत रत्न, पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शहनाई वादक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 21 मार्च 1916 मध्ये झाला होता.
21 ऑगस्ट 2007 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखिका क़ुर्रतुलऐन हैदर यांचे निधन झाले.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/08/august-20-day-of-special-dinvishesh-20.html
👆
August 20 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 20 : दिनविशेष
X X
View, Comments and share..,
X X
View, Comments and share..,


0 Comments