Subscribe Us

header ads

August 17 - Day of Special (Dinvishesh) ऑगस्ट 17 : दिनविशेष

August 17 - Day of Special (Dinvishesh)

ऑगस्ट 17 : दिनविशेष



महत्त्वाच्या घटना

17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत आग्राच्या तुरुंगातून निसटले आणि 91 दिवसांच्या प्रवासानंतर महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर पोहोचले. शिवाजीने आपली आई जिजाबाईंना राज्याचे संरक्षक बनवले आणि 5 मार्च 1666 रोजी औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला रवाना झाले. 9 मे 1666 रोजी शिवाजी आग्राच्या बाहेरील भागात पोहोचले होते, जिथे त्या वेळी औरंगजेबाचा दरबार होता. विविध इतिहासकारांनी दिलेल्या वर्णनांवरून ते किती मोठे कार्य होते हे लक्षात येते.

17 ऑगस्ट 1836 रोजी जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे, अशी सक्ती करणारा ‘रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅंक्ट’ ब्रिटिश संसदेने मान्यता दिल्याने अमलात आला. पुढे हा सर्व ब्रिटिश वसाहतींना लागू करण्यात आला आणि 1537 पासुन त्याची अंमलबजावणी सुरू झाली.
X X
17 ऑगस्ट 1945 रोजी ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य मिळाले.

17 ऑगस्ट 1953 रोजी नार्कोटिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.

17 ऑगस्ट 1982 रोजी पहिली सी. डी. (Compact Disk) जर्मनीमधे विकण्यात आली.


17 ऑगस्ट 1988 रोजी पाकिस्तानचे 6 वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नॉल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.


17 ऑगस्ट 1997 रोजी उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा ’नॅशनल हेरिटेज’ पुरस्कार जाहीर करण्यात आला.

17 ऑगस्ट 2008 रोजी एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.

X X
17 ऑगस्ट 1761 रोजी पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 9 जून 834 मध्ये झाला.

17 ऑगस्ट 1844 रोजी इथियोपियाचा सम्राट मेनेलेक (दुसरा) यांचा जन्म झाला.


17 ऑगस्ट 1866 रोजी मीर महबूब अली खान – हैदराबादचा सहावा निजाम याचा जन्म झाला. त्याचा मृत्यू 29 ऑगस्ट 1911 मध्ये झाला.

17 ऑगस्ट 1888 रोजी गुरुवर्य बाबूराव गणपतराव जगताप – बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे संस्थापक (1918), पुण्याचे महापौर (1962) यांचा जन्म झाला.

17 ऑगस्ट 1893 रोजी मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती तिचा जन्म झाला. तिचा मृत्यू 22 नोव्हेंबर 1980 मध्ये झाला.



17 ऑगस्ट 1905 रोजी शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 10 डिसेंबर 1964 मध्ये झाला.


17 ऑगस्ट 1916 रोजी डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 ऑगस्ट 1975 मध्ये झाला.


17 ऑगस्ट 1916 रोजी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक लेखक व साहित्य क्षेत्रांतील उत्कृष्ट कादंबरीकार अमृतलाल नागर यांचा जन्म झाला.
X X
17 ऑगस्ट 1926 रोजी जिआंग झिमिन – चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना चे मुख्य सचिव यांचा जन्म झाला.

17 ऑगस्ट 1932 रोजी व्ही. एस. नायपॉल – नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक यांचा जन्म झाला.

17 ऑगस्ट 1941 रोजी भारतीय राजकारणी भीम सिंग यांचा जन्म झाला.

17 ऑगस्ट 1941 रोजी भारतीय रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांचा जन्म झाला.

17 ऑगस्ट 1944 रोजी ओरॅकल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक लैरी एलिसन यांचा जन्म झाला.


17 ऑगस्ट 1949 रोजी निनाद गंगाधर बेडेकर – महाराष्ट्रीयन मराठी भारतीय इतिहासकार, लेखक आणि वक्ते यांचा जन्म झाला.

17 ऑगस्ट 1970 रोजी जिम कुरिअर – जगातील पहिल्या क्रमांकाचे माजी अमेरिकन व्यावसायिक टेनिसपटू यांचा जन्म झाला.

17 ऑगस्ट 1972 रोजी हबीब उल बशर – माजी बांगलादेश क्रिकेटपटू व कर्णधार काझी यांचा जन्म झाला.

17 ऑगस्ट 1304 रोजी जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन झाले.
X X
17 ऑगस्ट 1850 रोजी पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1778 मध्ये झाला होता.


17 ऑगस्ट 1909 रोजी भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची हत्या करणारे क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 883 मध्ये झाला होता.


17 ऑगस्ट 1924 रोजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन झाले.


17 ऑगस्ट 1949 रोजी महान भारतीय क्रांतिकारक व स्वतंत्रता सेनानी तसचं, ढाका अनुशिलन समितीचे संस्थापक अध्यक्ष पुलिन बिहारी दास यांचे निधन झाले.

17 ऑगस्ट 1982 रोजी “भारतातील सर्वात प्रसिद्ध ख्रिश्चन हिंदी विद्वान” म्हणून लोकप्रिय असलेले भारतातील बेल्जियन जेसुइट मिशनरीचे धर्मगुरू व प्रसिद्ध साहित्यकार फादर कामिल बुल्के यांचे निधन झाले.

17 ऑगस्ट 1988 रोजी मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे 6 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1924 मध्ये झाला होता.

17 ऑगस्ट 2005 रोजी जॉन एन. बाहॅकल – हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1934 रोजी झाला होता.

X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/08/august-16-day-of-special-dinvishesh-16.html
👆
August 16 - Day of Special (Dinvishesh)

ऑगस्ट 16 : दिनविशेष

Visit the blog for some intresting of " General and Scientific Knowledge" for UPSC /MPSC/SSC and Other Competitive exams.

X X











View, Comments and share...

Post a Comment

1 Comments