August 18 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 18 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
आंतरराष्ट्रीय आद्यनिवासी लोक दिन
जागतिक हेलियम दिवस: 18 ऑगस्ट हा ‘जागतिक हेलियम दिवस’ म्हणून साजरा केला जातो. 1868 मध्ये या दिवशी सूर्यावर हेलियम गॅस असल्याचे निरीक्षण केले गेले. ग्रीक देव ‘हेलियस’च्या नावावरून हेलियम हे नाव पडले. सर जोसेफ नॉर्मन लॅकियर विजयदुर्ग किल्ल्यावरून सूर्यग्रहणाचे निरीक्षण करत होते. त्यामुळे हेलियमच्या शोधाचे श्रेय या जागेला जाते. नॉर्मन ज्या प्लॅटफॉर्मवरून दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण करीत होते, तो आजही साहेबाचा कट्टा म्हणून ओळखला जातो.
18 ऑगस्ट 2016 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भारतीय महिला बँक आणि स्टेट बँकेच्या तीन सहयोगी बँका ( स्टेट बँक ऑफ बिकानेर अंड जयपुर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि स्टेट बँक ऑफ त्रावणकोर)विलीन करण्यास भारतीय स्टेट बँक मंजुरी दिली.
18 ऑगस्ट 1800 रोजी ब्रिटीश कालीन भारतात कलकत्ता या ठिकाणी (Richard Wellesley) यांनी फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली.
X X
18 ऑगस्ट 1841 रोजी जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना
18 ऑगस्ट 1868 रोजी फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ ज्यूलस जानसेन (Pierre Janssen) यांनी हेलियम वायूचा शोध लावला.
18 ऑगस्ट 1920 रोजीअमेरिकेच्या संविधानात 19 वा बदल झाला आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. पुरुषांच्या सोबत आपल्यालाही मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी अमेरिकेतल्या स्त्रियांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आणि 18 ऑगस्ट 1920 साली अमेरिकेतल्य स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.
18 ऑगस्ट 1942 रोजी शेरपूर येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या एका समुहाने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.
X X
18 ऑगस्ट 1945 रोजीइंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्ष पदावर सुकारणो हे कार्यरत झाले.
18 ऑगस्ट 1949 रोजी हंगेरी राष्ट्राने प्रजासत्ताक राष्ट्राची घटना स्वीकारली.
18 ऑगस्ट 1951 रोजी पहिल्या पंचवार्षिक योजणे दरम्यान पश्चिम बंगाल मधील खडगपूर येथे भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली.
18 ऑगस्ट 1958 रोजी बांग्लादेश चे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.
18 ऑगस्ट 1963 रोजी जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
18 ऑगस्ट 1999 रोजी कोणताही गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या अथवा कोणत्याही कारणासाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
18 ऑगस्ट 2005 रोजी ईंडोनेशियाच्या जावा बेटावर वीज गेल्यामुळे 10 कोटि लोक अंधारात
18 ऑगस्ट 2008 रोजीहक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
X X
18 ऑगस्ट 2018 रोजी इमरान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडून आले.
18 ऑगस्ट 1700 रोजी थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म झाला. यांचा मृत्यू 28 एप्रिल 1740 मध्ये झाला.
18 ऑगस्ट 1734 रोजी रघुनाथराव पेशवा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 डिसेंबर 1783 मध्ये झाला.
18 ऑगस्ट 1792 रोजी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेल यांचा जन्म झाला.
18 ऑगस्ट 1872 रोजी ’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 ऑगस्ट 1931 मध्ये जाणार.
18 ऑगस्ट 1886 रोजी सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 नोव्हेंबर 1959 मध्ये झाला.
18 ऑगस्ट 1900 रोजी विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी (मृत्यू: 1 डिसेंबर 1990). संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित यांचा आज जन्मदिवस आहे. विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म 18 ऑगस्ट 1900 रोजी झाला. त्या पंडित नेहरुंच्या भगिनी होत्या. 1953 ते 1954 या काळात त्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या आठव्या अध्यक्षा होत्या.
X X
18 ऑगस्ट 1923 रोजी सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 जून 1955 मध्ये झाला.
18 ऑगस्ट 1934 रोजी संपूर्ण सिंग कालरा ऊर्फ ’गुलजार’ – गीतकार, कवी, लेखक व दिग्दर्शक यांचा जन्म झाला.
18 ऑगस्ट 1936 रोजी रॉबर्ट रेडफोर्ड – हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी आणि दानशूर यांचा जन्म झाला.
18 ऑगस्ट 1956 रोजी संदीप पाटील – धडाकेबाज फलंदाज यांचा जन्म झाला.
18 ऑगस्ट 1967 रोजी दलेर मेहंदी – भांगडा गायक / पंजाबी पॉप गायक यांचा जन्म झाला.
18 ऑगस्ट 1227 रोजी मंगोल सम्राट चंगीझ खान यांचे निधन झाले.
18 ऑगस्ट 1850 रोजी फ्रेंच लेखक ऑनोरे दि बाल्झाक यांचे निधन झाले.
18 ऑगस्ट 1886 रोजी मॉर्टिस लॉक चे शोधक एली व्हिटनी ब्लेक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1795 मध्ये झाला होता.
18 ऑगस्ट 1919 रोजी सीग्राम कंपनीचे संस्थापक जोसेफ ई. सीग्राम यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1841 मध्ये झाला होता.
X X
18 ऑगस्ट 1940 रोजी वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 2 एप्रिल 1875 मध्ये झाला.
18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसा राज्यातील कटक या ठिकाणी झाला होता.
18 ऑगस्ट 1979 रोजी वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक यांचे निधन झाले.1 जुलै 1913 रोजी गहुली ता. पुसद जि. यवतमाळ येथे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म झाला. यांचा जन्मदिन हा महाराष्ट्र राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
18 ऑगस्ट 1990 रोजी प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार, प्रचारक व सरस्वती पत्रिकेचे संपादक तथा पत्रकार श्री नारायण चतुर्वेदी यांचे निधन झाले.
18 ऑगस्ट 1998 रोजी पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1948 मध्ये झाला होता.
18 ऑगस्ट 2008 रोजी नारायण धारप – रहस्यकथाकार यांचे निधन झाले. यांचा जन्म 27 ऑगस्ट 1925 मध्ये झाला होता.
18 ऑगस्ट 2009 रोजी दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांचे निधन झाले.
18 ऑगस्ट 2012 रोजी भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन यांचे निधन झाले.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/08/august-17-day-of-special-dinvishesh-17.html
👆
August 17 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 17 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/01/23.html
👆
नेताजी सुभाषचंद्र बोस: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते
18 ऑगस्ट: स्मृतीदिन
XX
View, Comments and share....


0 Comments